Tuesday, August 4, 2015

संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या सोयी तथा चालविले जाणारे प्रकल्प...

आपण सर्वजन शेती आणि शेतकरी विकासासाठी बरीच वर्षे झटत आहोत. यामध्ये -

1. माहितीचा प्रसार, आवश्यक साहित्य पुरवठा
2. गरजेनुसार प्रशिक्षण
3. सामाजिक, सहकारी, वैयक्तिक संस्था सबलीकरण
4. शेती व शेतीपुरक व्यवसाय प्रशिक्षण
5. शेती, शेतकरी यांच्यासाठी वरील विषयांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्यांचा गौरव

याशिवाय अजुन काही करु शकतोय काय??? तुम्हाला काय वाटते???

___महेश बोरगे, सावलज (सांगली)
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सांगली
------------------------------------
संस्थेच्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_पत्ता_जिल्हा_मोबाईल नंबर> 09975740444 या नं.वर कळवा.
-------------------------------------
Mobile - 08412995758
Email - mazishetifoundation@gmail.com
Web - www.mazisheti.org
FB - www.facebook.com/agriindia
Whatsapp - 09975740444

Friday, June 5, 2015

MAZISHETI VISION

आम्ही शेतकरी आहोत कष्ट करून स्वतःच्या भाकरीची सोय करून जगाच्या भाकरीची तजवीज करणे इतकेच आम्हाला माहित.... आमच्या भाकरीसाठी कोणाच्या मार्गात जात नाही आणि कोणीही आमच्या मार्गात येऊ नये. इतिहास साक्षीला आहे, जेंव्हा जेंव्हा आमची सटकली तेंव्हा तेंव्हा महाप्रलय आला होता आणि आता यायला वेळ लागणार नाही.

माहितीसाठी माहिती मिळवणे आणि माहितीकरिता माहितीचा प्रसार शेतकऱ्यांसाठी करणे. भारतातील each & every शेतकरी त्याच्या आयुष्यात त्याला मिळणाऱ्या हक्क आणि ह्क्कांसोबत मोफत मिळणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये संभाळायला सक्षम बनविणे. भविष्यात money is wealth, किंवा health is wealth म्हणण्यापेक्षा Knowledge is wealth असणार आहे त्यामुळे सर्वंकष ज्ञान सर्वांना मिळाले पाहिजे. या करिता साम-दाम-दंड-भेद या नीतीने 24x7 झगडणे हेच आमचे ध्येय.....

आम्ही आमच्या ध्येय प्राप्तीसाठी पुढील मार्ग निवडला आहे. 

* Agricultural SMS advisory - या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना मोफत हवामानाचा अंदाज, पिक सल्ला, बाजारभाव, शासकीय योजना या शेतीच्या गरजेच्या बाबी त्यांच्या मोबाईल संदेशाद्वारे सांगणे. यामुळे शेतकऱ्यांचा अमूल्य वेळ कॅचला जाऊन इतर फायदेशीर गोष्टीस वेळ मिळु लागला आहे. 

* Agricultural Reading Materials - मोबाईल संदेशाद्वारे मिळणारी माहिती अचूक असली तरीही संदर्भासाठी पुरेशी नाही याची जाणीव झालेने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार साहित्य क्षेत्रात पदार्पण करुन सभासद शेतकऱ्यांना मोफत व इतर शेतकऱ्यांना "ना नफा ना तोटा" या तत्वावर वर्षातून ४ अंक 'मागणीनुसार' तयार करून उपलब्ध करून दिले जातात.

* Agri & agri allied business guidance - बरेचदा शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याच्या योजनांचा लाभ घेता आलेला नाही असे दिसते. आमचेकडून शेतकऱ्यांना "ना नफा ना तोटा" या तत्वावर प्रकल्प अहवाल, थोड्या कालावधीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.

