माझीशेती : कृषीविषयक वार्तापत्र (१०/१०/२०१८)

कृषीविषयक  वार्तापत्र  •  मराठवाड्यात कपाशीचा हंगाम लवकर आटोपण्याची चिन्हे

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. उन्हामुळे कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या, बरड जमिनीवरील कपाशीची सर्वच बोंडे फुटली आहेत. अनेक ठिकाणी एकाच वेचणीनंतर केवळ पऱ्हाटी शिल्लक राहत आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे पाते, फुले, बोंडे लागण्याची शक्यता नाही.
 त्यामुळे यंदा कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीचा हंगाम लवकरच आटोपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


 • सातारा जिल्ह्यात ९४ टक्के पीककर्जाचे वितरण

सातारा ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक हजार ६८० कोटी १ रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ३० सप्टेंबरअखेर एक हजार ५७१ कोटी ७८ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ९४ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा बॅंकेने ११६२ कोटी १३ लाख रुपये वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत बँक ऑफ महाराष्ट्रने सर्वाधिक कर्जवितरण केले आहे.


 • पाळीव प्राण्यांतील क्षयरोगाला रोखण्यासाठी पचनसंस्थेतील जिवाणूंचे अस्त्र


युरोपियन बॅडगर या प्राण्याच्या पचनसंस्थेतील सूक्ष्म जिवाणू हे क्षयरोगाशी सामना करण्याच्या लढाईतील प्रमुख अस्त्र ठरू शकत असल्याचे सरे विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. हे संशोधन गाईंसह विविध पाळीव प्राण्यांतील क्षयरोगाच्या उद्रेकाशी सामना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या संशोधनासाठी मॉरिस अॅनिमल फाउंडेशनने अर्थसाह्य केले आहे.


 • सातारा जिल्ह्यात ९४ टक्के पीककर्जाचे वितरण

सातारा ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक हजार ६८० कोटी १ रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ३० सप्टेंबरअखेर एक हजार ५७१ कोटी ७८ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ९४ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा बॅंकेने ११६२ कोटी १३ लाख रुपये वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत बँक ऑफ महाराष्ट्रने सर्वाधिक कर्जवितरण केले आहे.


 • पुणे जिल्ह्यात रब्बी पीक कर्जवाटप सुरू

पुणे ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रब्बी हंगामासाठी एकूण ७२७ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडाअखेरीस ३९० शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी ७२ लाख रुपयांइतके पीक कर्जवाटप पूर्ण झालेले आहे.


 • ताकारी-म्हैसाळ, टेंभूचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचवा ः संजय पाटील

सांगली : ताकारी-म्हैसाळ आणि टेंभूचे जास्तीत जास्त पंप सुरू करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचवण्याचे आदेश कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी दिले. सोमवारी (ता. ९) महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक वारणालीत घेण्यात अाली.


 • सांगलीत फळपीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरणा सुरू


सांगली ः २०१८-१९ मधील आंबे बहरासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अधिसूचित मंडळातील फळपिकासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, आंबा आणि लिंबू या अधिसूचित फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षांचा विमा रक्कम भरण्याची १५ ऑक्‍टोबर मुदत देण्यात आली आहे. तर अांब्यासाठी डिसेंबरअखेर मुदत अाहे.
 • वारंगा येथे हेक्‍टरी २० क्विंटल सोयाबीन उत्पादनाचा निष्कर्ष

नागपूर : खरीप हंगामामध्ये विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी कृषी व महसूल विभागातर्फे वर्धा रोडवरील वारंगा गावातील व्यंकेटश येरले यांच्या शेतातील सोयाबीन प्लॉटवर पीक कापणी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात हेक्‍टरी २० क्विंटल सोयाबीन उत्पादनाचा निष्कर्ष काढण्यात आला.


 • नगर जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांत दुष्काळी स्थिती

नगर : कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांत दुष्काळी स्थिती आहे. जिल्ह्यातील ८६८ गावांना दुष्काळाला सामोरे जावे लागेल. दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे लढू, असे सांगत पाणी आरक्षणासाठी तत्काळ उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले.


 • नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करा

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात आतापर्यंत केवळ १० ते २० टक्के पाऊस झाला आहे. त्यातच परतीच्या पावसानेही निराशा केली. त्यामुळे नांदगाव, येवला, मालेगाव, सिन्नर यांसारख्या तालुक्यातील खरीप पिके वाया जाण्याची शक्यता आहे. सध्या ५३ ठिकाणी टँकरमधून पाणीपुरवठा केला जात असून, आगामी काळात ही स्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (ता. ८) करण्यात आला.


 • शेतकऱ्यांचे ‘कादवा`च्या बॉयलरवर आंदोलन

निफाड, जि. नाशिक : उसाची रक्कम मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपासून बंद असलेल्या कादवा गोदा साखर कारखान्याच्या बॉयलरवर चढून आंदोलन केले. मात्र, प्रशासन आणि संचालक मंडळाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे.


 • दूध संघांचा सरकारला आजपर्यंतचा अल्टिमेटम


मुंबई: दुधाला वाढीव दर मिळावा यासाठी जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने पिशवीबंद दुधाव्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थासाठी वापरल्या जाणाऱ्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. सरकारी अनुदान मिळेल या अपेक्षेने दूध संघांनी शेतकऱ्यांकडून वाढीव दराने दूध खरेदी केली आहे. मात्र घोषणा करून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप सरकारने दूध संघांना अनुदानाची रक्कम दिली नसल्याने दूध संघ आर्थिक संकटात सापडले आहेत. आज, १० ऑक्टोबरपर्यंत सरकारने अनुदानाची रक्कम न दिल्यास अनुदानाच्या रकमेनुसार दूध खरेदी बंद करण्याचा इशारा दूध संघांनी दिला आहे.  • दुष्काळसदृश परिस्थिती लवकरच जाहीर करणार ः मुख्यमंत्री

मुंबई ः राज्यातील टंचाईग्रस्त भागात लवकरच दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाईल. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण तयारी केली आहे. तसेच स्वतः मंत्री प्रत्येक दुष्काळी तालुक्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांची पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ९) दिली. राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 


 • कांदारोपे - फुकट तरी न्या!

नगर : नगर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्याचा गंभीर परिणाम कांदा लागवडीवर झाल आहे. बहुतांश भागात पाण्याअभावी कांद्याच्या लागवडी रखडल्या आहेत. ही कांदारोपे आता अखेरच्या घटका मोजत आहेत. डोकेदुखी नको म्हणून शेतकऱ्यांनी ही रोपे फुकटात वाटायला सुरवात केली आहेत, मात्र फुकटातही कोणी रोपे नेत नसल्याची सध्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी कांदारोपांवर पाळी फिरविली आहे.


 • संत्रा उत्पादकांना मिळणार जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान : श्‍वेता शालिनी


वर्धा ः संत्रा उत्पादकता वाढीसाठी पूरक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि सुविधांच्या उभारणीवर सरकारकडून येत्या काळात भर दिला जाणार आहे. जागतिक दर्जाच्या या सुविधा असतील, अशी माहिती महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या (व्हीएसटीएफ) कार्यकारी संचालिका श्वेता शालिनी यांनी दिली.  • आॅक्टोबर हीटमुळे वाढली तूर अन्‌ कपाशीची होरपळ


औरंगाबाद : एरवी साधारणपणे डिसेंबरनंतर भेगाळणारी भुई ऑक्‍टोबरमध्येच भेगाळल्याने जमिनीत ओलावा झपाट्याने तुटला आहे. पावसाळ्यात पावसाने दोन ते तीन वेळा प्रदीर्घ खंड दिला. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने ऑक्‍टोबरमध्येच जमिनीला भेगा पडणे सुरू झाले आहे. जमिनीतील ओल तुटल्यात जमा असून, ऑक्‍टोबरच्या वाढत्या हीटने स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे कपाशी अन्‌ तुर पिकांची होरपळ वाढली आहे.  • बुलडाणा जिल्ह्यात केवळ ३० टक्के पीक कर्जवाटप

बुलडाणा ः कमी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनीही उभे केले नाही. या हंगामात बुलडाणा जिल्ह्यात अवघे  ३०.११ टक्के पीककर्ज वाटप झाले असून, ७० टक्के शेतकरी वंचित राहिले अाहेत. १७४५ कोटींचे उद्दिष्ट असलेल्या या जिल्ह्यात केवळ ५२५ कोटी रुपयांचेच वाटप बँकांनी केले अाहे.


