Sunday, October 30, 2016

तुमचा लॅपटॉप / डेस्कटॉप आम्हाला द्याल का?? - महेश बोरगे

तुमच्या किंवा तुमच्याशी संबंधित असलेल्या मित्र-मैत्रिणीं, सहकारी, कुटुंबे, नातेवाईकांमध्ये सुस्थितीत असलेले लॅपटॉप / डेस्कटॉप आम्हाला द्याल का??? 



आधुनिक शेती किंवा नाविन्यपुर्ण व्यावसायिक शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे क्रमप्राप्त आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आजही संगणक वापरताना मागे हटतो परिणामी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आणि सहकार्यापासुन शेतकरी दुर राहतात. माझीशेतीच्या प्रशिक्षण विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणातून असे पुढे आले आहे. यामध्ये प्रामुख्याने संगणक वापरता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संगणक प्रणाली घेणे टाळतो. माझीशेतीकडून याविषयावर सविस्तर चर्चा करून व्यावसायिक शेती अभ्यासक्रम सुरू करणेत आला आहे. परंतु शेतकऱ्यांची उत्पादकता कमी असल्यामुळे शेतकरी संगणक घेणे आवश्यक बाब समजत नाही. यामुळेच माझीशेतीकडून व्यावसायिक शेतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना लॅपटॉप / डेस्कटॉप देण्याचे ठरविले आहे. 

आपण दिपावलीच्या मंगल प्रसंगी लॅपटॉप, डेस्कटॉप, आधुनिक मोबाईल खरेदी करतो, तुम्हीही केला असेलच. अश्यावेळी जुना लॅपटॉप / डेस्कटॉप घरी पडून असेल तर तो कृपया आम्हाला द्या. डिजिटल इंडिया मध्ये 1% शेतकरी डिजिटल आहेत मात्र 99% अजूनही प्रतीक्षेत आहेत. तुमचा पुढे केलेला एक हात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जाणार आहे. 

आपणाकडून मिळालेले लॅपटॉप / डेस्कटॉप ग्रामीण भागातील गरजू शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना गरजेचे आणि अतिशय महत्त्वाची संसाधने मिळवण्यासाठी आपण दिलेल्या डोनेशनचा उपयोग केला जातो. दैनंदिन जीवनातील शेतीच्या कामकाजासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून घ्यावयाच्या माहितीसाठी आणि मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी वापर करायला देण्यात येणार आहेत. 

माझीशेतीचा दस्तऐवजामध्ये / डेड स्टॉकमध्ये तुमच्या दिलेल्या योगदानाचा समावेश केला जाईल व योग्य तपासणी करून गरजू शेतकरी गटांना प्रति गट एक याप्रमाणे संगणक देण्यात येईल. यामुळे झालेल्या अमुलाग्र बदलाचा मासिक अहवाल सर्वत्र प्रकाशित केला जाईल. 

Call us - 9975740444
Write us - mazishetifoundation@gmail.com
Know us - mazisheti.org
Like us - fb.com/agriindia
Twit abt us - @mazisheti
Link with us - LinkedIn.com/in/mazisheti

Tuesday, October 25, 2016

शेततळ्यासाठी साडेपाच लाखांपर्यंत अनुदान...

शेततळ्यासाठी साडेपाच लाखांपर्यंत अनुदान
दोन हजार शेततळ्यांना मिळणार लाभ 

पुणे - पाणीटंचाईच्या काळात शेततळ्यांतील पाण्याचा योग्य वापर करून फळबागा जगविण्यासाठी शेतकरी त्यांचा आधार घेत आहेत. शेततळ्याच्या आकारमानानुसार व योजनेनुसार जास्तीत जास्त साडेपाच लाखांपर्यंतचे अनुदान मिळेल.

वाढत्या पाणीटंचाईमुळे या फळबागा जगविणे मोठे आव्हान बनले अाहे. शासनाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (दोन किवा अधिक लाभार्थी) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यांचा शंभर टक्के अनुदानावर लाभ दिला जातो. 

या दोन्ही योजनेतून २००५ ते २०१४-१५ या कालावधीत राज्यात तब्बल २३ हजार ९०८ शेततळे घेतली असून त्यासाठी शासनाने ४५७ कोटी ९२ लाख रुपये अनुदानापोटी उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात २०१२ नंतर वाढत्या दुष्काळामुळे शेततळ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत गेली. तर २०१३-१४ यामध्ये या एकाच वर्षी राज्यात सर्वाधिक म्हणजेच ९७०४ एवढी शेततळी झाली. त्यानंतर शेततळ्यांच्या संख्येत घट झाली असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळ्यांचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेततळ्यांच्या प्रकारानुसार अनुदान 
सध्या योजनेअंतर्गत हाफ डगआऊट, फुलली डगआऊट आणि बोडी टाइप असे शेततळ्यांचे तीन प्रकार आहेत. बहुतांश शेतकरी हाफ डगआऊट प्रकाराची शेततळी घेत आहेत. यासाठी साधारणपणे कमीत कमी पाचशे घनमीटर पाणीसाठ्यासाठी १४ बाय १४ बाय ३ मीटर आकारामानाच्या शेततळ्यासाठी ६५ हजार रुपये एवढे अनुदान मिळते. जास्तीत जास्त दहा हजार घनमीटरच्या पाणीसाठ्यासाठी ४४ बाय ४४ बाय ५.४ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी पाच लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यासाठी प्रामुख्याने शेतकऱ्याजवळ फळबाग असणे अावश्यक आहे.

पाणीटंचाईमुळे सामूहिक शेततळ्याला आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी दिली आहे.
- सुभाष जाधव, संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 

Wednesday, October 19, 2016

हरभरा लागवड

साधारणपणे जगातील एकून हरबऱ्याच्या पिकापैकी ७८% पीक भारत व ९% पीक पाकिस्तानात पेरले जाते, उरलेले १३ % पीक जगातील इतर भागांत पेरले जाते. भारतामध्ये हे पीक पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

महत्त्व : हरबऱ्याचे कोवळे शेंडे भाजी म्हणून वापरतात. दाणे पक्व होण्यापूर्वी कच्च्या स्वरूपात खाल्ले जातात. हरबऱ्यांच्या मुळावरील गाठींमुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण वाढते. हरबऱ्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे घोडे व इतर जनावरांना खुराक म्हणून हरबरा दिला जातो. मिठाई करण्यासाठी चण्याच्या पिठाचा उपयोग करतात. टरफलासह दाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १९ % असते. नुसत्या डाळीत २२ ते २५ % असते. हरबऱ्याच्या कोवळ्या पानात मॅलिक व ऑक्झॉंलिक आम्ल असते.

जमीन व हवामान : मध्यम किंवा मध्यम भारी रानात हरबऱ्याचे पीक घेतात. कमी ते मध्यम पावसाच्या प्रदेशात (६५० ते १००० मिमी) हे पीक उत्तम प्रकारे घेता येते. कडाक्याची थंडी मात्र या पिकास सहन होत नाही. ५ डी. सेल्सिअसच्या वर तापमान असणाऱ्या भागात हरबऱ्याची वाढ चांगली होते.

पूर्व मशागत : खरीपाचे पीक काढल्यानंतर १ नांगरट व कुळवाच्या २ पाळ्या देतात. मशागतीच्या वेळीच पूर्ण कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० ते १५० किलो एकरी द्यावे.

बी - बियाणे आणि पेरणीचा कालावधी :

जातीपरत्वे हरबऱ्याचे एकरी बियाणे २५ ते ४० किलो लागते. हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेनंतर ३ - ४ आठवड्यांपर्यंत करतात.

बीजप्रक्रिया : मर या रोगापासून वाचविण्यासाठी आणि उगवण चांगली होण्यासाठी जर्मिनेटरची बीज प्रक्रिया करवी. हरबऱ्याचे १ किलो बी जर्मिनेटर २० ते २५ मिली + १ लि. पाण्यात अर्धा तास भिजवून सावलीत सुकवून पेरावे. म्हणजे उगवण चांगली होते, तसेच हवेलीत नत्र खेचून हरबऱ्याच्या मुळावर नत्राच्या गाठी वाढतात. त्यामुळे रासायनिक खतात बचत होते. जमीन खराब न होता जमिनीची जैविक सुपिकता वाढते. त्यामुळे उत्पादन व दर्जा दोन्हीत वाढ होतो.

सुधारित वाण : हरबऱ्याचे विविध सुधारित वाण पुढील तक्त्यात दिले आहेत.
अ. क्र.  वाण  पिकाचा कालावधी (दिवस)  उत्पन्न (क्विं./ एकरी)  प्रमुख वैशिषट्ये  
१)  विकास  १०५ -११०  जिरायत ४.५ ते ५ बागायत ९ ते १०  जिरायत क्षेत्रासाठी योग्य वाण  
२)  विश्वास  ११५ - १२०  जिरायत ४ ते ४.५ बागायत ११ ते १२  टपोरे गोल दाणे, पाणी व खतास प्रतिसाद देणारा वाण, राष्ट्रीय वाण म्हणून प्रसारित  
३)  फुले जी - १२  १०५ -११०  जिरायत ५ ते ५.५ बागायत ११ ते १२  जिरायत तसेच बागायतीसाठी योग्य वाण  
४)  विजय  ८५ - ९०  जिरायत ६ ते ६.५  मर रोगास प्रतिकारक्षम तसेच अवर्षण प्रतिकारक्षम जिरायत बागायत तसेच उशीर पेरणीसाठी योग्य वाण. आकर्षक पिवळे टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादन क्षमता.  
५)  विशाल  ११० -११५  जिरायत ५.५ ते ६ बागायत १२ ते १४  
६)  श्वेता  १०० -१०५  जिरायत ३.५ ते ४ बागायत ७.५ ते ८  काबुलीवाण, मर रोगास प्रतिकारक्षम, टपोरे दाणे, हळवा वाण.  
७ )  भारती  ११०-११५  जिरायत ५.५ ते ६ बागायत १२ ते १३  मर रोग प्रतिकारक्षम, जिरायत तसेच बागायतीसाठी योग्य  


पेरणीच्या वेळी तापमानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी पेरणी करावी. पेरणी जर तिफणीने केली तर दोन ओळींत ३० ते ४५ सेंमी अंतर ठेवतात. पेरणी जमिनीखाली ७ ते १० सेंमी खोल करावी.