* Trainings & Consultancy - शेतकरी गटांना वेगवेगळ्या भागातील प्रगत शेतकऱ्यांच्या यशोगाथा सांगणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक घेणे, शेतीमधील जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर लक्ष वेधून घेणे. प्रगत व यशस्वी शेतकऱ्यांच्या अनुभवावर कार्यरत राहण्यासाठी शेतकऱ्यांना जागृत करणे.

Saturday, May 30, 2015

वातावरणातील बदलाला सामोरे जाण्यासाठी द्राक्ष बागेमध्ये प्लॅस्टिक आच्छादन हा चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थात, त्यावर शास्त्रीय पद्धतीने अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. - डॉ. जे. एम. खिलारी, रोहीत पांढरे

वातावरणातील बदलाला सामोरे जाण्यासाठी द्राक्ष बागेमध्ये प्लॅस्टिक आच्छादन हा चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थात, त्यावर शास्त्रीय पद्धतीने अधिक अभ्यास होण्याची गरज आहे.
- डॉ. जे. एम. खिलारी, रोहीत पांढरे

गेल्या दोन-चार वर्षांपासून राज्यातील द्राक्ष बागांचे अवकाळी पाऊस, दव, धुके, अति थंड किंवा अति उष्ण तापमानाचे चढ-उतार यामुळे मोठे नुकसान होत आहे. 2014-15 मध्ये तर ऑक्टोबर छाटणीनंतरच्या द्राक्षमण्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात पाऊस पडल्याने नुकसान वाढत गेले.

नुकसानीचा अंदाज आणि स्वरूप -
राज्यातील चारही द्राक्ष विभागामध्ये सुमारे 30 ते 70 टक्के नुकसान झाल्याचे आढळून आले. नुकसानीमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भावाचे दृश्य नुकसान सर्वत्र कमी अधिक होते. मात्र प्रत्यक्ष नुकसानीमध्ये द्राक्षमणी, घड हे केंद्रस्थानी असून, घड कूज (Early bunch stem necrosis) व घड आणि मण्यांच्या देठातील जळ (Bunch stem necrosis) सारख्या विकृतीचा प्रादुर्भाव अधिक असतो. या प्रादुर्भावापेक्षाही बेरी क्रॅकिंगसारख्या साध्या वाटणाऱ्या विकृतीने मोठे नुकसान केले. त्यावर केलेल्या उपाययोजना फारशा उपयुक्त ठरल्या नाहीत. याउलट काढणीपूर्व, काढणी आणि (www.facebook.com/agriindia) काढणीपश्चात द्राक्षामध्ये अनेक रोगांचा शिरकाव झाल्याने द्राक्ष पिकविण्याप्रमाणेच विकणेही अवघड होऊन बसले. या कालावधीत द्राक्ष बागांमध्ये प्लॅस्टिक आच्छादनाविषयी झालेले मोजके प्रयोग व त्याचे निष्कर्ष खूपच आशादायी वाटले.

प्लॅस्टिक आच्छादन -
- हवामानाच्या लहरीपणाचे फटके द्राक्ष शेतीला अनेक देशांमध्ये बसत आहेत. अशा स्पेन, इटली, चिली, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इस्राईल यांसारख्या देशांनी द्राक्षवेलींची हानी टाळण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा मार्ग स्वीकारला आहे.

- आपल्याकडेही या दशकाआधी बारामती व नाशिक येथे काही शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक शेड हाऊसमध्ये हे प्रयत्न केले. याशिवाय जाणोरी (जि. नाशिक) येथील काही शेतकऱ्यांनी (mazishetifoundation@gmail.com) प्रयोग चालू ठेवले आहेत. या सर्व प्रयत्नांना प्रगत देशांमधील प्रगतीची पुरेशी जोड नसल्याने अंशतः यश मिळाले.

- मागील वर्षी नाशिक येथे स्पेन, इटली या देशांमधील प्रयोगाच्या धर्तीवर प्लॅस्टिकचा आच्छादनाचा वापर करून काही प्रयोग घेतले गेले. त्याचा फायदा होताना दिसून आला.

