बाजार

शेतकरी
शेतकरी बांधवांनी मालाच्या विक्रीसाठी नोंदणीकृत व्यावसायिक सहयोगी संस्थांना स्वतः संपर्क करावा. संबंधित संस्थांसोबत यथोचित नोंदणी प्रक्रिया पुर्ण केलेली आहे. तरीही शेतकऱ्यांनी वैयक्तिक जबाबदारीवर त्यांच्याशी व्यवहार करावा. भविष्यात काही अपरिहार्य कारणास्तव शेतकरी अडचणीत आले तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू परंतु जबाबदार राहणार नाही. 

ग्राहक
शेतकरी ते ग्राहक उपक्रम राबविताना सध्याच्या स्थिरस्थावर यंत्रणेला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली आहे. शेतकरी / सहयोगी संस्था / ग्राहक यांचे नुकसान होणार नाही यासाठी प्राधान्य दिले जाते. नोंदणीकृत सोसायटी / क्लब/ बचत गट/ कंपनी / शासकीय संस्था यांच्या सदस्यांना मागणीनुसार पुरवठा केला जातो. 
फोन / मेसेज / whats app/ Facebook / email
प्रत्यक्ष भेट / ग्रुपमार्फत तुमची मागणी कळवा. 
8806907444


व्यापारी / उत्पादक
गुणवत्ता, मधली एजंट साखळी, गैरव्यवहार, मानसिक व आर्थिक त्रास अश्या गोष्टींपासून सुटका होईल. संस्थेच्या महाराष्ट्र स्तरावरील नेटवर्कमधुन मुंबईपासुन गोंदियापर्यंत तसेच नंदुरबार पासुन कोल्हापुर, सिंधुदुर्ग पर्यंत सर्वत्र आपत्कालीन सहकार्य, व्यवसाय वृद्धीसाठी सहकार्य केले जाईल. स्थानिक व्यापाऱ्यांना सहयोगी संस्थामार्फत १८ राज्यांमध्ये व्यवसाय वाढ व आर्थिक सुरक्षा मिळेल.

 

Popular Posts

Image

वांगी