 • शेतकरी सरकारवर पुरता समाधानी : रावसाहेब दानवे

नगर ः देशात आणि राज्यात सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी पुरता समाधानी आहे. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादी व अन्य विरोधकांनी कितीही बाता मारल्या, टीका केली तरी शेतकरी आमच्या बाजूनेच आहे. आमचे सरकार चांगले काम करत आहे. म्हणून तर गेल्या चार वर्षांत झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. यानंतरही आमचीच सत्ता येईल, शिवसेना भाजपवर आजिबात नाराज नाही. ते आमच्यासोबतच आहेत, असेही श्री. दानवे म्हणाले.


 • निमित्त ऊस दराचे, पडघम निवडणुकांचे

कोल्हापूर : ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे यंदाचाही ऊस हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही आता ऊस परिषदांची घोषणा विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. उसाला पहिला हप्ता किती मिळणार, याचबरोबर आता या परिषदांमधून आता संभाव्य निवडणुकीची रणनितीही आखली जाण्याची शक्‍यता आहे. यादृष्टीनेही शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. आक्‍टोंबरच्या उत्तरार्धात या परिषदा होणार आहेत.


 • ‘सीसीआय’ची सहावी निविदा निघालीजळगाव ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यासंबंधी भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) सहावी निविदा प्रक्रिया राबवायला सुरवात केली आहे. येत्या १० तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. खरेदी केंद्रासंबंधीच्या निविदेत जे नवे निकष सीसीआयने ४८ वर्षांनंतर लागू केले, ते मागे घेण्याची मागणी गुजरात, तेलंगण, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील (मध्यांचल) काही जिनर्सनी नुकतीच ‘सीसीआय’च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली आहे. उद्याचा हवामान अंदाज 

A . कोकण 
तापमान - २५ अंश से. ते ३२ अंश से. 
पाऊसमान - हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 
आद्रता - ६७% ते ९८%
वारे - १ ते ३ 

B . पश्चिम महाराष्ट्र 
तापमान - २०अंश से. ते ३३ अंश से. 
आद्रता - ३५% ते ९९%
वारे - १ ते ४ किमी /तास. 

C . खान्देश 
तापमान - २० अंश से. ते ३४ अंश से. 
पाऊसमान - 
आद्रता - २६% ते ९९% 
वारे - १ किमी /तास. 

D . मराठवाडा 
तापमान - २२ अंश से. ते ३६ अंश से. 
आद्रता - २२% ते ६१% 
वारे - १ ते ५ किमी /तास. 

E . विदर्भ 
तापमान - २० अंश से. ते ३६अंश से. 
पाऊसमान - 
आद्रता - ३५ % ते ८२ % 
वारे - १ ते ३ किमी /तास. 

F . विदर्भ 
तापमान - २३ अंश से. ते ३४ अंश से. 
पाऊसमान - 
आद्रता - २५% ते ५०% 
वारे - २ ते ५ किमी /तास. पीक सल्ला 

पिकाचे नाव:ज्वारी 
रब्बी ज्वारीची  पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान करावी . 
रब्बी हंगामासाठी ज्वारीचे हेक्टर १० किलो बियाणे पेरावे . 
पेरणीपूर्वी बियाण्यास ७ ग्राम इमिडाक्लोप्रिड किंवा ५ ग्राम थायमेथॉक्झाम प्रति किलो 
बियाण्यास २५० ग्राम ऍझेटोबॅक्टर जिवाणूसंवर्धन चोळावे. 
त्यानंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे . रब्बी  ज्वारीचे पेरणी २ चाड्याच्या 
४५ सेमी अंतराच्या तिफणीने जमिनीमध्ये ५ सेमी खोलीवर करावी. हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे .