माझीशेती कृषीविषयक वार्तापत्र (१३/०९/२०१८)
आजच्या कृषीविषयक घडामोडी :
सोयाबीनमधील मावा कीड प्रतिकारक जनुक गट ओळखला


दरवर्षी सोयाबीन पिकावर होणाऱ्या मावा किडीच्या प्रादुर्भावामुळे अब्जावधी डॉलरचे नुकसान होते. या किडीच्या प्रतिकारकतेशी जोडलेल्या सोयाबीनमधील जनुकांच्या गटाचा शोध संशोधकांनी घेतला आहे. असे गट असलेल्या अनेक सोयाबीन जाती असून, त्यांचा उपयोग मावा किडीसाठी प्रतिकारक जाती विकसित करण्यासाठी होऊ शकतो.
सातारा जिल्ह्यात ८२ हजार हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध

सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम गतवर्षीप्रमाणे लांबणार आहे. जिल्ह्यात आगामी गाळप हंगामासाठी ८२ हजार ४८४ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांकडून हंगामाच्या सुरवातीपासून उसाची पळवापळवी सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सर्वच कारखान्यांकडून ऊसतोडणी यंत्रणा सक्षम करण्यासाठी ऊसतोडणी टोळ्या; तसेच टॅक्‍ट्ररचे करार करून ॲडव्हान्स देण्यात आले आहेत. काही कारखान्यांनी बॅायलर पूजन केले आहे. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने राज्य शासनाकडून एक अॅाक्टोबरपासून गाळप परवाने दिले जाणार आहेत. यामुळे बहुतांशी कारखान्यांचे गाळप अॅाक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे.हिरजे येथे रेशीम कोष खरेदी केंद्र तातडीने सुरू करा

सोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे होणाऱ्या रेशीम संशोधन केंद्रात प्रयोगशाळा प्रशिक्षण सुविधा मिळावी, त्याबरोबरच राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम कोष खरेदीची होणारी अडचण दूर करण्याकरिता येथे तत्काळ रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.सोलापूरसह पंढरपूर, सांगोला बाजार समितीत गांडूळ खत प्रकल्प


सोलापूर  : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जैविक घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांना ७५ लाखाचा निधी त्यासाठी पणन विभागाकडून मंजूर करण्यात आला असून, या प्रकल्प उभारणीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.  
बियाणे प्रमाणीकरणासाठी पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी केली पिकांची नोंदणी

परभणी  ः २०१८-१९ मधील खरीप हंगामात महाराष्ट्र राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेअंतर्गत परभणी येथील विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालयाकडे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील १३ हजार ७४० शेतकऱ्यांनी ३२ हजार ९२९.२० हेक्टर बीजोत्पादन क्षेत्रावरील पिकांची बियाणे प्रमाणीकरणासाठी नोंदणी केली.शेतकऱ्यांचे शिवारच व्हावे कृषीविस्ताराचे मॉडेल ः डवले


नागपूर ः कृषी विद्यापीठाच्या शेतातच दाखविण्यापुरते तंत्रज्ञान मर्यादित असल्याने शेतकरी त्यावर पुरेसा विश्‍वास ठेवत नाहीत. त्याकरिता उपलब्ध तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत नेत त्याआधारे मॉडेल विकसित झाले तरच कृषीविस्ताराचा खरा उद्देश साध्य होईल. अशाप्रकारची कृषी विस्ताराची संकल्पना राबविण्यावर येत्या काळात भर दिला जाणार असल्याची माहिती प्रभारी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिली.
पीककर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे औरंगाबादला आंदोलन

औरंगाबाद  : खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे, या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसमोर बुधवारी (ता.१२) शेकडो शेतकऱ्यांनी त्वरित पीककर्ज वाटप करावे, या मागणीसाठी घेराव आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. याप्रकरणी लवकरच बॅंक संचालक मंडळाची बैठक बोलविण्याचे लेखी आश्‍वासन बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे  : पावसाने दडी मारल्यानंतर उन्हाचा वाढलेला चटका पुढील काही दिवस कायम राहणार अाहे. राज्यात रविवारपर्यंत (ता. १६) मुख्यत: पावसाची उघडीप राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी मोठ्या खंडानंतर पावसाची हजेरी लावल्याने वातावरणात काहीसा गारवा आला होता.मध्य प्रदेशात केळीचे रोज लिलावजळगाव  : देशात केळी लागवडीत पहिल्या तीन राज्यांमध्ये असलेल्या महाराष्ट्राच्या तुलनेत केळी पिकाची अल्प लागवड करणाऱ्या मध्य प्रदेशातील केळीसंबंधीची धोरणे सरस आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत मोठे यार्ड केळीसाठी राखीव आहेत. येथे शेतकऱ्यांसमोर रोज लिलाव होतात. केळीचे आगार असलेल्या रावेर किंवा जळगावात कुठेही केळीचे लिलाव होत नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीत. यामुळे अनेक उत्पादक केळी बऱ्हाणपुरात विक्रीसाठी नेतात, अशी माहिती मिळाली.हमीभावाने खरेदीच्या नव्या धोरणास केंद्राची मान्यता

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदीसाठी केंद्र सरकारने 'अन्नदाता मुल्य संरक्षण' या नव्या शासकीय खरेदी धोरणास मान्याता दिली आहे. यात तेलबिय उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव झाल्यास थेट दर नुकसान भरपाई देण्यात येणार असून याशिवाय खासगी खरेदीदारांमार्फत खरेदीसही मान्यता देण्यात आली आहे. उद्याचा हवामान अंदाज 
तापमान - १७ अंश से ते ३० अंश से 
पाऊसमान - अंशतः ढगाळ वातावरण राहील 
आर्द्रता - ७१ %
वारे - उत्तरेकडून दक्षिणेकडे १ m /s पीक सल्ला :
भुईमूग :

भुईमुगावरील टिक्का रोग :
रोगांचा प्रादुर्भाव खालच्या पानावर आढळतो . सुरवातीच्या काळात पानांवर काळ्या रंगाच्या ठिपक्या भोवती पिवळ्या रंगाचे वर्तुळ दिसू लागते . ठिपक्यांचा रंग पुढे गर्द काळा होतो . हिरव्या पानावर रोगांचा प्रादुर्भाव जास्त आढळतो . नंतर पुढे पान सुकते ,व गळून पडते . झाडे लहान असताना या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेंगातील  दाणे बारीक व सुरकुतल्या सारखे दिसतात . 

नियंत्रण : 

रोगांचा प्रादुर्भाव हवेतून होतो . त्यावर वेळीच उपाय योजना केल्यास रोग नियंत्रणात येतो .त्यासाठी पीक ६ आठवड्याचे असताना . ३००पोतांची गंधकाची भूकटी हेकटरी  १२ ते १५ किलो या प्रमाणात धुरळनी करावी . अथवा मॅन्कोझेब ७५ % पा .मी. २५ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .