द्राक्ष

द्राक्षबाग ही जवळपास 12 ते 14 वर्षे उत्पादन देत असते. द्राक्ष हे खुप संवेदनशील पिक आहे.
उदा. ख़त, पाणी व्यवस्थापन या पिकात घडनिर्मितीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असल्यामुळे प्रत्येक वेलीच्या मुळाजवळ एकसारख्या दाबाचे पाणी मिळणे गरजेचे होते.


आखणी 
द्राक्ष घडांचे उन्हापासून रक्षण होईल अशी रचना करा. भारी जमिनित लागन टाळावी. लागन केल्यास दोन ओळींतील अंतर जवळपास दहा फूट, तर दोन वेलींतील अंतर सहा फूट ठेवल्यास पुढील काळात अडचणी येत नाहीत.
हलक्‍या जमिनीत वाढ कमी असते, त्यामुळे उन्हापासून संरक्षण होत नाही. या गोष्टींचा विचार करता हलक्‍या जमिनीत दोन ओळींतील अंतर हे साधारणतः नऊ फूट, तर दोन वेलींतील अंतर हे जवळपास पाच फूट ठेवा. 
चर 
मुळांचा विस्तार चांगला व्हावा या दृष्टीने चरी घ्याव्यात. २ X २ फूट खोल अशी चर घ्यावी. २०० फुटांपेक्षा जास्त लांबी नसावी. चर भरताना खालची माती वर आणि वरची माती खाली घालवावी.
चर भरणे
चर 10 ते 15 दिवस उन्हात चांगली तापुन द्यावी. खालच्या एक फूटानंतर शेणखत, हिरवळीचे खत (उपलब्ध असेल तर) पसरावे. शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून चर भरा.
पाहिले पाणी मोकाट पद्धतीने दया. माती समपातळीत करून घ्या. पाणी देवून वाफसा आलेवर नर्सरी लावावी. नर्सरीकरीता रूट स्टॉक, बेंगलोर डोगरीच्, अमेरिकन डोगरीच् यापैकी एकाची निवड करावी.
कलम भरणे 
खुंटकाडी रसरशीत असणे -
1) बागेत ज्या खुंटकाडीवर आपण कलम करणार आहोत, त्या काडीवर कलम करण्याकरिता सरळ वाढणारी, सशक्त (8-10 मि.मी. जाड) आणि रसरशीत काडी असल्यास कलम यशस्वी होण्यास चांगली मदत होते.
2) खुंटकाडी रसरशीत नसेल तर कलम करण्याच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी ठिबक सिंचनाद्वारे भरपूर पाणी द्यावे.
सायन काडीची निवड -
1) कलम करण्यापूर्वी सायन काडी ही विशेषतः रोगमुक्त, सतत जास्त उत्पादन देणाऱ्या वेलीवरून परिपक्व काडी निवडा.
2) परिपक्व काडी बाहेरून पूर्ण खाकी रंगाची दिसते, काप घेतल्यानंतर त्यामधील पीथ हे पूर्णपणे तपकिरी रंगाचे दिसते.
3) द्राक्षकाडीची निवड सुरवातीस जास्त क्षेत्रामध्ये लागवड करण्यापेक्षा थोड्या वेलीवर कलम करून त्याचा अनुभव घेऊन ठरवावे.
द्राक्ष- छाटनी
छाटणीनंतर सुरवातीच्या काळात डाऊनी येतो, त्यापासून बाग वाचविण्यासाठी छाटणीचे नियोजन योग्य वेळी व्हावे. 15 ऑक्‍टोबरनंतर शक्‍यतो पाऊस पडत नाही. त्यामुळे या तारखेनंतर केलेली फळछाटणी सुरक्षित मानली जाते. रोग नियंत्रणावरही ताबा राहतो.
महत्त्वाचे मुद्दे -
- ज्या बागांची छाटणी लवकर होते, त्या बागांशेजारच्या न छाटलेल्या बागेत रोग येणार नाही याची काळजी घ्यावी.
- काडीवरील डाऊनीच्या बीजाणूंचा नायनाट करण्यासाठी पेस्टिंग करावे. यात तीन ते पाच ग्रॅम मॅन्कोझेब आणि दोन ग्रॅम सल्फर यांचे मिश्रण करावे. याद्वारे भुरीचेही नियंत्रण होण्यास मदत होईल.
- छाटणीनंतर फुटलेल्या अनेक फुटी पुढे जातात. त्या हाताने काढून टाकाव्यात. त्यामुळे रोगाचे बीजाणू वाढणार नाहीत.
पोंगा अवस्थेतील काळजी -
पोंगा अवस्थेत रोगाचा धोका जास्त असतो. पोंगा अवस्थेत पोंगा हाताने दाबून पाहावा.  पोंग्यात सकाळी पडणाऱ्या दवाचे पाणी शिरले असेल तरच फवारणी करावी.
अशावेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकांऐवजी डायथायोकार्बामेट गटातील (मॅन्कोझेब किंवा मेटीराम सारखी) बाह्यस्पर्शी बुरशीनाशक फवारले तर धोका टाळता येतो.
छाटनी ते काढनी पर्यंत द्यावयाची खते आणि औषधे फवारणी तसेच घ्यावयाची काळजी
**(TABLE ADD KARANE)
कमी खर्चाच्या नियोजनासाठी -
- डाऊनी, भुरी व करपा रोगांचे बीजाणू हवेद्वारे पसरतात. सप्टें.-ऑक्‍टो.मध्ये वारे पश्‍चिमेकडे वाहतात. त्यामुळे छाटनी पूर्वेकडून पच्छिमेकडे छाटनी करावी.
- जास्त रोग असलेली वा पानगळ झालेली बाग लवकर छाटल्यास रोगांच्या प्रसाराला आळा बसेल.
- फवारणीपूर्वी चांगले हवामान पाहूनच फवारणीचा निर्णय घ्यावा.
- शक्यतो बुरशीनाशक हे दुसरे कोणतेही रसायन न मिसळता फवारावे.
द्राक्ष फवारणी व्यवस्थापनातील काही नियमः-
1. रोग दिसन्या अगोदर फवारणी गरजेचे आहे.
2. रोग दिसल्यानतंर आंतरप्रवाही फवारणी टाळावी.
3. बुरशी सारख्या रागाचे इनाकुलाम किति हि दुरवर जाऊ शकते. (उदा. डाऊणि ५० मिटर) त्यामुळे रोगग्रस्त बागेकडे दुर्लक्ष करून फक्त चागंल्या बागेवरच लक्ष केन्द्रित करण्याचि मानसिकता टाळावी.
४. सर्व साधारण बोर्डोनिश्रन वगळता बुरशिनाशकांच्या द्रावणाचा सामु ६ ते ६.५ आम्लधर्मी ठेवावा. उदाः कार्बेन्डिझमसारखे औषधांची ७.५ pH ला विघटन होते.
५. एकावेळी एक बुरशीनाशक फवारावे.
६. पावसाळी वातावरणात स्प्रेडर किंवा स्टिकर वापरणे.
७. बागेत सुर्यप्रकाश व वारा खेळता रहावा यासाठी प्रयत्न करावा.
प्रत्येक वर्षी छाटनीपूर्वी ठिबंक सिंचनाची डिस्चार्ज, प्रेशर साठी देखभाल - दुरुस्ती करून घ्यावी.
अमोनियम स्लफेट आणी 13:0:45 एकत्र देवु नये.
नायट्रेट खते ठिबक देताना शेवटी द्यावी.
फॉस्फेरिक गटातील अन्नद्रव्या बरोबर फेरस, झिक,कॅलशियम या गटातील अन्नद्रव्य देऊ नयेत. दोन्हिचे परिणाम मिळणार नाही. (12:61:0, 0:52:34, फॉस्फरिक असिड बरोबर फेरस झिंक ,कॅलशियम सोडु नये)
मायक्रो न्यूट्रिएंट्स जमिनीतुन देणे फायदेशिर ठरते. कारण ती एक ठिकाणाहुन दुसरया ठिकाणी उपल्बध होत नाही. द्राक्षाला अंदाजे दिलेल्या खताचा उपयोग होत नाही.
या मुलद्रव्यांची कार्यक्षमता पुढीलप्रमाणे वाढवावी.
नत्र
नत्रयुक्त खते गरजेनुसार वापरुन कार्यक्षमता वाढवावी. अतिरिक्त नत्र वाया जाते.
जेणेकरून त्याची कार्यक्षमता वाढेल. आम्लयुक्त नत्र खते उदा. युरिया, अमोनियम सल्फेट ऑक्टोबर छाटणीनंतर द्यावेत. तण आणि पाणी व्यवस्थापन बरेच प्रमाणात खताची बचत करते. नत्रयुक्त खत दिल्यानंतर पाणी देवु नये किंवा पाणी दिल्यानंतर ख़त देवु नये. नत्राची पानांवरती फवारणी १- २ ग्रॅम युरिया प्रति लिटर या प्रमाणात ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस करावी. नत्र द्राक्षाला सेंद्रिय खातांद्वारेच द्यावे. कारण सेंद्रिय नत्रयुक्त खतातील नत्र द्राक्षाला हळूहळू प्रमाणात उपलब्ध होते.
स्फुरद
द्राक्षपिकास स्फुरादाचे कार्य घड निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि हरीतद्रव्यांची निर्मिती, न्युक्लिक आम्लांचे संश्लेषण यासाठी स्फुरदाची गरज असते. स्फुरदयुक्त खते मातीमध्ये मिसळू नयेत. मातीमध्ये स्फुरद सेंद्रिय खताबरोबर जेथे द्राक्षवेलीची कार्यक्षम मुले असतील तेथे टाकावे. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते व ते द्राक्षवेलीला योग्य प्रमाणात उपलब्ध होते. स्फुरदयुक्त खते जसे की डी. ए. पी १०० - २०० ग्रॅम प्रति १०० लिटर व फोस्फोरीक आम्ल ७० मिली/ १०० लि. या प्रमाणात पानांवरती फवारणी करावी. फोस्फोरीक आम्ल फर्टीगेशनद्वारे २ लिटर प्रति एकर या प्रमाणात आठवड्यातून दोन वेळा द्यावे.
पालाश
कांड्यांच्या पक्वतेसाठी व साखरेच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी पालाश आवश्यक असते. ज्या जमिनीची कॅटआयन विनिमय क्षमता जास्त असते, त्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी देऊन पाण्याचा निचरा करावा. पालाश मातीमध्ये मिसळून किंवा  फर्टीगेशनद्वारे देता येते. तसेच पालाशची पानांवरती फवारणी करून पालाशची कमतरता दूर करता येते. पालाशचा वापर करताना सल्फेट ऑफ पोटॅश
वापरावे. क्लोराईड असणारी मिश्र खते वापरू नये.
कॅल्शियम
कॅल्शियम या अन्नद्रव्याचा वपर फुलोऱ्याचे वेळी पानांवरती फवारणी करून किंवा डिपींगद्वारे द्यावित. कॅल्शियम हे मुलद्र्व्य द्राक्षवेलीत वहनीय नाही. द्राक्षवेळीमध्ये जी (व्हाईट रूटस) पांढरी मुळे असतात तीच फक्त केल्शियम शोषून घेऊ शकतात. मर्यादित पाणी, मर्यादित तापमान नसेल तर पांढरी मुळे कार्यक्षम राहत नाहीत. त्यामुळे जेव्हा जी. ए.ची फवारणी किंवा डिपींग करतो. त्यानंतर लगेच कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम क्लोराईडची पानांवरती फवारणी करावी. त्यामुळे घडकुज रोखता येते. अविद्राव्य स्थितीतील कैल्शियम द्राक्षास उपयोगी होत नाही. परंतु हे फक्त ऑक्टोबर छाटणीनंतरच करावे.
बोरॉन
हलक्या जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता दिसून येते. बोरॉन कमतरतेमुळे
द्राक्षमणी लहान होतात. द्रक्षामण्यांची गोडी कमी होते. देठ तपासणी करून बोरॉनची कमतरता असेल तरच बोरॉनचा वापर करावा. बोरॉनचे जमिनीमध्ये स्थिरीकरण होत नाही त्यामुळे बोरॉनचा जास्त वापर टाळावा. बोरॉन गरम पाण्यामध्ये मिसळून पानांवरती फवारणी करावी.
मॉलीब्डेनम
हलक्या जमिनीमध्ये मॉलीब्डेनमची कमतरता दिसून येते. देठ परीक्षणाच्या आधारे
मॉलीब्डेनमची कमतरता असेल तरच त्याचा वापर करावा.
क्लोराईड
क्लोराईड हे इतर अन्नद्रव्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचे आहे. क्लोराईडचे विपरीत परिणाम पानांवरती दिसून येतात. त्यामुळे हे विपरीत परिणाम टाळण्यासाठी क्लोराईडयुक्त खते वापरू नयेत.
द्राक्षाला खते देण्याची योग्य वेळ :
स्फुरद खरड छाटणीनंतर फळधारणेच्या वेळेस द्यावे.
नत्राची गरज असेल तर गरजे एवढीच नत्राची मात्रा द्यावी.
पोटॅशियमचा वापर काडी पक्क होतानाच करावा.
सुक्ष्म अन्नद्रव्ये यांची नव्या पानांवरती फवारणी करावी.
संजीवकाचा वापर
इथ्रेल(इथिलीन),जिब्रेलिक अॅसिड, लिहोसीन, 6बीए ,ब्रासोनो (पोषक ) सीपीपीयु
१) ईथ्रेल (इथिलीन) : ऑक्टोबर छाटणी पूर्वी साधारणता दोन आठवडे या संजीवकाचा वापर पानगळ करण्यासाठी केला जातो.१००० ते २५०० ppm तीव्रतेचे द्रावण फवारले असता छाटणी पर्यत पाने ९० % पर्यत पानगळ होते.तसेच छाटणी योग्य डोळावर करणे सोपे जाते.तसेच छाटणीनंतर डोळे लवकर फुटण्यास मदत होते.
प्रमाण -
ईथ्रेल 100 मिली 100 लिटर पाणी -1000 ppm
ईथ्रेल  250 मिली 100लिटर पाणी -2500 ppm
ईथ्रेल ५०० मिली 100  लिटर पाणी -5000  ppm
ईथ्रेल ६२५ मिली 100 लिटर पाणी -6250 ppm
पानगळीसाठी आठ ते दहा दिवस अगोदर इथ्रेल 600मिली+पि एच मास्टर एक्स 200मिली+13:0:45-1किलो+सा अलवा 100मिली= 200लिटर पाणी चिंब फवारणी करणे,  पानगळीचे चांगले रिझल्ट यावेत म्हणून इथ्रेल मारण्या अगोदर दोन तीन दिवस आधी व नंतर पानगळ होईपर्यंत प्लॉटला पाणी देऊ नये {परंतू कूज गळीचा ज्या क्षेत्रात प्रादूभ्राव असेल तर तेथे इथ्रेलचा वापर करू नये, हाताने दोन तीन दिवस आधी पाने काढून टाकावी त्यामुळे काडी तापून एक सारखा फूटवा होन्यास मदत होईल.
ऑक्टोबर छाटणी अगोदर दहा ते बारा दिवस शेनखत कूजलेले  चार टन किवा अॅगर बायो ऊर्जा एक टन जमीनीतून देने दोन्ही बाजू देने  .  त्या नंतर चार पाच दिवसांनी डि ए पी 100 किलो +एस ओ पी 25 ते 50 किलो +यूरिया 25 किलो{गरजेनुसार }-एक बाजू देने, दूय्यम अन्नद्रव्य 100 किलो +सूक्ष्म अन्नद्रव्य  20 किलो +सूपर बि टि एम गोल्ड -6 किलो +मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो -दूसरी बाजूला देने.
0 ते ३५ दिवस ( धोकादायक अवस्था)

छाटणी नंतर १ दिवस- १% बोर्डो मिश्रणाची गच्च फवारणी करावी.
छाटणी नंतर ७ ते ८ दिवस- डोळे कापसणे अवस्था उडद्या किडीसाठी फवारणी घेणे.
छाटणी नंतर १० वा. दिवस- करपा नियंत्रण व घड बळकटीसाठी फवारणी करणे.
छाटणी नंतर १२ वा. दिवस- घड जिरू नये म्हणुन फवारणी करणे.
छाटणी नंतर १३ वा. दिवस- डावणी व उडद्या नियंत्रणासाठी फवारणी करावी.
छाटणी नंतर १५ वा. दिवस-करपा व डावणी नियंत्रणासाठी फवारणी करावी.
छाटणी नंतर १७ वा. दिवस- फेल नंतर १० पी.पी.एम जी ए फवारणी ६०० लि.पाणी प्रतिएकर.
छाटणी नंतर १८ वा. दिवस- डावणी नियंत्रणासाठी फवारणी करावी.
छाटणी नंतर २० वा. दिवस- करपा व किटकनाशक एकत्र फवारणी करावी.
छाटणी नंतर २२ वा. दिवस- घड पोपटी रंगाचा असतांना १० पी.पी.एम. जी.ए+१ग्रम युरियाची फवारणी (पावसाचा अंदाज घेउन) करावी.
छाटणी नंतर २४ वा. दिवस- डावणी नियंत्रणासाठी फवारणी करावी.
छाटणी नंतर २५ वा. दिवस- जी.ए.१५ पी.पी.एम.+ डावणी नियंत्रणासाठी (घडांची व पाकळ्यांची लांबी मिळवण्यासाठी) फवारणी घ्यावी.
छाटणी नंतर २६ वा. दिवस- करपा व डावणी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
छाटणी नंतर २८ वा. दिवस- थ्रिप्स (फुलकिडे) नियंत्रण + डावणी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
छाटणी नंतर ३० वा. दिवस- पाऊस असेल तरच डावणी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.(फ्लॉवरिंग सुरु असतांना)
छाटणी नंतर ३२ वा. दिवस- भुरी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
छाटणी नंतर ३४ वा. दिवस- पाउस असेल तरच डावणी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
छाटणी नंतर ३५ वा. दिवस- मिलीबग ( पिठया ढेकुण) नियंत्रण करिता जमिनीतुन

छाटणी नंतर ३७ वा.दिवस- करपा व थ्रीप्स नियंत्रणासाठी फवारणी करावी.
छाटणी नंतर ३८ वा. दिवस- डावणी व हिरवी अळी नियंत्रणासाठी फवारणी करावी.
छाटणी नंतर ४० वा. दिवस- १००% कॅपफॉल ते १ ते २ एम. एम.अवस्था जी.ए.१० पी.पी.एम.+ ६ बीए १० पी.पी.एम.+ कॉम्बी एफ.१/२ ग्रम फवारणी करावी. हि फवारणी शक्यतो दुस-या डिप पुर्वी ५ दिवस अगोदर करावी.
छाटणी नंतर ४२ वा. दिवस- भुरी व थ्रीप्स करिता फवारणी करावी.
छाटणी नंतर ४५ वा. दिवस- मणी सेंटिंग नंतर डिप ४० पी.पी.एम.जी.ए.+डावणी नियंत्रक+सि.पि.पी.यु.
छाटणी नंतर ४७ वा. दिवस- थ्रीप्स + भुरी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
छाटणी नंतर ४९ वा. दिवस- तिस-य़ा डिपच्या आगोदर ५ दिवस जी.ए.१० पी.पी.एम.+ ६ बीए.१० पी.पी.एम.+१९.१९.१९ २ग्रम यांची एकत्र फवारणी एकरी ६०० लि. पाणी घेउन फवारणी करावी.
छाटणी नंतर ५१ वा. दिवस- डावणी नियंत्रक + थ्रीप्स नियंत्रक यांची एक फवारणी करावी.
छाटणी नंतर ५३ वा. दिवस- भुरी + मिलीबग करिता फवारणी करावी.
छाटणी नंतर ५५ वा. दिवस- मणीसेटिंग नंतर दुसरा डिप जी.ए.५०पी.पी.एम.+सि.पि.पी.यु+भुरीनाशक.
छाटणी नंतर ५७ वा. दिवस- झिंक बोर्डो ०.३% पी.एच.७.५ ते ८ घेणे.
छाटणी नंतर ६० वा. दिवस-तिस-या डिप नंतर ५ दिवसांनी जी.ए.१० पी.पी.एम.+६ बी.ए.१० पी.पी.एम.+१३.०४५ . ३ ग्रम प्रमाणे फवारणी करावी.
छाटणी नंतर ६५ वा. दिवस-भुरी नियंत्रण + थ्रीप्स नियंत्रणासाठी फवारणीघ्यावी. छाटणी नंतर ७० वा. दिवस- लालकोळी नियंत्रणासाठी फवारणी करावी.
छाटणी नंतर ७५ वा.दिवस-भुरी नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
छाटणी नंतर ८० वा.दिवस-भुरी नियंत्रणासाठी फवारणी करावी.
देठावरील गाठी
द्राक्ष फुलोऱ्याच्या रचनेतील मुख्य भाग हा त्यातील देठ असतो. द्राक्ष घडाच्या एकूण भागांपैकी दोन ते पाच टक्के भाग हा देठाचा असतो. फळ छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या कमी करण्यासाठी ऑक्‍सिन व सायटोकायनिन यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्यामुळे बऱ्याच वेळा द्राक्षबागेत देठावरील गाठीची समस्या निर्माण होते.
मागील काही वर्षांच्या पाहणीमध्ये आढळून आलेल्या बाबी -
- मागील हंगामात आपल्या राज्यामध्ये बऱ्याच भागात द्राक्ष घडांच्या देठावर लहान, मोठ्या गाठी आढळून आल्या. वाळवा, गोळेगाव, बार्शी व इतर काही भागांत गाठीची समस्या सातत्याने दिसून येत आहे, त्यामुळे पुरेशा प्रमाणात अन्नपुरवठा न झाल्याने मण्यांची फुगवण होत नाही. कधी कधी मण्यांमध्ये गाठीमुळे आंबटपणा निर्माण होतो. देठावरील गाठीमुळे तसेच देठ सुकण्यामुळे द्राक्ष घडावर वॉटर बेरीज, ममीफिकेशन या विकृतींसारखी लक्षणे दिसून येतात.
- फळ छाटणी लवकर म्हणजे सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या बागांमध्ये देठावरील गाठीची समस्या अधिक होती. या उलट त्याच भागातील द्राक्षबागांची फळ छाटणी उशिरा म्हणजे ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात झाली, त्या बागांमध्ये गाठीचे प्रमाण कमी म्हणण्यापेक्षा शक्‍यतोवर आढळले नाही. यावरून असा निष्कर्ष काढता येऊ शकतो, की लवकर छाटणी झालेल्या बागा ऑक्‍टोबर हिटच्या सान्निध्यात येतात. त्याचा परिणाम देठावरील गाठी निर्माण होण्याच्या समस्येमध्ये होऊ शकतो. बऱ्याच बागा सध्या प्रीब्लूम अवस्थेमध्ये असून ऑक्‍टोबर हिटमुळे अशा बागांमध्ये गाठींची समस्या उद्‌भवू शकते.
- केवळ भारतातच नाही तर परदेशातदेखील देठावरील गाठींची समस्या वाढत आहे. ही समस्या सर्व प्रथम खाण्याच्या द्राक्ष बागांमध्ये प्रामुख्याने शरद सीडलेस व थॉमसन सीडलेस आणि त्यांचे क्‍लोन यामध्ये दिसून आली आहे. मात्र पुणे येथील द्राक्ष संशोधन केंद्राकडून झालेल्या सर्वेक्षणामध्ये ही समस्या बेदाण्याच्या द्राक्षांमध्येही दिसून आली आहे.
देठावर गाठी येण्याची कारणे -
- वनस्पती शरीर क्रियाशास्त्राच्या अभ्यासानुसार, देठावरील गाठी पेशीतील अमर्याद वाढीमुळे येऊ शकतात.
- सर्वसाधारणपणे द्राक्ष देठावरील गाठीची समस्या घड दिसायला सुरवात झाल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर वातावरणात घडणाऱ्या बदलानुसार दिसू लागते. देठावरील गाठी आतून पोकळ असून त्या पाकळ्यांचे देठ सुकण्यास कारणीभूत ठरतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनानुसार देठावरील गाठीसाठी वेगवेगळी कारणे नमूद करण्यात आली आहेत. उष्ण तापमान, प्रकाशाची तीव्रता, पाऊस व सूर्यप्रकाशाचा कालावधी इ. देठावर येणाऱ्या गाठीसाठी कारणीभूत ठरतात.
- सूक्ष्म अभ्यासानुसार देठाच्या गाठीमध्ये छोटे खड्डे असून, त्यात प्रामुख्याने कर्बोदके, प्रथिने किंवा लिपिडचे (Lipids) चे स्फटिक काही तज्ज्ञांना आढळून आले आहे .
प्राथमिक प्रयोगांमध्ये आढळलेले निष्कर्ष -
सध्यातरी या समस्येवर ठोस उपाय सांगता येत नसले तरी गाठ तयार होऊ नये यासाठी प्राथमिक प्रयोगामधील निष्कर्ष उपयुक्त ठरू शकतात.
- जर सप्टेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात ज्या बागांची फळ छाटणी होते. अशा बागा ऑक्‍टोबर हिटच्या कालावधीमध्ये प्रीब्लूम अवस्थेत असतात. याच वेळी देठाचीदेखील वाढ होत असते. अशा अवस्थेमध्ये घड जिरू नये म्हणून बागेत जर ऑक्‍सिन सायटोकायनिन किंवा ब्रासिनोस्टेराईडस या संजीवकांची वारंवार फवारणी केली तर ऑक्‍टोबर हिट व संजीवकांचा वापर यामुळे घडाची वाढ जोमाने होते; परंतु या संजीवकांचा परिणाम कमी झाल्यानंतर घडाच्या वाढीवर ताण पडतो. याचा परिणाम म्हणून घडाच्या देठावर गाठी आल्याचे दिसून येते म्हणूनच एकतर ही समस्या असणाऱ्या बागांची फळ छाटणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर घ्यावी किंवा घडाच्या वाढीसाठी वापरण्यात येणाऱ्या संजीवकांचा संतुलित वापर करावा, त्यामुळे गाठी येण्याची शक्‍यता कमी होईल.
- अवेळी झालेल्या अतिपावसामुळे देखील देठावरील गाठींची समस्या उद्‌भवू शकते. यासाठी द्राक्ष बागेच्या फळ छाटणीचे नियोजन महत्त्वाचे ठरते. मागील वर्षी ज्या बागांमध्ये गाठी आढळून आल्या त्या बागांमध्ये चालू वर्षी गाठी येण्याची शक्‍यता जास्त असते. अशा जागांची शक्‍यतोवर फळ छाटणी लवकर घेऊ नये. संजीवकांचा समंजसपणे वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याचे नियोजन करावे.
- बाग फुलोऱ्याच्या आधीच्या अवस्थेत असताना बागेमध्ये अधिक आर्द्रता राहु देवु नका.
डाऊनी मिल्ड्यु
कारणे-
1)प्लाझमोपॅरा विटीअोकोला (plasmopara viticola) या बुरशीमुळे हा रोग होतो.
2) 20 अंश से. ते 30 अंश से. तापमाण व 60% पेक्षा जास्त आद्रतेला �या बुरशीची सुप्त अवस्था संपुन �प्रचंड �वेगात �बुररशीची वाढ होते
3) पाऊस , चुकीचे पाणी नियोजन , दव इत्यादी कारणांमुळे 2 तासापेक्षा जास्त वेळ पोंगा ,पाने ,घड यामध्ये आेलावा राहिल्यामुळे बुरशीची वाढ होते.
