शेती अपडेट्स... दि.०३ फेब्रुवारी २०१८

#शासन 
  • शेतकरी कुशल योजना आणि वैयक्तिक व गटांनी केलेल्या प्रकल्पांना कर्ज व त्यावरील व्याज परतावा व अश्या शेती आणि पुरक योजनांना प्रारंभ झाला.
  • शेतकरी कुशल योजना अंतर्गत २०० कोटींच्या खर्चामध्ये ०२ प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ३४ अभ्यासक्रम १६ महिन्यांच्या काळात पुर्ण केले जाणार. 
#शेती
  • कृषि विभागाने मराठवाड्यात केलेल्या सर्वेक्षणात साडे सतरा लाख हेक्टर क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसुन आला. पंचनामे पुर्ण झाले आहेत, शेतकरी मदतीची वाट पहात आहेत.
  • सातारा जिल्ह्यात ५१ लाख टन उस गाळप, दर कमी केल्याने शेतकरी नाराज...
  • वनशेती, नारळामध्ये मसाला पिके, पिवळी डेझी फुल निर्मिती, उन्हाळी सुर्यफुल आणि मातीचे गुणधर्म यांची सविस्तर माहिती आजच्या अग्रोवनमध्ये..
#निविष्ठा
  • प्रोफेनोफोस ४०%, असिफेट, डायफेन्थ्युरॉन, मोनोक्रोटोफॉस, फिप्रोनील यांच्यावरील बंदीची मुदतवाढ मिळण्यासाठी अमरावती विभागाची शिफारस 
#व्यवसाय
  • तासगाव मध्ये माझीशेतीकडून शेतकरी गट, महिला गट यांच्यासाठी शेळी व बेदाणा क्लस्टर योजना
#यशोगाथा
  • बाळकृष्ण पाटील, कंडारी ता. नांदुरा, जि. बुलढाणा यांचे यशस्वी तुर उत्पादन
  • सुरेश आप्पासाहेब कबाडे, कारंदवाडी ता.वाळवा जि. सांगली यांचे यशस्वी उस उत्पादन 

सौजन्य सकाळ अग्रोवन वरील माहिती अग्रोवन दैनिकामध्ये सविस्तर आहे. 

Popular Posts