Sunday, March 12, 2017

माझीशेती : स्त्रियांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन त्यांना उपजीविका विकास करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन

माझीशेती : स्त्रियांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन त्यांना उपजीविका विकास करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन (170310)
https://youtu.be/gXJQbcCmmec

 खुर्द येथे ग्रामीण भागातील महिला सबलीकरण अंतर्गत सुझलन फाऊंडेशनच्या सामाजिक विकास प्रकल्प अंतर्गत आणि येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हस्तकला व कौशल्ये विकासाचे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

स्त्रियांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन त्यांना उपजीविका विकास करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले. सुझलानच्या सामाजिक बांधीलकी निधीतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थित महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून Mazisheti Pratishthan कडुन या प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंना मार्केट कसे शोधायचे आणि उत्पन्न वाढीसाठी सहकार्य आणि मार्गदर्शन देण्याचे आश्वासन महेश बोरगे यांनी दिले.

यावेळी श्री. सागर खोत यांच्यासोबत घोटी खुर्दच्या मा. सरपंच महोदया, माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश बोरगे (Mahesh Borge, सावळज), वर्षा मस्के, अश्विनी शिंदे तसेच राजाभाऊ सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सौ.कदम मॅडम उपस्थित होते.

फी, देणगी, वर्गणी देण्यासाठी https://pay.paytm.com/MAZISH23249404229094 इथे क्लिक करा.
----------------------------------------
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
वेबसाईट - www.mazisheti.org
सोशल मिडिया - www.mazisheti.org/p/sm.html
----------------------------------------

Monday, March 6, 2017

माझीशेती : महिला सबलीकरण (170305)

माझीशेती : सावळज येथे ग्रामीण भागातील महिला सबलीकरण अंतर्गत सुझलन फाऊंडेशन आणि येरळा विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बेसिक शिलाई, आधुनिक ब्लाउज, आधुनिक मुलींचे ड्रेस शिलाईचे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.


यावेळी श्री. सागर खोत यांच्यासोबत माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश बोरगे (Mahesh Borge, सावळज) , श्री. राजू पाटील, तासगाव उपस्थित होते. ग्रामीण भागात वेगवेगळ्या योजनेतून शिलाई मशीन पुरवण्यात येतात पण त्या चालवायच्या कश्या आणि उपजिविकेचे माध्यम म्हणून मशीनचा उपयोग होणे गरजेचे आहे.

सुझलानच्या सामाजिक बांधीलकी निधीतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थित महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून Mazisheti Pratishthan कडुन या प्रशिक्षणार्थ्यांना ऍडव्हान्सड ड्रेस पेंटिंग आणि जरदोजीचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन महेश बोरगे यांनी दिले.

पिक लागवड व सल्ला अधिक माहितीसाठी www.mazisheti.org/p/shivar.html वाचा.

आमच्या व्हाट्स ऍप ग्रुपमध्ये सहभागी व्हा, www.mazisheti.org/p/whatsapp.html आणि कोणत्याही अवांतर मेसेजच्या त्रासाशिवाय शेतीची माहिती घ्या. (फक्त सदस्यांना मर्यादित)

नोंदणी फी, देणगी, सभासद वर्गणी देण्यासाठी https://pay.paytm.com/MAZISH23249404229094 इथे क्लिक करा.
--------------------------------------------------
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
वेबसाईट - www.mazisheti.org
सोशल मिडिया - www.mazisheti.org/p/sm.html
-------------------------------------------------

Friday, March 3, 2017

माझीशेती:शेतीसल्ला(१७०३०३)


     मशरूम(आलिंबी)