4) पानांची कमकुवत पेशी, फिजीकल डॅमेज (वारा,पाऊस,गारा),
बायोलाॅजीकल डॅमेज(किडी,सुत्रकृमी),
केमीकल डॅमेज (बुरशीनाशके ,किटकनाशके ,खते -कोवळ्या पानावर 2 किलो s o p चे स्काॅर्चिंंग )
या सारख्या डोळ्यांनी सहज न दिसणार्या कारणाने वेलीमध्ये रोगाची लागण होते.
5) अवैज्ञानीक , अतिरेकी रासायनिक बुरशीनाशके फवारणीमुळे वेल अशक्त होउन रोगाला सहजच बळी पडते.
आॅक्टॊंबर छाटणी अगोदर मोठ्या प्रमाणात लागण झालेल्या डाऊनीमुळे रोग वाढतो.
उपाय-
1) एकात्मिक रोग नियंत्रण (IDM) तंत्रज्ञान वापरावे.
2) द्राक्ष बागेत पानांमध्ये आद्रता ,दव राहणार नाही याची काळजी घ्यावी.
3) अंतरप्रवाही बुरशीनाशके,  स्पर्शजन्य बुरशीनाशके  , ट्रायकोडर्मा, सुडोमोनास , बॅसिलसचा वापर वैज्ञानिक द्रुष्ठीनेच करावा.
4) डाऊनी च्या बुरशीमध्ये रासायनिक बुरशीनाशकांविरोधी प्रतिकारक्षमता तैयार होऊ नये म्हणून बुरशीनाशकांच्या QOI, MSA, DMI, गटांचा अभ्यास करून फवारणीचे शेड्युल्ड ठरवावे.
*** द्राक्ष बागेत आच्छादन अन्‌ पाणी नियोजन महत्त्वाचे...
काही बागांमध्ये दाट कॅनॉपी व नत्राची जास्त प्रमाणात उपलब्धतेमुळे मणीगळ दिसून येत आहे. मण्यात पाणी उतरेपर्यंत वाढ जोमाने होते. याकरिता बागेत भरपूर पाणी व आवश्‍यकतेप्रमाणे स्फुरदची पूर्तता करावी. बागेत आच्छादन करावे.
आर. जी. सोमकुंवर 
मणीगळ होणे -
1) बऱ्याच ठिकाणी द्राक्ष बागेत जास्त प्रमाणात पाऊस झाला. त्याचाच परिणाम म्हणजे जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साचले व वातावरणात आर्द्रता जास्त प्रमाणात तयार झाली.
2) फळछाटणीनंतर ज्या भागात पाऊस नव्हता किंवा कमी होता अशा बागेत या वेळी झालेल्या पावसामुळे मुळीच्या भोवतालच्या भागातून जे अन्नद्रव्य उपयोगात आले नाही अशा भागातील अन्नद्रव्य विशेष म्हणजे नत्र जास्त प्रमाणात मुळांद्वारे शोषले गेले. त्यामुळे वेलीचा वाढीचा जोम जास्त प्रमाणात दिसला. दाट कॅनॉपी व नत्राची जास्त प्रमाणात उपलब्धता या गोष्टी मणीगळ होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.
3) बरेच बागायतदार मणीगळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीए व त्यासोबत इतर संजीवकांची फवारणी करतात. महत्त्वाचे म्हणजे बागेत प्रीब्लूमची अवस्था असेल तरच काही द्राक्षजातीमध्ये (थॉमसन, तास-ए-गणेश, क्‍लीन-2 इत्यादी) याचा परिणाम मिळेल, अन्यथा हीच जर फवारणी फुलोरा अवस्थेत केल्यास शॉटबेरीजची समस्या दिसेल. सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका इत्यादी द्राक्षजातींमध्ये जीएची फवारणी फुलोरा अवस्थेत केल्यास शॉटबेरीज होणार नाहीत. मण्याची लांबी वाढवण्याकरिता आपण या जातीमध्ये फुलोरा अवस्थेमध्येच फवारणी करतो.
4) तेव्हा ज्या जातीमध्ये शॉटबेरीजची अडचण येऊ शकते, अशा ठिकाणी पालाशची पूर्तता (फवारणी व ड्रिपद्वारे) करावी. तसेच शेंडा पिचिंग व पाण्यावर नियंत्रण करावे. 
मण्याचा विकास आणि पाण्याचे नियोजन -
1) बऱ्याच भागात फळछाटणीनंतर पाऊस झाला नाही. साठवणुकीची साधने नसल्यामुळे पाण्याचा साठासुद्धा काही ठिकाणी नसेल. अशा परिस्थितीमध्ये या वेळी मण्याचा विकास होत असताना पाण्याची जास्त प्रमाणात गरज असते.
2) हिरव्या रंगाच्या द्राक्षजातीमध्ये मणी सेटिंगनंतरच्या जीएच्या डीपनंतर थिनिंग करून पुन्हा रिव्हर्स डीप घेतला जातो. त्यानंतर खरे तर द्राक्षमणी लॅग फेजच्या बाहेर येतो. मण्यात पाणी उतरेपर्यंत वाढ जोमाने होते. याकरिता बागेत भरपूर पाणी व आवश्‍यकतेप्रमाणे स्फुरदची पूर्तता करणे गरजेची असते; परंतु बागेत जर पाणी कमी असल्यास खतांच्या वापरावरसुद्धा मर्यादा येते.
3) ज्या बागेत पाऊस कमी झाला अशा ठिकाणी या वेळी वारेसुद्धा जास्त प्रमाणात वाहताना दिसेल. त्याच बागेत या वेळी दिवसाचे तापमानसुद्धा जास्त प्रमाणात दिसून येईल. याचाच अर्थ या बागेत पानांतून बाष्पीभवनाद्वारे पाणी जास्त प्रमाणात निघून जाईल. वेलीची गरज पुन्हा वाढेल. ही परिस्थिती सोलापूर व विजापूर विभागात दिसू शकेल. 
पाणी बचतीसाठी उपाययोजना -
1) बागेत पाणी शक्‍यतो सकाळी किंवा सायंकाळी द्यावे.
2) ड्रीपलाइन वर बांधली असल्यास जमिनीच्या जवळ आणावी.
3) बोदावर काडीकचरा, गवत, उसाचे पाचट किंवा शेणखत इत्यादीचे आच्छादन करावे.
4) बागेत शिफारशीत बाष्परोधकांची फवारणी घ्यावी.
5) कॅनॉपी नियंत्रणात ठेवावी.
6) बागेत ज्या दिशेकडे वारे वाहते, त्या दिशेने सुरवातीस वाऱ्यास अडथळा आणावा. जर पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत असल्यास बागेत पश्‍चिमेकडील बाजूस जमिनीपासून एक फूट अंतरावरून वर मांडवपर्यंत शेडनेट बांधून घ्यावी. यामुळे वाहणारे वारे अडल्यास बागेतील पाण्याची गरज काही प्रमाणात पूर्ण करता येईल. 