आंतरमशागत व तणनियंत्रण : पेरणीनंतरसुरूवातीचे ४ ते ६ आठवडे जमीन तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी १ खुरपणी व १ कोळपणी आवश्यक आहे. पेरणीनंतर कोळपे फिरवल्यास हवा खेळती राहून पीक चांगले वाढते.

खत व्यवस्थापन : उपलब्धतेनुसार पुर्ण कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत कोरडवाहू पिकास ५० ते ७५ किलो तर बागायत पिकास १०० ते १५० किलो एकरी द्यावे.

पाणी व्यवस्थापन : पेरणीनंतर ८ - १० दिवसांनी एक व घाटे भरून काढण्याच्या वेळी एक अशा किमान २ - ३ वेळा पाणी दिल्यास पीक उत्तम येते. तथापि हवामानात उष्णतेचे प्रमाण वाढत गेल्यास पाण्याची जादा पाळी देणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जादा पाणी देण्याचे मात्र कटाक्षाने टाळावे. कारण जादा पाण्यामुळे वाढ जादा होऊन घाटे येण्याचे प्रमाण मात्र कमी होते व पर्यायाने उत्पन्न कमी होते.

पीक संरक्षण : हरबऱ्यावर मुख्यत्वे मुळकुजव्या मर, भुरी आणि गेरवा हे रोग पडतात.

पेरणीनंतर लगेचे हवेतील तापमानात वाढ झाल्यास मुळकुजव्या रोगाचा उपद्रव होतो. लहान - लहान रोपे वाळू लागतात व मरतात, यासाठी तापमान योग्य व थंड असतानाच पेरणी करावी आणि बीजप्रक्रियेला जर्मिनेटर आवश्य वापरावे. मर हा रोग जिवाणूंमुळे होतो. चांगले वाढलेले झाड एकाएकी वरपासून वाळू लागते. यासाठी एन -३१ व एन -५९ या जाती रोगप्रतिबंधक जातींची शिफारस केलेली आहे.

हरबऱ्यातील कीड :

घाटेअळी : हरभऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या किडीत घाटेअळी प्रमुख आहे. घाट्यात अळी शिरते व आतील सर्व दाणे फस्त करते. या अळीचा बंधोबास्त करण्यासाठी प्रोटेक्टंट या किटकनाशकाचा वापर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांमध्ये पुढीलप्रमाणे दर पंधरा दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फुले येण्याच्या सुरूवातीपासूनच केल्यास पिकाचे संरक्षण होते. मात्र अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे जाणवताच रासायनिक किटकनाशकाची फवारणी घ्यावी.

हरबऱ्याची वाढ समाधानकारक होऊन अधिक फुल - फलधारणा होऊन घाट्यामध्ये ठसठशीत दाणे भरण्यासाठी अर्थातच दर्जा व उत्पदान वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

फवारणी:

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ३५० मिली. + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( ४५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली.+ क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर ३५० ते ४०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

४) आवश्यकता भासल्यास (प्रतिकुल हवामानात) चौथी फवारणी ७५ दिवसांनी : वरीलप्रमाणेच (तिसरी फवारणीप्रमाणे) फवारणी करावी. मात्र यामध्ये थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, आणि न्युट्राटोन प्रत्येकी १ मिली प्रती लि. पाण्यामध्ये जादा द्यावे.

पीकपक्वता / काढणी : शेताच्या सर्व भागांतील पीक वाळल्यावर पाने झडतात. त्यानंतर पिकाची कापणी जमिनीलगत कापून केल्यास नत्राच्या गाठी असलेल्या मुळ्या जमिनीत राहून त्यातील नत्राचा पुढील पिकास उपयोग होतो. डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर वरीलप्रमाणे केल्यास हरबऱ्याच्या मुळावर नत्राच्या गाठी नेहमीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आल्याचे कृषी विज्ञान मधून शेतकऱ्यांनी कळविले आहे. (संदर्भासाठी कृषी विज्ञानचे मागील अंक वाचावेत. ) साधारणत: कोरडवाहू क्षेत्रामध्ये एकरी २०० ते ३०० किलो तर बागायती क्षेत्रामध्ये ६०० ते ९०० किलो इतके उत्पादन येते. 

Tuesday, September 6, 2016

गटाला किंवा शिवाराला रस्ता मिळवून देण्यासाठी ....

माझीशेती : शेतरस्ता (160906)

एखाद्या गटाला किंवा शिवाराला रस्ता मिळवून देण्यासाठी तुम्हाला तहसिलदाराकडे अर्ज करावा लागेल. शेतीला रस्ता मिळवून देणे हे तहसिलदाराचे आद्य कायदेशीर कर्तव्य आहे. नकाशामध्ये शेतरस्ता उपलब्ध नसेल तर एकमेकांना क्षेत्र सरकवून देणे किंवा रस्ता खरेदी करणे हे उत्तम पर्याय आहेत. 

शेतीचे संपूर्ण नकाशे आणि इतर स्वरूपाचे रेकॉर्ड भूमी-अभिलेख तालुका कार्यालयात मिळतील. शेतीचे नकाशे दोन प्रकारचे असतात.
१. गाव शिवाराचा नकाशा
२. गटाचा नकाशा

नकाशांत रस्ता असेल पण काही कारणास्तव बंद झाला असेल तर खुला करून शेतीच्या प्रत्येक गटाला रस्ता उपलब्ध करून देण्याचे काम महसुल विभागामार्फत होते. *प्रत्येक शेतकऱ्याला गटाच्या रस्त्यापर्यंत दुसर्‍याच्या शेतातून जाण्याचा कायदेशीर अधिकार आहे.*

तहसिलदारांचा निर्णय अंतिम असत नाही. जिल्हाधिकार्‍यापर्यंत त्याला आव्हान देता येते. तहसिलदारांच्या निर्णयाविरोधात न्यायालयातही जाता येते. गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकरी लढू शकतात. अश्या खटल्यांना दिवाणी न्यायालय असते. एकेका न्यायालयात ते अनेक वर्षे चालतात. कनिष्ठ न्यायालयातच २० ते २५ वर्षे खटले चालतात. *संस्थेमार्फत वकील पुरवठा करून शेतकऱ्यांना कायद्याचे मार्गदर्शन केले जाईल त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.*कोणत्याही परिस्थितीत कायदा हाती घेऊ नये. परस्पर समन्वय साधुन स्वतःची आणि शेजाऱ्याची प्रगती साधावी. बांधावरची भांडणे पिढ्यानपिढ्या बरबाद करतात.

यामध्ये काही अडचण असेल तर तुमच्या गावासाठी संस्थेमार्फत नियुक्त केलेले *ग्रेझर* यांच्याशी संपर्क करा किंवा संस्था कार्यालयास संपर्क करा. 

*माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान*
********************** 
📞 9975740444 (नोंदणी - वैयक्तिक)
📞 9130010471 (नोंदणी - ग्रामपंचायत) 
📞 18001801551 (KCC - पिकसल्ला)
📞 18002330418 (KCC - हवामान)
🌐 www.mazisheti.org 
👥 www.fb.com/agriindia

Thursday, August 25, 2016

प्रतिबंधात्मक उपायांनी रोखा जनावरांतील सांसर्गिक गर्भपात

माझीशेती : 160825
*प्रतिबंधात्मक उपायांनी रोखा जनावरांतील सांसर्गिक गर्भपात*
- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील

*सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेलॉसिस)* हा आजार ब्रुसेला जीवाणुमूळे प्राण्यांपासून मानवाला व मानवापासून प्राण्यांना होणारा आजार आहे.

*प्रसाराचे मार्ग*
* जननेंद्रियांतून पडणारा स्राव, झार यांच्या संपर्कात आलेला चारा व पाणी याद्वारे.
* हवेतून श्‍वसनाद्वारे
* नैसर्गिक रेतनामधून
* डोळे व कातडीच्या जखमांतून

*लक्षणे*
* गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात (7व्या ते 8व्या महिन्यापासून)गर्भपात होणे
* झार किंवा वार न पडणे, जनावर वारंवार उलटणे.
* जननेंद्रियातून पू-सारखा स्राव येणे.
* वळूमध्ये अंडाशयाला सूज येणे, सांधे सुजणे.
* ताप कमी जास्त होणे, अशी लक्षणे आढळतात.
*उपचार*
जनावर खरेदी केल्यानंतर त्यांना एक महिना वेगळे ठेवून त्यांच्या रक्ताची तपासणी करावी.
विकत घेतलेल्या जनावराचे, वासरांचे लसीकरण, जंतनिर्मूलन करावे
पृष्ठभाग पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
वर्षातून १ ते २ वेळा रक्ताची तपासणी करावे
रेतन वळू आणि गाईंची वर्षातुन दोन वेळा रक्त तपासणी करावी.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
*आमच्या शेतीविषयक सेवांसाठी www.mazisheti.org/p/loading.html या संकेतस्थळावर भेट द्या.
------------------------------------------
www.mazisheti.org 
www.agriindia.club
www.fb.com/agriindia 
Whatsapp -9975740444

Wednesday, August 17, 2016

कपाशी कृषि विषयक सल्ला (160817)

*कृषि विषयक सल्ला*

_★ *जूनी पाने काढणे*

कपाशीचे पीक ६० दिवसांचे असतांना झाडांना ११ ते १३ फांद्या आलेल्या असतात.
यावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडांवरील इतर फांद्यांखालील जूने मोठे पान काढावे.
 जास्तीत जास्त ७ ते १० पाने एका झाडाची निघतात.
पाने शेतातच पडू द्यावीत.
या पद्धतीमुळे उत्पादनात निव्वळ २०% पर्यंत वाढ होते.
संपूर्ण झाड मोकळे होत असल्यामुळे जून्या पानांखाली लपून बसणा-या कीडींपासून व रोगांपासून संरक्षण तर होतेच त्याच बरोबर संपूर्ण खोड व फांद्या सूर्यप्रकाशात आल्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण वाढते._

_★ *कपाशीमध्ये संजीवकांचा वापर: संजीवकांचा वापर हा लागवड अंतराशी निगडीत आहे*.