प्लॅस्टिक आच्छादनाचे दोन प्रमुख कार्ये आहेत.
1) पाऊस, गारा, ऊन, वारा, दव, धुके यापासून संरक्षण.
2) अनैसर्गिक किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वेलीची वाढ आणि विकास यांना चालना देणे.

त्यामध्ये जल औष्णिक (Thermo Hydrolic) घटकांचा समावेश होतो. थोडक्यात, अशा वातावरणाचे दुष्परिणाम होण्याऐवजी वेलीची / घडांची वाढ आणि विकास चांगला होणे.

आच्छादन वापराचे फायदे -
ग्राफिकसाठी -
1) आच्छादनाच्या प्लॅस्टिक भरपूर सूर्यप्रकाश आत येण्यासाठी भरपूर पारदर्शक असावे. त्याचबरोबर जमिनीवरून परावर्तित होणाऱ्या लांब अवरक्त (इन्फ्रारेड) किरणांना ते कमीत कमी पारदर्शी असावेत. यालाच "स्क्रीन इफेक्ट' असे म्हणतात.

2) वातावरणातील लांब अवरक्त किरणे टाळली गेल्याने वेलींवर औष्णिक ताण पडत नाही.

3) धुक्यापासून संरक्षण - समशीतोष्ण कटिबंधातील सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष शेतीचे सतत नुकसान होते. धुके तसेच अधिक तापमानामुळे उकड्या तसेच जळ अशा अनेक समस्या उद्भवतात. सन स्कॉर्चिंग प्लॅस्टिक आच्छादनामुळे कमी होण्यास मदत होते.

4) पानांचे कार्यक्षमतेत, साखर निर्मितीत, रंगनिर्मितीत वाढ -
वातावरणातील अन्य घटकांच्या तुलनेमध्ये प्रकाशाचे वेलीवर सर्वाधिक परिणाम होतात. द्राक्षवेलीतील शारीरिक क्रियांमधील बरेचसे विकर (enzymes) प्रकाशामुळे प्रभावीत होत असतात. प्रकाशातील सूक्ष्म बदलही अचूकतेने टिपत असतात. वेलीची पाने वातावरणातील प्रकाशाच्या विद्युत पट्ट्यामधील (Electro magnetic spectrum) दृश्य विभागातील (www.mazisheti.org) प्रकाशच प्रामुख्याने घेत असतात. दृश्य विद्युत चुंबकीय पट्ट्यातील 400 ते 700 नॅनोमीटर वारंवारितेचा प्रकाश फक्त हरितद्रव्य निर्मितीसाठी उपयोगात येतो. या पट्ट्यातील प्रकाशास हरितद्रव्य निर्मितीसाठी क्रियाशील प्रकाश (Photosynthetic Active Radiation) म्हणतात. बाहेरील वातावरणात पानांवर पडणाऱ्या या प्रकाशातील 85 ते 90 टक्के प्रकाश वेलींची पाने शोषण करतात. उरलेला 6 टक्के प्रकाश परावर्तित होतो. या परावर्तित प्रकाशाला बाहेर जाण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन अधिकाअधिक पारदर्शक असले पाहिजे. आच्छादनामुळे वेलींवरील पानांचे आकारमान वाढते.
त्यामुळे पानांचे क्षेत्रफळ - उत्पादन यांचे गुणोत्तर वाढते. फोटो सिन्थेटिक ऍक्टिव रेडिएशन (पीएआर) वाढते. प्रकाश संश्लेषण वाढते, पानांमधील शर्करा (अन्न) वाढते. साखर भरण्याच्या टप्प्यामध्ये अशा द्राक्षात लवकर आणि वेगाने गोडी वाढते. आकारमान आणि वजन वाढते.