मुरमाड जमिनीत द्राक्ष फळछाटणीनंतर करावयाचे पाणी व्यवस्थापन
मुरमाड जमिनीमध्ये पाणी आडवे न पसरता सरळ खोल जाते. जमीन लवकर कोरडी पडते. अशा वेळी ठिबक अथवा पाट पाणी पद्धतीने पाणी नियोजन करण्याविषयी अधिक माहिती घेऊ.
वासुदेव काठे
कोणत्याही फळपिकाच्या एकूण उत्पादनापैकी 60 टक्के उत्पादन हे पाणी व्यवस्थापनावर अवलंबून असते. उर्वरित 40 टक्के उत्पादनामध्ये रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर, संजीवकांचा वापर, कीड व रोगनियंत्रण, मशागत, पानांचे नियोजन इत्यादी मुद्यांवर अवलंबून असते. जमिनीमध्ये दिलेली रासायनिक खते उचलण्याकरिता तंतुमय मुळांची वाढ होणे गरजेचे असते. ही मुळे खते पाण्याच्या माध्यमातून उचलतात. 
- मात्र, पिकांना प्रमाणापेक्षा अधिक पाणी दिल्यास रासायनिक खते पिकाच्या मुळांच्या कक्षेच्या बाहेर जातात. तसेच अतिरिक्त पाण्यामुळे तंतुमय मुळ्या कुजून जातात. परिणामी पानांची संख्या कमी होते. फळांचे पोषण कमी होते. वजनात घट येते.
- पाणी गरजेपेक्षा कमी झाले तरी मुळांची संख्या कमी होते. रासायनिक खते उचलली जात नाहीत. पिकाची वाढ कमी होते.
- त्याचप्रमाणे दिलेले पाणी पिकाभोवती योग्य रितीने पसरण्याऐवजी फक्त खोलच जात राहिले तरी मुळांची संख्या मर्यादित वाढते. उत्पादनात घट येते.
- जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर योग्य दिवसांचे ठेवत वाफसा स्थिती ठेवावी.
अधिक उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य तितके पाणी देण्याची पद्धत राबवावी लागते. त्याविषयी समजून घेऊ.
मुरमाड जमिनीतील पाणी व्यवस्थापन -
मुरमाड जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अन्य कोणत्याही जमिनीपेक्षा कमी असते. या जमिनी लवकर कोरड्या पडतात. ताण पडल्यास पाणी घेणारी मुळी लवकर मरतात. वरील 2 ते 6 इंचात असलेली खते पिकांना घेता येत नाहीत.
- 6 इंचाखालील जमिनीतही मुरमाडपणा, खडकाळपणा असल्यास, पाणी धरले जात नाही. पिकाच्या मुळ्या खोलवर जात नाहीत.
- या जमिनीची पाणी धरण्याची क्षमता कायमस्वरूपी वाढवण्याकरिता काळ्या मातीचा कमाल एक फुटापर्यंतचे थर द्यावा. यामुळे या जमिनीची पाण्याची गरज निम्म्याने कमी होत असल्याचे माझ्या शेतात केलेल्या प्रयोगातून लक्षात आले आहे. (चित्र माती मल्चिंग क्र.1) असे केल्याने द्राक्षाचा दर्जा सुधारून घट्ट गराचे मनी व फुगवण जादा झाली, त्यामुळे एकरी वजनात 30 टक्के वाढ झाली.
- सर्वांना हे शक्‍य नाही किंवा लगेचच शक्‍य नाही; त्यांना सध्याच्या मुरमाड जमिनीच्या दोन प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन करावे लागेल.
ठिबक पद्धतीने पाणी व्यवस्थापनाचेही दोन प्रकार पडतात.
1) एका प्रकारातील मुरमाड जमिनीत 3 ते 5 फुटांदरम्यान खोलीत बारीक फुटणारा मुरूम असतो. अशा जमिनीत ड्रीपरचे पाणी फारसे आडवे न पसरता जेथे पडते तेथून खोल खाली जाते. यामुळे मुळ्यांची संख्या ड्रीपरखाली ओलाव्याच्या एक फुटातच वाढते. परिणामी द्राक्ष व अन्य फळपिकांच्या वजनात 25 ते 40 टक्‍क्‍यापर्यंत घट येते. त्याच प्रमाणे दिलेली पाण्यासोबत मुळाच्या कक्षेखाली जाऊन निरुपयोगी ठरतात.
- अशा जमिनीत ठिबक सिंचन करतेवेळी ड्रीपरची संख्या दर 2.5 फुटाऐवजी 1.5 फुटावर ठेवावी. ओले होणारे क्षेत्र जास्त राहून, रासायनिक खते वरील 2 ते 6 इंचाचे थरातील तंतुमय मुळांना उपलब्ध होतील. यामुळे कमी खतात कमी पाण्यात उत्पादनात वाढ मिळेल. याकरिता दर 1.5 फुटांवर 4 किंवा 8 लिटरचा ड्रीपर असावा.
- पाणी आडवे रुंदीत पसरण्याकरिता वरंब्यात दीड ते 2 फूट रुंदीत व 6 इंच खोलीचा चर घेवून, त्यात शेणखत टाकावे. जमिनीची पाणी लावून धरण्याची क्षमता चांगली वाढते. दोन पाणी पाळीतील अंतर वाढते.
2) दुसऱ्या प्रकारातील मुरमाड जमिनीमध्ये 1 ते 2 फुटाखाली पक्का खडक असतो, त्यामुळे या जमिनीत पाणी खोल न जाता, आडवे रुंदीत पाणी लवकर पसरते. एक ते दीड तास पाणी दिल्यावर वरंबा 2 ते 3 फुटापर्यंत ओला होतो. या थरातील मुळांचे प्रमाण चांगले असले तरी खोल असणाऱ्या मुळांचे प्रमाण कमी असते. या जमिनीत पाणी खोल जाणाऱ्या मुरमाड जमिनीपेक्षा कमी पाणी द्यावे लागते.
- दोन्हीही प्रकारच्या जमिनीस वापरानुसार थंडीच्या कालावधीत 1 ते 2 दिवसाआड पाणी दिले पाहिजे.
मुरमाड जमिनीस पाट पाणी व्यवस्थापन -
पाट पाणी दिल्याने मुळांची संख्या वाढून, पानांचा हिरवेपणा व जाडी वाढते. प्रकाशसंश्‍लेषणाचा वेग वाढून अन्ननिर्मिती वाढते. पिकांच्या वजनात व दर्जात वाढ होते. पिकाची रोगप्रतिकारक्षमता वाढते.
हे सर्व फायदे मिळण्याकरिता दाभोळकर प्रयोग परिवाराचे गौळाने (ता. जि. नाशिक) येथील रामचंद्र दगुजी चुंभळे यांनी एक पद्धत तयार केली आहे.
