Mazisheti.Agrinews/2018/07/05

पीक पेरणी कालावधीने चिंतेचे ढग गडद
औरंगाबाद : काही प्रमुख पिकांचा उशिरात उशिरा पेरणी करण्याचा कालावधी संपायला काही दिवसच शिल्लक आहेत. अशात पावसाने मारलेल्या दडीमुळे यंदा पीकनिहाय अपेक्षित पेरणीचा टप्पा गाठता येईल का, पाऊस त्यासाठी साथ देईल का, या प्रश्नांमुळे मराठवाड्यातील खरिपाच्या पेरणीविषयी चिंतेचे ढग गडद झाल्याचे चित्र आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट
नांदेड  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील उगवलेल्या तसेच पेरणी केलेल्या पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. कपाशी, हळद या पिकांचा उगवण व्यवस्थित होत नाही. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके सुकू लागली आहेत. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी धास्तावले आहेत. पावसाअभावी अनेक मंडळांतील पेरणी रखडलेलीच आहे. पीक परिस्थिती बिकट झाल्यामुळे शेतकरी चिंतेत झाले आहेत.

पीक विमा परताव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
परभणीः गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल संपूर्ण जोखमीसह विमा परतावा मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. ४) करण्यात आलेल्या सर्वपक्षीय ठिय्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

नुकसानग्रस्त केळीच्या जागी पिलबागा
जळगावजिल्ह्यात वादळग्रस्त केळीबागांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिलबागांचे नियोजन केले आहे.  नुकसान कमी खर्चात भरून काढण्याचा प्रयत्न रावेर, चोपडा, यावल भागांतील शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात मे व जून महिन्यांत वादळाचा मोठा फटका बसला. रावेरात सुमारे १८०० हेक्‍टरवरील केळी १ ते ३ जूनदरम्यानच्या पावसात जमीनदोस्त झाली. नंतरही वादळ झाले. त्यात चोपडा, यावल तालुक्‍यातील बागांना फटका बसला. जिल्ह्यात एकूण

बुलडाण्यात तूर, हरभऱ्याचे चुकारे थकल्याने शेतकरी अडचणीत
बुलडाणा : शासनाने हमीभावाने खरेदी केलेल्या तूर व हरभऱ्याचे सुमारे ४४ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे चुकारे थकलेले असून शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी सर्वत्र होत अाहे. तूर अाणि हरभरा उत्पादकांच्या रखडलेल्या चुकाऱ्यांची रक्कम नाफेडच्या वतीने देण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचा दिलासाच केवळ अधिकाऱ्यांकडून मिळत अाहे.

दीडपट हमीभाव जाहीर : कापूस ५१३०; सोयाबीन ३३९९, तूर ५६७५, मूग ६९७५
नवी दिल्ली : खरीप हंगाम २०१८-१९ करिता १४ पिकांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) देण्याचा बहुचर्चित निर्णय केंद्र सरकारने बुधवारी (ता. ४) घेतला. यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस या पिकांच्या एमएसपीमध्ये घसघशीत वाढ झाली आहे.