महिला

महिला व्यवसाय गट

प्रकल्प क्षेत्रामध्ये कार्यरत महिलांना ४ दिवसांचे “व्यवसाय व्यवस्थापन” प्रशिक्षण दिले जाते. अंगभुत कौशल्ये विकास, स्थानिक परिस्थितीतील गरजांचा व्यावसायिक स्तरावर वापर, उपलब्ध संसाधने व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन यासोबत उत्पादन, व्यापार आणि सेवा इत्यादी विषयांचा सविस्तर अभ्यासक्रम या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट केलेले आहे. प्रकल्प क्षेत्रातील गावे आणि तेथील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यापार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित उपक्रम महिलांचे एकजिनसी व्यावसायिक गट बनवून त्यांच्यामार्फत राबविले जातात. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर मुल्यवर्धन करण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. तसेच मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्तर उंचावला जात आहे.

आम्ही कशा प्रकारे सेवा देतो ???
  • माझीशेतीकडे संपुर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काम करण्यासाठी 600 पेक्षा जास्त नोंदणीकृत उद्योजक व कर्मचारी आहेत. हे सर्वजन ग्रामीण शाश्वत विकास या प्रकल्पावर काम करतात.
  • माझीशेतीकडे 200 पेक्षा जास्त महाविद्यालये असून त्यामध्ये 19 कृषी महाविद्यालये आहेत. इथे शिक्षण घेणारे विद्यार्थी वरीलप्रमाणे कल्याणकारी योजना राबवितात.


24 x 7 हेल्पलाईन - 8788334324

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे निय...