work from home

प्रस्ताव / अहवाल 
(₹ 30 प्रति पान + ₹ 5 प्रति संगणक प्रिंट + ₹ २ प्रति झेरॉक्स पान)
ग्रामीण विकासाच्या दृष्टीने कोणताही प्रकल्प अहवाल बनवा आणि संस्थेला सादर करा. यामध्ये प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी संख्येचे बंधन नाही. प्रकल्प प्रस्ताव / अहवाल संबंधित शिक्षक / प्राध्यापक यांनी तपासलेला असणे अनिवार्य आहे.

संकेतस्थळ पोस्ट / ईमेल पत्रव्यवहार

(₹ 5/ email / Social media post)
ग्रामीण विकासाशी संबंधित केलेले कार्य, तुमचे शैक्षणिक व सामाजिक विचार किंवा तुमच्या जवळ घडलेल्या सामाजिक घडामोडी माझीशेतीच्या पेजवर पोस्ट करा. तुमची पोस्ट संबंधित शिक्षक / प्राध्यापक यांनी तपासलेली असणे अनिवार्य आहे. माझीशेतीचे अधिकृत संकेतस्थळ माहितीसाठी इथे क्लिक करा.


फोटो
(₹ 5/ email / Project /Social media post)
प्रकल्प अहवाल, प्रस्ताव संकेतस्थळावरील पोस्ट यासाठी जोडलेल्या तुमच्याशी संबंधित फोटो अपलोड करा. निवडक फोटो करिता हा निधी लागू आहे.


निधी संकलन
(किमान ₹ १०% व कमाल ३०% प्राप्त निधीस अधीन राहून)
माझीशेतीच्या लाभार्थी घटकांकडून लोकवर्गणी जमा करणे, प्रकल्पाची वेगवेगळ्या प्रकारचे निधी जमा करणे तसेच समाजातील दात्या लोकांकडून लोकहिताच्या कामासाठी निधी संकलन करणे अश्या निधी संकलनासाठी होणारा व्यवस्थापन आणि इतर खर्चापोटी निधी दिला जातो.

जनसंपर्क
(₹ 3/ call किंवा ₹ 5/ प्रति सकारात्मक call)
लाभार्थी घटकांना फोनवरून माहिती देणे हे दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. संस्थेच्या नियोजित उपक्रमाबाबत वेळोवेळी सुचित करणे, माहिती देणे, अहवाल घेणे यासोबत संस्थेच्या कार्यक्रमाचे लाभ घेण्यासाठी आवाहन करणे या बाबींचा समावेश होतो.


कार्यक्रम समन्वय / सुत्रसंचालन
(₹ २००/ कार्यक्रम किंवा ₹ ०६/ प्रति लाभार्थी संख्या)
शेतकरी, विद्यार्थी, महिला, सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक, सामाजिक संस्था यांच्यासाठी शासकीय योजना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणे. नियोजित उपक्रमाबाबत संबंधित घटकांना वेळोवेळी सुचित करणे, माहिती देणे, अहवाल घेणे व तसेच कार्यक्रम पुर्व आणि पश्चात त्यासंबंधी माध्यमातुन प्रचार - प्रसिद्धी देणे या बाबींचा समावेश होतो.


कार्यक्रम वक्ता
(₹ ५००/ कार्यक्रम किंवा ₹ १०/ प्रति लाभार्थी प्रति ७५ मिनिट)
शेतकरी, विद्यार्थी, महिला, सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक, सामाजिक संस्था यांच्यासाठी शासकीय योजना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणे. नियोजित उपक्रमाबाबत संबंधित घटकांना वेळोवेळी सुचित करणे, माहिती देणे, अहवाल घेणे व तसेच कार्यक्रम पुर्व आणि पश्चात त्यासंबंधी माध्यमातुन प्रचार - प्रसिद्धी देणे या बाबींचा समावेश होतो.

कार्यक्रम

(आसनव्यवस्था - ₹ 3 प्रति लाभार्थी, दृकश्राव्य यंत्रणा - ₹ ५ प्रति लाभार्थी, खानपान - ₹ ५ प्रति लाभार्थी)
किमान ७५ मिनिटे नियोजित माहिती देण्यासाठी स्थळ निवड करताना शासकीय, शैक्षणिक, सामाजिक सभागृहे प्राधान्याने निवड  करणे. इतर कार्यालयामध्ये आयोजित करणेपुर्वी माझीशेतीच्या वरिष्ठ स्तरावरील संस्था / प्रतिनिधी यांची परवानगी आवश्यक आहे. हॉलकरिता होणारा खर्च वगळता इतर सर्व खर्च देय राहतील. कार्यक्रम पुर्व आणि पश्चात त्यासंबंधी माध्यमातुन प्रचार - प्रसिद्धी देणे या बाबींचा समावेश होतो.

क्षेत्र भेट
(₹ ३०० / २०० / १०० प्रति भेट)
शेतकरी, विद्यार्थी, महिला, सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक, सामाजिक संस्था यांच्या मार्गदर्शनासाठी किंवा संस्थेच्या नियोजित उपक्रमासाठी वेळोवेळी भेटी देणे आवश्यक आहे. अश्या नियोजित भेटी तीन प्रकारात समाविष्ट होतात. कुशल / तज्ञ - ₹ 300/ day, अर्धकुशल - ₹ 200/ day आणि अकुशल - ₹ 100/ day एका भेटीसाठी. 


कर्मचारी
(₹ ३००० / ६००० / १२००० प्रति महिना)
शेतकरी, विद्यार्थी, महिला, सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक, सामाजिक संस्था यांच्या हिताचे उपक्रम राबविण्यासाठी माझीशेतीच्या सहयोगी संस्थेचे  कर्मचारी असणे अभिप्रेत आहे. त्यामध्ये विनानुभवी, अर्धकुशल आणि कुशल अश्या वर्गवारीनुसार कर्मचारी वेतन देय राहील. नेमणुक केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवास, फोन, निवास, वैद्यकीय खर्चापोटी अनुक्रमे १५%, ०३%, १०%, ०५% इतके अनुदान देय राहील.

No comments:

Post a Comment

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे निय...