 लागवड अंतर ५ X १ फूट किंवा यापेक्षा जास्त असल्यास लिहोसीनची फवारणी लागवडीपासून ६० दिवसांनी १० लिटर पाण्यात २ मिली या प्रमाणात करावी.
यानंतर पीक ९० दिवसांचे असतांना जीए १० पीपीएम व १% युरीयाची फवारणी करावी.
लागवड अंतर कमी असल्यास व जोड ओळ पद्धतीमद्धे या फवारण्या १० दिवस अगोदर (म्हणजेच ५० दिवसांनी व ८० दिवसांनी) करणे गरजेचे आहे.
लागवडीपासून १०० दिवसांनी पोटॅशियम हायड्रोजन ऑर्थोफॉस्फेट ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे._

_★ *कपाशी मधे गुलाबी बोंड अळी: गेल्यावर्षी बीटी कपाशीचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान गुलाबी बोंडअळीमुळे झाले होते*

.शेतकरी बांधवांनो यावर्षी या अळीचा प्रादुर्भाव पूर्वहंमामी कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणावर एक ऑगष्टपासूनच दिसू लागला आहे.
यापुढेही अळी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे नुकसान करू शकते. वेळीच या कीडींवर नियंत्रण न मिळवल्यास आलेले पीक हातेच जावू शकते.

_यासाठी दररोज दुपारी तीन नंतर कपाशी पिकांमध्ये निरिक्षणे घ्यावीत. निरिक्षण करतांना जर एखादे फुल पिवळे दिसले तर तात्काळ ते तोडावे. अशा फुलाचे तोंड एकदम घट्ट चिकटलेले दिसेल.
यालाच डोमकळी असेही म्हणतात. अशावेळी या फुलाच्या पाकळ्या वेगळ्या केल्यास अशा फुलांमध्ये एक ते दोन गुलाबी बोंडअळ्या आपणास पहावयास मिळतील._
_तोडलेली फुले तात्काळ नष्ट करावीत. फवारणी करतांना क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमथ्रीन ५% एकत्र असलेले किंवा प्रोफेनोफॉस ४०% + सायपरमेथ्रिन ४% मिश्रण २ मिली अधिक युरिया १० ग्राम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. एकरी तीन ते पाच डेल्टास्टिकी ट्रॅप लावावेत.
हे सापळे कृषी विक्रेते यांचेकडे उपलब्ध असतात.
 या कामगंध सापळ्यांमध्ये येणा-या कीडींवर सतत निरिक्षण ठेवावे._

*कृषि विभाग*
*वसमत*

Saturday, August 13, 2016

माझीशेती : हुमणी किडींचा प्रार्दुभाव व व्यवस्थापन

माझीशेती : हुमणी किडींचा प्रार्दुभाव व व्यवस्थापन (160813)
- मनोज लोखंडे, हिंगोली
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधासाठी www.mazisheti.org/p/project-service.html येथे क्लिक करा.


*हुमणीमुळे होणारे नुकसान-*
हुमणी पिकाची तंतुमुळे, सेंद्रिय पदार्थ खातात. नंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.

*रासायनिक नियंत्रणासाठी-*
-ठिबकद्वारा पाण्यामध्ये  क्‍लोरपायरीफॉस  (20 टक्के ईसी)  किवा नुवान 2 लिटर + 500  gm कापर आक्सीक्लोराइड  प्रति एकर सोडावे.

- cartrap hydrochloride 4%  (biostat-Dartriz 4g, caldan 4%)  or  fertera  dupont  3kg प्रतीएकर soil application द्वारे देणे

*जैविक नियंत्रण*
जैविक नियंत्रणात *मेटारेजीयम ॲनिसोफिली* या बुरशीमुळे आणि *हेटरोरेब्डीटीस सूत्र कृमी (निमेटोड)* द्वारे नियंत्रण होते.

सुत्रकृमीने बाधित एकरी दोन हजार अळ्या जमिनीत सोडल्यास ते सर्व हुमणी नष्ट करतात. हुमणी मेल्यानंतर तिच्या शरीरातून दीड पावणेदोन लाख सुत्रकृमी बाहेर पडतात. हुमणीचे वास्तव्य असेल तेथे जाऊन हुमणीच्या शरीरात या सुत्रकृमी घुसून तिला नष्ट करतात.

Wednesday, August 10, 2016

पिकांचे नुकसान टाळा कामगंध सापळ्याच्या सहाय्याने....

माझीशेती: कृषिवार्ता - कामगंध सापळ्याविषयी माहिती (१६०७२६)

कीड - हिरवी बोंड आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - कापूस, हरभरा, टोमॅटो, तूर, मका, ढबू, वाटाणा, द्राक्षे
संख्या - ५ ते ७ एकरी
घ्यावयाची काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे.

कीड - पाने खाणारी आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - सोयाबीन,कापूस, गुलाब, भुईमूग, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर,मिरची, तंबाखु, सुर्यफुल
संख्या - ५ ते ७ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - गुलाबी बोंड आळी
सापळा - डेल्टा स्टीकी ट्रॅप
पिक - कापूस
संख्या - ५ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - ठिपक्यांची बोंड आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - कापूस, भेंडी
संख्या - ५ ते ७ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - काटेरी बोंड आळी
सापळा - फनेल ट्रॅप
पिक - कापूस
संख्या - ५ ते ७ एकरी
काळजी - २१ दिवसांनी गोळी बदलणे

कीड - वेलवर्गीय फळमाशी
सापळा - फ्लायटी ट्रॅप
पिक - काकडी, दोडका, पडवळ, ढेमसे, कोहळा, कलिंगड, खरबुज, दुधी भोपळा
संख्या - ४ एकरी
काळजी - ६० दिवसांनी गोळी बदलणे

Friday, August 5, 2016

शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके

*माझीशेती कृषिवार्ता : शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके*(20160805)
- संतोष तनपुरे

खरीप पिके वाढीच्या अवस्थेत रोग व किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी *५० टक्के अनुदानावर कीटकनाशकांचे वाटप* करण्यात येणार आहे.
*कडधान्य* पिकांसह दुय्यम पिकांच्या पीक संरक्षणासाठी *राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून* हा कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. तर विदर्भातील पाच जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत भात पिकांच्या संरक्षणासाठी कीटकनाशके देण्यात येणार आहे.
*राष्ट्रीय गळीत धान्य अभियानातून* भुईमूग, सोयाबीन, करडई, जवस, तीळ या पिकांच्या संरक्षणासाठी रासायनिक व जैविक कीटकनाशकांसाठी 50% अनुदान देण्याची तरतूद केली आहे.
*क्रॉपसॅप* अंतर्गत कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांना सर्व कीटकनाशके ५० टक्के अनुदानावर दिली जाणार आहे.

*लाभार्थी निवड*
अभियानांतर्गत निवडलेल्या पिकांच्या प्रकल्पाच्या *शेतकरी गट, शेतकरी कंपन्यातील शेतकऱ्यांना या कीटकनाशकांचा लाभ मिळणार* आहे. त्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Wednesday, July 27, 2016

घरच्या घरी खते तपासणी भाग - २

माझीशेती : कृषिवार्ता
घरच्या घरी खते तपासणी भाग - २
(२०१६०७२६)
लेखक - श्री. सुहास पाटील, वाळवा

शेतकरी मित्रांनो आमचे प्रसारण आपणास आवडत आहे हे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. आपले वेळोवेळी मिळणारे प्रतिसाद आमच्या स्वयंसेवकांना स्फूर्ती देत आहे. मागील घरच्या घरी खते तपासणी लेखावरील वरील तुमच्या प्रतिक्रिया पाहून आम्ही आपणासाठी खते तपासणीचा पुढील भाग प्रसारित करत आहोत.

नत्र, स्फुरद, पालाश :- तपासनळीत १ ग्रॅम खत घेऊन त्यात ५ मिली डिस्टिल्ड वॉटर व १ मिली संद्र सोडियम हैड्रोक्सीड मिसळून गरम करा. नंतर लाल लिटमस पेपर तपासनळीच्या तोंडावर धरा. पेपर निळा झाला तर नायट्रोजन आहे. कलर न बदलल्यास नायट्रोजन नाही असे समजावे.

०१ ग्रॅम खतात डिस्टिल्ड वॉटर ५ मिली मिसळून गाळून घ्या. मिश्रणामध्ये ०.५ मिली फेरिक क्लोराईड मिसळा. पिवळसर झालेले मिश्रण ०१ मिली संद्र आम्लात मिश्रित झाले तर फॉस्फरस आहे असे समजावे.

