माझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (११/०४/२०१८)

·         तापमानात वाढ झाल्‍यास फळझाडांवर कोणत्या उपाययोजना कराव्यात.

1.       नवीन लागवड केलेल्‍या कलमांचे संरक्षण करण्‍यासाठी सावली करावी.
2.       कलमांच्‍या आळ्यातील पाण्‍याचे बाष्‍पीभवन कमी होण्‍यासाठी वाळलेले गवतपालापाचोळाऊस पाचट किंवा पॉलिथीनचे आच्‍छादन करावे. कलमांना सकाळी मडका सिंचनठिबक सिंचन पद्धतीनेच पाणी द्यावे.
3.       आंबा फळे बटर पेपरने झाकून घ्‍यावीत. जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाश व उष्‍णता यापासून फळांचे संरक्षण होईल.
4.       झाडांच्‍या खोडाला बोर्डोपेस्‍ट (१० टक्‍के) लावावी.
5.       पाणीटंचाई असल्‍यास झाडांवर १५ ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्‍यामुळे झाडांची पाण्‍याचा ताण सहन करण्‍याची क्षमता वाढते. अधिक वाचा...

·         आंबिया (वसंत ऋतू) बहरमध्ये संत्रामोसंबी बागेतील फळगळ नियंत्रण
1.       नियमित ठिबक सिंचन वेळापत्रकाप्रमाणे सध्या एप्रिल महिन्यात १०० ते १२० लिटर पाणी/दिवस/ झाड पाणी द्यावे. पुढे मे महिन्यात १६० ते १८० लिटर पाणी/दिवस/झाड ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. 
2.       आळे पद्धतीने पाणी देत असल्यास ३ ते ४ दिवसांच्या अंतराने डबल रिंग पद्धतीने मातीच्या मगदुराप्रमाणे पाणी (कमी प्रमाणात पण जास्त वेळा विभागून) द्यावे.
3.       प्लॅस्‍टिक किंवा गवताने आळ्यामध्ये आच्छादन करावे.
4.       फवारणी : ,४-डी (१५ पी.पी.एम) १.५ ग्रॅम अधिक युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट २ किलो प्रति १०० लिटर पाणी किंवा पुढे १५ दिवसाच्या अंतराने जीए-३, (१५ पी.पी.एम) १.५ ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट २ किलो प्रति १२० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. अधिक वाचा...
  • गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निधीतून वैजापूर सिंचन यंत्रणेसाठी पाच कोटी ७९ लाख रुपये उपलब्ध


गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निधीतून पाच कोटी ७९ लाख रुपये उपलब्ध करून देण्यास या वेळी मान्यता देण्यात आली. वैजापूर तालुक्यातील १६ गावांतील शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयातून शेतीसाठी पाणी आणण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती. नाबार्ड व औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अर्थसाह्यातून १९९३ मध्ये ही योजना कार्यान्वित झाली होती. त्यानंतर १९९४-९५ व १९९५-९६ या दोन वर्षांत अनुक्रमे ७५५ व ९७ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले होते. अधिक वाचा...  • पाणीवाटपाचे नियोजन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले


माढा तालुक्‍यतील सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या उन्हाळी हंगामातील पाणीवाटपाचे नियोजन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मोडनिंब व पिंपळनेर वितरिकेच्या लाभक्षेत्रातील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ९) दुपारी टेंभुर्णी येथील भीमा पाटबंधारे उपविभागीय कार्यालय व पाटबंधारे शाखा कार्यालयाला टाळे ठोकत शाखा अभियंता सी. डी. घंटे यांच्यासह सात-आठ कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडले होते. अधिक वाचा...
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किसान सेनेच्या पुढाकाराने काट्यांवर बसून आंदोलन


बुलडाणा : शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किसान सेनेच्या पुढाकाराने मंगळवारी (ता.१०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काट्यांवर बसून आंदोलन करण्यात आले. या संदर्भात शासनाने दखल न घेतल्यास मंत्रालयात शेतीमाल फेकण्याचा इशारा देण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हा मेटाकुटीला आला आहे. शेतकरी आपल्या शेतातील वांगे, टोमॅटो, कोबी काढून फेकत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे दर अत्यंत कमी आहेत. तब्बल तिप्पट फरक आहे. दुसरीकडे शासकीय खरेदी बंद आहे. अधिक वाचा...
  • हमीभावाने तुर खरेदीसाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी - सदाभाऊ
हमीभावाने तुरीच्या खरेदीसाठी राज्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असून, निर्धारित मुदतीमध्ये तूर खरेदीसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्व तूर खरेदीस ३१ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. अधिक वाचा...


  • तीन जिल्ह्यांत एक लाख ३६ हजार क्विंटल तूर खरेदी


औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत १ लाख ३६ हजार ६२४ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली असून हरभरा खरेदीला अजूनही गती आलेली नाही. अधिक वाचा...
  • जागेअभावी सुमारे ३० हजार क्विंटल तूर वेगवेगळ्या केंद्रांवर पडून
बुलढाणा जिल्ह्यात नाफेडमार्फत सव्वातीन लाख क्विंटलपर्यंत तूर खरेदी झाली असून, सध्या ठेवायला जागा नसल्याने शेगाव वगळता सर्वच ठिकाणी तूर खरेदी केंद्रे बंद पडली आहेत. साठवणुकीसाठी गोदामांची व्यवस्था केली जावी, अशी मागणी जिल्हा मार्केटिंग विभागाने शासनाकडे केल्याची माहिती आहे. मात्र अद्याप यावर कुठलाही तोडगा काढण्यात आला नसून तूर खरेदीची मुदत अवघी आठ दिवसांनी (१८ एप्रिल) संपत आहे. अधिक वाचा...
  • हिंगोलीमध्ये मंगळवारी (ता. १०) हळदीला ५५०० ते ६५०० रुपये क्विंटल दर


हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डावर सोमवारी (ता. ९) हळदीची ७  हजार क्विंटल आवक झाली होती. यंदाच्या हंगामातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या हळदीची आवक मार्केट यार्डावर घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडे बारा ते पाच वाजेपर्यंत तसेच दुसऱ्या दिवशी जाहीर लिलावने हळदीची खरेदी केली जाणार आहे. येत्या काळात ई ऑक्शन पद्धतीने हळद खरेदी केली जाणार आहे. अधिक वाचा...
  • विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त
शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्याच्या घोषणा शासनाकडून केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र या घोषणा हवेतच विरत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज बाराऐवजी फक्त आठ तासच दिली जात असल्याचे कागदोपत्री दिसून येते. प्रत्यक्षात या आठ तासांमध्ये विजेचा चांगलाच लपंडाव सुरू असतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिक वाचा...
  • ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी आच्छादन केल्यास अधिक फायदा
शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात. पाचट हाताळण्यातील अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची उगवण कमी होणे आणि नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे ही पारंपरिक पद्धती अधिक सोयीची वाटते. मात्र, पाचटाचे आच्छादन जमिनीवर केल्यास होणारे फायदे यापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे संशोधनात आढळले आहेत. अधिक वाचा...
  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने ४६.५२ लाख शेतकऱ्यांना १४,३८८ कोटी कर्जाचे वाटप, जिल्हानिहाय माहिती अनुपलब्ध

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती मागितली होती. कर्जमाफीत एकूण शेतकऱ्यांची संख्या, एकूण मंजूर आणि नामंजूर अर्जाची संख्या, बँकेचे नाव, एकूण वाटप निधी याची जिल्हानिहाय माहिती त्यांनी शासनाकडे मागितली होती. यावर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी एकूण बँकेत जमा केलेल्या निधीच्या रकमेबाबत जिल्हानिहाय माहिती शासन स्तरावर उपलब्ध नाही. अधिक वाचा...

माझीशेती : *मागेल त्याला नोकरी*

माझीशेतीच्या लाभार्थी घटकांना प्रबोधन करणे, त्यांच्या विकासासाठी शासकीय यंत्रणेसोबत काम करणे. शासकीय योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने हा अभिनव उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आला आहे. किमान १० वी पास पासुन कोणत्याही क्षेत्रातील उच्च पदवीधर यांना त्यांच्या कौशल्यावर आधारित कामे करता येतात. आयुष्यातील महत्वाचा लग्नाच्या प्रश्नाला सक्षम दिशा देण्याचा प्रयोग केला जाणार आहे. सुरुवातीला किमान वेतन नंतर कौशल्यानुसार पदोन्नतीनुसार वेतनावर नोकरी देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. काही कारणास्तव लाभार्थी घटक संस्थेच्या सामाजिक धोरणाविरुद्ध वर्तन करत असल्यास पदोवनतीचा समावेश या प्रकल्पात केला आहे.  


ग्रामीण भागातील युवकांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यासाठी शेती आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रात आवश्यक सेवा पुरवठा करण्यासाठी शेतकरी, महिला यांच्यासोबत सहभागी करून नोकरी उपलब्ध करून दिली जाते.