Wednesday, November 15, 2017

राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत -कांदा चाळ अनुदान योजना

राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत -कांदा चाळ अनुदान योजना

लाभार्थी
वैयक्तिक शेतकरी/खरेदी विक्री सहकारी संघ/कृषि उत्पन्न बाजार समित्या/कांदा उत्पादक सहकारी संस्था/विविध कार्यकारी सहकारी संस्था/पणन व प्रक्रिया सहकारी संस्था

अनुदान
महत्तम मर्यादा रु.6000/- प्रति मे.टन एवढी राहील. त्यांच्या 25 टक्के म्हणजे रु.1500/- प्रति मे.टन एवढे अनुदान देय राहील. अनुदान हे रु.1500/- प्रति मे.टन किंवा बांधकाम खर्चाच्या 25 टक्के जे कमी असेल ते लाभार्थीस देय राहील.

अनुदान मर्यादा
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी रु.1,50,000/- अनुदान देण्यात येईल तर इतर सहकारी संस्था/कृषि उत्पन्न बाजार समित्या/कांदा उत्पादक सहकारी संस्था यांना जास्तीत जास्त 500 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळींसाठी रु.7,50,000/- एवढे अनुदान देण्यात येईल.




प्रस्ताव सादर करण्याची पद्धत 
(अ) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी :
1. विहीत नमुन्यातील अर्ज. 
2. अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा. 
3. वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे. 
4. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल. 
5. लाभार्थींनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा. 
6. अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा. 
7. कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा. 
8. अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा. 
9. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल. 


(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत :
सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा. 
1. संस्थेने कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
2. संस्थेमार्फत किती मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी. 
3. प्रकल्पासाठी संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7, 7-अ/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे. 
4. प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा. 
5. कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा.


कांदा चाळीची उभारणी करताना खालील गोष्टी टाळाव्यात
1 कांदा चाळीसाठी पानथळ/खोलगट ठिकाणीची कच्चे रस्ते असणारी जमीन टाळावी. 
2 हवा नैसर्गिक रित्या खेळती राहण्यास असलेले अडथळे टाळावे अथवा कमी करावे, 
3 कांदा चाळीचे लगत कोणतेही उंच बांधकाम असू नये. 
4 निवाऱ्याच्या बाजूच्या भिंतीची फ्लॅट फॉर्मची खालील झडप बंद असावी, जेथे वादळ आणि वादळी वारे अपेक्षीत आहे, अशा ठिकाणी हवेची/वाऱ्याची बाजू उघडी असेल तर निवाऱ्याची बाजू बंद असु नये. 
5 वादळ आणि जोरदार पावसामध्ये वाऱ्याची बाजू बंद करण्याची व्यवस्था असावी. आवश्यकता असेल तेव्हा उघडता यावी. 
6 कांदाचाळींमध्ये वरच्या बाजूस उष्णता प्रतिबंधक छताचे साहित्याचा वापर करावा. छतासाठी लोखंडी पन्हाळी पत्र्यासारख्या साहित्याचा वापर टाळावा, 
सदर प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था,/कृषि उत्पन्न बाजार समित्या किंवा पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.


या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा पणन मंडळाचे मुख्य कार्यालय किंवा पणन मंडळाचे विभागीय कार्यालय पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा.