हवामान


राज्यस्तरीय अँग्रोअ़ँडव्हायजरी समितीच्या दि. १०/०४/२०१८  च्या बैठकीतील कृषि हवामान विषयक संदेश खालीलप्रमाणे आहेत.


पुढील ४८ तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापुढील ३ दिवस हवामान कोरडे राहील. विदर्भात पुढील ७८ तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील २ दिवस हवामान कोरडे राहील. कोकणात पुढील ५ ही दिवस हवामान कोरडे राहील.

इशारा – विदर्भात पुढील २४ तासात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही. व त्यानंतर २ ते ३ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.

तापमानातील वाढीची शक्यता लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकांना दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी करावे. पाण्याची कमतरता असेलल्या ठिकाणी ऊसास सरीआड सरी पाणी द्यावे.

जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी सर्वच पिके व फळबागांना गवत व काडीकच-याचे अच्छादन करावे.

दुपारच्या कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पशुधनास सावलीची व्यवस्था करावी.

उन्हाळी भाजीपाला पिकारील मावा, फुलकिडे तसेच तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% एस एल ५ मिली किंवा फिप्रोनिल ५ % एस.सी ३५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.

भेंडी व टोमॅटोवरील फळ पोखरणा-या अळीचे नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ %ईसी २० मिली अथवा नोव्हॅलिरॉन  १० %ई.सी १५ मिली अथवा क्लोरट्रॅनिलीपोल १८.५ % एस सी ३ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे. यापैकी कोणताही एका किटकनाशकाची फवारणी करावी.


विशेष संदेश : 
तरुण वर्गाला 10 लाखापर्यंत बिनव्याजी आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना या तीन योजना राबविल्या जात आहेत. 
Popular Posts

Image

वांगी