Saturday, May 27, 2017

शेतकऱ्यांना दिलासा देणारी माझीशेती गट संकल्पना

शेतकऱ्यांना दिलासा देणारी माझीशेती गट संकल्पना
लेखक आणि संकल्पना - महेश बोरगे

सहभाग -
धना - धनंजय उरणे
सगु तात्या - सागर कदम
अप्पा - अक्षय मोरे
सुरज भैय्या - सुरज मोरे

नमस्कार मंडळी,

आपल्या नेहमीच्या पारावरच्या गप्पा नेहमीच चालू असतात. सगळ्यांचा पहिला गहन विषय असतो अच्छे दिन आणि दुसरा गहन विषय कर्जमाफी.... या दोन विषयांना घेतल्याशिवाय कारभारणींन थापलेली भाकर गळ्यातन उतरतच नाई. आधीमधी कधीकधी IPL आणि कबड्डी बी असती पर काय बी म्हणा अच्छे दिनाच्या गाजराच्या पुंगीपुढं कर्जमाफीची नागीण डुलल्या शिवाय मज्जा नाय.... जश्या तुम्ही पाराव बसुन गप्पा हणता तसल्या आमी बी हाणतो.... काल बी मी, धना, सगु तात्या, सुरज भैय्या .... आणि लयं मोठा चर्चेचा विषय निघाला की आपलं चुकतंय कुठं... बघा, पाराव बसलुया आणि विषय हुता आपलं गणित चुकतंय कुठं आणि करायचं काय.

धना : लेकाणू कायतर कराया पायजी....
सगु तात्या : व्हय व्हय काय तर झालंच पायजे...
सूरज भय्या : गपा रं, कायतर कराया पायजी....राच्याला पाण्यावर कोण जाणार हाय... कोण नसलं तर ही पाळी मला पायजे, गेल्या बारीला लायट नव्हती तवा मला पाणी नाय भेटलं.
आप्पा : ये लयं शहाणं हु नकु म्या पाणी पाजायला चाललुय, ही घोंगडी इथं झोपाया आणि काठी कायं कुत्री माराय आणली व्हय...
सूरज भैय्या : आप्पा का तापतुया, तुझं झाल्याव मला उठीव.. मी येतो सोबतीला आणि पडतुकी बांधावर. तुला बी सोबती हुईल...
आप्पा: व्हय व्हय चल लेका, पर्वा नायका पाटलाचा बाळ्या जनावर लागून मेलं, मला तर लयं भ्या वाटतंय पर लेकाणू पोरांच्या तोंडाकडं बघवना रं
धना : आर चांगलं हाय की, रोज मरण्यापरास जनावर लागून एकदाचं संपल्याल बर...
सगु तात्या: मला तर काय बी कळणं बंद झालंय, डोक्याला शॉट लागलाय नुसता...
.
.
(भयाण शांतता)
.
.
आप्पा : हुंय रं
.
.
आपा : आर ये, काय मयताला आला कारं, समदी अशी जीव गेल्यागत बसून हाय. धन्या लेका तू तर ढाण्या वाघ हायस आणि तुला का धाड भरली का?
धना : आप्पा तूच सांग, काय करू दी... पोरीची बारावी झालीया.
सूरज भैय्या : आर बाबलीच्या, पोरगी देवाच्या गुणाची हाय आणि तिच्या नावानं का गा डोकं धरलंस..
धना : देवाच्या गुणाची म्हणूनच डोकं फिरलया. आता निकाल लागल्यावर कायं सांगू तेच कळणं बंद झालयं बघ. रोज रात्री उशिरापर्यंत इथंच पाराव बस्तु आणि पोरं झोपली की घरला जातूय बघ. पुढं शाळेला शहरात जायचं म्हणतीय, तुला तर माहिती हाय, पाणी हाय तर लायट नाय आणि लायट असली तर पाणी पुरत नाय... त्यातनं बी काय पान लागलंच तरी पुढं दर मिळाला पायजी.
.
.
.
आप्पा : (आवंढा गिळत) मी काय म्हणतुय, मोदी कर्ज माफी करतु म्हणलेला तेच काय झालं कळलं का??