·                                    मशरूमला जगभर एक पौष्टिक अन्नम्हणून मान्यता मिळालेली आहे. भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे व जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.आपल्या शरीराच्या वाढीसाठी व सुस्थितीत राहण्याकरिता १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहा अमिनो आम्ले मशरूम मध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत.
·                             मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण ते संपूर्णतः शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरूमवरील संशोधनानंतर मशरूम मध्ये अॅन्टी व्हायरलअॅन्टी कॅन्सरचे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत. मशरूममध्ये तंतुमय पदार्थ अधिक आहेत. तसेच फॉलिक अॅसिड आहे. हे दोन्ही घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरिता मदत करतात. कमी उर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूम मध्ये कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे.
                मशरूम लागवड प्रक्रिया
*काड भिजवणे:
प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे.
*निर्जंतुकीकरण:
निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. त्यात १०० लि.पाणी टाकावे व ते ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावे व त्यात भिजवलेले काड १ तास ठेवावे. त्यानंतर २ तास निर्जंतुक केलेले काड निथळण्याकरिता ठेवावे.
*बी पेरणे:
प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा. अंदाजे दोन ते अडीच इंच. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे. बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा. पुन्हा बी चा ठार, असे करून पिशवी भरावी.
बी पेरताना ओल्या काडाच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना काड दाबून भरावे. पिशवी भरल्यावर दोर्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत. छिद्रे पाडताना दाभान किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा.
*उबविणे:
बुरशीच्या वाढीकरिता उबविने ही महत्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे.
*पिशवी काढणे:
पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. तापमान २० ते ३० अंश सेल्सियस  व आद्रता ७०-८५% राहील याची दक्षता घ्यावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी. पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी. फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा.
*काढणी:
मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. मशरूमकाढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.
एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.
                आळिंबी लागवड प्रक्रिया:
काड भिजवणे १२ ते १५ तास गरम पाण्यात निर्जंतुक करणे
१ तास
पिशव्यांमध्ये बी भरणे
उबविणे
१४ ते २० दिवस
पिशवी काढणे
२-३ दिवस
१ ली काढणी
४-६ दिवस
२ री काढणी
५-६ दिवस
३ री काढणी
                   साठवण
        ज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या २००-३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात. ४-५ दिवस फ्रीजमध्ये मशरूमउत्तम राहते. मशरूम उन्हात दोन दिवसात उत्तम वळते. मशरूम वाळवण्याकरिता ४५-५० अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते. वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.
मशरूम उत्पादन येण्याकरिता महत्वाच्या बाबी :
१. मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा.
२. मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे.
३. मशरूमच्या खोलीत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यावी.
४. खोलीतील तापमान ३० अंश सेल्सियस व आद्रता ८०% राहील याची काळजी घ्यावी.
५. आळिंबी लागवड करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे, चप्पल यांचा वापर करावा.
६. नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा.
७. काडाचे निर्जंतुकीकरण महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी.
८. सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधीप्रकाश बॅग उघडल्यावरच भरपूर ठेवावा.
९. मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे.
१०. पिशव्या भरण्यापूर्वी काड फार ओले नसावे. हाताने दाबून पाहावे. पाणी न निघाल्यास भरण्यास योग्य आहे, असे समजावे.
११. पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर १० इंच ठेवावे.
१२ .रोग, किडीचा, चिलटांचा प्रादुर्भाव झाल्यास नुवान ( १ मि.मि., १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.)
१३. आळिंबीचे स्पॉन विश्वसनीय संस्थेमार्फतच घ्यावे. जुने, काळसर, हिरवी बुरशी असणारे स्पॉन वापरू नये.
१४. भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये कीडी, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नाही ना, या करिता दर रोज निरीक्षण करावे.
१५.  मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायरमध्ये आळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी.
अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आपण यशस्वी उत्पादन घेऊ शकतो.

         
                मशरूमची विक्री व्यवस्था
१) ताजे मशरूम २५ ते ३० रुपये प्रति किलो घाऊक दराने विकले जातात. पुणे- मुंबईत भाजी मंडईत सहज विक्री होत आहे.
२) वाळवलेले मशरूम विक्री हा ताज्या मशरूम पेक्षा विक्रीस सोपा प्रकार आहे. ताजे मशरूम वाळवून (सूर्यप्रकाशात/ड्रायर मध्ये) सीलबंद केल्यास ३ वर्षे टिकतात. त्यामुळे खराब होण्याची भीती नाही. वाळविलेले मशरूम २५० ते ३०० रुपये प्रति किलो दराने खरेदी केले जातात.
                                                                           स्रोत:वनराई संस्था 

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे निय...