Tuesday, December 2, 2014

ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे…… - संकलन श्री.दत्ताञय पाटील, अंजनी

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:

ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे……
- संकलन श्री.दत्ताञय पाटील, अंजनी

सध्या कुठल्याही द्राक्ष विभागामध्ये पावसाची शक्‍यता नाही. परंतु शनिवार, रविवारपर्यंत सांगली, सोलापूर आणि पुणे विभागांमध्ये वातावरण ढगाळ होण्याची शक्‍यता आहे. ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे सध्या बऱ्याच विभागांमध्ये सकाळी दव पडत आहे. ते कमी होईल किंवा पडणार नाही. असे झाल्यास डाऊनीचा धोका कमी होईल. सध्या बऱ्याच विभागांमध्ये शेंड्यावरती वाढणाऱ्या पानांवरती डाऊनी दिसत आहे. सध्या अशा प्रकारच्या डाऊनीचा नवीन प्रादुर्भाव होणार नाही. परंतु ढगाळ वातावरणामध्ये जुनी जिवंत असलेली डाऊनी फुलण्याची शक्‍यता आहे. परंतु अशी फुललेली डाऊनी दिसल्यास नियंत्रणासाठी जास्त फवारणीची जरुरी नाही.

1) जर छाटणीनंतर 50 दिवसांपुढे बाग पोचलेली असल्यास अशा बागेमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड 2 ते 3 ग्रॅम अधिक मॅन्कोझेब 2 ग्रॅम मिसळून फवारणी करावी. शक्‍य झाल्यास शेंड्याच्या काही पानांवर वाढलेली डाऊनी काढून टाकावी. 
2) जर फुलोऱ्याच्या जवळपास बाग असल्यास आंतरप्रवाही बुरशीनाशके उदा. डायमिथोमार्फ (50 टक्के) 1 ग्रॅम व मॅन्कोझेब दोन ग्रॅम किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रॉपीनेब संयुक्त बुरशीनाशक 3 ग्रॅम किंवा मॅन्डीप्रोपामीड 0.65 मि.लि. प्रति लिटर अधिक दोन ग्रॅम मॅन्कोझेब, सायमोक्‍झॅनील अधिक मॅन्कोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर मिसळून फवारावे. 
3) फुलोऱ्याच्या जवळपास असलेल्या बागांमध्ये डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी दोन फवारण्यांतील अंतर आता पाच ते सहा दिवसांपर्यंत वाढविल्यास धोका राहणार नाही. 

भुरीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना - 
1) ढगाळ वातावरणामध्ये विशेषतः काड्या व घडांची जास्त गर्दी असलेल्या बागांमध्ये वेगाने भुरी वाढू शकते. अशा बागांमध्ये आता भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी आवश्‍यक आहे. बागा छाटणीनंतर 50 ते 60 दिवसांपर्यंत असल्यास डिनोकॅप 25 मि.लि. प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 
2) फुलोऱ्याच्या जवळपासच्या बागांमध्ये हेक्‍झाकोनॅझोल 5 ईसी 1 मि.लि. प्रति लिटर किंवा फ्ल्यूसिलॅझोल 25 मि.लि. प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ज्या ठिकाणी अगोदरच भुरी वाढलेली असेल, अशा ठिकाणी या बुरशीनाशकांच्या बरोबरीने पोटॅशिअम बायकार्बोनेट 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळून फवारल्यास चांगले नियंत्रण मिळेल. 
3) गर्दी असलेल्या बागांमध्ये आतल्या भागापर्यंत बुरशीनाशकाची फवारणी चांगल्या प्रकारे पोचत नाही, म्हणून प्रथम बागेतील गर्दी झालेली खालची पाने काढून बुरशीनाशकाची फवारणी केल्यास चांगले नियंत्रण मिळेल. 
4) फळधारणा झाल्यानंतर फ्ल्यूसिलॅझोल आणि हेक्‍झाकोनॅझोलची फवारणी शक्‍य नाही. असे केल्यास रेसिड्यूचा धोका वाढेल. छाटणीनंतरच्या 60 दिवसांनंतर डायफेनकोनॅझोल अर्धा मि.लि. प्रति लिटर किंवा टेट्राकोनॅझोल 0.75 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून भुरीच्या नियंत्रणासाठी रेसिड्यूचा धोका न घेता वापरणे शक्‍य आहे
~~~~~
संस्थेचे निर्णय, दिशा, धोरणे, शेतीविषयक बातम्या तुमच्या स्मार्ट मोबाईलवर हवे असल्यास तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, जिल्हा ही माहिती ९९७५७४०४४४ या नंबरवर पाठवा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Monday, December 1, 2014

आपल्या गावात दुर्देवानी शेतकर्यांचा अपघाती मृत्यु झाला तर ....

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
शेतकरी बाधंवाना महत्वाची सुचना....
संकलन - मनोज ओ. लोखंडे, कृषि विभाग, वसमत

आपल्या गावात दुर्देवानी शेतकर्यांचा अपघाती मृत्यु झाला तर महाराष्ट्र शासन, कृषि विभाग मार्फत '' शेतकरी अपघात विमा योजना अंर्तगत 100000/- ची मदत केली जाते. त्यासाठी लागणारी कागदपत्राचा तपशील

1. 7/12
2.होंल्डीग
3.गावनमुना 6-ड
4.गावनमुना 6-क
5.तलाठी प्रमाणपत्र (गोल शिक्का)
6.वयाचा पुरावा
7.FIR
8.मृत्यु /अपंगत्वाचा दाखला
9.घटना स्थळाचा पंचनामा (पोलीस सांक्षाकीत)
10.मरणोत्तर पंचनामा (पोलीस सांक्षाकीत) 11.पोस्टमार्टम पंचनामा
12.ड्रायव्हिग लायसन्स (मोटारसायकल अपघात)
13.MSEB report (विजेचा शॉक लागुन)
14.पासबुक झेराक्स (क्लेम धारक)
15.रहिवाशी प्रमाणपत्र

अधिक माहीतीसाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा

कृपया विनंती जवळील शेतकरी बाधंवाना ही माहीती सागंणे.
~~~~~
संस्थेचे निर्णय, दिशा, धोरणे, शेतीविषयक बातम्या तुमच्या स्मार्ट मोबाईलवर हवे असल्यास तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, जिल्हा ही माहिती ९९७५७४०४४४ या नंबरवर पाठवा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Saturday, November 29, 2014

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 1012 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
संकलन - मिलींद पोळ, वार्ताहर

डॉ. रामचंद्र साबळे
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 1012 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मध्य प्रदेशावर 1014, राजस्थान सीमेवर 1016 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. त्यामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतात थंड वारे वाहतील. वाऱ्याचा वेगही साधारणपणे 10 किलोमीटर राहील. कमाल तापमानात फरक दिसेल. कोकणात 25 ते 32 अंश सेल्सिअस,
उत्तर महाराष्ट्रात 29 ते 32 अंश सेल्सिअस,
मराठवाड्यात 24 ते 27 अंश सेल्सिअस,
विदर्भात 25 ते 30 अंश सेल्सिअस;
पश्चिम महाराष्ट्रात 23 ते 26 अंश सेल्सिअस राहील.

संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहील. त्यानुसार रात्रीचे तापमान घटेल.
अरबी समुद्राचे आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 300 ते 301 केलव्हिन्स इतके राहील. हिंदी महासागरावर ढगांचा समूह जमलेला असून, त्या ढगांचे तापमान उणे 40 अंश सेल्सिअस राहील. हवेच्या दाबात फरक
होत असल्याने मोठ्या प्रमणात ढग दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्रावरही दिसून येतील. प्रामुख्याने डिसेंबरच्या 1 ते 3 तारखेच्या दरम्यान अशी स्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रावरही ढग जमतील आणि मेघ गर्जनेसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत पावसाची शक्य

उत्तर महाराष्ट्र -
उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत राहील. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात 17 अंश, तर धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत 19 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 47 ते 58 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 19 ते 22 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 7 ते 10 किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Thursday, November 27, 2014

अध्यक्ष महेश बोरगे यांच्या महाराष्ट्र दौर्याचा अहवाल

माझीशेती अध्यक्ष महेश बोरगे यांच्या महाराष्ट्र दौर्याचा अहवाल:

ठळक नोंद घेणे योग्य -
१. सर्व शेतकरी बंधुना संस्थेच्या वाटचालीवर विश्वास आहे.
२. कोणत्याही राजकीय विचाराने प्रेरित नसलेली, प्रशासनाच्या सहाय्याने शेतकरी सेवेसाठी वाहुन घेतलेली संस्था पाहुन आश्चर्य वाटले.
३. समाजातील सर्व भेदाभेद बाजुला ठेवुन सर्व शेतकरी समान मानले जातात, हे सर्वांना आवडले.
४. कोणताही स्वार्थ न ठेवता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन जुडलेले शेतकरी पाहुन सर्वांचे मन भरुन आले.
५. महेश बोरगे आणि भेटलेले शेतकरी व प्रतिनीधी यांच्यातील चर्चा व त्यातुन होणारे भविष्यातील वाटचाल यांमुळे सर्वच शेतकर्यांचे भविष्य उज्वल होईल, असे सर्वांना वाटते.
६. सर्वसमावेशक धोरण व निर्णयप्रक्रिया पाहुन सर्व पदाधिकार्यांनी सहकार्य व पाठींब्यावर मर्यादीत न राहता सक्रीय राहण्याचे आश्वासन दिले.
७. भविष्यातील २ ते ३ वर्षांचे नियोजन सांगितले. आतापर्यंत संस्थास्तरावर केलेले कामांची माहिती दिली.
८. नियोजीत शेतकरी विकासाची दिशा कशी असेल, कोणत्या ठिकाणी काय रोख ठेवायचा याबाबत चर्चा झाली.
९. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी देखील शेतकर्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्थेस सर्व स्तरावरुन मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. १०. एकंदरीत चर्चा केली असता समजले की शेतकर्यांमध्ये संस्थेबद्दल प्रेम आणि आस्था आहे. प्रेम, त्याग आणि आस्था असलेशिवाय कोणतेही कार्य तडीस जात नाही.

सर्व विभागातील शेतकर्यांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या कळवळ्या त्याबद्द्ल संस्थेच्यावतीने मी आपला आभारी आहे.

”शेतकरी आत्महत्येवर” चर्चा केली असता असे कळाले की
१. आत्महत्या केलेले शेतकरी अगोदर खुप निराश होते.
२. आत्महत्येपुर्वी काही काळ (३ ते ४ महिणे) ते खुपच एकलकोंडे झालेले होते.
३. यांना माहितीची कमतरता दिसुन आली.
४. नैसर्गीक आपत्तीपासुन सावरता येत नसल्याने हळुहळु खचत होते.
५. सावकारी कर्ज वाढले होते व संबंधीत सावकर पैश्याचे जोरावर माणसिक ञास देत होते.
६. काही जणांचे तर कौटुंबिक स्तरावरील वाद टोकावर गेलेले जे कोणाशी व्यक्त करता येत नव्हते.
७. ज्यांच्याकडे मदत मागितली त्यांनी वेळीच मदत न करता मजाक उडवला.
८. राजकीय पार्श्वभुमी समाजाला विघातक वळणावर घेवुन जात आहे.
९. शासकीय अधिकारी जाणुनभुजून ठराविक लोकांनाच मदत करतात.

या सर्व प्रवासादरम्यान केलेल्या निरीक्षणावरुन असे वाटते की -

१. शेतकर्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेणेपुर्वी किमान एकदा आम्हास लिखीत स्वरुपात कळवावे.
२. बदललेली नैसर्गीक अवस्था पाहता विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली पिक पद्धतीत बदल करावेत.
३. संस्थेचे पदाधिकारी आपल्या आसपास असतात, त्यांचा सल्ला घ्या किंवा आम्हास कळवा. गोपनियता पाळणे हे आमचे परम कर्तव्य आहे.
४. शेतकर्यांना मानधन, पेन्शन, विमा, मेडिकल, मुलांचे शिक्षण, शिष्यवृत्ती व तत्सम सुविधा चालु करणेबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे. याबाबत प्रस्ताव करणे चालु आहे.
५. संघटना मजबुत करणेसाठी जिल्हा, तालुका व गावनिहाय रचना करणे.

आपला विनीत,
महेश बोरगे, सांगली (सावळज)
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

बहुचर्चित उस उत्पादक शेतकरी श्री. दत्ताञय पाटील, अंजनी यांच्या ऊस क्षेञास माझीशेतीची सदिच्छा भेट

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान (२७.११.२०१४):

बहुचर्चित उस उत्पादक शेतकरी श्री. दत्ताञय पाटील, अंजनी यांच्या ऊस क्षेञास माझीशेतीची सदिच्छा भेट

मागील बरेच दिवसांपासुन चर्चेत असणार्या श्री. दत्ताञय पाटील यांच्या ऊस क्षेञास भेट देण्याचा योग आज आला. मागील आठवड्यातील संस्थेच्या ‘महाराष्ट्र दौर्याचे’ वेळी २ ते ३ ठिकाणी संबंधीत ऊस आणि बियाण्यांबद्दल चर्चा झाली. त्यामुळे आम्ही भेटीचे नियोजन केले होते.
    श्री. दत्ताञय पाटील यांनी शेतकर्यांना एकाच ठिकाणी सर्व उत्तम प्रतीच्या बियाण्यांची उपलब्धता केलेली आहे. त्यामध्ये सिध्दगीरी १२३४,
नीरा-८६०३२,
कोईमतुर-०३१०२,
कोईमतुर -९८०५,
आधार
अश्या निरोगी ऊस बियाण्यांचे उत्पादन व संगोपन सुरु केले आहे. माझीशेती शिष्टमंडळातील सदस्य अंजनी, ता.तासगांव (सांगली) येथे पोहचुन ऊस पाहेपर्यंत बरेच शिष्टमंडळातील सदस्य नकारार्थी होते कारण मुळात अंजनी, ता.तासगांव (सांगली) हे ठिकाण ‘सेमी क्रिटीकल’ झोनमध्ये येत असल्यामुळे या दुष्काळी भागात उत्पादित केलेला ऊस कसा असेल या विषयावर आमची चर्चा चालुच होती पण वास्तवात जेंव्हा ऊस क्षेञ पाहिले तेंव्हा सदरच्या ऊस बियाण्यांचे उत्पादन व संगोपन चांगल्या पद्धतीने केले गेले आहे हे जाणवले... 
     आम्हास जाणविले
* ऊस पडलेला नव्हता.
* उंची सरासरी सुमारे १५ फुटांपर्यंत होती.
* सरळ व सशक्त वाढ झालेली दिसली.
* पानांवर कुस नव्हती.
* फुटवे १३ ते १४ होते.
* तुरा दिसुन आला नाही.
* व्यवस्थापन संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केले आहे.
* ऊसाचे साधारण वजन ४ ते ५ किलो आहे.
      श्री. दत्ताञय पाटील, अंजनी, ता.तासगांव (सांगली) यांनी सुरु केलेली शेतकरी सेवा ही वाखाणन्याजोगी आहे. त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले की ऊसाची उंची जास्त असली तरी ऊस सशक्त असल्यामुळे पडत नाही, विक्रमी उंची व वजन, सरळ व जोमदार वाढ, पानावर कुस नाही, त्यामुळे जनावरांच्या चार्रयासाठी उपयुक्त,शतप्रतिशत जर्रमिनेशन, गुळासाठी उत्तम, फुटवे १० ते १५, लवकर तुरा(झेंडा) येत नाही, यापैकी काही पाण्याचा ताण सहण करणार्या नविन जाती, १००% संपूर्ण शेंद्रिय व्यवस्थापन, १२ ते १३ महीन्यात पाणी लांबवीले की रिकवरी १२/१४ लागते, पुर्ण वाढलेला एक ऊस ४ ते ४.५ किलो भरतो. यातील काही जाती आपल्या भागात नवीन असलेने रोपवाटीकावाले जादा दर आकारून शेतकर्यांना लुबाडत आहेत.
      या ऊसाच्या संगोपनाबद्दल सांगताना श्री.दत्ताञय पाटील म्हणाले, शेतीला उन्हाळ्यात पाणी कमी असलेने कोणत्याही रासायनीक खताचा वापर न करता पूर्ण पणे शेंद्रीय नियोजन केले असून पाणी कमतरतेमुळे 26 जानेवारीला लागवड केलेला ऊस 26 जुनला मोठी बांधनी केलेचे सांगीतले. परंतू ,"ऊसाची लागण ही 5 बाय 2.5 फुटावर दोन कांडी (डोळे) आणि दीड महीण्यात बाळबांधणी व साडे तीन महीण्यात मोठी बांधनी व्हायलाच हवी आणि ऊस हे जास्त कालावधीचे पीक असलेने खतांचा वापर एकवेळच भरमसाठ न करता तीन वेळेस विभागून केलेस व त्याबरोबरच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावयास हवा," असे नमुद केले.

~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेबसाईट - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Tuesday, June 18, 2013

सिंचन विहिर योजना व विहीर पुनर्भरण

लाभार्थ्याचे निकष
आजपर्यंत सिंचन विहीरीचा कधीच लाभ न घेतलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असून एका विहिरीकरिता जास्तीतजास्त अडीच लाखांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यास प्राप्त होवू शकते. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सिंचन विहीर पूर्ण झाल्यावर विद्युत कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीद्वारे प्रथम प्राधान्यतेने वीज जोडणी देण्यात येत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पूर्वी पंचायत समित्यांच्यामार्फत जवाहर व नरेगा योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरी उपलब्ध होत होत्या. मात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील प्रवर्गात लाभार्थ्यांनाच त्या विहिरींचा लाभ मिळत होता. राज्य शासनाने निर्णयात दुरुस्ती करुन समाजातील सर्व प्रवर्गासाठी ही योजना खुली करुन ज्या शेतकऱ्यांकडे दीड एकर शेती आहे व ज्या शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेतला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरी उपलब्ध करुन देण्याचे धोरण स्विकारले आहे. लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरुन पंचायत समित्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना सिंचन विहीर उपलब्ध करुन देण्यासाठी विचार केला जातो.

सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या नावावर कमीत-कमी 0.60 हेक्टर जमीन असावी लागते. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक असावी लागते. यासंदर्भात शाखा अभियंता, उपअभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकारी/कर्मचारी जागेची पाहणी करतात. त्याचा अहवाल घेतला जातो, यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबतच विहीर या घटकांच्या शासकीय योजनामधून लाभ घेतलेला नसावा, अशी अट आहे. दोन अथवा तीन लाभार्थ्यांनी त्यांची जमीन सलग/सामुदायिक असल्याने विहिरींची मागणी केली तर सामुदायिकरित्या विहीर मिळण्यास ते पात्र असतील. यासंदर्भात पाण्याचा वापर व पाण्याची हिस्सेवार याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी स्टँपपेपरवर करार करावा. ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालली आहे त्यांचे वारसदार, दारिद्र्यरेषेखालील (बी. पी. एल.) शेतकरी व इतर लाभार्थ्यांना प्राधान्याने याचा लाभ देण्यात येतो.

लाभार्थ्याची जबाबदारी
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी निश्चित केलेल्या जागेवर विहीर होणे बंधनकारक असते. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून लाभार्थ्यांनी 30 दिवसात विहिरींचे काम सुरु करावे व पुढील सहा महिन्यात काम पूर्ण करावे. लाभार्थ्यांने स्वत:चा राष्ट्रीयकृत बँक / इतर बँकेमधील खाते क्रमांक संबंधित गट विकास अधिकाऱ्यास जिल्हा परिषद यांच्याकडे पासबुकाच्या झेरॉक्ससह सादर करावा. विहीरीचे बांधकाम लाभार्थ्याने स्वत: मजुराद्वारे, अन्य पर्यायी साधनांच्या (जेसीबी /पोकलेन सारख्या मशिनच्या सहाय्याने ) काम करण्याची या योजनेत लाभार्थ्यांना मुभा आहे. ही योजना पूर्णत्त्वास गेल्यानंतर सिंचनाची खात्रीशीर सोय उपलब्ध होत असून पावसाच्या पाण्याचा चांगला उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडत आहे. यामुळे धडक सिंचन विहिरींमुळे वर्षभर पाण्याची उपलब्धता राहून उत्पादन वाढीचे उद्दिष्ट लवकर आणि तुलनेने अल्प गुंतवणुकीतून साध्य होत आहे.

