Tuesday, August 13, 2019

कडुनिंबापासून बोंडअळी कीटकावर नियंत्रण शक्य

🐛कापसासह, सूर्यफुल आणि कडधान्याच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळी कीटकामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. 
✔️ महाराष्ट्रासह देशभरातील कापूस, सूर्यफुल, डाळी, धान्य यासह जगभरातील तीनशेपेक्षा जास्त वनस्पतींना नुकसान करणाऱ्या बोंडअळी या कीटकामुळे शेतकरी हैराण आहे. पारंपरिक पद्धतीने या बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महागडय़ा रासायनिक कीटकनाशकांचा अलीकडे बेसुमार वापर केला जात असल्याने ही कीटकनाशके मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठीही घातक ठरत असल्याचे समोर आले आहे.
✔️या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक वषार्ंपासून जगात वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. विशाल हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी बोंडअळी किडीच्या चयपचन आणि वाढीसाठी जगभरातील संशोधनाचा अभ्यास केल्यानंतर त्यांचा शोध कडुनिंबापाशी येऊन थांबला आहे.

येथे क्लिक करून तुमची मागणी नोंदवा. 


       

✔️कडुनिंबापासून वेगवेगळी कीटकनाशके तयार केली जातात. कडुनिंबातील अझादिराक्तिन रेणू कीटकांच्या वाढीला नियंत्रित करण्यासाठी अनेक प्रकारे काम करतो हे लक्षात आल्यानंतर हा रेणू बोंडअळीला खाऊ घातला तर ती मरते, हेही प्रयोगातून समोर आले आहे.
✔️जगभरातील संशोधकांकडून सुरू असलेल्या संशोधनाचा अभ्यास करून त्यांनी कडुनिंबापासून बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्याबाबतच्या संशोधनाला गती दिली.
✔️कडुनिंबाचे झाड हे पिकावरील कीटकांना मारण्यासाठी आणि मानवी आरोग्य सुधारण्यासाठी गुणधर्मी म्हणून ओळखले जाते.
✔️भारतात आणि इतर ठिकाणीही कडुनिंबाच्या झाडामध्ये मिळणारे अझादिराक्तीन घटक हे इतर कोणत्याही झाडात दिसत नाहीत आणि हा घटक नसíगक पद्धतीने कीटकांच्या वाढीला प्रतिबंध करतो.
✔️त्यामुळे मागील ६० वर्षांपेक्षा अधिक काळापासून अझादिराक्तीनचे गुणधर्म समजून घेऊन तो कृत्रिमरीत्या तयार करण्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. मात्र तो प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार करणे शक्य होत नाही. हा घटक तयार झाला तर जैविक पद्धतीने पर्यावरणपूरक कीटकनाशक विकसित करता येऊ शकते.
*शेतकऱ्यांना परवडणारे औषध*
आता हे संशोधनाने एक पाऊल पुढे टाकले असून जैव सूची विज्ञानाचे तंत्रज्ञान वापरुन बोंडअळीच्या सहा विकारांबरोबर प्रक्रिया घडवून चयापचय झालेले रेणू विकरांची क्रियाकलाप थांबवतात, हे सिद्ध झाल्याने ३५ पेक्षा जास्त रेणूंची संरचना तयार करून असे रेणू तयार करणे दृष्टिक्षेपात आल्यामुळे बोंडअळीवर नियंत्रण मिळवणे जैविक पद्धतीने शक्य होणार आहे. यामुळे स्वस्तात शेतकऱ्यांना परवडणारे औषध उपलब्ध होऊन बोंडअळीच्या त्रासातून सुटका होण्याची शक्यता वाढली आहे.
तेल न काढलेली निबोळी चे,,,अर्क  निंबोळी,, गोमूत्र, वर्मींवाॅश जिवाणू युक्त, -निंबोळी अर्क उपलब्ध *_लष्करी अळी वर रामबाण उपाय_* 5लिटर पॅकिंग,,,
सपर्क

*महेंद्र निंबा परदेशी*
7588319968
8208351205
कुसुंबा ता.जि.धुळे

No comments:

Post a Comment