Mazisheti Agrinews (07/08/2018)

युरियासाठी केळी बागायतदारांची वणवण
जळगाव : जिल्ह्यात खतपुरवठा संथगतीने सुरू असून, त्यात युरियाची उपलब्धता अतिशय कमी आहे. जुना ५० किलो प्रतिगोणीचा युरिया संपला आहे. नवीन युरिया येत नसल्याने खतटंचाई निर्माण झाली आहे.

रासायनिक खतांमुळे वनस्पतींवरील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या क्षमतेवर परिणाम
वनस्पतीच्या पानांवर वाढणाऱ्या विविध सूक्ष्मजीवांच्या समुदायांच्या भूमिकांचा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया- बर्कले येथे नेमका अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये रासायनिक खतांचा वापर असलेल्या वनस्पती रोगांसाठी अधिक संवेदनशील असल्याचे दिसून आले.

पन्हाळा तालुक्यात पिकावर हुमणीचा उपद्रव
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पश्चिमेकडील शिवारांमध्ये हुमणीचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे. भात, ऊस, भुईमुगासोबतच भाजीपाला पिके हुमणीमुळे कोमेजू लागली आहेत.



नाशिक जिल्ह्यातील खरीप संकटात
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पूर्वभाग असलेल्या येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, चांदवड, देवळा या तालुक्यांत खरीप हंगामात पेरणी झालेली पिके तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लांबलेल्या पावसामुळे मान टाकू लागली आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळणार नसल्याने पूर्वभागात खरीप हंगामाचे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामावर केलेला खर्च भरून निघणार नसल्याची शक्यता आहे.

पावसाचा खंड त्यात किडींनी काढले डोके वर
नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. वाढीसाठी पोषक वातावरणामुळे विविध प्रकाराच्या किडींनी डोके वर काढले आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या प्राद्रुर्भावाची व्याप्ती वाढत चाललेली असताना मूग, सोयाबीन आदी पिकांवर देखील विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ बोंड अळी नियंत्रण मोहिमेत सहभागी
नांदेड ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रांतर्गतचे शास्त्रज्ञ जिल्ह्यात सुरू असलेल्या बोंड अळी नियंत्रण मोहिमेमध्ये सहभागी झाले असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन कीड व्यवस्थापन सल्ला देत आहेत. त्याचप्रमाणे भ्रमणध्वनीद्वारेदेखील शेतकऱ्यांना बोंड अळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. या संदर्भात कापूस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. खिजर बेग यांनी माहिती दिली.

नगरमध्ये शेतकऱ्यांसमोर पिके जगवण्याचे संकट
नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या तीस दिवसांपासून पाऊस गायब आहे. त्यामुळे खरिपाची पिके वाचवण्याचे गंभीर संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले असून, पाऊस येण्याची शक्‍यता दिसत नसल्याने त्यात वरचेवर भर पडत आहे. भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अजून आठ दिवस पाऊस आला नाही, तर बहुतांश
पिके वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

वऱ्हाडात पावसाअभावी पिके संकटात
अकोला : वऱ्हाडात प्रामुख्याने अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाने दहा ते १५ दिवसांपासून विश्रांती घेतल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस झालेला नाही. तिनही जिल्ह्यांमध्ये पेरणी आटोपली असून, पावसाअभावी पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम दिसू लागला आहे.


शेतकऱ्यांच्या खात्यात १५०० कोटींची एफआरपी जमा
पुणे  : राज्यातील थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी घेतलेला आक्रमक पावित्रा आणि दुस-या बाजूला साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी सुरू ठेवलेल्या प्रशासकीय पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळेच आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यात एफआरपीचे १५०० कोटी रुपये जमा झाले आहेत.