विहीर पुनर्भरणाची प्रक्रिया
विहीर पुनर्भरणासाठी विहिरीपासून काही अंतरावर आठ फूट लांब, सहा फूट रुंद व सहा फूट खोलीचा खड्डा खणावा. या खड्ड्याच्या उताराकडे विहिरीच्या दिशेस सुमारे दहा फूट अंतरावर दुसरा एक चार फूट लांब, चार फूट रुंद व सहा फूट खोल आकारमानाचा खड्डा खणावा आणि या खड्ड्यामध्ये दगड, खडी, वाळू व कोळसा यांचे थर भरावेत. पहिला व दुसरा खड्डा एक चर खोदून एकमेकांस जोडावेत. दुसऱ्या खड्ड्याच्या तळापासून 15 सें.मी. उंचीवरून एक पाइप विहिरीत सोडावा. खड्ड्याच्या आतल्या बाजूला कचरा विहिरीत जाऊ नये म्हणून या पाइपास जाळी बसवावी. उतारामुळे वाहत येणारे पाणी पहिल्या खड्ड्यात येऊन साठते. पाण्याबरोबर काही प्रमाणात गाळही येतो व तो खड्ड्यात खाली बसतो.

या खड्ड्यात पाणी भरल्यानंतर ते पाणी दुसऱ्या खड्ड्यात येते. हा दुसरा खड्डा शोषखड्ड्याच्या तत्त्वानुसार तयार केलेला असल्याने, त्यात येणारे पाणी पाइपद्वारे गाळून विहिरीत पडते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणारे पाणी विहिरीत आल्याने विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते; तसेच भूगर्भात पाणीसाठा वाढविण्यासही मदत होते.

विहीर पुनर्भरणासाठी कोणती विहीर निवडावी?
  • ज्या विहिरीला रब्बी हंगामाच्या शेवटी पाणी कमी पडते.
  • विहिरीचे बांधकाम सिमेंटमध्ये अथवा पक्‍क्‍या दगडांत झालेले असावे.
  • विहिरीचे ठिकाण हे साठणाऱ्या पाण्यापासून 50 मीटरच्या आसपास असावे.
  • विहिरीच्या भोवतालची जागा चिबड किंवा पाणथळ होणारी नसावी.
  • सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विहिरीची निवड करू नये.
  • भुरकट व गडद पाणलोट क्षेत्रातील विहिरी पुनर्भरणासाठी उत्तम ठरतात, त्यातील जलस्तर साठवणुकीसाठी योग्य असतात.

Monday, April 8, 2013

MaziSheti Karip Visheshank 2013

MaziSheti Kharip Visheshank 2013

This Magazine contents lots of information in agriculture sector. this is a mile stone for Farmers. this magazine includes that subjects which are directly effects on farms. as per our knowledge this is a complete information resources for farmers.
This magazine covers following subjects-
1. Agriculture crop advisory
2. Vegetables
3. Fruits
4. Biotechnology
5. Weather forecast for kharip season 2013
6. Gaurav Maticha - salute to those farmers who innovate agriculture with his efforts
7. Care at field - what to do & what don't
8. Veterinary Guidance
9. Rural Gossips - what is the real facts behind indian culture, occasions
10. Cartoons
11. Recipe - rural recipe

all the above subjects covered in single magazine "MAZISHETI KHARIP VISHESHANK 2013" & the price Rs. 90/- is the negligible for the magazine as compared to information covered.

you can buy it directly from us on 25% discounted price. for more details contact us at 9975740444 or 9665223385

Thursday, July 12, 2012

स्त्री.... काल, आज आणि उद्या

स्त्री
काल, आज आणि उद्या



            मी स्त्री आहे हे वास्तव जगाने स्वीकारायला हवे. साहजिकच एक स्त्री म्हणुन मी सुंदर असणे स्वाभाविक आहे परंतु सुंदर असण्यापेक्षा मला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी मला अधिक गरम किंवा मादक असायलाच हवे आणि हा मला लोकशाहीने दिलेल्या मुलभूत हक्कापैकी एक हक्क आहे.’ हो, काय चुकीच आहे, एकेकाळी सांगलीच्या (नागठाणेच्या) बाळगंधर्वांनी स्वतः स्त्रीचा अभिनय करून स्त्रीला माणसात आणले. आणखी थोडस पाठीमागे गेलो आणि काळाचा पडदा किलकिला करून पाहिलं तर सदासर्वदा इतकंच जाणलं की स्त्रीला परमपुज्य रामांनी देखील एक मर्यादेतच ठेवले होते. कारण काहीही असो पण स्त्री आणि मर्यादा हे एक समीकरणच होते. परंतु एकदमच पाठीमागे भुतकाळात ज्यावेळी समाज किंवा कोणतीही रुढी – परंपरा नव्हती तेंव्हा कोणालाही कसल्याही मर्यादा नव्हत्या हेही ध्यानांत घ्यायला हवं.
                ज्यावेळी समाज वेगवेगळ्याप्रकारे वेगवेगळ्या थरात स्वतःला आकार देत गेला त्यावेळी प्रत्येक घरातील आजी, आई, बायको, बहिण, मुलगी या वेगवेगळ्या रुपात स्त्री ही त्या संस्कारित घराची लक्ष्मी म्हणुन उदयाला येत गेली. पण समाज रचनेच्या अगोदर मानव प्राणी कसा होता. मी मुद्दाम प्राणी असा उल्लेख केला कारण त्यावेळची परिस्थिती अगदी तशीच होती जशी आजच्या घडीला जंगलामध्ये जनावरांचे कळप राहतात. प्रत्येक नराला त्याच्या कुवतीनुसार कळपाचे नेतृत्व मिळायचे, मग त्या नराने कळपातील प्रत्येक सदस्याचे संरक्षण करायचे, कळपाला योग्य दिशा दयायची, चारा-पाण्याचा प्रश्न सोडवायचा, प्रजननक्षम माद्यांमार्फत कळपाची संख्या वाढवायची यांसारखी प्रामुख्याने कळपाच्या नराची कामे असत. काही काळ गेल्यानंतर पुन्हा स्वयंवर. नवीन तयार झालेल्या नरांबरोबर स्पर्धा आणि जिंकलेल्या नराला कळपाचे प्रतिनिधीत्व. हे असे चक्र होते.
म्हणजेच तत्कालीन स्त्रीचा विचार केल्यास शून्य असेच चित्र पहावयाला मिळेल. काळ बदलत गेला तसा मानव प्राणी समाजप्रिय होत गेला. मानव प्राण्यामध्ये लज्जेची जान आली आणि रूप पालटले मानव प्राण्यामधुन मनुष्य जन्माला आला. समाज आकार घेऊ लागला. मनुष्य वस्ती करु लागला. मनुष्याने कमरेभोवती झाडाचा पाला लपेटुन घेतला. छातीवरही झाडपाला आला. पुढे मनुष्याला वाणी मिळाली. मनुष्य संवाद करू लागला. आणि आणि मनुष्याच्या आयुष्यात प्रगती आली. तिने सर्व चित्रच बदलुन टाकले. बाळगंधर्वांच्या चित्रपट सृष्टीला आताच्या पिढीतल्या बिबत्स नायिका गालबोट लावुन थांबल्या नाहीत तर अधिक उन्मत्त आणि मादक दिसण्यासाठीच या ललनांचा जन्म झालाय हे सांगायलाही ह्या तरुण पिढीच्या नायिका विसरल्या नाहीत. जेंव्हा अजुन कापडाचा शोध लागलेला नव्हता तेंव्हापासुन स्त्रीचा युगानुयुगे चाललेला प्रवास कोणी विसरले नाही आणि विसरनारही नाही असाच आहे.
पूर्वीचा सती सावित्रीचा काळ मधला झाशीची राणी लक्ष्मीबाईचा काळ आणि आजचा पुनम पांडेचा काळ !!!! कुठे चाललाय हा समाज... आज प्रत्येकजण स्त्री मुक्तीचा पाढा वाचतोय,,, पण स्त्रीला कोणापासून मुक्ती दयायची.... स्त्री मुक्तीच्या भोवऱ्यात सापडून आजची स्त्री स्वतःच्या मीला विसरू लागलीय. स्त्रीला पाहून मान झुकविणारा समाजातील वर्ग हा याच स्त्रीच्या वर्तनामुळे स्त्रीला अंगाखाली पाहू लागला आहे. कोण जबाबदार आहे या परिस्थितीला??? स्त्रींयांवर झालेला हा वैचारिक अत्याचार हा शारीरिक अत्याचारापेक्षा कितीतरी पटीने अधिक भयानक आहे. चंगळवादी आणि अश्लीलपणामुळे तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुली नागड्या देहाचे प्रदर्शन करताना पाहून आदराने झुकणाऱ्या माना शरमेने झुकू लागल्या आहेत. स्त्रीचे शील, तिचे सौंदर्य याचा आज मितीला बाजार भरला आहे.

काय होती स्त्री?? या स्त्री वादाकडे निरखुन पाहिल्यास समजुन येईल की प्राणी म्हणुन झाडाझुडपांच्या जंगलात विवस्त्र वावरणाऱ्या स्त्रीने घोशा पहिला, बुरखा पहिला आता या जीवनाचा कंटाळा आलेमुळे स्त्री पुन्हा जंगलाकडे वळण्याच्या प्रयत्नात आहे. स्त्रीचा प्रवासही अगदी तसाच आहे विवस्त्र असणारी स्त्रीने लज्जा रक्षणासाठी झाडापाल्याचा आधार घेतला नंतर जसजशी प्रगती माणसाबरोबर आली तसतशी स्त्रीने भारतीय पोशाख नऊवारी साडी पाहिली आणि आता वर एक आणि खाली एक अशी दोन फडक्यांच्या सहाय्याने लज्जा रक्षणाचा आव आणला जात आहे. आजच्या स्त्रीच्या या वागण्यामुळे स्त्री भोगाची वस्तु म्हणुन वापरली जात आहे.

Saturday, June 2, 2012

स्वातंत्र्य आले रे आले ......

             तस पाहिले तर फक्त शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे, असे नाही. शेतकऱ्यांना लुबाडणारे व्यापारी, दुकानदार, कंपन्या, शाळेतील मुले, आजी-आजोबा, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हे तर वाट बघतातच... पण फरक एवढाच आहे कि, शेतकरी मायबाप डोळ्यात पाणी आणून वाट बघतात तर बाकीचे इतर लोक डोळ्यात पाणी आणायला लावुन वाट बघायला लावतात. त्यांचे आणि पावसाचे काही देणेघेणे नाही विशेषतः पांढरे बोके मलई तोंडात घालत - घालत पावसाचे भांडवल करतात. मी स्वतः दुष्काळी पट्टयात राहणारा आहे, त्यामुळे पांढरे बोके वावरताना मी पाहिलेले आहे. किती मलई खायची, कुठे खायची, कधी खायची याचा काही नेम नाही. तुम्ही सर्वांनी ती जुनी दोन मांजरांची / बोक्यांची गोष्ट वाचली किंवा ऐकली असेलच. त्यावेळी शिक्षणाची म्हणावी अशी प्रगती नव्हती आणि जसा काळ बदलला तसे बोक्यांच्यात पण Generation Gap आलाच कि हो... तर आताचे बोके थोडे अडवान्स पद्धतीचे आहेत. आता तुम्ही म्हणाल ते कसे काय ?? बघा, भारत स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊन गेली तेंव्हापासून आजअखेर नाही... नाही... मुघलांच्यावेळी त्रास झाला म्हणुन छत्रपती शिवाजीराजे यांनी बंड केले आणि स्वराज्य स्थापन केले तेंव्हा माझे पूर्वज खुशीत होते राव... मी वाचले होते आणि आमचे आबासाहेब देखील सांगत होते, त्यांचे पूर्वज खुशीत होते. त्यानंतर ब्रिटीश आले आणि आमच्या शेतकरी बांधवांसह, स्थानिक व्यापारी, संस्थानिक, उच्चवर्गीय सारेच ब्रिटिशांच्या ग्रहणात अडकले असे म्हणतात.

          यावेळी सर्वांना लढायीचा अनुभव आलेला होता. आणि साक्षात छत्रपती शिवाजीराजे यांनीच गनिमीकावा शिकविला होता. हां शिकवला होतो पण काळाच्या ओघात 'गनिमीकावा' जिंकण्यासाठी वापरायचा असतो  हेच तेवढे लक्षात राहिले पण केंव्हा, कुठे, कसा आणि महत्वाचे म्हणजे कोणाविरोधात वापरायचा हे मात्र सर्वजण विसरलो. या सर्वांच्यामध्ये माझे भोळेभाबडे शेतकरी बांधव एकच शिकले, 'माझ्या राजाच राज्य हाय, राजा माझा हाय.. माझ्यावर संकट येऊ देणार नाय... माझी पोर-बाळ सुखानं खाणार.... तेंव्हा अश्या कितीतरी आशा एकट्या महाराजान पुऱ्या केल्या होत्या ....

          अगदी तेंव्हापासुन शेतकरी राजा विसरुनच गेला आहे. राजे गेले,, गोरे साहेब आले पण या बापड्यांना काही काळ जाणविलेच नाही, माझ्या महाराजाची सत्ता गेली आहे. (त्यावेळी प्रामाणिक नेते होते आणि आताही आहेत यात वादच नाही, पण कोणाशी प्रामाणिक रहायचे याचे त्यांना भानच राहिले नाही एवढाच फरक आहे) या नेत्यांनी नंतर ओळखले होते; जसे छत्रपती शिवाजीराजेनी बारा मावळातील मावळ्यांच्या मदतीने मोघलांची सत्ता घालवुन स्वराज्याची स्थापना केली आणि त्या आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा शेतकरी आणि कामगारांना जागे केले  पाहिजे तर आणि तरचं स्वातंत्र्य मिळणार आहे आणि हो हो हे घडलही अगदी असेच जवळपास दीडशे वर्षांची सत्ता घालवली फक्त आणि फक्त या शेतकरी आणि कामगारांच्या जीवावर ... हो हो अगदी खरंय हे. 
   
          जोपर्यंत शेतकरी आणि कामगार जागे होत नाहीत तोपर्यंत ब्रिटीशच काय पण एखादयाने काळा दगड जरी आणून ठेवला आणि सांगितलं कि हा तुमचा राजा तर भारतीय मान्य करतील. हो, इतकी साधी, सरळ आणि भोळी आहेत माझी माणस. पण कुणीतरी जाग करायची वाट बघत्यात...




पण लक्षात ठेवा, इतिहास आजही ठाम आहे, पुनरावृत्ती होऊ देवू नका. कोणी शिवाजी येणार नाही की महात्मा येणार नाही. शिवाय आजकाल एक म्हण प्रचलित आहे, "शिवाजी जन्माला येऊ दे, पण तो शेजारच्या घरात" ती खरी अथवा वास्तवात उतरू देवू नका. शिवाजीराजे जन्माला येऊ द्या पण एकाच ठिकाणी नको,,,,,, प्रत्येकाच्या घरात जन्माला येऊ द्या. प्रत्येक स्त्रीने जिजामाता बनण्याची गरज आहे आणि प्रत्येक पुरुषाने "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।" रु शिवधोरणाचा स्वीकार करून मार्गक्रमण केले पाहिजे. क्रांतीने होरपळलेल्या जनतेला सुराज्य पाहिजे. स्वातंत्र्य मिळुन अजुन एक पिढीही गेली नाही तोपर्यंत पुन्हा क्रांतीची वाट पाहू नये....

- B. Mahesh, INDIA

Thursday, May 17, 2012

मुग व उडीद लागणीपासुन काढणी पर्यंत सर्व माहिती


मुग व उडीद लागणीपासुन काढणी पर्यंत सर्व माहिती
(शेतकऱ्यांनी या माहितीचा उपयोग संदर्भाकरिता करावा, प्रत्यक्षात वस्तुस्थितीनुसार स्वतःच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करावी)

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मुग व उडीद ही महत्त्वाची पिके आहेत. दुबार तसेच एकत्र पिकासाठी ही महत्त्वाची पिके आहेत.
जमीन – या कडधान्यासाठी मध्यम ते भारी चांगली निचरा होणारी जमीन लागते.
पूर्वमशागत – उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन चांगली नांगरणी करून घ्यावी. जमीन चांगली तापल्यावर पावसाळा सुरु झाल्यावर कुळवून घ्यावी. याच बरोबर हेक्टरी ५ पाच टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.
बियाणे –
सुधारित वाण –
मुग >> वैभव, BMR 145 विशेषता – रोगप्रतिकारक व अधिक उत्पन्न देणारे वाण.
उडीद >> TPU-4, TAU-01 विशेषता – पक्वतेचा काळ २ ते २.५ महिने
पेरणीची वेळ – मान्सूनचा पहिला पाऊस झालेनंतर जुनच्या २रया आठवड्यापासुन जुनअखेर पेरणी करावी. पेरणीस होणारा वेळ उत्पादनात घट होते.
बीजप्रक्रिया – पेरणीपुर्वी ०१ किलो बियाण्यास ५ ग्राम ट्रायकोडर्मा + २५ ग्राम रायझोबियम + २५ ग्राम PSB ही जीवाणूची पावडर गुळाच्या पाण्यात मिसळुन लावावी. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळाच्या गाठी वाढून नत्राचे प्रमाण वाढते. PSBमुळे जमीनीतील स्फुरद्युक्त होऊन विकास होतो.
पेरणी – पेरणीसाठी दोन ओळीमधील अंतर ३० सेमी आणि दोन रोपांमधील अंतर १० सेमी असावे. या पिकांमध्ये तुरीचे पिक घ्यावयाचे झालेस २ ते ४ ओळीनंतर १ ओळ तुरीची पेरणी करावी.
खतमात्रा – या दोन्ही कडधान्यांना हेक्टरी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद द्यावे लागते.
आंतरमशागत – ही कडधान्ये ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावी. यासाठी दोन वेळा कोळपणी आणि एक वेळ खुरपणी करून घ्यावी.
पाणी व्यवस्थापन – कोरडवाहु पिके असल्यामुळे शक्यतो पाणी लागत नाही परंतु फुलोरा आणि शेंगा भरावयाच्या वेळी पाऊस नसेल आणि ओलाव्याची कमतरता भासल्यास हलके पाणी द्या.
कीड नियंत्रण –
मुग – रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव – मोनोक्रोटोफॉस ५५० पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे.
भुरी, पिवळा विषाणू – नियंत्रणासाठी पानात मिसळणारे गंधक १२५० ग्राम किंवा कार्बेन्डॅझिम २५० ग्राम + ३०% प्रवाही मोनोक्रोटोफॉस ५५० पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे. गरज भासल्यास ८ ते १० दिवसांनी दुबार फवारणी घ्या.
उडीद – केसाल आळी – नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेली रोपे उपटुन सर्व आळ्या नष्ट करा.
भुरी, पिवळा विषाणू – नियंत्रणासाठी पानात मिसळणारे गंधक १२५० ग्राम किंवा कार्बेन्डॅझिम २५० ग्राम + ३०% प्रवाही मोनोक्रोटोफॉस ५५० पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे. गरज भासल्यास ८ ते १० दिवसांनी दुबार फवारणी घ्या.
साठवण – साठवणीपुर्वी मुग व उडीद धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून कडुनिंबाची पाने मिसळुन पोत्यात किंवा टाकीत साठवावे.
सरासरी उत्पादन – मुग – १२ ते १५ क्विंटल  उडीद – १० ते १२ क्विंटल