माझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (०७/०४/२०१८)

बदनामी विरोधात न्यायालयात जाणार : हजारे
राळेगणसिद्धी, जि. नगर : "सातत्याने खोट्या आरोपांद्वारे मला व आंदोलनाला संघाशी जोडून विविध मार्गांनी वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. वारंवार होणाऱ्या या बदनामी विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार आहे,'' असे अण्णा हजारे यांनी येथे स्पष्ट केले. अधिक वाचा.

संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील; राज्यावर वादळी पावसाचे सावट 
पुणे : कोल्हापूर, सांगलीसह राज्यात गुरुवारी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. कोल्हापुरात जोरदार वाऱ्यांसह गारपीट झाली. शुक्रवारी सकाळपासूनच राज्यात ढग गोळा झाले होते. रविवारपर्यंत (ता. ८) राज्यावर विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचे सावट कायम राहणार आहे, तर मंगळवारपर्यंत (ता. १०) राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अधिक वाचा.
औरंगाबाद विभागात ४ लाख ४० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ 
औरंगाबाद  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मार्चअखेर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ४ लाख ४० हजार ७८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची १९२१ कोटी ४८ लाख १८ हजार २०० रुपयांची रक्‍कम वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिक वाचा

कोल्हापुर जिल्ह्यात कृषी विभागास ‘बुरे दिन’ 
कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील कृषी विभागात ‘बुरे दिन’ आल्याचे चित्र आहे. विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असणारा समन्वयाचा अभाव, कृषी विभागात आलेली शिथिलता, वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तुटत असलेला संवाद याचा एकत्रित परिणाम कृषी विभागाच्या कामकाजावर झाला आहे. त्यातच कृषी महोत्सवाकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ आणि परत केलेला साडेतीन कोटी रुपयांचा निधी यामुळे सध्या कृषी विभागातील वातावरण बिघडल्याचे चित्र आहे. अधिक वाचा.


नगर जिल्ह्यात ८५ हजार क्विंटल तूर खरेदी 
जिल्ह्यात आतापर्यंत दहा शासकीय खरेदी केंद्रांवर ८५ हजार १०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. ८९०४ शेतकऱ्यांनी तूर विक्री केली असून, ऑनलाईन नोंदणी केल्यानुसार अजून जवळपास ४ हजार शेतकऱ्यांची तूर विक्री बाकी आहे. या खरेदी केलेल्या तुरीची रक्कम सुमारे ४६ कोटी ३७ लाख आहे. अजून अनेक शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाहीत. किती शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाहीत याचा आकडा मात्र मार्केटिंग फेडरेशनकडे नाही. अधिक वाचा 

जळगावमध्ये हरभऱ्याची आवक अधिक; खरेदी केंद्रे मात्र अपुरीच 

जिल्ह्यात हरभरा खरेदी रखडतच सुरू आहे. परिणामी सर्वच हरभरा उत्पादकांना या शासकीय खरेदीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा हरभरा पेरणीने उच्चांक गाठला. आवक अधिक आणि शासकीय खरेदी केंद्रांची अपुरी संख्या अशी स्थिती जिल्ह्यात आहे. अधिक वाचा.


तूर, हरभरा खरेदीसाठी गोदामे ताब्यात घेणार 
शेतकऱ्यांची तूर तसेच हरभरा खरेदीला गती देण्यासाठी जिल्हा स्तरावरील उपलब्ध असलेली गोदामे ताब्यात घेण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करावी. तूर व हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू असलेल्या खरेदी केंद्रावरील खरेदीच्या कामाला गती द्यावी. ठरवून दिलेल्या कालमर्यादेत खरेदी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने प्रयत्न करावेत. असे निर्देश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. अधिक वाचा.

शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास महागाई वाढेल : रिझर्व्ह बॅंक 
केंद्र सरकारने २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. परंतु शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन महागाई वाढेल, अशी शक्यता भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) वर्तविली आहे. अधिक वाचा.बोगस कृषी विद्यापीठाच्या चौकशीसाठी चार पथके 
सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे स्थापन करण्यात आलेल्या बोगस कृषी विद्यापीठाची चौकशी करण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर फौजदारी गुन्हा केला जाणार आहे. अधिक वाचा.

पाण्यातील नत्राचे प्रमाण कमी करण्यामध्ये मिथेन मोलाचा 
गोड्या पाण्याच्या स्रोतामधील कार्यक्षम नायट्रोजनच्या प्रमाणामध्ये लक्षणीयरीत्या घट होण्याच्या प्रक्रियेतील अनेक बाबींचा उलगडा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात झालेला आहे. अधिक वाचा.अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धात भारताला संधी 
चीनने अमेरिकेतून आयात ३३४ वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावले आहे, तर अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या १३०० वस्तूंवर आयात शुल्क लावले आहे. जगातील या सर्वांत मोठ्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये सध्या व्यापारयुद्ध सुरू आहे. याचा फायदा भारताला होणार असून कापूस, मका आणि तेलबिया पेंड निर्यातीला संधी आहे, तसेच आशियायी देशांतील बाजार उपलब्ध होऊ शकतो, असे व्यापरतज्ज्ञ आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. अधिक वाचा.

साताऱ्यामधील सर्वच तालुक्‍यांतील भूजलपातळी वाढली 
जलयुक्त शिवार योजना, मनरेगासह अन्य योजनांतून केलेली जलसंधारणाची कामे तसेच परतीचा दमदार झालेला पाऊस, यामुळे यंदा सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांतील भूजलपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाईची झळ कमी बसत असून, टॅंकरच्या संख्येतही घट झाली आहे. अधिक वाचा.

जळगावमधील ७४ गावांना ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा 
जिल्ह्यात हरभरा खरेदी रखडतच सुरू आहे. परिणामी सर्वच हरभरा उत्पादकांना या शासकीय खरेदीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा हरभरा पेरणीने उच्चांक गाठला. आवक अधिक आणि शासकीय खरेदी केंद्रांची अपुरी संख्या अशी स्थिती जिल्ह्यात आहे.