Mazisheti Agrinews 2018/07/04

शेतकऱ्यांचे प्रश्नच अधिवेशनाचा केंद्रबिंदू : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर :पावसाळी अधिवेशन असल्याने त्याचा केंद्रबिंदू अर्थातच खरीप हंगाम आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच असेल. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशनात निर्णय घेतले जातील. तसेच या अधिवेशनात 27 विधेयकांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.३) दिली. 

साकुर परिसरात सोयाबीन पिकावर मिलीपीड
आर्णी, जि. यवतमाळ  ः यावर्षी पहिल्या टप्प्यात पाऊस झाल्याने हुरूप वाढलेल्या शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या आटोपल्या. पीक अंकुरले आणि आता ते चांगले बहरात असतानाच मिलीपीड (वाणू) या किडीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याचे दिसून आले आहे.

पावसाची दडी पिकाच्या मानगुटीवर
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बत्तीस टक्‍के पेरणी आटोपली. पाऊस येईल या आशेवर दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी पेरणीची गती वाढविली. परंतु अंदाज चुकविणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा घात करण्याचेच काम केले आहे. कुठे आठ दिवस, कुठे पंधरवडा लोटूनही पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या व पेरणी राहिलेल्या साऱ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. खासकरून औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत चिंतेचे ढग अधिक गडद झाले आहे.  

शेतक-यांची मिरचीपेक्षा पपई लागवडीला पंसती
नंदुरबार : ऐन लागवडीच्या वेळेस पावसाचा लहरीपणा, रोगराईमुळे वाढलेला उत्पादन खर्च आणि कापसाचा पर्याय आदी कारणांमुळे जिल्ह्यात मिरचीची लागवड कमी होत असून, यंदा सलग तिसऱ्या वर्षी या पिकाची लागवड ६०० ते ६५० हेक्‍टरवर राहील. तर, पपईसह कापूस लागवडीला यंदा शेतकऱ्यांची पसंती मिळत असून पपईचे क्षेत्र यंदा शहादा व नंदुरबारात सुमारे ४ ते ५ हजार हेक्‍टरपर्यंत पोचल्याचा अंदाज आहे.  

अकोला, बुलडाणा जिल्ह्यात कमी पावसामुळे पिके अडचणीत
अकोला : गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झालेला असला, तरी सार्वत्रिक पाऊस नसल्याने याही हंगामात मागील वर्षांप्रमाणे पेरण्यांमध्ये तफावत झाल्याचे दिसून येत अाहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके अडचणीत आल्याची बाब समोर आली आहे.


केळी लागवडीचे भवितव्य पाण्याच्या उपलब्धतेवर
नांदेड  ः जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्राचे भवितव्य इसापूर धरणातील पाणीसाठा उपलब्धतेवर अवलंबून आहे. सध्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; परंतु सद्यस्थितीत कोसळलेले दर आणि उघडलेला पाऊस त्यामुळे केळी लागवड करावी की नाही या विचारात शेतकरी आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे तुलनेने कमी पाण्यावर येणाऱ्या हळद या नगदी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. त्यामुळे केळीचे क्षेत्र कमी होत आहे. विहिरीद्वारे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी सध्या केळी लागवड सुरू केली आहे.

मावळ तालुक्यात ९० एकरांवर यंत्राव्दारे भात लागवड प्रात्यक्षिके
पुणे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणेअंतर्गत (आत्मा) मावळ तालुक्‍यात सुमारे ९० एकर क्षेत्रांवर यंत्राद्वारे भात लागवडीची प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहे. त्यासाठीच्या रोपवाटिका तयार झाल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील खरीप संकटात
नाशिक  : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरवातीला झालेल्या पावसाने पाठ फिरविल्याने विभागातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्यातील शेवटचे दोन आठवडे कोरडे गेल्याने आणि पावसाचे पुनरागमन लांबल्यास यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत अवघ्या ०.११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लवकर पाऊस न झाल्यास त्या पेरण्याही वाया जाण्याची शक्यता आहे.

विविध पर्यायांतून दुधाला दर देण्यासाठी प्रयत्नशील ः पाशा पटेल
पुणेदूध उत्पादक शेतकरी आणि संघांना आंदाेलनाची वेळ येऊ देणार नाही. यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असून, केवळ आंदाेलनामुळेच प्रश्‍न सुटणार नाही, तर विविध पर्यायांतून दुधाला चांगले दर देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वयाने मार्ग काढू, असे आश्‍वासन राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मंगळवारी (ता. ३) झालेल्या मुख्यमंत्री दूध सल्लागार समितीच्या बैठकीत दिले.

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेना
पुणे  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्या तरी पावसाचा जोर अपेक्षित प्रमाणात वाढलेला नाही. या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना, भात रोपांना जीवदान मिळाले आहे. पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. पावसाचा जोर कमी असला तरी आहे त्या स्थितीत पेरण्या करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

पुणे जिल्ह्यात खरिपाची १२,७१० हेक्‍टरवर पेरणी
पुणे : गेल्या आठवड्यापासून पावसाने काही प्रमाणात जोर धरल्याने खरीप पेरण्यांना वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी पेरणीक्षेत्र दोन लाख ३० हेक्‍टर असून आतापर्यंत १२ हजार ७१० हेक्‍टरवर म्हणजेच सरासरी ६ टक्के पेरणी झाली आहे.

दुधाला पाच रुपये वाढ दिल्याशिवाय माघार नाही : खासदार शेट्टी
पुणे  : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ मिळण्यासाठी १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यभर सुरू होणाऱ्या दूध संकलन बंद आंदोलनात खासगी डेअरीचाही समावेश आहे. डेअरीचालकांनी संकलन बंद न ठेवल्यास आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत  दिला.