Saturday, January 16, 2016

काकडी

जमीन

जमिनीची नांगरट करून एकरी 15 टन शेणखत किंवा एरंड पेंड 500 किलो देवून जमीन तयार करावी.
1.5 ते 2 मी. अंतराच्या ओळी तयार करा.

लागणीची पद्धत 
काकडीच्या लागवडीस सरी वरंबा चांगली मानली जाते .काकडीच्या जाती नुसार 90 सेंमी वर लागवड करून दोन वेलीतील अंतर 45सेंमी ठेवावे. खुरप्या सहायाने 3ते 4 बीयाची लागवड करावी .
बियाणे
हिमांगी, फुले शुभांगी, पूना खिरा, पुसा संयोग, शीतल या जाती जास्त वापरल्या जातात.
बीज प्रक्रिया -
लागनीपूर्वी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. सुरवातीच्या काळात मातीतून येणारे रोग व बियाणांच्या अन्य समस्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझिम 50WP @ 3gm प्रती किलो बियाणे याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.

ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.

पाणी व ख़त व्यवस्थापन 
काकडी पिका करीता पेरणी पूर्वी 25 टन शेनखत द्यावे .लागवड करताना प्रति हे 50 किलो प्रमाणे नत्र , स्फूरद ,पालाश द्यावे .आणी परत 30 दिवसानी 50 किलो नत्राची मात्रा द्यावी .

किड नियंत्रण 
1) लाल भुंगेरे - नियंत्रना करीता 10 लिटर पाण्यात  40  ग्राम कर्बारील किंवा डायमेथोयेट 10 मिली ची फवारनी करावी .

2) फळ माशी - मॅलेथियॉन 10- मिली 10 लिटर पाण्यात 1ते 2 वेळा  फवारावेत . 
काकडी                 

रोग नियंत्रण 
1)भुरी - फळावर पांढरे डाग पडतात ,वाढ खुंटते 
नियंत्रण - बाव्हिस्टीन किंवा कॅरेथेन 10 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे .

2) केवडा -नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन - एम -45 हे बुरशी नाशक फवारावे .

महत्वाची घ्यावयाची काळजी 
काकडी वर येणारे रोग व किडिचे नियंत्रण वेळीच   करने आवश्यक आहे जेणेकरून फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर फरक पडणार नाही

उन्हाळी काकडी लागवड तंत्र

उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानतील तीव्र झळांच्या काळात काकड़ी जवळपास सर्वांना आवडते. उन्हाळी काकड़ी लागवड तंत्रज्ञान देत आहे.
* या पिकासाठी जमीन सर्व प्रकारची चालते पण तिचा पी एच ५.५ ते ६.५ दरम्यान असल्यास अधिक योग्य.
* यासाठी हवामान कोरडे अधिक मानवते. तापमान १८ ते २८ सेल्सियस उत्तम.
* पेरणी पूर्वी खोल नांगरणी करावी त्यानंतर दोन उभ्या-आडव्या वखर पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळी पूर्वी एकरी २ ते ३ टन चांगले कुंजलेले शेणखत व्यवस्थित मिक्स करावे सोबतच फळमाशी नियंत्रणसाठी निंबोळी खत वापरावे.
* लागवड कालावधी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी योग्य.
* बाजारात अनेक नवीन वाण उपलब्ध आहेत. वाण निवड करताना अधिक उत्पन्न,रोग प्रतिकारक क्षमता, इत्यादि बाबी तपासून घ्या.प्रामुख्याने बलम खिरा, पुसा संजोग, संकरित हिमांगी, फुले शुभांगी, प्राची, शीतल, चंपा हे वाण शिफरशीत आहेत.
* बियाणे एकरी एक किलो वापरावे.
* लागवड पद्धत - दोन ओळीतील अंतर १.५ ते २.५ मीटर, दोन रोपात ९० सेमी ठेवावे.  
* प्लास्टिक मल्चिंग पेपर टाकूनही ठिबक वर लागवड केल्यास पाण्याची बचत होते व उत्पन्नही अधिक मिळते. 
* ठिबकने विद्राव्य खते द्यावी.
* जमिनीच्या मगदुरा नुसार ६५ टक्के आर्द्रता टिकवून ठेवावी. तापमानानुसार किंवा दर आठवड्याला एक पानी द्यावे.
* डाऊणी आल्यास मेंकोझेब फवारावे किंवा कॉपर किंवा सल्फरची धुरळणी चालते. 
* फळमाशीचा प्रादुर्भाव दिसन्याची शक्यता असल्यास निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* साधारणपणे ४५ दिवसांनी तोडणी सुरु होते यात ८ ते १० तोडण्या मधे गावरान एकरी ३० क्विंटल तर संकरित एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळू शकते.
* बियाणे वांझ निघण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे, योग्य ती खबरदारी घ्यावी.
* खरेदी केलेल्या बियान्याची पावती, लेबल, थोड़े सैंपल बीयाने सांभाळून ठेवा.
* दुष्काळजन्य परिस्थितीत लागवड जर योग्य राहिली तर नक्की फायदा होवू शकेल.

No comments:

Post a Comment