०१ ग्रॅम खतात ०५ मिली डिस्टिल्ड वॉटर मिसळून गाळून घ्यावे. त्या मिश्रणात २ मिली फॉर्मल्डीहाईड मिसळा लाल कलर येईल. पुढे पिवळा कलर येईपर्यंत मिसळत रहा. नंतर त्यात ०१ मिली कोबाल्टीक नायट्रेट रिएजंट मिसळा. पिवळा रंग येणे म्हणजे पोटॅश आहे.

फेरस सल्फेट : ०१ ग्रॅम खतास ५ मिली पाण्यात मिक्स करा. मिश्रणामध्ये १ मिली पोटॅशिअम फेरोसायनाईड मिसळल्यानंतर मिश्रण निळे बनले म्हणजे ते फेरस सल्फेट आहे.

केंद्रीय खते व गुणवत्ता नियंत्रण व प्रशिक्षण संस्था हरयाणा यांनी यासाठी परीक्षण किट विकसित केले आहे.

Sunday, July 24, 2016

आता तुम्हीच पारख करा रासायनिक खतांची...

माझीशेती : आता तुम्हीच पारख करा रासायनिक खतांची.. (२०१६०७२४)
लेखक - सुहास पाटील, वाळवा

शेती उत्पन्न वाढीसाठी शेतकरी बांधव बरेच वेळेस कर्ज काढून खते आणतात पण बरेच वेळेला आपणास मिळालेली खते योग्य आहेत का ? ही तपासणी गरजेची असते.

खते तपासणी -
१. युरिया :
 तपास नळीत १ gm युरिया, ५ ते ६ थेंब सिल्व्हर नायट्रेट, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिसळुन ढवळल्यास द्रावण पांढरे झाल्यास भेसळ आहे.

२. युरिया :
१ gm युरिया तपास नळीत गरम केल्यास संपुर्ण युरिया विरघळला नाही तर भेसळ आहे.

३. DAP :
१ gm DAP खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर, ०१ ml आम्ल मिसळून हलवा. संपुर्ण DAP विरघळला नाही तर भेसळ आहे.

४. म्युरेट ऑफ पोटॅश :
०१ gm खत, १० ml पाणी तपासनळीत घेऊन हलवून पाहिल्यास बरेच कण तरंगत असतील तर भेसळ आहे.
याशिवाय
पेटत्या निखाऱ्यावर खत टाकल्यानंतर निखारा पिवळा झाल्यास भेसळ समजावी.

५. सिंगल सुपर फॉस्फेट :
१ gm खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यामध्ये १ थेंब (२%) डिस्टिल्ड अमोनिअम हैड्रोक्साइड आणि १ ml सिल्व्हर नायट्रेट मिसळले तर द्रावनास पिवळा रंग न आल्यास भेसळ समजावी.

६. फेरस सल्फेट :
१ gm खत आणि ५ ml पाणी मिसळा त्यात १ ml पोटॅशिअम फेरोसिनाईड मिसळल्यास मिश्रण निळे बनेल अन्यथा भेसळ समजावी.

*** "प्रोफेशनल ऍग्रीकल्चर" प्रशिक्षण करीता नोंदणी चालू आहे. ३० किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी असतील तर आपल्या भागात ग्रामपंचायत मार्फत प्रशिक्षणाची सोय केली जाईल. 

Sunday, April 24, 2016

जैविक खते - शैलजा तिवले

जैविक खते

जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक जैविक गुणधर्मांची वाढ होण्यास जमिनीतीलच सूक्ष्म जीवजीवाणूंचा उपयोग करून तयार करण्यात आलेली जैविक खते मदत करतात. वनस्पतींच्या पेशींची वाढ आणि गुणन ही प्रमुख कार्ये नत्रामुळे होत असतात. हवेतील नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणा-या जीवाणूंची  प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना जैविक/जिवाणू खते असे म्हणतात.
जैविक खतांचे वर्गीकरण-

नत्र स्थिर करणारे जीवाणू
रायझोबियम: हे जीवाणू पिकांच्या मूळावर गाठी स्वरूपात राहून हवेतील नत्र शोषून घेवून पिकांना पुरवितात. परंतु निरनिराळ्या पीकासाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम जिवाणूचे खत वापरावे लागते .काही महत्त्वाचे पीकांचे गट पुढे दिले आहेत.
पीके - जीवाणू खत
सोयाबीन – (रायझोबियम) जापोनिकम, (रायझोबियम) इटलाय, (रायझोबियम) फ्रिडाई
वाटाणा - (रायझोबियम) लग्युमिनोसायरम
हरभरा - (रायझोबियम)  सिसीराय चवळी, मुग, तूर, मटकी इ. - (रायझोबियम) जीवाणूचा प्रकार
बरसीम - (रायझोबियम)  ट्रायफेली फ्रेंच बीन / बीन -(रायझोबियम) फँझिओलाय
अँझोटोबॅक्टर: हे जीवाणू जमिनीमध्ये वनस्पतीच्या मुळाच्या भोवती राहून नायट्रोजन द्रव्याच्या साहाय्याने हवेतील नत्र अमोनिआच्या स्वरुपात पिकांना उपलब्ध करुन दिला जातो. हे जीवाणू नत्रस्थिरीकरण करण्याबरोबरच जिब्रेलीक अँसीड, व्हिटॅमीन आणि इंडॉल अँसीटीक अँसीड यांसारखी संप्रेरके जमिनीत सोडतात. त्याचा फायदा उगवण आणि पिकाची झपाटयाने वाढ होण्यासाठी होतो.
अँझोस्पिरीलम: हे जीवाणू जमिनीमध्ये वनस्पतींच्या मूळांवर त्याचप्रमाणे मूळांमध्ये असतात तसेच या जीवाणूमूळे मात्र गाठी तयार होत नाही. एकदल पिकांची पेरणी करताना या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला, ऊस, फळझाडे या पिकांसाठी या खताचा वापर केला जातो.
बायजेंरीकीया: हे जीवाणू 6.5 सामूपेक्षा कमी असलेल्या जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्याचे कार्य प्रभावीपणे करु शकतात त्यामुळे कोकणात याचा जास्त वापर केला जातो.

नत्र स्थिर करणार्‍या सूक्ष्म वनस्पती

अँझोला: ही पाण्यावर तंरगणारी वनस्पती असून भात खाचरामध्ये वाढताना पिकाला कोणताही त्रास न देता तणाचा नाश करते.
निळे-हिरवे शेवाळ: शेवाळे कार्बोदके तयार करत असताना पाण्यामध्ये प्राणवायू सोडतात आणि हाच प्राणवायू भाताच्या रोपांनी घेतला तर त्यांची वाढ होते.
स्फुरद विरघळणारे जीवाणू: निसर्गात काही जीवाणू असे आहेत की जे अविद्राव्य स्थितीत असणा-या स्फूरदांवर प्रक्रिया करतात . ह्या प्रक्रियेत सुक्ष्म जीवाणू उदा. बँसिलस, सुडोमोनेस, पेनीसीलीयम, इत्यादी विशिष्ट प्रकारच्या आम्लांची निर्मिती करतात, ज्यामुळे अविद्राव्य स्फुरदाचे विघटन होऊन स्फुरद पिकांना उपलब्ध होतो. हे जिवाणू खत वापरल्य़ाने पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
सेंद्रिय पदार्थ कुजणारे जीवाणू- बुरशी, अँक्टीनोमायसीटस
सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करुन देणारे जीवाणू

- शैलजा तिवले.

Sunday, March 20, 2016

माझीशेती : राष्ट्रीय कृषी विकास बँक अर्थसहाय्यित डेअरी उद्योजकता विकास योजना

माझीशेती : राष्ट्रीय कृषी विकास बँक अर्थसहाय्यित डेअरी उद्योजकता विकास योजना (160320)

आजच्या पोस्टमध्ये आपण वाचाल
माझीशेती: शासकीय योजना - डेअरी संबंधित 09 योजना
माझीशेती: कार्यक्रम पत्रिका - सातारा आणि अहमदनगर मधील कार्यक्रम माहिती
माझीशेती : माझा प्रयोग - सुधाकर जाधव यांचे सुमारे 20 लाखांचे मिरची उत्पादन

🔷 माझीशेती: शासकीय योजना 🔷

1. लहान गोठा (संकरित गाई / म्हैशी -१०)
प्रकल्प खर्च - ₹ 05 लाख प्रति 10 जनावरे (कमीत कमी 02)
सहाय्य प्रकार - (Message published by - www.mazisheti.org)
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 1.25 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 1.67 लाख

2. वासरे संगोपन (संकरित, देशी, दुभत्या जातीची -20)
प्रकल्प खर्च - ₹ 4.80 लाख प्रति 20 वासरे (कमीत कमी 05)
सहाय्य प्रकार - (like our page www.facebook.com/agriindia)
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 1.20 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 1.60 लाख

3. गांडूळ खत
प्रकल्प खर्च - ₹ 20 हजार
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 5 हजार
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 6.7 हजार

4. दुग्ध व्यवसाय मशीनरी खरेदी (2000 लिटर क्षमता)
- दूध दोहन यंत्र, दूध तपासणी यंत्र, दूध शीतकरण यंत्र
प्रकल्प खर्च - ₹ 18 लाख
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 4.5 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 6 लाख

5. दुग्धपदार्थ बनविण्यासाठी प्रक्रिया साधने
प्रकल्प खर्च - ₹ 12 लाख
सहाय्य प्रकार-
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 3 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 4 लाख

6. दुग्धपदार्थ वाहतूक व शीत साखळी
प्रकल्प खर्च - ₹ 24 लाख
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 6 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 8 लाख

7. दुग्धपदार्थ साठविण्यासाठी शीतगृह सुविधा
प्रकल्प खर्च - ₹ 30 लाख
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 7.50 लाख
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 10 लाख

8. खासगी पशुवैद्यकीय दवाखाना
प्रकल्प खर्च -
चल - ₹ 2.40 लाख
अचल - ₹ 1.80 लाख
सहाय्य प्रकार-
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त
चल - ₹ 60 हजार
अचल - ₹ 45 हजार
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त
चल - ₹ 80 हजार
अचल - ₹ 60 हजार

9. दुग्धपदार्थ विक्री केंद्र / पार्लर
प्रकल्प खर्च - ₹ 56 हजार
सहाय्य प्रकार -
जनरल - प्रकल्प रक्कमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त ₹ 14 हजार
SC/ST - प्रकल्प रक्कमेच्या 33.33% किंवा जास्तीत जास्त ₹ 18.6 हजार

निधी उपलब्धता पद्धत -
* व्यावसायिक हिस्सा - 10% (min.)
* अनुदान - वरीलप्रमाणे
* बँक कर्ज - शिल्लक किंवा कमीत कमी 40%

अधिक माहितीसाठी वाचा - https://www.nabard.org/pdf/Annexure_1.pdf

🔷 माझीशेती: कार्यक्रम पत्रिका  🔷

दिनांक: २४ ते २८ मार्च २०१६
विषयः कृषी, औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शन
स्थळ : जिल्हा परिषद मैदान, सातारा
आयोजक:
१. शेती उत्पन्न बाजार समिती, सातारा
२. जिल्हा परिषद, सातारा
३. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

दिनांक - 15, 16 आणि 17 एप्रिल 2016
विषय : किसान मित्र कृषी प्रदर्शन
स्थळ - न्हावरे फाटा, पुणे-नगर रोड, शिरूर, अहमदनगर
आयोजक –
1. अग्रोनॉमी सर्विसेस
2. क्युरिअस मिडिया प्रा. लि.

🔷 माझीशेती : माझा प्रयोग 🔷

नमस्ते, मी सुधाकर जाधव रा. सोनजांब ता. दिंडोरी जि. नाशिक येथील रहिवाशी आहे. मी 03 एकर वाण V.N.R-270 ही मिरची लागण केली. योग्य वेळी योग्य सल्ला व नियोजन यामुळे मी एकरी 170 क्विंटल मिरची उत्पन्न घेऊ शकलो. ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याची कमतरता जाणवली नाही. मला मुंबई मार्केटमध्ये विकुण सुमारे 20 लाखाचे उत्पन्न 04 महिन्याच्या कालावधीत मिळाले.

🔷 माझीशेती : नोटीस बोर्ड 🔷

📣 शेतकऱ्यांना उपयोगी अशी तुमची माहिती प्रसिध्द करायची असेल तर 9130010471 या क्रमांकावर संपर्क करा.
📣 माझीशेती कडून प्रसिद्ध झालेल्या माहितीचा प्रत्यक्षात वापर करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.

* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
**********************
📞 9975740444 (नोंदणी)
📞 9130010471 (कृषि व्यवसाय संसाधन)
📞 18001801551 (KCC - पिकसल्ला)
📞 18002330418 (KCC - हवामान)
🌐 www.mazisheti.org
👥 www.fb.com/agriindia
**********************
(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)
नाव -
गाव -
तालुका -
जिल्हा -
जमीन क्षेत्र (एकर) -
प्रमुख पिक व त्याचे क्षेत्र -

Friday, March 11, 2016

कोंबडी / कुक्कुट पालन

कोंबडी / कुक्कुट पालन

निवड
मांस उत्पादन - ब्रॉयलर
अंडी उत्पादन (खालीलप्रमाणे)
गावठी कोंबड्या (वार्षिक अंडी उत्पादन 60-80),
व्हाइट लेगहॉर्न (वार्षिक अंडी उत्पादन 240-260)
ऱ्होड आयलॅंड रेड (वार्षिक अंडी उत्पादन 240-260)

संगोपन
शेड
हवामानातील बदल ,ऊन, वारा ,पाऊस,थंडी तसेच इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी कॊंबडयांना घराची आवश्यकता आहे. कोंबडी घराची दिशा ही नेहमी पूर्व - पश्‍चिम ठेवा. प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला एक चौ.फुट जागा लागते तर प्रत्येक अंडी देणा-या कोंबडीस अडीच ते तीन चौरस फूट जागा लागते. घराची लांबी पक्ष्यांच्या संख्येवर अवलंबून असते.मात्र रूंदी २५ फुटापेक्षा जास्त असू नये ही घरे जमीनीपासून २ फुट उंचीवर असावीत .सुरवातीस २ ते ३ फुट भिंती घ्याव्यात व त्यावर छतापर्यत बारीक जाळ्या बसवाव्यात .मधली उंची १२ ते १५ फूट असावी व छत दोन्ही बाजूस उतरते असावे. दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने पडनारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही. घराची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते.

खाद्य 
खाद्यात दोन प्रकारचे अन्न घटक असावेत .
१) उर्जा पुरविणारे
२) प्रथिने पुरविणारे
उर्जा पुरविण्यासाठी मका ,ज्वारी ,बाजरी ,बारली ,गहू ही धान्ये वापरतात तर प्रथिनांसाठी शेगदाणा,सोयाबीन ,तीळ पेंड वापरतात.

कोंबडयांचे खाद्य 
एकूण खर्चाच्या ६० – ७० % खर्च फक्त खाद्यावर होतो त्यासाठी ते फायदेशीर ठरण्यासाठी खाद्य संतुलित व चांगले असावे.

कोंबडी खाद्यनिर्मितीबाबत माहिती
1) पोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या 70 टक्के खर्च हा फक्त खाद्यावर होतो. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी 35 ते 45 टक्के खाद्याचे रूपांतर हे अंडी व मांसामध्ये होते.
2) पक्ष्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते 12 टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये 30 ते 40 टक्के प्रथिने असतात. कोंबडीखाद्यामध्ये वनस्पतिजन्य प्रथिने आणि प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करावा.
3) ज्वारी, गहू, मका, तांदूळ इ. धान्यांत पिष्टमय पदार्थ भरपूर असतात. हे घटक आहारात असावेत.
4) पक्ष्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. हे पदार्थ अन्न तुटवड्याच्या कालावधीमध्ये शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवितात. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्याला चांगली चव येते. सर्व प्रकारचे खाद्यतेल व चरबी यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात.
5) हाडांची बळकटी आणि अन्नपचनासाठी कोंबड्यांना खनिजांची आवश्यकता असते. कोंबड्यांच्या आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायांतील अशक्तपणा दूर होतो. हाडांची योग्य पद्धतीने वाढ होते, त्यांना बळकटी मिळते. शरीरास कॅल्शिअम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, सोडिअम, पोटॅशिअम, सेलेनिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज, झिंक इत्यादी खनिजांची आवश्यकता असते.
6) जीवनसत्त्वांमुळे कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते, उत्पादन वाढते. शरीर कार्यक्षम व तजेलदार राहण्यासाठी जीवनसत्त्वांचा उपयोग होतो.
पाणी व्यवस्थापण 
पाण्याची भांडी रोज स्वच्छ व ताज्या पाण्याने भरावीत .त्यावर झाकण असावे, पाण्याची भांडी उंच विटांवर ठेवावीत व विटांस चुना लावावा,त्यामुळे पाणी गादीवर सांडणार नाही व घर कोरडे राहण्यास मदत मिळेल .भाडी दरदोज स्वच्छ करून भरावीत पाच कोंबड्यांना अंडी देण्यासाठी १४-१२ – १२ इंच आकाराचा एक खुराडा जमिनीपेक्षा दीड ते दोन फुट उंच ठेवावा.

लसीकरण
वय - रोग - लसीचे नाव-टोचणीची पध्दत (table)
१ दिवस - मँरेक्स - मँरेक्स - पायाच्या स्नायुमध्ये
५- ७ दिवस - राणिखेत - लासोटा - नाकात एक थेंब टाका
४ आठवडे - श्वासनलिकेचा डोळयात दोन थेंब टाकणे.संसर्गजन्य रोग
५ आठवडे - राणिखेत - लासोटा पिण्याच्या पाण्यातुन 
६ आठवडे - देवी - देवी लस पंखाखाली कातडीतून टोचून
८ आठवडे राणिखेत राणिखेत आर बी पंखाखाली कातडीतून टोचून
१८ आठवडे - देवी - देवी लस पंखाखाली कातडीतून टोचून
२० आठवडे - राणिखेत - राणिखॆत आर बी पंखाखाली कातडीतून टोचून

रोग नियंत्रण 
१) काँक्सिडिआँसिस - ओलसर असल्यास केव्हाही होते-गादी कोरडी ठेवावी.
२) जंत - जंताचे औषध दर ३ महिन्यांनी पाण्यातून द्यावे.
३) उवा, गोचिड, कुकुडवा - सर्व वयात येतात - स्वच्छता ठेवा, कोबडयांना जंतुनाशक लावा.

ब्रॉयलर कोंबड्यांतील आजारावर करा वेळीच उपाययोजना
ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये थंडीमध्ये उष्णतेची कमतरता, अमोनिया वायू साठणे, विविध संसर्गजन्य आजार, मूत्रपिंडाचे आजार, परोपजीवी जंतूचा प्रादुर्भाव, खाद्य घटकातील असमतोलता, अशा विविध कारणांमुळे पहिल्या एक-दोन आठवड्यांमध्ये मरतुक आढळते. हे टाळण्यासाठी कुक्कुटपालनामध्ये नेहमी आढळणारे आजार, प्रतिबंधक उपाय आणि औषधोपचार याविषयी माहिती असणे आवश्‍यक आहे. 
डॉ. एम. व्ही. धुमाळ, डॉ. डी. एस. गाडे

प्रथिनयुक्त मांसाची गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन केले जाते. ब्रॉयलर कोंबड्या 6 ते 8 आठवड्यांत अतिशय जलद वाढतात. बदलते हवामान, आहारातील असमतोलपणा, व्यवस्थापनातील त्रुटीमुळे कोंबड्यांना विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होतात. त्यामुळे ब्रॉयलर कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व कोंबड्यांची उत्पादनक्षमता घटते. त्यासाठी ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये मरतुक कोणत्या कारणामुळे होते हे जाणून घेणे आवश्‍यक आहे.
1. पिलांमध्ये कमी-अधिक तापमानामुळे होणारी मरतुक- 
- ब्रॉयलर कोंबड्याच्या शरीराचे सामान्य तापमान 105 ते 107 अंश फॅरनहाइट असते. 
- पहिल्या आठवड्यामध्ये ब्रॉयलर कोंबड्यांना 95 अंश फॅरनहाइट तापमान देणे आवश्‍यक असते. यापेक्षा तापमान जास्त झाले तर पिलांच्या शरीरातील पाणी कमी होते. पर्यायाने विष्टेमधील कमी पाण्यामुळे विष्ठा पिलांच्या गुद्वाराजवळ साचते. गुद्वार बंद होऊन पिलांची मरतुक वाढते. 
- जास्त तापमानामध्ये पिलांना धाप भरते व पिलांचा श्‍वसनाचा वेग वाढतो. त्यामुळे पिलांचे खाद्य खाण्याचे प्रमाण घटते, वजनात वाढ होत नाही. 
- जास्त तापमानामध्ये कॅनिबालीझमची (स्वजाती भक्षण) समस्या निर्माण होते व पिलांचे मरतुकीचे प्रमाण वाढते. जेव्हा शेडमधील तापमान 60 ते 65 अंश फॅरनहाइटच्या खाली जाते तेव्हा पिले उष्णता असलेल्या ठिकाणी गर्दी करून एकमेकांवर बसतात, त्यामुळे चिलिंग (शीतकरण) होऊन वाढ खुंटते. 
- श्‍वसनाचे आजार होऊन पिलांमध्ये मरतुक होते.

उपाय - 
- वरील परिणाम टाळण्यासाठी पिले पक्षिगृहात येण्यापूर्वी 12 ते 14 तास ब्रुडर चालू करून शेडचे तापमान नियंत्रित ठेवावे. 
- पिलांना पहिले एक-दोन आठवडे 95 अंश फॅरनहाइट तापमान द्यावे, जेणेकरून पिलांना आल्हाददायक तापमान मिळेल. पिलांच्या सर्व शारीरिक क्रिया सामान्यपणे चालू राहतील. पिलांची सारखी वाढ होईल. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढून पिलांची मरतुक कमी होते.

2. शेडमध्ये जास्त प्रमाणात अमोनिया वायू जमा झाल्यामुळे होणारे विपरीत परिणाम ः 
- शेडमधील लिटर (पक्ष्यांची गादी) पाणी व पिलांच्या विष्टेमुळे दमट व ओलसर होते. त्यामुळे अमोनिया वायू तयार होतो. 
- अमोनिया वायू पिलांच्या डोळ्यातील आवरणावर परिणाम करतो. त्यामुळे पिलांचे खाद्य खाण्याचे प्रमाण घटते. पिलांची वाढ कमी होऊन श्‍वसन नलिकेमध्ये रक्तस्राव होतो. 
- अमोनिया वायूचे प्रमाण 25 पी.पी.एम.पेक्षा जास्त वाढल्यास असे परिणाम पिलांमध्ये दिसतात. 

प्रतिबंधात्मक उपाय - 
- पक्ष्यांचे लिटर दररोज दोन-तीन वेळा हलवावे. (खाली-वर करणे) 
- लिटरवर जास्त प्रमाणात पाणी सांडणार नाही याची काळजी घ्यावी. 
- ओलसर व पेंडीसारखे झालेले लिटर शेडमधून काढून नष्ट करावेत. 
- शेडमध्ये सतत खेळती व आल्हाददायक हवा ठेवावी. 
- लिटर ओले झाल्यास 1 किलो चुना पावडर प्रति 100 चौ. फुटास लिटरमध्ये मिसळावी.

3. आजारी नाभी (ओम्फालायटीस, नेव्हल इल) - 
- अंड्यामधून निघालेल्या नाभीचे मुख शक्‍य तो बंद होते, परंतु कधी कधी काही कारणांमुळे बंद होत नाही. त्यामधून जंतू प्रवेश करतात व नाभिला संसर्ग होतो, त्यामुळे पिलांच्या पोटाजवळील कातडी सुजते आणि पिलांचा पोट फुगून मृत्यू होतो. 
- अशा पिलांचे शवविच्छेदन केल्यानंतर पोटामध्ये शोषला न गेलेला अंड्याचा पिवळा भाग दिसतो आणि त्याचा घाण वास येतो. 
- हा आजार अंडी उबवणूक केंद्रामधील निर्जंतुकीकरणाच्या अभावामुळे होतो.

उपाय - 
- प्रतिजैवकांचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार करावा. 
- अंडी देणाऱ्या कोंबड्यांची घरे स्वच्छ ठेवावीत. 
- अंडी उबवणूक यंत्रातील याचर व सेटर, बास्केट व इतर उपकरणांचे परिणामकारक निर्जंतुकीकरण करावे. 
- याचर बास्केट कोरडे असावे. 
- पिले आल्यानंतर त्यांना आठ तास गुळाचे पाणी व भरडलेली मका द्यावी. 
- उबवणुकीच्या वेळी अंडे ओलसर होऊ देऊ नये.

4. पांढरी हगवण (साल्मोनेल्लोसीस/पुल्लोरम डिसीज) - 
- हा आजार सूक्ष्म जीवाणूपासून होतो. या आजाराला पांढरी हगवणसुद्धा म्हणतात. कारण पिलांची विष्ठा पांढऱ्या रंगाची होते. 
- हा आजार प्रामुख्याने अंडी उबवणूक केंद्रात कोंबड्यांच्या बीजांडामध्ये दोष किंवा संसर्ग झाला असेल तर पुढे नुकत्याच तयार झालेल्या पिलांमध्ये उद्‌भवतो. 
- या आजारात पिल्लांचे पंख विस्कटलेले दिसतात. गुद्वाराजवळ पांढरी विष्ठा असते. 
- पिल्ले खाद्य खात नाहीत आणि श्‍वसनास त्रास झाल्यामुळे पिलांमध्ये मरतुक होते.

उपाय - 
- हा आजार मोठ्या कोंबड्यांना होतो, त्यामुळे आजारी, अंड्यांवरील कोंबड्या काढून टाकाव्यात. 
- पिलांना पाण्यामधून प्रतिजैवकाचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार करावा.

5. रक्ती हगवण (कोक्‍सिडीओसिस) - 
- हा रोग परोपजीवी जंतूपासून होतो. 
- यामध्ये विटकरी किंवा लालसर रंगासारखी रक्ती विष्ठा (हगवण) असते. 
- पंख विस्कटलेले दिसतात. 
- पिलांमध्ये खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणामुळे पिलांचा मृत्यू होतो.

उपाय - 
- अशा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेडचे प्रभावी निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे. 
- निर्जंतुकीकरण केलेल्या शेडमध्येच पिलांचे संगोपन करावे. 
- कोंबड्यांची गादी (लिटर) नियमित खाली-वर करून त्यामध्ये चुन्याची पावडर मिसळावी. 
- पिलांना आल्हाददायक मोकळी हवा, पिण्यासाठी पुरेसे स्वच्छ पाणी द्यावे. 
- आजारी पिलांवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

6. संधीरोग (गाऊट) - 
- या आजारामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, पिले निस्तेज दिसतात. 
- पिसे विस्कटलेली दिसतात. गुद्वार ओले दिसून काही वेळेस हिरवट विष्ठा दिसते आणि त्यामुळे पिलांमध्ये मोठ्या प्रमाणात मरतुक होण्याची शक्‍यता वाढते. 
- खाद्यातील प्रथिनांच्या चयापचयानंतर युरिक आम्ल तयार होते. 
- युरिक आम्ल हे रक्तामधून मूत्रपिंडाद्वारे शरीराच्या बाहेर विष्टेद्वारे टाकले जाते. 
- जेव्हा रक्तामधील युरिक आम्लाचे प्रमाण वाढते व ते मूत्रपिंडाद्वारे बाहेर काढण्यासाठी मूत्रपिंडाचे काम वाढते त्यामुळे मूत्रपिंडावर ताण निर्माण होतो तेव्हा गाऊट आजार होतो. 
- खाद्यातील जास्त प्रथिने, खनिजाचे कमी-जास्त प्रमाण, जीवनसत्त्वे व रसायनांमुळे चयापचयातील होणाऱ्या बिघाडामुळे पिलांमध्ये हा मूत्रपिंडाचा आजार होतो. 
- जास्त प्रमाणात सोडियम बाय कॅर्बोनेटचा वापर केल्यामुळेसुद्धा अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या मूत्रपिंडामध्ये कडक खडे तयार होतात. 
- खाद्यामधील प्रथिनाचे प्रमाण जास्त असल्यास युरिक आम्ल तयार होते आणि गाऊट होतो. 
- पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तामधील युरिक आम्ल व इतर खनिजाचे प्रमाण वाढते. ही स्थिती उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसते. 
- कठीण पाणी व मिठाच्या जास्त प्रमाणामुळेसुद्धा मूत्रपिंडावरील ताण वाढतो व गाऊट होतो. 
- लहान पिलामध्ये प्रतिजैवकांचा अनावश्‍यक वापर झाल्यास असमतोल चयापचयामुळे मूत्रपिंडावर ताण निर्माण होतो व गाऊट होण्याची शक्‍यता वाढते.

उपाय - 
- पिलांना पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध असावे. 
- पिलांना शिफारशीनुसार वयोमानाप्रमाणे खाद्य द्यावे. 
- आजार झाल्यास एक दिवस भरडलेली मका व गुळाचे पाणी पिण्यासाठी द्यावे. 
- शास्त्रोक्तपणे संतुलित आहार द्यावा. 
- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत.

7. लसीकरण - 
ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये विविध रोगांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. उपचारापेक्षा प्रतिबंधक लसीकरण हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार खालील रोगाचे लसीकरण करावे.

संपर्क - डॉ. एम. व्ही. धुमाळ, 9422176705. 
(कुक्कुटपालन विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Monday, February 8, 2016

मधमाशी / मधुमक्षिका पालन

आर्थिक प्राप्तीचा एक उद्योग म्हणून मधमाशी पालनाचे फायदे उत्पादन प्रक्रिया
अ. मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य
आ. मधुमाशांच्या प्रजाती
इ. मधाच्या पोळ्यांची स्थापना
ई. मधमाशांच्या वसाहतीची स्थापना करणे
उ. वसाहतींचे व्यवस्थापन
ऊ. मधाची काढणी

आर्थिक प्राप्तीचा एक उद्योग म्हणून मधमाशी पालनाचे फायदे
मधमाशी पालनासाठी वेळ, पैसे आणि पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मध आणि माशांनी तयार केलेलं मेण शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशा स्रोतांसाठी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. मधमाशा फुलोरा येणा-या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. 

मध हे एक रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमधे संगोपन करुन आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक किंवा गटगटानं मधमाशी पालन सुरु करता येऊ शकते. मध आणि मेण यांच्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. 

महाबळेश्वर येथे मधमाशी पालन व्यवसायाचे 15 दिवस प्रशिक्षण मिळते. 45 हजार रुपयांना मधमाशांच्या 10 पेट्या मिळतात. या एका पेटीत 10 फे्रम तयार होतात. फे्रममध्ये एक एक करून मधमाशा शिरतात व मध जमा करतात. एका पेटीत 30 ते 40 हजार मधमाशा राहतात. खादी ग्रामोद्योग तर्फे अर्थसहाय्यित कर्ज मिळते. यामध्ये जवळपास 80 टक्के अनुदान असते, तर 20 टक्के रक्कम परतफेड करायची असते. सरासरी 100 रुपये किलो दराने मधाची विक्री होते. 


थंडीपासून बचाव
दहा सेल्सियसपेक्षा कमी तापमानास मधमाश्या उडणे थांबवतात आणि पोळ्याच्या मध्यवर्ती भागावर गोळा होतात. थंडीमध्ये एकत्र येण्याच्या या प्रकारामुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या हालचालीमुळे राणी माशीभोवतीचे तापमान २७ सेंटिग्रेडपर्यंत ठेवले जाते. या तापमानास राणी माशी अंडी घालू शकत नाही. पोळ्याचे तापमान 34 अंशापर्यंत वाढल्यानंतर राणी आणखी एकदा अंडी घालण्यास प्रारंभ करते. कामकरी माशा सतत पोळ्याच्या आतील भागाकडून बाहेरील भागाकडे फिरत राहिल्याने कोणत्याही माशीस असह्य थंडीस तोंड द्यावे लागत नाही. बाहेरील तापमान जेवढे थंड तेवढे एकत्र आलेल्या माश्यांचे थर वाढत जातात. थंडीच्या दिवसात माशा साठवून ठेवलेला मध शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी वापरतात. सतत खर्च केलेल्या मधामुळे पोळ्याचे वजन कमी होत जाते. थंडीच्या तीव्रतेनुसार तीस ते सत्तर टक्के मध खर्च केला जातो.


मधुमक्षिका पालनामधील धोके -
पाश्चिमात्य मधुमक्षिका पालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. वरवर पाहता एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते. आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या मा्श्यांची आवशकता आहे त्याहून कमी माश्या राहिल्या म्हणजे पोळेच नाहीसे होते. २००७मध्ये तीस ते सत्तर टक्के मधमाश्यांची पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काहीं बदल किंवा अनिश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेत सुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी आतापर्यंत कधीच झालेली नव्हती. या प्रकारास ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे नाव मिळाले. हा प्रकार नवा आहे की इतर बाह्य घटकामुळे झाला याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे. पण हे एक लक्षण (सिंड्रोम) असून आजार नाही असे दिसते. जसे इस्रायली अक्यूट परजीवी विषाणूमुळे इस्राईल मध्ये मधमाश्या जवळजवळ संपल्या. २००९मध्ये झालेल्या संशोधनामध्ये मधमाश्यांमधील प्रथिन निर्मितीसाठी एकच जनुक कारणीभूत आहे असे सिद्ध झाले. मधमाश्यांमधील प्रथिननिर्मितीसाठी डिसिट्रिव्हिरिडी जातीचा विषाणू मधमाशीमधील रायबोसोम मधील जनुकीय यंत्रणेवर परिणाम करतो असे दिसले आहे.

उत्पादन प्रक्रिया
मधमाशांचं संगोपन शेतावर किंवा घरी पेट्यांमध्ये करता येते.

अ. मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य
पोळे ही एक साधी लांब पेटी असते आणि तिच्या वरील भागावर अनेक पट्ट्या असतात. या पेटीचा अंदाजे आकार १०० सेंमी लांब, ४५ सेंमी रुंद आणि २४ सेंमी उंच असा असावा. ही पेटी २ सेंमी जाड असावी आणि पोळे १ सेंमी रुंदीच्या प्रवेश छिद्रांसहित एकत्र चिटकवलेले आणि स्क्रूने घट्ट केलेले असावे. वरील पट्ट्या पोळ्याच्या रुंदीइतक्याच लांबीच्या असाव्यात जेणेकरुन त्या आडव्या बरोबर बसतील आणि त्यांची जाडी १.५ सेंमी असावी म्हणजे एक वजनदार मधाचे पोळे पेलण्यासाठी त्या पुरेशा होतील. प्रत्येक स्वतंत्र वरील पट्टीला एकेक पोळे तयार करण्यासाठी मधमाशांना आवश्यक नैसर्गिक जागा मिळण्याकरता ३.३ सेंमीची रुंदी ठेवणं गरजेचं आहे.धुराडं हे दुसरं महत्वाचं साधन आहे. ते लहान पत्र्याच्या डब्यापासून तयार करता येतं. मधमाशा आपल्याला चावू नयेत आणि त्यांना नियंत्रित करता येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कापड - मधमाशा पालन क्षेत्रात काम करताना माशांच्या दंशापासून आपले डोळे आणि नाकाचा बचाव करण्यासाठी. सुरी वरील पट्ट्या सैल करण्यासाठी आणि मधाची पोळी कापण्यासाठी. पिस मधमाशांना पोळ्यापासून दूर करण्यासाठी. राणीमाशीविलगक Queen Excluder

आ. मधुमाशांच्या प्रजाती
भारतामध्ये मधमाश्यांच्या चार प्रजाती आहेत. त्या खालीलप्रमाणेः

दगडी माशी अपीस डोरसाटा या माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन ५०-८० किलो असतं. लहान माशी अपीस फ्लोरिआ या माशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे अंदाजे २००-९०० ग्रॅम मध मिळतो. भारतीय मधमाशी अपीस सेराना इंडीका या मधमाशांद्वारे होणारं मध उत्पादन दर वर्षी प्रति वसाहत ६-८ किलो असतं. युरोपिअन मधमाशी इटालिअन मधमाशी अपीस मेल्लीफेरा यांच दर वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन २५-४० किलो असतं.
डंखरहित मधमाशी त्रिगोना इरीडीपेन्नीस वर उल्लेख केलेल्या प्रजातींच्या शिवाय, केरळमध्ये आणखी एक प्रजाती अस्तित्वात आहे तिला डंखरहित मधमाशी म्हणतात. त्या ख-या अर्थानं डंखरहित नसतात, परंतु त्यांचा डंख पुरेसा विकसित झालेला नसतो. त्या परागीकरण चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्याद्वारे दर वर्षी ३००-४०० ग्रॅम मध उत्पादन मिळतं.

इ. मधाच्या पोळ्यांची स्थापना
मध उत्पादन केंद्र पाण्याचा चांगला निचरा असलेल्या खुल्या जागेत उभारावं, शक्यतो फळांच्या बागांच्या जवळ, मकरंद, परागकण आणि पाणी भरपूर असलेल्या ठिकाणी उभारणी करावी. पोळ्यामधलं तापमान आवश्यक तितकं राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणं महत्वाचं आहे. पोळ्याच्या स्टँडच्या भोवती मुंग्या शिरु नयेत यासाठी पाणी भरलेले खंदक (अँट वेल्स) ठेवाव्यात. वसाहतींचे तोंड पूर्वेच्या दिशेला असावं, पाऊस आणि सूर्यापासून पेटीचं रक्षण होण्यासाठी दिशेमध्ये थोडेफार बदल करावेत. या वसाहतींना पाळीव जनावरं, अन्य प्राणी, गर्दीचे रस्ते आणि रस्त्याकडील दिव्याच्या खांबांपासून दूर ठेवावं.