सूरज भैय्या : ये आप्पा, पाण्याव चल, त्या मोदीच्या नादाला नग लागू. अजून विधानसभा निवडणूक लांब हाय, तवा करील कर्ज माफी... काम धंदा सोडायचा आणि अच्छे दिन आणि कर्ज माफी करत बसायचं, चल बिगी बिगी... बांधावर एक डुलकी तर काढीन.
धना: खरंय भैया, नायतर हे काँग्रेस वाले काय आणि भाजपा वाले काय. आपल्या माग का लागत्यात माहिती का तुमास्नी...
सगु तात्या : अयं, ही बघा तत्वज्ञ.... आता समद्यानी ऐका, संत महाराज धनाजी राजे आपल्यासणी या पाराच्या साक्षीनं निरशी कथा सांगत्यात...
.
.
(सगळेच दिलखुलास हसतात)
.
.
धना : अय ऐकून घी पयला मग बोंबाल माझ्या नावानी...
सगु तात्या : धना मी काय वंगाळ बोल्लू व्हय... चांगलं म्हणलं तरी बी नेहमी आपलं मलाच बोलायचं
धना : मी काय म्हणतुय ते तर ऐक, मग बोल की काय बोलायचं ती...
.
.
बघा.. तुम्ही रोज पेपर वाचता का नाय... समदी शेतकऱ्यांना काय ना काय द्येत्यात का नाय... असा कधी पेपर निघतु का त्यात आपल्यातल्या कुणी जीवच दिला नाय...
आप्पा : तुला काय म्हणायचंय
धना : आप्पा बघा, माझ्या पोरीला आता घरात ठेवायचं तर पंच्याती आणि शाळेला धाडायची तरी पंच्याती... मला तिचं हात पिवळं केलं पायज्यात नायतर शाळेला धाडली पायजे.. दोनीबी बाजूला पैका तर पायजेच. अनं तुला तर मायतीच हाय, माझी सोसायटी अजून तशीच हाय. . आता म्या पैका आणायचा तर कुठंन गा. माझी तर झोपच उडाल्या बघ.
सगु तात्या : हं, त्यात काय एवढं. हित येत जा पाराव माझ्यापशी. लयं झ्याक झोप लागत्या. मी तर कायमचा इथंच असतुया... निदान तू घरला तर जातूयस.
धना : वरच्या पट्टीला कांदा हुता त्यो पडलाय चाळणीला, आता तिथं काय करावं ते बी सुचणं बंद झालंय. बेण्याचं कायतर हुईल पर खतांचे तू बघतुयास, परत कामाला मजुराचं बी मेळ बशीना...
आप्पा : धना, असं धीर सोडून कसं चालेल, आपुन थांबून चालेल का??? आर आपुन हाय म्हणून आपलं गाव चालतय... काय ना काय काम केले की गावात समद्यासनी रोजंदारी तर मिळत्या. नायतर आपल्यासंग ही बिना जमिनीची माणसं उपाशी मेली असती.
सुरज भैय्या : हे अगदी लाखात एक बोल्लास... आपल्या शिवाजी महाराजांनी सांगितलंय लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पायजे. आर जगाला पोटाला घालणारी जात आपली अन ही काय रडगाणं लावलंयस...
सगु तात्या : तू आता अलंयस शेती करायला. आमची हयात गेली शेतीत. मोबाईलवर शेती होत असती तर म्या इथं झक माराय पाराव पडलू असतु का???
धना : भैय्या तू नक्की काय करतूस र त्या मोबाईल मधी...
सुरज भैया : तुमी कधी माझं ऐकलंय का??? आपली शेती एकदम वंटास हाय, पाणी हाय, पिकतंय बी भारी... फकस्त आपलं विकायचं काय होत नाय. आणि तिथंच आपलं घोड पेंड खातंय... मी गेल्या आठवड्याठाव माझीशेतीच्या ग्रुपला जॉईन झालूया, मला सगळं तिथंच कळतंय.
आप्पा : ये भैया जरा कळलं असं बोल. ती माझीशेती वाली म्या कधी पाह्यली बी नायती आणि ती काय सांगत्याती...
सुरज भैया : ती आपल्यासणी काय बी सांगत नायत, समदं आपल्यापाशीच हाय. ती फक्त दाखवत्यात....
सगु तात्या : धनाच पान भैयाला लागल्याल दिसतंय... तू फेक, त्येच्या मायला सकाळपसन कोण भेटलं नाय हुंय...
सुरज भैया: आता बघ, तुला पेराया येतं का?
सगु तात्या : व्हय.. आयुष्य गेलं की माझं.. आता काय तू शिकवतु का? तुझी ती माझी का तुझी शेती, काय ती...?
सुरज भैया : ते पेराया शिकवत नायती ना काढायला,
सगु तात्या : तुला काढाया बाकी भारी जमतंय, येत जा आमच्याकडं... आमच्या शेतात बी लयं वाढ झालीया...
धना : आर मग ती माझीशेतीवाली करत्याती कायं???
सुरज भैया : त्यांनी आपलं ग्रुप केलेत आणि आपल्यालाच आपली काम करायला लावत्याती. आप्पा, गेल्या बारीला मी तुझी कपाशी लावायची दिशा बदलावली काय फरक पडला का त्यानं...
आप्पा : खोट का बोलू, लेका लयं फरक पडला रं...
सगु तात्या : ही बघा, आंधळ्याला भयंर साक्षीला... दिशा बदलून फरक पडला म्हणं.
धना : आर तात्या ऐक तर खरं काय सांगत्याती, आधीच माझं डोसक्याचं भरीत झालंय तू आणि लयं फिरवु नकु. भैय्या बोल तू हेझ काय करायचं म्या बघतू.
सुरज भैय्या : तुला सांगातु धना, आम्ही बघ 70-80 जण हाय, आम्ही कधी भेटलू बी नाय आणि महेश बोरगे तर कधी कुठं काय सांगाय बी जात नाय. आमचं सगळं मोबाईलवर... पीक कुठलं लावायचं, मशागत कशी करायची ही कधी पुस्तकात वाचून आणि कुणी सांगून होत नाय. आजकाल सगळी मोठी तज्ञ झाल्याती.. पर इथं सगळं आपलं आपुन करायचं...
सगु तात्या: आर मग ती करत्याती कायं, उग येड्यावणी कायं तर बरळु नगं...
आप्पा : आर आपली काम आपुन करतच राहायचं, गरज वाटली तर थोडा बदल सांगत्याती. मजी बघ, आतापतुर मी बैलं फिराया सोपं जातंय म्हणून सरळ उभं पेरायचो पण जवा कपाशी फुलावर याची तवा वारं सरळ निघून जायचं यावेळी ग्रुप मध्ये आडवं पेरल्याव होणारं फायदा सांगितला आणि म्या आणि भैय्या न आडवं पेरलं... पेराया जर येळ गेला पर लेका जवळजवळ सगळ्या फुलातनं बोण्ड फुटली की...
धना : काय सांगतूस, भैया खरंय कायं...
सुरज भैय्या : आर धना नुसतं खरं नाय तर सगळीकडे माझीशेतीचे ग्रुप झाल्याती आपुन बी आपल्यासाठी माझी, तुझी आणि समद्यांची शेती मिळून करूया... आपलं ग्रुप करूया. जगाच्या शेतीच परत बघू पर माझीशेती आधी फुलवू...
धना : मग आपण कधी जायचं भेटायला...
सुरज भैया : आर धना, कश्याला कुठं जातूस... माझं पाणी पाजयचं पडलंय.
सगु तात्या : आर मग कश्याला हुलीव घालातूयास.. आमचं आमी करतुय नव्ह शेती, लयं आला माझीशेतीच सांगाय.
सुरज भैया : आर माझीशेती म्हंजीच माझीशेती, स्वतः स्वतःची शेती करत करत इतरांशी गप्पा मारायच्या. शेती करता करता काय प्रश्न पडला तर सरळ ग्रुपवर विचारायचा आणि उत्तर घ्यायचं... तुला काय प्रश्न पडला तर ग्रुपमध्ये विचार मला येत असेल तर मी सांगीन नायतर कोणी ना कोणी तरी सांगिलच की...