- द्राक्ष वेलीमध्ये पूर्वी साठवलेल्या अन्न साठ्याचा वापर घडांची वाढ व विकासासाठी करता येतो.
- बाहेर अधिक उष्णता असल्यास प्लॅस्टिक आच्छादनाखाली काही अंशी ती कमी राहते, तर बाहेर कमी तापमान असेल तर आत काही अंशी वाढ झालेली असते. परिणामी, साखरेची निर्मिती आणि रंग निर्मिती या क्रिया सुलभरीत्या चालू राहतात. बाहेरील अधिक तापमानात (32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त) दोन्ही क्रिया मंदावतात आणि नंतर थांबतात. सोबतच अधिक तापमानामुळे होणारे सनस्कॉर्चिगही टाळले जाते.

5) प्लॅस्टिक आच्छादनामुळे प्रकाशात बदल ः
प्लॅस्टिक आच्छादनामुळे आत आलेला प्रकाश कॅनोपीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर होते. याला प्रकाशाच्या वर्णावलीची विभागणी (Spatial Deistribution) असे म्हणतात. ही विभागणी प्लॅस्टिक आच्छादनामुळे सारखी होते. आच्छादनामुळे योग्य तरंगलांबीचा प्रकाश येतो. परिणामी, वेलीच्या सभोवती असलेल्या सूक्ष्म वातावरणात (Micro Climate) बदल होतो. पर्यायाने शाकीय वाढ (Vegtative) आणि पुनरुत्पादनाचे चक्र (reproductive cycle) यात अपेक्षित बदल होतात. प्लॅस्टिक आच्छादनामुळे प्रकाश स्थिर राहतो. याउलट कार्बन- डाय-ऑक्साईड (CO2) मात्र प्रसरित (डिफ्यूज) होतो. प्लॅस्टिकखालील पर्णसंभारात कार्बन- डाय- ऑक्साईडचे प्रमाण वाढते. तो कॅनोपीत सगळीकडे पसरतो. कार्बन- डाय- ऑक्साईडचा वापर वेली अधिक कार्यक्षमपणे करू शकतात. परिणामी, पानात हरितद्रव्य निर्मिती कार्यक्षमपणे चालते. यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाची निवड, टाकण्याची वेळ, साधावयाचा परिणाम यांचा मेळ मात्र बसला पाहिजे.

6) तोडणीनंतर द्राक्ष मण्यांचे आयुष्य वाढते.

7) काढणीपूर्व अवस्थेपासून पक्वता व काढणीपश्चात अवस्थेमध्ये रोग व किडीपासून संरक्षण मिळते.

8) पाण्याची बचत होते.

9) द्राक्ष बागेतील क्रॅकिंग, बंच स्टेम नेक्रोसिस, अर्ली बंच स्टेम नेक्रोसिससारख्या विकृतीवर नियंत्रण मिळवता येते. त्याचप्रमाणे उकड्या, सनस्कॉचिंगसारख्या किचकट विकृतींना लगाम घालता येतो.

10) अपेक्षेप्रमाणे पक्वता लांबविता येते किंवा लवकरही आणता येते.

सारांश -
आपल्या वातावरणात योग्य अशा प्लॅस्टिक आच्छादनाची निवड करून वापरल्यास निश्चितच फायदे होतात.

- आपत्कालीन हवामानाचे परिस्थितीत नुकसान टळेल. सोबतच वेलीसाठी शरीर शास्त्रीय फायदे होत असल्याने उत्पादन आणि दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. अर्थात, या बाबतीमध्ये शास्त्रीय पातळीवर प्रयोग व अभ्यासाची गरज आहे.

प्रतिक्रिया -
आमच्या थॉमसन सीडलेस जातीच्या द्राक्ष बागेमध्ये 22 ऑक्टोबर 2014 रोजी छाटणी केली. त्यानंतर त्यावर 23 नोव्हेंबर 2014 ला प्लॅस्टिक आच्छादन टाकले. नोव्हेंबर ते एप्रिल या काळात पाच वेळा मुसळधार पाऊस होऊनही आमचे द्राक्ष सुरक्षित राहिले. त्याला कुठेही क्रॅकिंग आले नाही.
उलट आच्छादनाखाली पानांचे आकारमान वाढले व पाने खरड छाटणीपर्यंत हिरवीगार राहिली. यामुळे द्राक्ष मण्यांचे आकारमान व वजन वाढलेले दिसले. मण्यांमध्ये साखरेचे प्रमाणही वाढलेले आढळते.
- सोपान चौधरी, मु.पो. दीक्षी (ओझर मिग), ता. निफाड, जि. नाशिक

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
**** संस्थेच्या न्यूज व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, अकोला, जळगाव, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
मोबाईल - 07745820077
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Monday, May 25, 2015

खरीप पेरणी करा यांत्रिक पद्धतीने, पारंपरिक पेरणी पद्धतीमधील त्रुटी लक्षात घेऊन कोरडवाहू शेती फायद्याची करण्यासाठी उपाययोजना

खरीप पेरणी करा यांत्रिक पद्धतीने, पारंपरिक पेरणी पद्धतीमधील त्रुटी लक्षात घेऊन कोरडवाहू शेती फायद्याची करण्यासाठी उपाययोजना
- श्री. नवनाथ पाटील, सांगली (कवठे पिरान)

पारंपारिक पेरणी पद्धतीमधील त्रुटी -
* मजुराच्या साह्याने बियाणे पेरणी केल्यामुळे पेरणी क्षेत्रावर बियाणाचे असमान वाटप
* दोन ओळींतील बियाणाचे प्रमाण किंवा दोन बियाणांतील अंतर कमी जास्त
* बियाणाची उगवण दाट किंवा विरळ
* पेरणीच्या खोलीवर नियंत्रण ठेवता येत नाही
* बियाणाची असमान उगवण. विशेषतः खरीप हंगामामध्ये पाऊस पडल्यामुळे बियाणावर अधिक माती पडते व त्याचा बियाणाच्या उगवणीवर विपरीत परिणाम होतो.
* खत व बियाणाच्या पेरणीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन मजूर लागतात. आंतरपीक उदा. सोयाबीन + तूर घ्यावयाची असेल तर तीन मजूर लागतात.
* यामध्ये शेतकऱ्यांचा मजुरी व बियाणांवर अधिक खर्च होतो.

या पारंपरिक पेरणी पद्धतीमधील त्रुटी लक्षात घेऊन केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद (CRIDA) यांनी बैलचलित तसेच ट्रॅक्‍टरचलित क्रीडा टोकणयंत्र विकसित केलेले आहे.

बैलचलित "क्रिडा टोकणयंत्र' -
- हे बैलचलित बहुपीक टोकण यंत्र आहे. हे यंत्र दोन, तीन किंवा चार फणांमध्ये उपलब्ध आहे. हे यंत्र सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, हरभरा, बाजरी, मका, भुईमूग, वाटाणा, गहू, कांदा इ. पिकाच्या पेरणीसाठी शिफारस केलेले आहे.
- या यंत्रामध्ये बीज व खत पेटी, गती देणारी यंत्रणा व चाके, फण, बियाणे व खताच्या तबकड्या, बियाणे नळ्या हे मुख्य भाग आहेत. हे सर्व भाग मुख्य सांगाड्यावर बसविलेले आहेत.
- यंत्राच्या प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बीज व खतपेटी (like our page www.facebook.com/agriindia) दिलेली आहे. या यंत्राच्या प्रत्येक फणासाठी बीजपेटीत स्वतंत्र कप्पा दिलेला असल्यामुळे आंतरपीक पेरणी करता येते. तसेच प्रतिएकरी आवश्‍यकतेप्रमाणे ५०-२०० कि.ग्रॅ. खतपेरणी करता येते. या पेटीतील तबकड्यांना जमिनीवर चालणाऱ्या दातेरी चाकाद्वारा गती दिली जाते. जमिनीवर चालणाऱ्या चाकाची एक फेरी पूर्ण झाली असता, बियाणे तबकडीची एक फेरी पूर्ण होते. तसेच खोली नियंत्रित करणारी चाके दोन्ही बाजूंना चाके दिली आहेत. त्यामुळे पेरणीची खोली ५ ते १५ सें.मी. दरम्यान कमी-जास्त करता येते.
अंदाजे किंमत - रु. १९०००/-

ट्रॅक्‍टरचलित क्रिडा टोकण यंत्र -
या यंत्राची संरचना बैलचलित "क्रिडा' टोकण यंत्राप्रमाणेच आहे. यामध्ये बी व खताच्या पेटीचा आकार वाढविलेला आहे. तसेच फणाच्या संख्येनुसार बी व खतपेटीची संख्या आहे. आवश्‍यकतेनुसार दोन फणांतील अंतर कमी-जास्त करता येते. हे यंत्र ६, ७ व ९ फण अशा प्रकारात (visit our website www.mazisheti.org) उपलब्ध असून, एकाच वेळी अनुक्रमे ६ ते ९ ओळी पेरता येतात. या यंत्राने एका दिवसात ८ ते १० एकर क्षेत्रावर पेरणी करता येते.
यामुळे साधारणतः १५ ते २० टक्के बियाण्याची बचत होते. वेळेत पेरणी पूर्ण होते. अंदाजे किंमत - रु. ४५,०००/-.

"क्रिडा' टोकणयंत्राची संक्षिप्त वैशिष्ट्ये -
* हे यंत्र सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, हरभरा, बाजरी, मका, भुईमूग, वाटाणा, गहू, कांदा, गवारगम इ. पिकांच्या टोकण पद्धतीने पेरणीसाठी उपयुक्त आहे. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या तबकड्या असून, त्या सहजपणे बदलता येतात.
* प्रत्येक ओळीसाठी फण असल्यामुळे बियाणे व खत योग्यप्रकारे पेरता येते.
* दोन फणांतील अंतर आवश्‍यकतेनुसार बदलता येते व यामध्ये ९ ते १८ इंचांपर्यंत पिकाच्या शिफारशीनुसार दोन ओळींतील अंतर मिळते.
* दातेरी चाकावर बसविलेली तरफ शेताच्या कडेला वळताना बी व खत बंद करते, त्यामुळे बी व खतपेरणी बंद होते.
* हे यंत्र चालविण्यासाठी फक्त एक मजूर लागतो.

"क्रिडा' टोकण यंत्राचे फायदे-
पारंपरिक पेरणीशी तुलना करता, या यंत्राचा वापर केल्यामुळे
* योग्य खोलीवर बियाणे व खत एकाच वेळी पेरणी करता येते.
* २५ ते ३० टक्के वेळेची, ६-२० टक्के बियाणाची व ५६-६८ टक्के मजुरीची बचत होते.
* एकूण पेरणीच्या खर्चात ३०-५० टक्के बचत होते.
* पीक उत्पादनात ५ ते २० टक्के वाढ होते.
* आंतरपीकसुद्धा (उदा. सोयाबीन + तूर - ४:२/२:१) घेता येते.
* देखभाल-दुरुस्तीचा खर्च नगण्य.

ट्रॅक्‍टरचलित रुंद सरी वरंबा टोकण यंत्र -
"क्रिडा' ट्रॅक्‍टरचलित टोकण यंत्राच्या सांगाड्यावरील फणांची संख्या कमी करून, त्यावर सरी पाडण्यासाठी दोन रिजर बसवून हे यंत्र विकसित केलेले आहे. हे ट्रॅक्‍टरचलित चार फणी टोकण यंत्र आहे. हे यंत्र सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, उडीद, मूग, हरभरा, भुईमूग, बाजरी, वाटाणा, गहू, कांदा, गवारगम इ. पिकासाठी उपयुक्त आहे. या यंत्राच्या बीज व खतपेटीची संरचना क्रिडा टोकण यंत्राप्रमाणेच आहे. यंत्राच्या सांगाड्यावर दोन्ही बाजूंना सरी यंत्र (रिजर) जोडलेले आहे. त्यामुळे पेरणी करताना प्रत्येक चार ओळीनंतर एक सरी तयार होते. कमी-अधिक पावसाच्या कालावधीत पेरणीची रुंद सरी वरंबा पद्धत उपयुक्त आहे.

या पद्धतीचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
* अधिक पाऊस पडल्यानंतर पावसाच्या पाण्याचा सरीद्वारा जलद निचरा होतो.
* पावसाच्या पाण्याचे सरीमध्ये संवर्धन होते.
* सरीद्वारा पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
* सरीमुळे माती भुसभुशीत राहते.
* खुरपणी व यांत्रिक पद्धतीने कापणीसाठी सुलभ

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
**** संस्थेच्या न्यूज व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, अकोला, जळगाव, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
मोबाईल - 07745820077
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Friday, May 22, 2015

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया: बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते.

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया:

बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते. बियाण्याचे प्रमाणीकरण खालील अवस्थांमधून पार पाडले जाते.
१) क्षेत्राची निवड -
बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बीजोत्पादन क्षेत्राची मंजुरी घ्यावी. मागील वर्षी सोयाबीन घेतलेल्या क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम घेऊ नये. निवडलेले क्षेत्र शक्यतो रस्त्यालगत असावे. ओलिताची सोय असावी. जेवढ्या क्षेत्रासाठी बियाणे वाटप केले असेल, तेवढेच क्षेत्र तपासणीकरिता स्वीकारले जाते.
२) विलगीकरण (आयसोलेशन) -
प्रत्येक जातीवर त्याच पिकाच्या वर्गातील इतर वाणांचे परागसिंचन होऊ नये म्हणून बीजोत्पादन क्षेत्राभोवती ठराविक अंतर मोकळे ठेवले जाते. यास विलगीकरण अंतर असे म्हणतात. सोयाबीन हे. १०० टक्के स्वपरागसिंचित असल्यामुळे विलगीकरण अंतर फक्त तीन मीटर ठेवावे लागते.
३) बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी -
बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून सोयाबीन पिकाच्या दोन तपासण्या कराव्यात. पहिली तपासणी पीक फुलावर येतेवेळी (३५ ते ४० दिवस) व दुसरी तपासणी पिकाची काढणी/ कापणी अगोदर करावी.
भेसळ काढणे -
- मुख्य पिकातील इतर सोयाबीन जातींची झाडे वेळेवर काढणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी बीजोत्पादकांनी पेरणीपूर्वी अथवा पेरणी केल्यानंतर १५ दिवसांत आपले क्षेत्र फी भरून बीज प्रमाणीकरणासाठी नोंद करून घ्यावे. तसेच पीक फुलावर येण्याच्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा म्हणजे भेसळ ओळखणे व ती काढणे याबाबतचे प्रात्यक्षिक ज्ञान संबंधित अधिकारी देऊ शकतील.
- पीक वाढीच्या काळात बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी करून फुलांचा रंग, खोड व फांद्यांवरील लव, शेंगाचा केसाळपणा वाढीचा प्रकार व फुलोऱ्याचा कालावधी इ. गुणधर्मावर आधारित वेगळी वाटणारी झाडे फुलोऱ्याच्या पूर्वी व फुलोऱ्यावर असताना किमान दोन किंवा तीन वेळा क्षेत्राची तपासणी करावी.
४) प्रक्रिया करणे-
बीजप्रक्रिया केंद्रावर बियाणे पाठवून १० x ६४ (४.०० एम.एम.) या आकाराच्या चाळणीतून प्रक्रिया (ग्रेडिंग) करणे अत्यंत आवश्यक आहे. यापेक्षा छोट्या आकाराची चाळणी वापरू नये. अन्यथा, लहान आकाराचे बियाणेसुद्धा चांगल्या प्रकारच्या बियाण्यामध्ये मिसळले जातील. बीज प्रक्रिया केंद्रावर तयार झालेले उच्च दर्जाच्या बियाण्याचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. प्रयोगशाळेत बियाण्याची उगवणशक्ती, बियाण्याची भौतिक व अानुवंशिक शुद्धता, आर्द्रतेचे प्रमाण इ. तपासण्या केल्या जातात. प्रयोग शाळेतील प्राप्त झालेल्या अहवालानुसार ज्या लॉटनंतरची उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा बियाण्याचे ३० किलोग्रॅम प्रति बॅग प्रमाणात पॅकिंग केले जाते.
५) बीज प्रमाणित होण्यास लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी -
बियाणे पिशवीत भरताना व मोहोरबंद करताना बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण त्यांची उगवणशक्ती, इतर काडीकचरा बियाण्याची शुद्धता, तणांचे प्रमाण हे ठराविक मर्यादेपेक्षा अधिक असल्यास बियाणे स्वीकारले जात नाही. (तक्ता क्र. २) मूलभूत बियाण्यासाठी सोनेरी पिवळे, पायाभूतकरिता पांढरे व प्रमाणित बियाण्यासाठी निळ्या रंगाचे टॅग (लेबल) वापरतात. जेणे करून बियाणे कुठल्या प्रकारे आहे हे तत्काळ लक्षात येते.
आवश्यकता बाबी ---- बियाण्याचा प्रकार
---- मूलभूत ---- पायाभूत ---- प्रमाणित
१) शुद्ध बियाणे (कमीत कमी) ---- १०० टक्के ---- ९८ टक्के ---- ९८ टक्के
२) घाण व इतर काडीकचरा (जास्तीत जास्त) ---- ०.० टक्के ---- २ टक्के ---- २ टक्के
३) इतर पिकांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- नाही ---- १० प्र.कि.ला
४) तणांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
५) इतर ओळखू शकणाऱ्या जातीचे प्रमाण (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
६) उगवणशक्ती (कमीत कमी) ---- ७० टक्के ---- ७० टक्के ---- ७० टक्के
७) बियाण्यातील ओलावा (जास्तीत जास्त) ---- १२ टक्के ---- १२ टक्के ---- १२ टक्के
सोयाबीन बीजोत्पादनासंबंधी महत्त्वाच्या बाबी -
- पिकाची कापणी करतेवेळी त्यात गवत असता कामा नये. कापणी जमिनीलगत करावी.
- आंतरपिकामध्ये सोयाबीन बीजोत्पादन घेऊ नये.
- पीक तयार होण्याच्या १० दिवस अगोदर, प्रति १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे साठवणीमध्ये बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. बियाण्याची उगवणशक्ती वाढण्यास मदत होते. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
- बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १५-१७ टक्के असताना मळणी करावी.
- बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पीक वाणापासून ३ मीटर अंतरावर असावे.
- स्फुरद विरघळणारे जिवाणू (पी.एस.बी.) संवर्धन कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत समप्रमाणात देऊन स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून दिल्यास बियाण्याची प्रत सुधारते व दाणे वजनदार होतात.
- पिकाची अनुत्पादक कायिक वाढ रोखण्यासाठी पीक कळी अवस्थेत असताना ---- पोटॅशियम आर्थोफॉस्फेट ५०० ग्रॅम अधिक २० मि.ली. ---- लिव्होसीन १०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
- फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा दीर्घकाळ ताण पडल्यास ओलित देण्याची व्यवस्था करावी, तसेच पीक फुलोऱ्यात असताना कोळपणी करू नये.
- सोयाबीनची झाडे मुळासकट उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी, नाहीतर बियाण्यात मातीचे खडे येण्याची शक्यता असते.
- मळणी शेतातच ताडपत्रीवर किंवा मातीच्या खळ्यावर सोयाबीनचा जाड थर पसरून करावी.
- तयार झालेले बियाणे सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खालील आल्यास वाळवणे थांबवावे.
- पोत्यांची साठवण करताना जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी मारावी. त्यापेक्षा जास्त थप्पी लावल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
नाविन्यपुर्ण शेतीकडे वाटचालीसाठी चळवळ -
-----------------------------------
**** संस्थेच्या न्यूज व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, अकोला, जळगाव, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
मोबाईल - 07745820077
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
Whatsapp - 9975740444