माझीशेती : कृषीविषयक वार्तापत्र (०६/१०/२०१८)

 • कृषीविषयक घडामोडी. 

 • बांबूविषयक संशोधनाला प्रोत्साहनासाठी उपाययोजना आवश्यक ः राज्यपाल.


पुणे  ः बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण कारागीरांसह आदिवासी आणि शेतकरी तरुण राेजगारनिर्मितीतून आर्थिक समृद्ध होईल. या क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.


 • ‘जलयुक्त'ची चार सदस्यीय चौकशी रद्द करा.

पुणे :  जलयुक्त शिवार कामात घोटाळा झाल्याचे 
दस्तूरखुद्द लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आढळले असले, तरी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना चौकशी अजिबात मान्य नाही. तक्रारदार ब्लॅकमेलर असून, चार सदस्यीय चौकशीच रद्द करा, असे पत्र जलसंधारणमंत्र्यांनी थेट कृषी मंत्रालयाला पाठविले आहे

 • औरंगाबाद येथे होणार अंडीपुंज निर्मिती केंद्र.


औरंगाबाद : राज्यात रेशीम उद्योग विस्तारत आहे. या उद्योगासाठी आवश्यक अंडीपुंज निर्मितीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी औरंगाबाद येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारले जाणार आहे. आजघडीला अंडीपुंजसाठी कर्नाटक राज्यावर अवलंबून राहवे लागते. ही स्थिती संपुष्टात आणण्यासाठी रेशीम विभागाने प्रयत्न चालविले आहेत. अंडीपुंज निर्मिती केंद्राबरोबरच आवश्‍यक असलेले शीतगृहदेखील उभारले जाणार आहे.


 • तीन जिल्ह्यांत पावसाअभावी पिके करपली; पैसेवारी मात्र बहरली.

अमरावती  ः पश्चिम विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असतानाच खरिपाची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ६६ पैसे घोषित करण्यात आल्याने शासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. नजरअंदाज पैसेवारी कमी जाहीर करु नका, अशा अलिखित सूचना शासनानेच अधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा दबक्‍या आवाजात होऊ लागली आहे.

 • नगर जिल्ह्यातील ३५ गावांत दुष्काळी स्थिती.


नगर   : जिल्ह्यामध्ये अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने आता नुकतीच खरीप हंगामात पारनेर व नगर तालुक्‍यांतील ३५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे. या गावांसाठी विविध सवलती शासनाने लागू केल्या आहेत. यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या पारनेर तालुक्‍यातील ३०, तर नगर तालुक्‍यातील पाच गावांचा समावेश आहे. सध्या प्रशासनाने फक्त दोन तालुक्‍यांतील गावांत दुष्काळी स्थिती असल्याचे मान्य केले असले तरी साऱ्या जिल्ह्यावरच दुष्काळाचे सावट आहे.


 • सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम.

सातारा   ः जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १३.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

 • द्राक्ष बागायतदार संघाचा मार्केटिंग, ब्रॅँडिंगवर भर ः राजेंद्र पवार.

नाशिक  : ‘‘गोड चवीची, रेसीड्यू सिड्यू फ्री द्राक्ष उत्पादन मिळविण्यात प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांनी यश मिळवले आहे. गुणवत्तेमुळे जागतिक, देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. येत्या काळात राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून द्राक्षांच्या मार्केटिंग व ब्रॅँडिंगवर भर देण्यात येणार आहे``, असे प्रतिपादन राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.

 • कृषी आयुक्तांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न.

पुणे  ः नेवासा तालुक्यातील पुनतगाव (जि. नगर) येथील शेतकरी दीपक धनगे यांनी शुक्रवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नेवासा तालुक्यातील अन्न सुरक्षा अभियानातील भ्रष्टाचारप्रकरणी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा निषेध म्हणून त्यानी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. कृषी आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळीच आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

 • अडतमुक्तीचा दावा फाेल.


पुणे : राज्य सरकारने फळे व भाजीपाल्याची अडत (कमिशन) शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्याचा निर्णय घेऊन अडीच वर्षे झाली तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्याची अंमलबजावणी होत नाही. उलट अडते खरेदीदार आणि शेतकरी या दोन्ही घटकांकडून अडतवसुली करत असल्याचे समोर आले. सरकारच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


 • अळिंबी - वनस्पती या मैत्रीसाठी झाला जनुकाचा ऱ्हास.

फ्लाय अॅमानिटा या अळिंबीतील एका जनुकाचा ऱ्हास झाल्यामुळे अन्य वनस्पतींशी सहजीवी संबंधाकडे तिची वाटचाल सुरू झाल्याचे विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. अनेकवेळा अशा घटनांचा अर्थ जनुकांच्या उत्क्रांतीशी लावण्यात येत असला तरी या घटनेमध्ये एक जनुक नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल मॉलेक्युलर बायोलॉजी अॅँड इव्हॅल्युशन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे

 • औरंगाबाद, जालना, बीडमध्ये साडेसहाशेवर पीककापणी प्रयोग.


औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील खरीप पिकांची उत्पादकता काढण्यासाठीचे पीककापणी प्रयोग सुरू आहे. तीनही जिल्ह्यांत उडीद, मूग सोयाबीन आदी पिकांचे जवळपास साडेसहाशेवर प्रयोग घेण्यात आले आहेत. उडीद, मुगाचे प्रयोग जवळपास आटोपल्यात जमा असून, नियोजित पीककापणी प्रयोगापैकी ९० टक्‍के प्रयोग आटोपल्यानंतर संबंधित पिकाची नेमकी उत्पादकता किती ते कळणार आहे.


 • मराठवाड्यात ५४२ गावांत ‘जलयुक्‍त’ची कामे सुरू.

औरंगाबाद : मराठवाड्यात २०१८-१९ मध्ये जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करण्यासाठी १५७५ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामधील ५४२ गावांत जलयुक्‍त शिवारची कामे सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

 • नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान.


नाशिक : नाशिक जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून विविध ठिकाणी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसला. शिवाय वीज पडून दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले. या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.


 • जळगाव जिल्हा परिषदेत २०० कोटींचा निधी पडून. 

जळगाव : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन अजूनही झालेले नाही. सुमारे २०० कोटी रुपये निधी पडून आहे. २०१८-१९ या वित्तीय वर्षात कामे मार्गी लागतील कशी, हा मुद्दा असून, त्याचा ग्रामविकासावर परिणाम होईल, असे चित्र आहे.

 • खानदेशातील ३० गावांत तीव्र पाणीटंचाई


जळगाव : खानदेशात धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात सुमारे २० टॅंकर्स सुरू आहेत. टॅंकरची संख्या वाढत असून, जळगाव जिल्ह्यात १२ टॅंकर सुरू आहेत. तीव्र टंचाईग्रस्त गावांची संख्या खानदेशात ३० पर्यंत पोचली आहे. पुढे ही स्थिती आणखी बिकट बनेल, असे संकेत आहेत.


 • सांगली जिल्ह्यातील २४६ गावांवर दुष्काळाचे सावट.

सांगली ः जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने पेरणी आणि पीकपाहणी करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्‍यांतील २४६ गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याने या गावांवर दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

 • परभणीत खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टपूर्ती अपूर्ण


परभणी ः परभणी जिल्ह्यातील सर्वंच बॅंकांचे खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दूर राहिले आहे. यंदा रविवारअखेर (ता. ३० सप्टेंबर) जिल्ह्यातील ८३ हजार ३८५ शेतकऱ्यांना ४४० कोटी २७ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या ३०.०५ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले. यंदा ७६ हजार २८० नवीन शेतकऱ्यांना ३७८ कोटी ३२ लाख रुपये पीककर्ज देण्यात आले. केवळ ७ हजार १०५ शेतकऱ्यांनी ६१ कोटी ९५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे.


 • मळणी यंत्रात अडकून तरुणाचा मृत्यू.


गोरेगाव, (ता. सेनगाव) - सोयाबीन काढताना मळणी यंत्रात ओढला गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हाताळा (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे गुरुवारी (ता. 4) दुपारी घडली. दत्ता सुभाष धामणकर (वय 19) असे त्याचे नाव आहे. दत्ता हा सोयाबीन काढणीसाठी येथील गोरे यांच्या शेतात मजुरीने कामाला गेला होता. मळणी यंत्रात सोयाबीन टाकत असताना त्याच्या डोक्‍यावरील रुमाल यंत्रात अडकला. काही क्षणातच तोही यंत्रात ओढला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गोरेगावचे सहायक पोलिस निरीक्षक माधव कोरंटलू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दता हा पळशी येथील रुक्‍मिणी विद्यालयात बारावीत शिकत होता.

 • उद्याचा हवामान अंदाज :
 •  A . कोकण 

तापमान -२५ अंश से ते ३५ अंश से 
आद्रता - ५७% ते ९७%. 
वारे  - १-३ किलो.मी / तास 

 • B. पश्चिम महाराष्ट्र . 

तापमान - २१अंश से ते ४१ अंश से . 
आद्रता - ५३% ते ८१ % . 
वारे  - ३-४ किलो.मी / तास . 
    
 •  C.खान्देश.  

तापमान - २३अंश से ते ३३ अंश से . 
आद्रता - ४३% ते ८१ %. 
वारे - १-३ किलो.मी /तास . 

 • D . मराठवाडा . 

तापमान - २३अंश से ते ३४ अंश से . 
आद्रता - ३७% ते ८१%. 
वारे - १-३ किलो.मी /तास 

 • E . विदर्भ 

तापमान - २१अंश से ते ३४ अंश से . 
आद्रता - ४३% ते  ९२ %. 
वारे - १किलो.मी /तास 

 • F. विदर्भ . 

तापमान - २३ अंश से ते ३३ अंश से . 
आद्रता - ३७% ते ७२ %. 
वारे - २-३ किलो.मी /तास 
 • पीक सल्ला :

 • पिकाचे नाव : सोयाबीन . 

सोयाबीन पिकाची काढणी ,मळणी :
सोयाबीनची काढणी जेव्हा झाडावरील पाने पिवळी पडून गळल्यानंतर आणि ९५ टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या झाल्यावर करावी . 

काढणीस विलंब करू नये अन्यथा शेंगा झाडावर तडकून बी  बाहेर पडते. व उत्पादनात नुकसान होते. 
त्यावेळी दाण्यामधील आद्रता १५ टक्के असते काढणी केल्यावर मळणी यंत्राच्या साहाय्याने मळणी करून घ्यावी .