ई. मधमाशांच्या वसाहतीची स्थापना करणे
मधमाशांची वसाहत स्थापन करण्यासाठी, जंगलात वसलेली वसाहत एखाद्या पोळ्याकडे स्थानांतरित करुन किंवा मधमाशांचा जत्था जवळून जात असताना त्यांना तिथे वसण्यासाठी आकृष्ट करुन मधमाशा मिळवता येतात. तयार केलेल्या पोळ्यामध्ये एक जत्था किंवा एक वसाहत वसवण्याच्या पूर्वी, जुन्या पोळ्याचे करड्या रंगाचे तुकडे किंवा पोळ्यातील मेण नव्या पोळ्याला चोळून त्याचा वास मधमाशांसाठी ओळखीचा करणं फायद्याचं ठरतं. शक्य झाल्यास, राणी मधमाशीला एका नैसर्गिक जत्थ्यातून पकडून एखाद्या पोळ्याखाली ठेवावं आणि अन्य मधमाशांना आकृष्ट करावं. पोळ्यामध्ये वसवलेल्या जत्थ्याला काही आठवडे अर्धा कप गरम पाण्यात अर्धा कप पांढरी साखर विरघळवून अन्न द्यावं म्हणजे पट्ट्यांच्या लगत पोळं जलदगतीनं तयार करण्यात मदत होईल. अधिक गर्दी होऊ देऊ नये.

उ. वसाहतींचे व्यवस्थापन
मधाच्या पोळ्यांची तपासणी शक्यतो सकाळच्या तासांमध्ये मधाच्या हंगामामध्ये आठवड्यातून एकदा करावी. पोळ्याची स्वच्छता पुढील क्रमाने करावी, छप्पर, सुपर /सुपर्स, ब्रूड चेंबर्स आणि फ्लोअर बोर्ड. सुदृढ राणी माशी, अळ्यांची वाढ, मध आणि परागकणांची साठवणूक, राणी चौकटींची उपस्थिती, माशांच्या संख्या आणि नर मधमाश्यांच्या वाढ पाहण्यासाठी वसाहतींवर नियमितपणे देखरेख ठेवा.

मधमाश्यांच्या खालीलपैकी कोणत्याही शत्रूंद्वारे त्रास होत असल्यास त्याचा शोध घ्या. मेण पतंग (गॅलेरिया मेल्लोनेला) -  मधमाशांच्या पेटीतील पोळं, कोपरे आणि पोकळीतून सर्व अळ्या आणि रेशीमयुक्त जाळ्या काढून टाका.

मेण कीडे (प्लॅटीबोलियम स्प.) - प्रौढ कीडे गोळा करुन नष्ट करा. 
तुडतुडे - Mites: पोळ्याची चौकट आणि तळाचा बोर्ड ताज्या बनवलेल्या पोटॅशिअम परमँग्नेटमध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्यांनी स्वच्छ करा. तळाच्या बोर्डवरील सर्व तुडतुडे निघून जाईतोवर ही प्रक्रिया वारंवार करा. 

अनुत्पादन काळातील व्यवस्थापन ज्येष्ठ माशांना काढा आणि उपलब्ध सुदृढ नव्या माशांना ब्रूड चेम्बरमध्ये नीट बसवा. आवश्यक असल्यास, विभाजन बोर्ड बसवा. राणीच्या चौकटी आणि नर मधमाशांची चौकटी, दिसल्यास नष्ट करा.

भारतीय मधमाश्यांसाठी प्रति आठवडा प्रति वसाहत २०० ग्रॅम साखर या दराने साखर सीरप (१:१) द्या. पळवापळवी टाळण्यासाठी सर्व वसाहतींना एकाचवेळी अन्न द्या. मधाची उपलब्धता असण्याच्या काळातील व्यवस्थापन मध उपलब्ध असण्याच्या हंगामापूर्वी वसाहतीत पुरेशा संख्येनं माशा ठेवा. पहिले सुपर आणि ब्रूड चेम्बर यांच्यामध्ये जास्तीत जास्त जागा द्या आणि पहिल्या सुपरच्या वर नको. राणीमाशीला ब्रूड चेम्बरमध्येच ठेवण्यासाठी ब्रूड आणि सुपर चेम्बर यांच्या दरम्यान राणीला वेगळी करण्याच्या शीट्स ठेवा. वसाहतीची तपासणी आठवड्यातून एकदा करा आणि मधानं भरलेल्या फ्रेम्स सुपरच्या बाजून काढून घ्याव्यात. तीन-चतुर्थांश भाग मधानं किंवा परागकणांनी भरलेल्या आणि एक-चतुर्थांश बंदीस्त अळ्यांनी भरलेल्या फ्रेम्स चेंबरच्या बाहेर काढून घ्याव्यात आणि त्यांच्या जागी रिकामी पोळी किंवा फ्रेम्स आधारीसहित ठेवण्यात याव्यात. पूर्णतः बंदीस्त, किंवा दोन-तृतियांश आवरणयुक्त पोळी मध काढण्यासाठी बाहेर काढण्यात यावीत आणि मध काढून घेतल्यानंतर सुपर्समध्ये परत ठेवावीत.

ऊ. मधाची काढणी
मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे, शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्वाची दोन उत्पादने आहेत.

मधमाशीचे जीवनचक्र
समूहाने राहणाऱ्या कीटकापैकी एक मधमाशी. अशा प्राण्यांना eusocial असे म्हणण्याची पद्धत आहे. सुझान बात्रा यानी ही संज्ञा दिली..[१]. याचा मराठीमध्ये “ समूह सहजीवन वृत्ती” असे म्हणता येईल. समूहाने पिढ्यान्‌पिढ्या राहताना या गटाएवढे सामूहिक वर्तन जनुकीय पातळीपर्यंत पोहोचले आहे. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्याच्या राणी, नर, आणि कामकरी माश्यांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही. सामान्यपणे सर्व पोळ्यामधील समान गोष्टी खालीलप्रमाणे-

१. कामकरी माश्या राणीमाशीनेने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे काम कामकरी माश्यांचे असते. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. राणी माशी शुक्रगाहिकेमधील [[शुक्रजंतू]पासून अंडे फलित करू शकते. कामकरी माश्या आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पड्लेल्या अळ्याना कामकरी माश्या प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात अंळ्याना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्यापासून राणी माशी तयार होते. अनेक वेळा कात टाकल्यानंतर अळी स्वत:भोवती कोश तयार करते.

२. कामकरी माश्यांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्याना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माश्यांच्या शरीरात असलेल्या ग्रंथीनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्यांचे वय जसे अधिक होईल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि परागकण आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मध आणि पराग गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त काहीं काम करीत नाहीत.

३. कामकरी माश्या अन्न गोळा करतात. ठरावीक प्रकारच्या “वॅगल डान्स”च्या सहाय्याने त्या परस्पराना अन्न आणि पाणी कोठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर वर्तुळाकार डान्स आणि लांबवर असेल तर वॅगल डान्स अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. मधमाश्यांच्या “डान्स लँग्वेज” च्या अभ्यासास कार्ल व्हॉन फ्रिश्च या ऑस्ट्रियामधील संशोधकास १९७३ साली फिजिऑलॉजी आणि मेडिसीनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. एपिस मेलिफेरा या मधमाशीवर त्यानी हा अभ्यास केला होता.

४. अन्न गोळा करून आणलेल्या माष्यांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माश्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे “थरथराट नृत्य”, ट्रेम्बल डान्स केला जातो.

५. नवी राणी मधमाशी पोळ्यापासून दूरवर उड्डाण करून अनेक नर माशांशी मैथुन करून आपल्या शुक्रकोशिकेमध्ये शुक्रजंतू साठवून ठेवते. मिथुनानंतर नर माशीचा मृत्यू होतो. साठवलेल्या शुक्रजंतूपासून फलित अंडे घालायचे की अफलित हे राणी माशी नेमके कसे ठरविते हे नीटसे समजले नाही.

६. मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून अस्तित्वात असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माशानी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटकसृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.

मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात.

Saturday, February 6, 2016

लाळ्या खुरकुत - उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला

माझीशेती : FFC (160206)
लाळ्या खुरकुत - उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला

लाळ्या खुरकुत रोगाची लागण झाल्यानंतर ती नियंत्रणात येण्यास बराच उशीर लागतो. या काळात बाधित जनावर चारा खाऊ शकत नाही, लंगडत चालते, दुधाळ जनावराचे दुध घटते. गंभीर परिस्थितीत जनावर दगावण्याची शक्यता असते.
त्यामुळे नुकसान होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक लस टोचावी.

* प्रतिबंधात्मक उपाय आणि घ्यावयाची काळजी -
- थंडी ओसरताना फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडील गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या अशा सर्व दोन खुरी जनावरांना लाळ्या खुरकुत या रोगासाठी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
- सहा महिनेपेक्षा मोठ्या वासरांनाही लस टोचावी.
- गाभण गाईंना डॉक्टरच्या सल्याने लस टोचावी.
- या कला बाधित जनावर स्वतंत्र दूर बांधावे, पाणी स्वंतंत्र पाजावे. खुरातील जखम पोटाशियामच्या पाण्याने किंवा त्रिफळा चुर्णच्या पाण्याने धुवून काढावी.
- गावात साथ आली असल्यास सार्वजनिक ठिकाणी जनावरांना पाणी पाजू नये.
- लस स्वत: आणली किंवा घरी ठेवली तर २ ते ८ सेल्सियस तापमानात ठेवावी वाहतूकही या तापमानात करावी. शक्यतो गावातील सर्व जनावरांना लस द्यावी.

(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)

* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
**********************
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
**********************
व्हाट्स अप मेसेजसाठी खालीलप्रमाणे माहिती 9975740444 वर फक्त व्हाट्स अप मेसेज द्वारा पाठवा.
नाव -
संपुर्ण पत्ता -
जमीन क्षेत्र (एकर)-
प्रमुख पिक व त्याचे क्षेत्र -