कृषिविषयक बातमीपत्र (०६/०४/२०१८)

  • प्रचलित उत्पादन पद्धतीने पर्यावरण धोक्यात - संयुक्त राष्ट्रसंघ
वाढती अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी जगात जी उत्पादन पद्धती वापरली जात आहे, त्यामुळे कृषी पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याचा परिणाम मृदा, जंगल, पाणी, हवा आणि जैवविविधतेवर होत असून, जमीन आणि पर्यावरण धोक्यात येत आहे, असा सूर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) मुख्यालयात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यावरण परिसंवादात निघाला. सविस्तर वाचा...
  • पश्चिम बंगाल सरकार दुध उत्पादकांना प्रतिलिटर ०२ रुपये अनुदान देणार 
राज्यातील दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी पश्चिम बंगाल सरकार प्रयत्नशील आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील दूध उत्पादकांना खरेदी दरावर प्रतिलिटर दोन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारी दूध सोसायट्यांच्या माध्यमातून सरकारला दूध विकणाऱ्या उत्पादकांना याचा लाभ मिळणार आहे. सविस्तर वाचा.
  • राज्यात वादळी पावसाची शक्यता - हवामान विभाग 

विदर्भातील वनी (जि. यवतमाळ) परिसरात गुरुवारी (ता. ५) पहाटे तीन वाजता मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडला. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने शुक्रवारपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सविस्तर वाचा.
  • सरकारने ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळले 
मंत्रालयाचे आत्महत्यालय करणाऱ्या भाजपला उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही. कर्जमाफी योजनेतून जवळपास ५० लाख शेतकऱ्यांना वगळणारे फडणवीस सरकार पक्ष स्थापनेचा उत्सव साजरा करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. सविस्तर वाचा.
  • विदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपूरमध्ये आंदोलन 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने राज्यभरात विरोधकांचा सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असतानाच आता मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ५) पंढरपुरात सरकारविरोधात आंदोलन केले. शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कापसावरील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी विदर्भवासीय शेतकऱ्यांनी व गुरुदेव सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट विठ्ठलालाच आंदोलनाच्या माध्यमातून साकडे घातले. सविस्तर वाचा.
  • अन्नप्रक्रिया उद्योगांना सवलती जाहीर - कृषिमंत्री 
कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्याने जाहीर केलेल्या अन्न प्रक्रिया धोरणाला पूरक अशा सवलती देण्याबाबतचे निर्णय महसूल आणि जलसंपदा विभागाने घेतले आहेत. यामुळे अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी गती मिळणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. सविस्तर वाचा.
  • ऊस उत्पादक शेतकरी भरडला जाण्याची शक्यता 
गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर खाली आल्याने अखेर राज्य सहकारी बॅंकेने पुन्हा मूल्यांकन कमी केले आहे. बुधवारी (ता.४) सायंकाळी साखर मूल्यांकनात १८० रुपयांची कपात केली आहे. सविस्तर वाचा.
  • कृषि निविष्ठा विक्रीमध्ये आता पोलीस (गृहविभाग) सहभागी होणार 
गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता सावधगिरीच्या पावित्र्यात असलेल्या कृषी विभागाने यावर्षीच्या निविष्ठा विक्री मोहिमेत पोलिसांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता लवकरच यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांकरीता कार्यशाळा होणार आहे. सविस्तर वाचा.
  • कृषीच्या विद्यार्थ्यांना अपारंपरिक उर्जा विकासाचे धडे 
कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जाक्षेत्राशी संबंधित कौशल्य विकासाचे धडे देत त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण करण्याकरिता भारतीय कृषी संशोधन परिषदेने तब्बल पाच कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल. सविस्तर वाचा.
  • बेदाणा विक्री दरामध्ये वाढ 
गतवर्षीच्या तुलनेत यंदा बेदाणानिर्मितीला पोषक वातावरण मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना गुणवत्तेचा बेदाणा तयार करणे शक्‍य झाले आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या बेदाण्याच्या दरात वाढ झाली असून, प्रतिकिलोस १५० ते २२५ रुपये असा दर मिळत आहे. सविस्तर वाचा.
  • खत विक्रीमध्ये GST चा उल्लेख अनिवार्य 
केंद्रीय खत व रसायन मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या डी.बी.टी. योजनेत आता नवे बदल झाले आहेत. देशातील प्रत्येक खत विक्रेत्यास आता पॉस मशिनद्वारे रासायनिक खतांची विक्री करताना 'जीएसटी' (वस्तू आणि सेवा कर)चा उल्लेख करावा लागणार आहे. सविस्तर वाचा.
  • राज्यात वांगी प्रति क्विंटल ३०० ते २५०० पर्यंत 
जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची आवक टिकून आहे. त्यांना प्रतिक्विंटल ३०० ते ६०० व सरासरी ४०० रुपयांपर्यंतच दर मिळाला. आवक कायम असून, सध्या शुभकार्य, लग्नसराई आदींमुळे मागणी कायम आहे. सविस्तर वाचा.
  • अकोला खारपानपट्ट्यात तीव्र पाणीटंचाई
अकोला   आधीच खारपाणपट्टा असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात या वर्षी कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अकोला तालुक्‍यातील खारपाण पट्ट्यात असलेल्या गावांमध्ये डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. ही पाणीटंचाई लोकांसाठी परीक्षा घेणारी ठरत आहे. सविस्तर वाचा.
  • नगरमध्ये १७७९६ क्विंटल हरभरा खरेदी 
नगर जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू आहेत. या ठिकाणी आतापर्यंत १७ हजार ७९६ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. हरभरा विक्री करण्यासाठी आतापर्यंत ७ हजार २३० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग कार्यालयातून देण्यात आली. सविस्तर वाचा.
  • गिरणा धरणाच्या आवर्तनाचा जळगाव, धरणगावला लाभ नाही.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव व जळगाव आदी तालुक्‍यांची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणातून बुधवारी (ता.४) पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन फक्त पाचोरापर्यंत येईल. पुढे जळगाव, धरणगाव या तालुक्‍यांमधील गावांना त्याचा फारसा लाभ होणार नाही, अशी स्थिती आहे. सविस्तर वाचा.