Mazisheti Agrinews/2018/07/06

अकोला, वाशीम जिल्ह्यांत अाजवर ७० टक्के पेरण्या
अकोला : पावसाळा सुरू होऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला. या काळात वऱ्हाडात अकोला व वाशीममध्ये बुलडाण्याच्या तुलनेने परिस्थिती ठिक अाहे. या दोन्ही जिल्ह्यात पेरण्यांनी वेग घेतलेला असून, येत्या काही दिवसांत त्या पूर्ण होऊ शकतील. बुलडाणा जिल्ह्यात मात्र अातापर्यंत ४५ टक्क्यांच्या वर क्षेत्र अद्याप लागवडीखाली अालेले नाही. किमान २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणे बाकी अाहे.

अकोला जिल्ह्यात देशी कापसाच्या अतिघन लागवडीसाठी अनुदान
अकोला : या वर्षी जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत देशी कापसाच्या अतिघन लागवडीची प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. त्यासाठी शेतकरी गटांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने अनुदान दिले जाणार आहे.

कर्नाटकात शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी
बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारचा गुरुवार (ता. ५) अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचा अर्थसंकल्प कुमारस्वामी यांनी सादर केला. निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पहिल्याच अर्थसंकल्पात पूर्ण करत त्यांनी शेतकऱ्यांना तब्बल ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. डिसेंबर २०१७ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे.

मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यातही सोयाबीनचा टक्‍का अधिकच
औरंगाबाद : पावसाने डोळे वटारल्याने मराठवाड्यातील खरिपाच्या पेरणीला ब्रेक लागला आहे. पेरणीचा दुसरा टप्पा आटोपला असताना पेरणी झालेले कपाशीचे क्षेत्र अधिक असले तरी प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत झालेली तुलनात्मक आकडेवारी पाहाता कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचा टक्‍काच अधिक आहे.

जळगाव जिल्ह्यात ६५ टक्‍के खतपुरवठा
जळगावजिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणारा रासायनिक खतांचा ६५ टक्‍के पुरवठा झाला आहे. पावसाने साधारण महिनाभर दडी मारल्याने पेरण्या लांबल्या होत्या. यातच आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी जास्त प्रमाणात झालेली नाही. परंतु युरियाचा पुरवठा अतिशय कमी असून, पुरवठ्याची टक्केवारी फक्त ४० टक्केच राहिल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात अद्यापपर्यंत कापूसाची निम्मीच पेरणी...
नवी दिल्ली देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये मागील काही वर्षांपासून पिकावर बोंड अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे देशातील कापूस लागवड ३० टक्क्यांनी घटली आहे. महत्त्वाच्या कापूस उत्पादक महाराष्ट्रात तर कपाशीखालील क्षेत्रात ४९.६ टक्क्यांनी घट झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमीच ः पेरण्या खोळंबल्या
सोलापूरजिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने आपली गती मंद केली असून, जूनचा पहिला महिना संपला, तरी अद्यापही गतवर्षीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात १५६.१३ मिलिमीटर पाऊस झाला होता. पण यंदा आतापर्यंत सरासरी ७८.१५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शिवाय उगवलेली पिकेही आता माना टाकण्याच्या स्थितीत आहेत.

शेतकरी म्हणतात अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभारा
पुणेहमीभावात दीडपट वाढ केल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सरकारने हमीभाव जाहीर करताना उत्पादन खर्च गृहीत धरताना शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे हा दीडपट हमीभाव असल्याचा सरकारचा दावा हास्यास्पद आहे. तसेच, नुसता हमीभाव जाहीर करून उपयोग नाही, तर त्याची अंमबजावणी व्हायली हवी. सरकारची शेतीमाल खरेदी यंत्रणा सतत मागील दोन वर्षे कुचकामी ठरल्याचे दिसून आले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा माल पूर्णपणे हमीभावाने खरेदी केला जाणार नाही, तोपर्यंत असे आकडे फुगवण्यात काहीच अर्थ नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या  आहेत.