धना : मी कुठल्या ग्रुपमध्ये विचारू...
सुरज भैया : तुला व्हाट्स अप वापरायला येत का? फेसबुक माहिती हाय का??? मोबाईल वापरायला येतो का?
सगु तात्या : ही बघा वाडीवन आलं येड आणि भज्याला म्हणतंय पेढ... गावात कोणाची टाप हाय का आमच्यासारखा मोबाईल वापरायची...
धना : भैया, आता तुला वाटतंय का मोबाईल वापराया येत नसल.
सुरज भैया: मग सरळ 9975740444 मेसेज कर आणि ग्रुपला ऍड हो. झालं...
आप्पा : आर मग आपुन रोजच हाय की इथं, जगाच्या उसाभरी काढण्या परीस चार चांगल्या गोष्टी करू.
धना : आपुन एक रोज इथं हाय म्हणून का रोज समदी हायत का? आपल्यामुळे जर चार चौघांचं भलं होत आसलं तर काय वंगाळ हाय का?
सुरज भैया : आपल्याला काय लागणार, किती लागणार हे आपणच ठरवायचं आणि सगळ्यांनी एकत्रच घ्याचं, आपलं चार पैसे वाचलं तर पोरा बाळसनी खायला घ्याला ईल.
धना : कोण कोणाचं नाय बघ.सगळी कास्तकाराच्या जीवावर धंदा कराया बसलीती. आपणच आपलं बघितलं पायजे.
सुरज भैया : आपल्या भारतात सगळ्यात मोठा समाज आपला शेतकरी / कास्तकार समाज आहे. कोणाला आपल्याला दुखवुन काय करायला येतच नाही. येक सांगतो बघा, सगळी गॉड बोलून आपली मार्त्यात, आपण ठरवायला पायजे कोणाला जवळ करायचं आणि कोणाला लांब.. आपण जोवर आपल्या धंद्यासाठी एक होत नाय तोवर सगळे आपल्या मेल्याल्या मयताच लोणी खायाची बंद नाय हुणार...
आप्पा : भैया लेका मला गा कुठं येतूय मोबाईल वापराया...
सुरज भैया: मग आप्पा दर आयतवारी आपुन इथंच पाराव भेटू आणि फक्त शेती, शेतकरी आणि आपल्या गाव-शिवाराची चर्चा करू. आणि जर वाटलंच तर आपण गावासाठी व्यावसायिक शेतीची कार्यशाळा बी घेऊ की... त्यात समजतंय की मोबाईल, कॉम्पुटर, इंटरनेट वापरायला. शासन, विद्यापीठ, इतर संस्था काय सांगत्यात, जगात काय चाललंय ही बघायचं कसं ही समदं माझीशेती शिकवते.
सगु तात्या : ये बाबा, पैशाच काय बी नगु सांगूस. इथं दिसभर पारावर बस म्हंजी तुला कळल कितीजण माहिती देणारे सल्लागार गाड्या घेऊन फिरत्यात.
सुरज भैया : त्याना कश्याला पैसे द्यायचे. आपण आपल्यासाठी गट तयार करायचा, आपण आपल्याकडून आपल्यासाठी पैसे घ्यायचं आणि गरज लागली तर आपल्यासाठी खर्च करायचं. माझीशेती ही शासनाकडून धर्मादाय उपक्रम राबविण्यासाठी नोंदणीकृत संस्था आहे.
सगु तात्या : मग ती काय फुकट करत्याती का?
धना : धर्मादाय कडची संस्था म्हणजे समाजासाठी काम करते. काय भैया बरोबर हाय क नाय.
सुरज भैया : होय धना, असच हाय... इथं पैश्याची लूट अजिबात नाय बघ...
सगु तात्या : आर असं असलं तर मी बी देतू की... चला मग मी जातू माझीशेती मध्ये...
धना : मी बी हाय माझीशेती मध्ये...
आप्पा : भैय्या तुला पाण्याची पाळी पायजी नव्ह, तर चल माझीशेती मध्ये...
.
.
.
(हसत हसत सर्वजण निघून जातात)