कृषि माहिती केंद्र, सावळज

उमेदवारांना सुचना
१. सर्व पदांना मासिक लक्षांक आधारित वेतन पद्धत लागू आहे. 
२. वेतन वाढीकरिता लक्षांक प्राप्ती ग्राह्य धरली जाईल.
३. कामाच्या गुणवत्तेवर आधारित कंत्राटी कालावधीमध्ये वाढ होईल. 
४. अर्ज मिळाल्यानंतर उमेदवारांच्या पात्रतेनुसार प्रत्यक्ष मुलाखतीकरिता संपर्क केला जाईल.
५. मुलाखतीस येताना २ फोटो, मागील कंपनी / संस्था वेतन स्लिप, बँक पासबुक झेरॉक्स (पासबुक नसेल तर रद्द केलेला धनादेश), शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ व एक झेरॉक्स प्रत घेवून उपस्थित रहायचे आहे.
६. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांनी / उमेदवारांनी त्यांचा अद्ययावत (CV) बायोडाटा info@mazisheti.org येथे इमेल करावा.


कर्तव्य आणि जबाबदारी 
१. सोशल मिडिया : या वर्गात सहभागी होणारे कर्मचारी अभियांत्रिकीमधील शिक्षण घेतलेले असावेत. त्यांनी कृषि माहिती केंद्राच्या सहभागी घटकांना सर्व सामाजिक संकेतस्थळावर संपर्कात ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे. जास्तीत जास्त घटकांशी वैयक्तिक आणि सामुहिक स्तरावर संपर्क ठेवणे.

२. जनसंपर्क या वर्गात सहभागी होणारे कर्मचारी कोणत्याही शाखेचे नियमित पदवी शिक्षण घेतलेले असावेत. त्यांनी कृषि माहिती केंद्राच्या सहभागी घटकांना सर्व सामाजिक ठिकाणी संपर्कात ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे. जास्तीत जास्त घटकांशी वैयक्तिक स्तरावर (फोन, प्रत्यक्ष भेट) संपर्क ठेवणे. 

३. प्रकल्प समन्वयक : समाज कार्य पदवी व उच्च पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलेले आहे. इतर शाखेचे अनुभवी उमेदवार या पदावर काम करू शकतात. कृषि माहिती केंद्राच्या सामाजिक आणि संस्थात्मक प्रचार - प्रसिद्धीचे उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि अहवाल करणे हे काम प्राधान्याने करावयाचे आहे. या उमेदवारांना फोटोग्राफीमधील मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. 

४.१ प्रशिक्षक (कृषि) : नियमित कृषि पदवी झालेले किंवा अनुभवी बहिस्थ शिक्षित उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. शेतकरी, कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नियोजित प्रशिक्षणास अनुसरून अभ्यास साहित्य बनविणे व अद्ययावत करणे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करणे आणि पाठपुरावा घेणे. प्रशिक्षनार्थींचे प्राप्त प्रश्न सोडविणे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि लाभार्थी घटकांना प्रशिक्षित करणे. प्रकल्प समन्वयक यांचेकडून केलेल्या कामाचा आढावा घेणे. 

४.२ प्रशिक्षक (समाज कार्य) : नियमित समाज कार्य पदवी / पदवीत्तर शिक्षण झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक व इतर घटकांसाठी नियोजित प्रशिक्षणास अनुसरून अभ्यास साहित्य बनविणे व अद्ययावत करणे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करणे आणि पाठपुरावा घेणे. प्रशिक्षनार्थींचे प्राप्त प्रश्न सोडविणे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि लाभार्थी घटकांचे प्रबोधन करणे. प्रकल्प समन्वयक यांचेकडून केलेल्या कामाचा आढावा घेणे. 

४.३ प्रशिक्षक (अभियांत्रिकी) : नियमित अभियांत्रिकी पदवी / पदवीत्तर शिक्षित उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.  शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक व इतर घटकांसाठी नियोजित प्रशिक्षणास अनुसरून अभ्यास साहित्य बनविणे व अद्ययावत करणे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करणे आणि पाठपुरावा घेणे. प्रशिक्षनार्थींचे प्राप्त प्रश्न सोडविणे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि लाभार्थी घटकांना प्रशिक्षित करणे. प्रकल्प समन्वयक यांचेकडून केलेल्या कामाचा आढावा घेणे. 

५. विक्री प्रतिनिधी : नियमित पदवी / पदवीत्तर शिक्षित उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.  शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक व इतर लाभार्थी घटकांना लाभाच्या उपक्रमासाठी सहभागी करून घेणे. प्रशिक्षण, सहाय्यता केंद्र, डिजिटल व्यासपीठ, ग्रीट पुरस्कार असे सर्व उपक्रमांसाठी लाभार्थी घटक शोधणे आणि त्यांना सहभागी करून घेणे. 

६. ग्राहक सेवा प्रतिनिधी : नियमित पदवी / पदवीत्तर शिक्षित उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.  शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक व इतर लाभार्थी घटकांना लाभाच्या उपक्रमासाठी सहभागी झाल्यानंतर कायमस्वरूपी संपर्कात राहणे. त्यांच्या गरजेनुसार नियोजन, अंमलबजावणी करणे. प्रशिक्षण, सहाय्यता केंद्र, डिजिटल व्यासपीठ, ग्रीट पुरस्कार असे सर्व उपक्रमांचे लाभार्थी घटक कायमस्वरूपी काही न काही उपक्रमाचे नियोजन करून संपर्कात ठेवणे.

७. व्यवस्थापक : नियमित पदवी / पदवीत्तर शिक्षित उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. कार्यरत कर्मचारी उपस्थिती, त्यांचे नियोजन - अंमलबजावणी - अहवाल तपासणी करणे. प्रकल्पाचे भौतिक व आर्थिक नियोजन - अंमलबजावणी - अहवाल ९०% लक्ष साध्य करणे. कर्मचारी वेतन, नियोजित उपक्रम, कार्यालयीन खर्च, बहिस्थ यंत्रणा यांची देयके तपासणी करणे. 

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे निय...