Project Associate


माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान सोबत वेगवेगळ्या स्तरावर काम करून सामाजिक योगदान देता येते. अगदी नवीन ज्यांना कामाचा अजिबात अनुभव नाही अश्या संस्था देखील आमच्यासोबत काम करू शकतात. गावस्तरावर कामाची सुरुवात करून जिल्हास्तरापर्यंत ३ टप्प्यावर सहभागी होऊन सामाजिक योगदान देता येते. 

आवश्यकता : सहभागी होणाऱ्या संस्थेकडे स्वतःचे किमान ०२ तज्ञ मनुष्यबळ (०१ समाजकार्य व ०१ कृषि), किमान ०१ संगणक आणि इंटरनेट सुविधा सेट असणारे १० x १० चे स्वतःचे अथवा भाड्याने असणारे कार्यालय आवश्यक आहे. 

सुरक्षा ठेव निधी : संस्थांना सुरक्षा अनामत रक्कम रु. १०,०००/- (दहा हजार) संस्थेकडे जमा करणे अनिवार्य आहे. 

इतर कागदपत्रे : 
 1. नोंदणी प्रमाणपत्र 
 2. माझीशेती सोबत काम करण्यासाठी इच्छुक असलेबाबत संस्थेचा / गटाचा ठराव
 3. संस्थेचे किंवा बचत गटाच्या अध्यक्ष यांचे PAN कार्ड 
 4. बँक पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश 
 5. संस्थेच्या आतील व बाहेरील दर्शक फोटो 
 6. सुरक्षा ठेवीकरिता जमा केलेल्या निधीचे प्रमाण प्रत 
यासोबत आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार इतर आवश्यक कागदपत्रे पुर्तता करावी लागेल. 

सहभागी होणाऱ्या संस्थांना करावयाची प्राथमिक कर्तव्ये आणि जबाबदारी :
 • जनजागृती कार्यक्रम राबविणे. (कॉलेज, ग्रामपंचायत, सोसायटी, बँक, शासकीय कार्यालये)
 • लाभार्थी (शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, महिला, व्यावसायिक) शोधणे आणि नोंदणी करणे.
 • मासिक मिटिंग घेणे व दस्तऐवज ठेवणे.
 • कार्यक्षेत्रातील कार्याचे अहवाल सोशल मिडियाच्या माध्यमातुन प्रसिद्ध करणे. 
 • साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक अहवाल पाठवणे.
सहभागी घटकांना मिळणारा मोबदला : 
प्रत्येक महिन्याच्या ०५ तारखेपर्यंत मागील महिन्याचा अहवाल सादर केल्यानंतर अधिकतम रु. ७००० इतका निधी संबंधित संस्थेच्या बँक खातेवर दिला जातो. पहिल्या महिन्याचा निधी सहाव्या महिन्याच्या निधीसोबत दिला जातो. दुसऱ्या महिन्यापासून नियमितपणे प्रतीमाह निधी हस्तांतर केला जातो. 


१. प्रचार - प्रसिद्धी खर्च (१०%) - एखादा लाभार्थी "ग्रामीण शाश्वत विकास" प्रकल्पामध्ये सहभागी झाल्यास १०% प्रचार-प्रसिद्धी करिता उपलब्ध निधी दिला जातो. उदा. शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांच्यापैकी कोणताही घटक "ग्रामीण शाश्वत विकास" प्रकल्पामध्ये सहभागी झाल्यास प्राप्त निधीच्या १०% नोंदणी क्रमांक धारकाच्या बँक खातेवर एकत्रितपणे महिनाखेरीस जमा केले जातात.

२. व्यवस्थापन खर्च - 
२.१ प्रकल्प स्तर (१५%) : "ग्रामीण शाश्वत विकास" प्रकल्प कार्यक्षेत्रातील प्राप्त झालेल्या एकुण निधीच्या १५% निधी संबंधित आस्थापनेस दिला जातो. प्रतिवर्षी हा निधी अधिकतम रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र) इतका दिला जातो.

२.२ तालुका स्तर (१०%) : प्रकल्प स्तरावरील चालू आर्थिक वर्ष्यात प्रथम लक्षांक प्राप्त करणाऱ्या संस्था यांना तालुका स्तरावरील अंमलबजावणीचे अधिकार मिळतात. त्यामुळे 

 • इतर अधिकतम १० ठिकाणी प्रकल्प सुरु करता येतात किंवा 
 • त्याठिकाणी संस्था / व्यक्ती / आस्थापना नेमणुकीचे अधिकार प्राप्त होतात किंवा 
 • तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या इतर संस्थाच्या व्यवस्थापनेबद्दल तालुका स्तरावर प्राप्त एकूण निधीच्या १०% निधी दिला जातो. 
प्रतिवर्षी हा निधी अधिकतम रु. १०,००,०००/- (रुपये दहा लाख मात्र) इतका दिला जातो. त्यासोबत शासकीय / त्रयस्थ संस्थांची कामे अंमलबजावणीचा अधिकार दिला जातो.

२.३ जिल्हा स्तर (१०%) : तालुका स्तरावरील चालू आर्थिक वर्ष्यात प्रथम लक्षांक प्राप्त करणाऱ्या संस्थाना त्यांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाचे अधिकार मिळतात. त्यामुळे 

 • सध्याच्या प्रकल्पासोबत इतर अधिकतम १० तालुक्याच्या ठिकाणी काम करता येते किंवा 
 • त्यांना तालुका स्तरावर संस्था नेमणुकीचे अधिकार प्राप्त होतात किंवा 
 • तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या इतर संस्थांच्या व्यवस्थापनेबद्दल जिल्हा स्तरावर प्राप्त एकूण निधीच्या १०% निधी दिला जातो. 
प्रतिवर्षी हा निधी अधिकतम रु. ५०,००,०००/- (रुपये ५० लाख मात्र) इतका दिला जातो. त्यासोबत शासकीय / त्रयस्थ संस्थांची कामे नियंत्रण करण्याचा अधिकार दिला जातो.

३.४ विभाग स्तर (१०%) : जिल्हा स्तरावरील चालू आर्थिक वर्ष्यात प्रथम लक्षांक प्राप्त करणाऱ्या संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रात विभाग स्तरावरील नियोजनाचे अधिकार मिळतात. त्यामुळे 

 • सध्याच्या प्रकल्पासोबत इतर अधिकतम ०३ ते ०५ जिल्ह्यात काम करता येते किंवा 
 • जिल्हा स्तरावर संस्था नेमणुकीचे अधिकार प्राप्त होतात किंवा 
 • जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या इतर संस्थांच्या व्यवस्थापनेबद्दल विभाग स्तरावर प्राप्त एकूण निधीच्या १०% निधी दिला जातो. 
प्रतिवर्षी हा निधी अधिकतम रु. १,००,००,०००/- (रुपये एक कोटी मात्र) इतका दिला जातो. त्यासोबत प्रकल्प निधीच्या १०% या तत्वावर शासकीय / त्रयस्थ संस्थांची कामे नियोजन करण्याचा अधिकार दिला जातो.


विशेष ठराव -
जाने.२०१८ च्या मासिक बैठकीतील सुचनेनुसार कोणत्याही यंत्रणेला या प्रकल्पात सहभागी होताना कमीत कमी ६ महिने एका स्तरावर (गाव / क्लस्टर / तालुका / जिल्हा) काम करावे लागेल. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर समायोजन होईल.

संदर्भ : 
कमवा व शिका योजना 
Chapter 08 Economy
C. आर्थिक विनियोजन - 
# पुढील सूचना मिळेपर्यंत या सुचना लागू राहतील.
# पुर्वपरवानगी असेल तरच देयके देय राहतील.

सहभागी सहयोगी शैक्षणिक संस्था पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment