शिक्षण

विद्यार्थी विकास उपक्रम 
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना करिअर विकास करण्याच्या उद्देशाने पुढील गुण विकसित केले जातात. याशिवाय सहभागी विद्यार्थ्यांना रु. १००० प्रति महिना विद्यावेतन दिले जाते.
  • व्यक्तिमत्व विकास - नेतृत्वगुण, व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य
  • व्यवस्थापन विकास - अनुकुलन, सामाजिक बांधिलकी, मनुष्यबळ व्यवस्थापन
  • तंत्रज्ञान जाणीव जागृती - डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता, आंतरराष्ट्रीय स्तिथी
  • व्यवसाय नियोजन - गट व्यवस्थापन, भागीदारी, शोध आणि सर्जनशीलता
  • नोकरी व प्लेसमेंट सुविधा
नोकरी व रोजगार निर्मिती 

विद्यार्थी विकास उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करिता आवश्यक कौशल्य प्राप्त होतात त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना किमान वेतन आणि नियमानुसार नोकरी देण्याचे प्रावधान केलेले आहे. कर्तव्य जबाबदारी आणि इतर माहितीसाठी इथे क्लिक करा.

   Payment & Allowances -


Fresher
Beneficiary student
Pro agro trained candidate
Experienced
Basic
3000
7000
12000
10% hike on current Salary
TA (15%)
15%
15%
15%
15%
Phone (03%)
03%
03%
03%
03%
HRA (5%)*
05%
05%
05%
05%
Medical & Other (05%)
05%
05%
05%
05%
Total
3840
8960
15360
Actually
Incentive
10%
15%
20%
25%


विद्यार्थी दत्तक उपक्रम - रु. १२०००/-

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी स्वतःच्या कुवतीवर आणि स्वाभिमान जपुन जर शिक्षण घेत असतील आणि स्वतःच्या हिम्मतीवर पायावर उभे राहत असतील तर यासारखी दुसरी कोणती अभिमानाची गोष्ट असू शकत नाही. आमच्याकडे अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यामुळे अत्यंत गरीब आणि पालकांच्या आधाराशिवाय वाढलेली मुले "विद्यावेतन" घेवून उच्चशिक्षित झालेली आहेत.

आम्ही मुलांना मदत करताना "दान" हा शब्द वापरून त्यांच्यामध्ये कमीपणा किंवा हीनपणाची भावना जागृत करत नाही. तुमच्याकडून मिळालेला निधी कोणत्याही प्रकारे कोणत्याही विद्यार्थ्याच्या स्वाभिमानास ठेच पोहचेल अश्या प्रकारे वितरीत केला जात नाही. विद्यार्थी घडवून त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करताना सुरुवात दान घेतलेल्या रक्कमेतून व्हावी असे आम्हाला वाटत नाही. परिणामी आम्ही विद्यार्थ्यांना दान न देता विद्यावेतन देतो. 

एक विद्यार्थी दत्तक घेण्यासाठी रु. १२००० प्रति वर्ष आम्हास मदत करावी.

बँक खाते
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
Central bank of india,
Acc no- 3572858444 
IFSC - CBIN0283390
UPI 
mazisheti@ybl
PayUMoney