- पाट पाणी देताना द्राक्षबागेचे 9 इंच ते 1 फूट उंचीचे वरंबे पूर्ण भिजणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता ओळीच्यामध्ये मातीचे आडबंद द्यावे लागतात. प्रत्येक पाण्याच्या वेळी आडबंद करणे जिकिरीचे ठरते. चुंभळे यांनी मातीऐवजी बारदानाचे आडबंद तयार केले आहेत. हे हलके असल्याने उचलणे सोपे ठरतात. हे आडबंद संपूर्ण बागेकरिता दोन पुरेसे होतात.
(चित्र क्र. 2 - आडबंद)
असे पाट पाणी मुरमाड जमिनीस खालील टप्प्यात दिल्यास फायदेशीर ठरते.
1) वांझ फुटी काढल्यावर
2) मनी 4-5 मि.मी. आकाराचे झाल्यावर.
3) मनी 8-10 मि.मी. झाल्यावर.
4) मण्यात पाणी उतरताना.
5) नंतर 15 दिवसांनी.
आडबंद तयार करण्याची पद्धत -
एका 9-10 फुटाच्या बांबूला साखर बारदानाचे 4 पोती सुतळीने शिवून बांधावीत. या पोत्यांना चार ठिकाणी दोन-दोन फुटांचे बांबूचे तुकडे बांधावेत, त्यामुळे आडबंदांचे पोते पाण्याने गोळा न होता पसरून राहतात. हे आडबंद धरण्याकरिता हातात एकत्र धरता येतील असे चार-चार फुटांचे बांबूचे दोन तुकडे बांधून घ्यावेत. वरंबे ओले झाल्यावर या बांबूने ओढून आडबंद पुढे घेता येतो.
- या आडबंदामुळे वरंबे एक-दीड फुटापर्यंत उंच असले तरी पूर्ण भिजतात. वरंबे पूर्ण भिजल्यामुळे पाऊस पडल्यासारखा परिणाम मिळून बागेचा जोमदारपणा वाढतो.
द्राक्ष वेलीवरील विकृती व त्यावरील उपाय
द्राक्ष मण्यांच्या प्रामुख्याने देठाची जळ (स्टॉंक निक्रोसीस), शॉर्ट बेरीज, वॉटर बेरीज, पिंक बेरीज, मणी हिरवे राहणे (दाढे मणी ) या विकृती आढळतात.
महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांनी उत्पादनाच्या बाबतीत नेत्रदिपक अशी प्रगती केलेली आहे. परंतु अलीकडील काही वर्षापासून द्राक्ष मण्यात काही विकृती दिसून येऊ लागल्या आहेत. या विकृतीमुळे द्राक्षाची प्रत खालावली जाते व त्यास चांगला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. द्राक्ष मण्यात दिसून येणाऱ्या या महत्त्वाच्या विकृतींवर मात करून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पनादन कसे करून घेता येईल हे पहाणे गरजेचे आहे.
द्राक्षमण्याच्या देठाची जळ (स्टॉंक निक्रोसीस)
या विकृतीमध्ये द्राक्षमण्यात साखर भरण्याचे वेळेपासून देठावर टाचणीचे टोकाएवढे प्रथम पांढरट तपकिरी ठिपके पडून नंतर ते काळपट तपकिरी होतात आणि पक्ववेत वाढ होत असताना या ठिपक्यांच्या आकारातही वाढ होऊन असे अनेक ठिपके एकत्र आल्याने घडांचे अथवा मण्यांचे देठ जळून जातात. पक्वता जशी वाढत जाईल तसतशी ही विकृती वाढत जाते. यामुळे वेलीमधून साखर, पाणी आणि इतर घटकांचे वाहन यावर परिणाम होतो आणि याचा परिणाम मऊ, हिरवट , चिबचचिबीत , पाणीदार आणि परिणामी सुकलेले द्राक्षमणी घडामध्ये तयार होतात. शेवटी याचा परिणाम घडांचे ताजे वजन, रसाचे उत्पादन, विद्राव्य साखर आणि अॅन्थोसायनीनसारखे रंगीत घटक यावर अनिष्ट परिणाम होतो, तर द्राक्षमण्यांचे आम्लतेत वाढ होते. द्राक्षाचे उत्पादनावर आणि प्रतीवर आश प्रकारे अनिष्ट परिणाम झाल्यामुळे दर्जेदार उत्पादन घटते. परिणामी निर्यातक्षम द्राक्षे तयार करण्यात अडचणी येतात.
कारणे : ही विकृती संजीवके आणि अन्नद्रव्ये यांचा असमतोल विशेषत : पोटॅश कॅल्शियम + मॅग्नेशियम यांचे गुणोत्तर यांचेशी संबंध जोडतात.
उपाय :
१) अमोनिकल नत्राचा आणि पोटॅशचा पुरवठा करणे टाळावे. हे दोन्ही घटक कॅल्शियमच्या शोषणावर वाईट परिणाम करतात.
२) मणी ८ एम. एम. आकाराचे असतानांच कॅल्शियम क्लोराईड ५०० ग्रॅम / १०० लिटर पाण्यातून फवारावे. त्यानंतर यानंतर १० दिवसाच्या अंतराने २ फवारे द्यावेत.
३) १० एम. एम. बेरी साईज असतांना नंतर २ वेळा १० दिवसांच्या अंतराने मॅग्नेशियम सल्फेटचे फवारे द्यावेत. प्रमाण १० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रती लि.पाण्यातून द्यावे. 
शॉर्ट बेरीज :
द्राक्षाचा घड वाढत असताना काही मणी मोठे न होता लहान आकाराचे राहतात. त्यानं शार्ट बेरीज म्हणतात.
शार्ट बेरीज होण्याची संभाव्य कारणे :
१) परागीभवन चांगले न होणे, फुलांचे भाग विकृती असल्यास असे होते.
२) कर्बोदके (CHO) कमी पडल्यास फुले मण्यामध्ये विकसित होण्यास अडचण येते.
३) जी. ए. लवकरच्या स्टेजमध्ये वापरले तर शॉर्ट बेरीजचे प्रमाण वाढते.
४) फळधारणेच्या काळात थंडी किंवा धुके असणे.
५) बोरॉन व झिंक ह्या पोषक द्रव्यांची कमतरता.
६) वेलीला व्हायरसची लागण झाल्यावरही असे होते.
उपाय :
१) ही विकृती टाळण्यासाठी प्रमाणात जी. ए. सारखी संजीवके वापरावीत.
२) सुक्ष्मद्रव्ये योग्य प्रमाणात द्यावीत.
३) घोसाची संख्या पानांच्या प्रमाणात ठेवावी, म्हणजे कर्बोदके कमी पडणार नाहीत.
वॉटर बेरीज :
द्राक्षे पिकायला लागल्यानंतर द्राक्षाच्या घोसातील काही मणी रंगाला मंद दिसतात, नरम पोताचे असतात, त्यात गर नसतो, गोडी नसते, फक्त आंबट पाणी असते. हे मणी संपूर्ण धोसात इकडे तिकडे पसरतात. माल झाडावर जास्त दिवस ठेवल्यास हे मणी सुकतात व कधी कधी गळूनही जातात. एकूण वजनात त्यामुळे घट होते. झाडावरून द्राक्षे तोडल्यावर हे मणी लवकर सुकतात. त्यामुळे बाजारात पेटीतील माल खराब दिसतो. ह्या मण्यांना 'वॉटर बेरीज' म्हणतात. हे बनण्याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे
१) पालाशची कामतरता.
२) मणी पोसत असताना पाण्याचा ताण.
३) जास्त नत्र.
४) द्राक्ष घडांना कॅल्शियम पुरवठा कमी पडणे.
५) झाडावर प्रमाणापेक्ष जास्त द्राक्ष ठेवल्यास अन्नद्रव्ये कमी पडतात.
६ ) द्राक्षघोस घट्ट झाल्यास मण्यांच्या पेशी (झायलम) दबून जातात व पुढे अन्नपुरवठा होत नाही, त्यामुळेही वॉटरबेरीज वाढतात.
वर नमुद केलेल्या कारणांचा निट विचार केल्यास आपल्याला वॉटरबेरीज निश्चित कमी करता येतील. मात्र सर्व उपाय फलधारण होत असतानाच कराव्यात नंतर काहीही करता येणार नाही.
पिंक बेरीज :
साधारणत : द्राक्षात पाणी उतरायला लागल्यावर गुलाबी मणी दिसायला सुरुवात होते. असे मणी काहीसे आकाराने लहान असतात. द्राक्षे जशजशी पिकत जातात. तसतसा हा रंग अधिक गर्द होत जातो. ही द्राक्षे आधी आकर्षक दिसत असली तरी, बाजारात पोहचेपर्यंत गर्द लाल व काळसर रंगाची होतात. त्यांची चमक जाते.
पिंक बेरीज होण्याची कारणे: अॅन्थोसायनिन नावाच्या द्रव्यामुळे पिंक बेरीज होतात. हे बऱ्याच फळांत, फुलांत आणि पानांत सुद्धा आढळून येत असते. पेशीचे जे व्हेस्क्युलर सॅप असतात त्यात हे आढळते. जास्त पील असलेल्यामध्ये हा रोगण घातल्यास त्याचा रंग गर्द होतो. म्हणून काही फुलांचा रंग गर्द करण्यासाठी अमोनियम हायड्रोंक्साईडची वाफ देतात.
अॅन्थोसायनिनची रासायनिक प्रक्रिया होणाऱ्या कागदावरील आलेख केल्यावर असे आढळून आले की याचे चार प्रकार आहेत.
१) सायनाडीन,
२) माल्व्हीडीन,
३) पिनोनिडीन,
४) मनोग्लुकोईज,
ह्यातला पिनोनिडीन जास्त प्रमाणात असतो. बाकीचे अगदी अल्प प्रमाणात असतात. मुख्यत : नैसर्गिक चार घटकांची क्रिया अॅन्थोसायनिन तयार होण्यावर होते.
१) तापमानातील चढउतार
२) तीव्र सुर्यप्रकाश,
३) नत्राची कमतरता,
४) फॉस्फरसची कमतरता.
झाडाच्या पेशीमध्ये साखर जेव्हा जलद गतीने जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा ते अॅन्थोसायनिन तयार व्हायला उत्तेजन देतात. नत्राच्या पुरवठ्याने साखर नत्रजन्य पदार्थात रूपांतरित होते आणि साखरेची तीव्रता कमी होते. त्याचबरोबर अॅन्थोसायनिन कमी होते. मण्यात पाणी उतरतांना इथ्रेल वापरल्याने अॅन्थोसायनिन वाढतात. 
उपाय :
१) २५० ग्रॅम अॅस्कोर्बिक अॅसिड २०० लिटर पाण्यात घालून फवारावे. दुसऱ्या दिवशी ५०० ग्रॅम सोडियम डायथील डिथोकार्बोमेट प्रती २०० लिटर पाण्यात घालून फवारावे. अशा २- ३ फवारण्या ८ दिवसांच्या अंतराने कराव्यात, मात्र ह्या रसायनांचा एकरी खर्च जास्त असतो.
२) ५ ग्रॅम युरीया व २ ग्रॅम बोरीक अॅसिड प्रती १ लिटर पाण्यातून फवारल्यास शेंदरी मणी कमी होण्यास मदत होते.
३) एकरी १३ किलो बोरॅक्स एप्रिल छाटणीनंतर जमिनीतून दिल्यास ही विकृती लक्षणिकरित्या कमी होऊ शकते.
मणी हिरवे राहणे : (दाढेमणी)
या विकृतीमध्ये द्राक्ष पिकायला सुरुवात झाल्यानंतर घडाच्या शेंड्याकडील तसेच फांद्याकडील काही मणी पिकत नाही व ते मणी सुरकतले जाऊन गळून पडतात. जसा घड पिकत जाईल तसा या विकृतीचा प्रादुर्भाव वाढत जातो. अशा विकृती ने ग्रासलेले मणी गोडीला फार कमी असतात. तसेच त्यामध्ये गर नसतो. ही विकृती थॉम्पसन सिडलेस या जातीत मोठ्या प्रमाणात दिसून येते
कारणे : 
१) मण्यांच्या वाढीच्या काळात वेलींना पाण्याचा ताण पडला असल्यास.
२) बोरॉन सारख्या मुलद्रव्यांनी कमतरता पडल्यास.
३) रासायनिक खतांचा वाजवीपेक्षा जास्त वापर केल्यास.
४) ज्या बागेत पाण्याचा योग्य निचरा होत नाही व चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, तेथे ही विकृती मोठ्या प्रमाणात दिसून येते.
५) घडांना कॅल्शियमचा पुरवठा कमी झाल्यास.
६) वेलींवर प्रमाणापेक्षा जास्त घड ठेवल्याने सर्व घड योग्य पोसले न गेल्याने
७) घडाच्या पुढे पाने कमी ठेवली असल्यास.
उपाय :
१) खरड छाटणीनंतर प्रत्येक वेलीवर काड्यांची संख्या मर्यादित ठेवली पाहिजे.
२) ऑक्टोबर छाटणीनंतर वेलीवर घडांची संख्या मर्यादित ठेवावी.
३) घडाचा शेंडा खुडणे व विरळणी वेळेवर करावी.
४) जी. ए. चा वापर काळजीपूर्वक करावा व वाढीव प्रमाणात जी. ए. वापराचा मोह टाळावा.
५) बागेत पाण्याचा योग्य निचरा केला पाहिजे.
६) पालाश, बोरॉन, कॅल्शियम व मॅग्नेशियमसारख्या मुलद्रव्यांचा योग्य पुरवठा करावा.
७) घडांच्यापुढे पाने कमी राखल्यास घडांस अन्नाचा तुटवडा पडतो व घडांचे योग्य पोषण होत नाही.
८) पानातुन तसेच जमिनीतून सुक्ष्म मुलद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा