माझीशेती कृषीविषयक वार्तापत्र (१४/०९/२०१८).  • कृषीविषयक घडामोडी . 


  • पिकांचे संतुलित पोषण महत्त्वाचे...


अन्नद्रव्ये पिकांना पुरेशी आहे‏त किंवा नाहीत हे‏ पाह‏ण्यासाठी मातीचे रासायनिक पृथ:करण गरजेचे आहे‏. पानांचे, खोडांचे किंवा मुळ‎ांचे पृथ:करण करून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेविषयी माहि‏ती मिळ‎वता येते. या माहि‏तीच्या आधारे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्याने पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्ये पुरविली जाऊ शकतात. माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास संतुलित पीक पोषण करता येते.
  • इथेनॉल दरवाढीने साखर उद्योगाला दिलासा. 


नवी दिल्ली / पुणे ः  बी-हेवी मोलॅसिसपासून (उसाच्या रसाचा साखर तयार करण्याऐवजी इथेनॉलनिर्मितीसाठी वापर) तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १०.४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहारविषयक समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार या इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५२.४३ रुपये राहणार आहेत. जून महिन्यात या इथेनॉलला ४७.४९ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. तसेच १०० टक्के संपृक्त (कॉन्सनट्रेटेड) उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक म्हणजे प्रतिलिटर ५९.१३ रुपये दर समितीने मंजूर केला आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे.
  • फळबाग योजनेला उदंड प्रतिसाद. 


पुणे:  राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कै. पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच वर्षी सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील पात्र शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. फळे निर्यातीत देशात आघाडीचे राज्य असणाऱ्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा गरूडभरारी घेण्याची संधी या योजनेमुळे मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

राज्यात रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) फळबाग लागवड होते. मात्र, त्यात जॉबकार्ड सक्ती तसेच अनेक अटी असल्यामुळे काही भागांमध्ये या योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही  • द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक. 

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी फरार असणाऱ्या डी. पी. सेल्स काॅर्पोरेशनच्या दीपक व प्रशांत राजेभोसले या निर्यातदारांना निपाणी बेळगाव येथे बुधवारी (ता.१२) पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिक जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजेभोसले बंधूंना तत्काळ अटक करीत नाशिक येथे आणले. या संशयित आरोपींना गुरुवारी (ता.१३) न्यायालयासमोर दाखल करण्यात आले.   • बहुतांश ठिकाणी पारा तिशीपार. 


पुणे ः पावसाचा जोर ओसरल्याने दुपारचा उन्हाचा चटका वाढला आहे. बहुतांशी ठिकाणावरील उन्हाचा पारा तिशीच्यावर गेला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि अकोला येथे कमाल तापमान ३४.६ अंशांवर पोचले आहे. विदर्भातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. कमाल तापमानाबरोबर सातारा, सांगली, पुणे, औरंगाबाद, जळगाव येथील किमान तापमानात किंचित घट झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 


*हवामान अंदाज* :

A . कोकण 
तापमान - २३ अंश से ते ३१ अंश से 
पाऊसमान - पहाटे ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 
आद्रता - ८१% ते ९७%
वारे - ३ ते १२ किमी /तास 


B . पश्चिम महाराष्ट्र 
तापमान -१८ अंश. से. ते २९ अंश से. 
आद्रता - ६२% ते ९५% 
वारे - ३ ते १५ किमी/ तास   


C . खानदेश 
तापमान - १९ अंश से. ते २९ अंश से . 
पाऊसमान - सकाळपासून ते दुपारपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका पाऊस 
आद्रता - ७१% ते ९७%
वारे - १ ते ५ किमी /तास 


D. मराठवाडा 
तापमान - ३० अंश से.  ते ३३ अंश से. 
आद्रता - ५६% ते ९३% 
वारे - ७ ते १२ किमी/ तास E . विदर्भ 
तापमान - २२ अंश से. ते ३२ अंश से. 
आद्रता - ६३% ते ९९%
वारे - १ ते ६ किमी / तास F. विदर्भ 
तापमान - २२ अंश से. ते २९ अंश से. 
आद्रता - ६४% ते ९९%
वारे - ६ ते १४ किमी /तास कृषिसल्ला 

पिकाचे नाव - बाम्बुसा बाल्कोआ 

हे एक पुंजक्याच्या स्वरूपात वाढणाऱ्या बांबूची प्रजाती आहे. याला वाढीसाठी विशिष्ट क्षेत्र लागत नाही. याची वाढ 15मी. उंच आणि 15 सेंमी घेर अशी होते. 

बाम्बुसा बॅल्कोओ हे कमी पर्जन्यमान असलेल्या दुष्काळ प्रतिरोधी प्रजाती आहेत आणि एक एकरमध्ये 40 ते 25 टन उत्पादन मिळते. 

ही विशिष्ट डोळे पद्धतीने विकसित होणारी प्रजाती आहे याचे बियाणे तयार होत नाही. सध्या आफ्रिकेत याचे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते.

अश्या अनेक शेतीविषयक माहितीसाठी माझीशेतीच्या अधिकृत स्थानिक ग्रुपमध्ये सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी www.mazisheti.org येथे भेट द्या.