शेती अपडेट्स... दि.07 फेब्रु.2018#शासन/योजना 
 • ऊस - साखरेच्या घसरत्या किमतीमुळे केंद्र शासनाने साखर आयात शुल्क १००% केले आहे.
 • हरभरा - ३०% आयात शुल्कामध्ये १०% वाढ केली.
 • कापुस - नवीन वस्त्रोद्योग धोरण मंत्रिमंडळाची मंजुरी, यामध्ये ३६ हजार कोटी गुंतवणूक, १० लाख रोजगार निर्मिती, ३.५ ते ४ रुपये / युनिट दराने वीज, मराठवाडा व विदर्भात उद्योग येण्यासाठी ४५% भागभांडवल अनुदान 
#शेती
 • पशुधन - चुकीच्या पद्धतीने रेतन केल्याने खिलार गाईस जर्सी वासराचा जन्म, रेतन करणारे पशुधन पर्यवेक्षक मोहन चौधरी निलंबित

#हवामान 
 • राज्यात तुरळक ठिकाणी बुधवारपासुन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता... अधिक वाचा... 
 • कोकण व मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज..
#कायदा/न्यायालय 
 • शेतकऱ्यांच्या जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर फेरफार तयार करून इतरांची नोंदी घालणाऱ्या ग्रामसेवक, उपसरपंच यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली गेली.  
 • यवतमाळ विषबाधा प्रकरण - SITचा अहवाल हा अधिकारी आणि कीडनाशक कंपन्या यांना क्लिनचीट देणारा आहे. त्यामुळे अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह व इतर सहा सदस्य यांच्यावर कारवाईची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल, न्यायालयाने उत्तर देण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. 
#शिक्षण /करिअर 
 • कृषि सेवक नवीन ७३० जागांसाठी भरती प्रक्रियेतून परीक्षा परिषदेला डच्चूमहाऑनलाईन घेणार परीक्षा 
 • माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या विद्यार्थी विकास योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना दरमहा रु. १०००/- विद्यावेतनाची तरतूद... अधिक वाचा
#बाजार 
 • तुर - सोमवारअखेर १६० तुर केंद्रावर १ लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ३३९ शेतकऱ्यांची ३७५५ क्विंटल तुर खरेदी केली गेली. 
 • केळी - निर्यात कमी झाल्याने जुनारी केळीस बाजारात एक हजार प्रति क्विंटल तर पिलबाग केळीला सरासरी १०५०प्रति क्विंटल दर मिळत आहे.  

#निविष्ठा

 • माझीशेतीकडून शेतकरी गटांच्या निविष्ठा खरेदीमध्ये १०% ते ५०% अनुदान अधिक वाचा...
  #व्यवसाय
  • ग्रामीण भागातील व्यावसायिकांना मोफत वेबसाईट आणि डिजिटल इंटिग्रेशनची सुविधा अधिक वाचा...
  #यशोगाथा
  • हळद - डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या हळदीच्या कंदापासून एका दिवसात हळद पावडर तयार करण्याच्या तंत्रज्ञानास पेटंट घेण्यासाठी प्रयत्न सुरु, अधिकाधिक प्रसार होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यासोबत करार केले जात आहेत.
  • माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान कडून दिला जाणारा ग्रीट पुरस्कार अधिक वाचा...

  सौजन्य सकाळ अग्रोवन वरील माहिती अग्रोवन दैनिकामध्ये सविस्तर आहे. 

  Popular Posts