Saturday, March 10, 2018

महिलांच्या विकासासाठी शासकीय योजना

मनोधैर्य योजना
  • बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत बालक आणि हल्ला पिडीतांकरिता मनोधैर्य योजना (महिला आणि बालक)
  • बलात्कार आणि हल्ला पिडीतांना  (महिला आणि बालक) झालेल्या मानसिक आघातातून सावरणे सर्वात महत्वाचे असते. 
  • बाधित निवारा, आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत तसेच समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणेही महत्वाचे असते.
  • पिडीतांना २ लाख रुपयांची आणि विशेष प्रकरणांमध्ये ३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
  • पिडीतांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असा निवारा, समुपमदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

माझी कन्या भाग्यश्री योजना
  • या उपक्रमातंर्गत मुलींच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी, बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी आणि कौशल्ये विकसनासाठी मुलींच्या कुंटुंबियांना आर्थिक प्रोत्साहन देण्यात येईल.
  • मातांना पारितोषिक : मुलीच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी आणि योग्य पोषणासाठी मुलीच्या पालकांना नियमीतपणे आर्थिक लाभांश देण्यात येतात.
  • मुलीकरिता पारितोषिक : वयाच्या १८ व्या वर्षी, मुलीला कौशल्ये विकसनासाठी आणि उच्चशिक्षणासाठी रुपये १ लाख देण्यात येतील जेणे करून भविष्यात तिला रोजगार मिळाविता येईल आणि तिच्या निश्चित उत्पन्नाची सोय होईल, परंतु तो पर्यंत तिचा विवाह झालेला असता कामा नये.
  • आजीला पारितोषिक : बहुसंख्य कुंटुंबामध्ये घरातील सासूसासऱ्यांचा मुलगा जन्माला यावा असा आग्रह असतो. यावर तोडगा म्हणून मुलीच्या वडीलांच्या आईला सोन्याचे नाणे तसेच माननीय महिला आणि बालक विकास मंत्र्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • गावाला पारितोषिक :  कोणत्याही गावात जेथे लिंग गुणोत्तर १००० पेक्षा अधिक असेल त्यांना माननीय महिला आणि बालक विकास मंत्र्यातर्फे ५,००.००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
  • या योजनेतंर्गत शासन दारीद्र्यरेषेवरील कुंटुंबातील मुलींना रुपये २१,२०० विमा संरक्षण पुरविण्यात येईल.

बाल संगोपन संस्था (सी सी आय)
  • महिला आणि बाल विकास विभागाला जाणीव आहे की बालकांचे संरक्षण म्हणजेच बालकांना असलेल्या संभाव्य, वास्तविक वा जिविताच्या तसेच व्यक्तित्व आणि बाल्याला असलेल्या धोक्यापासून रक्षण करणे.
  • कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून मुलांचा दुबळेपणा कमी करणे आणि एकही मूल सामाजिक सुरक्षा कवचाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणे.
  • जे चुकून सुरक्षा कवच्याचा बाहेर पडतील त्यांना योग्य ते संरक्षण आणि मदत देऊन पुन्हा सामाजिक सुरक्षा कवचात आणणे.
  • संरक्षण हा प्रत्येक बालकाचाच मुलभूत अधिकार असला तरी काही मुले अधिक दुबळी असतात आणि त्यांच्याकडे इतरापेक्षा अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असते.
  • या मुलांना सुरक्षित वातावरण पुरविण्या बरोबरच इतर मुले देखील संरक्षितच राहतील याची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. याचे कारण असे की बालकांच्या इतर सर्व अधिकारांशी बाल संरक्षण हा अधिकार संलग्न आहे.
  • या बाबी लक्षात घेऊन विभागाने ११०० पेक्षाही अधिक बाल संगोपन वसतीगृहांचे जाळे तयार केले आहे, जेथे कायद्याचे उल्लघंन करतांना सापडलेली आणि आरोपी बालके तसेच ज्यांची काळजी घेणे अन संरक्षण करणे आवश्यक आहे अशा मुलांची मैत्रीपूर्ण व्यवहाराने योग्य ती काळजी घेतली जाते. त्यांना संरक्षण दिले जाते, त्यांचा विकास, उपचार, सामाजात मिसळणे अशा मुलभूत गरजा पूर्ण केल्या जातात.
  • बाल संगोपन केंद्र अत्यावश्यक सेवा आणि आणीबाणीमध्ये पोहचण्यासाठी, संस्थात्मक देखभाल, कुंटुंब, सामाजिक देखभाल यांच्यावर आधारीत  आणि मदत सेवा देण्याकरिता आपली संस्थात्मक रचना मजबूत करतात तसेच देश, प्रदेश , राज्य आणि जिल्हापातळीवर कार्यरत असतात.

निराश्रित महिलां, किशोरवयीन माता, अत्याचार पिडीत महिलां यांच्यासाठी राज्य महिला गृहे (वय गट १८ ते ६० वर्षे
  • महिलांना वास्तव्याकरिता सुरक्षित आणि संरक्षित वातावरण आणि मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात.
  • पिडितांचे विवाह आणि रोजगार यांच्याद्वारे पुनर्वसन सुनिश्चित केले जाते.
  • लाभार्थीचे राज्यात एक महिना वास्तव्य झाल्यानंतर प्रती लाभार्थी १००० रुपये, ५०० रुपये तिच्या पहिल्या मुलांकरिता आणि ४०० रुपये तिच्या दुसऱ्या मुलाकरिता मासिक अनुदान स्वरूपात देण्यात येतात.

+ देवदासी कल्याण योजना
  • देवदासींना निर्वाहाकरीता आणि त्यांना व त्यांच्या मुलींना विवाहाकरिता अनुदान देण्यात येते.
  • देवदासींच्या मुलांना शालेय गणवेष तसेच इतर शालोपयोगी साहित्य घेण्याकरिता अनुदान  देण्यात येते.
  • देवदासींच्या मुलांसाठी वसतीगृहाची सोय पुरविण्यात येते.


+ अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान
  • या योजनेचा शासकीय/बिगर शासकीय सेवाभावी संस्था जसे की राज्येगृहे, अनाथालये, निवारागृहे, माहेर योजनेतंर्गत संरक्षण गृहे आणि बालगृहे येथे राहणाऱ्या, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलींना लाभ घेता येतो.
  • मुलीच्या नावाने रुपये २५,००० चा धनादेश मुलीच्या नावे तिच्या बॅंकेतील खात्यात (राष्ट्रियकृत बॅंकेत) जमा करण्यात येतो, जेणे करून ती विवाहसंबंधीत खर्च करू शकेल तसेच भांडीकुडी इत्यादी विकत घेऊ शकेल.

+ शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
  • निराश्रित आणि विधवांच्या मुलींच्या विवाहाकरिता प्रत्येक  विवाहबध्द होणाऱ्या जोडप्याला विवाह पूर्व अनुदान देण्यात येते.
  • या योजनेचा लाभ वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या निराश्रित महिला आणि विधवांच्या मुलींना घेता येतो
  • अन्य कोणत्याही स्त्रोतातून अनुदान घेणाऱ्या मुलीला या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही.


+ महिला समुपदेशन केंद्र
अत्याचार पिडितांना (महिला आणि बालक) झालेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी समुपदेशनाची मदत पुरविण्यात येते.

+ अत्याचारग्रस्त पिडीत महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला केंद्र
  • अत्याचार पिडीत महिलांना सल्ला आणि मार्गदर्शन पुरविण्यात येते.
  • अशा पिडितांकरिता ही केंद्रे मार्गदर्शन आणि कायदेशीर मदतीबाबतीत सल्ला मिळण्याचे तसेच रोजगार आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्याचे ठिकाण असते.

+ निराश्रित महिलांसाठी आधार गृहे
  • आधारगृहे सुरक्षित आणि संरक्षित वातावरण पुरवितात. तसेच अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षा,वैद्यकीय मदत,शैक्षणिक आणि प्रशिक्षण संबंधित सुविधा, कायदेशीर सल्ला आणि इत्यादी मुलभूत सुविधा पुरवितात.
  • ३० दिवसांच्या वास्तव्यानंतर पिडीत महिला माहेर योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतात. विवाह/कौशल्येविकास इत्यादींने पिडितांचे पुनर्वसन करण्यात येते.

+ बाल सल्ला केंद्र
  • राज्याने मुलांच्या सर्जनशील क्षमतांच्या विकासासाठी ही केंद्रे स्थापन करुन विविध उपक्रम करण्यासाठी, संधी आणि संवाद साधण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, नवनिर्मितीकरिता तसेच त्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार सादरीकरण करून दाखविण्यासाठी सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
  • सध्या झोपडपट्टीमधून अशा प्रकारची केंद्रे उघडण्यात आली आहे, मुंबईत सुरु असणाऱ्या अशा एका केंद्रात ७५ ते १०० बालके आहेत.

+ बाल संगोपन योजना (मुलांसाठी कौटुंबिक देखभाल)
  • या उपक्रमातंर्गत ज्या मुलांचे पालक अनेक कारणांमुळे जसे की विकार( दिर्घकालीन आजार), मृत्यू, विभक्त होणे, किंवा एका पालकाने सोडून जाणे किंवा अन्य काही आपत्तीमुळे त्यांची काळजी घेण्यास असमर्थ असतात त्यांना तात्पुरते दुसरे कुंटुंब उपलब्ध करून दिले जाते.
  • कुंटुंबाकडून काळजी घेतली जाणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार असतो म्हणून जोपासना (फ़ॉस्टर) कार्यक्रमातंर्गत मुलाला थोड्या कालावधीसाठी किंवा दिर्घकालावधीसाठी कुंटुंब उपलब्ध करून दिले जाते.
  • जोपासना करणाऱ्या पालकांना शासनातर्फे प्रत्येक मुलासाठी त्यांच्या मुलभूत गरजांकरिता ४२५ रुपये मासिक अनुदान सेवाभावी संस्थेमार्फत देण्यात येते. अमंलबजावणी करणाऱ्या सेवाभावी संस्थेला त्या कुंटुंबाला भेटी देणे आणि इतर प्रशासकीय कामाकरिता प्रत्येक मुलासाठी  ७५ रुपये मासिक अनुदान देण्यात येते.

+ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना
  • पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे. (स्त्रीभृण हत्यांना प्रतिबंध करणे)
  • मुलींच्या जिवीताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे.
  • मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे.

+ काम करणार्‍या महिलांच्या मुलांकरीता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
  • या उपक्रमातंर्गत शाला-पूर्व मुलांना आवश्यक ती प्रबोधनपर खेळणी आणि शैक्षणिक साहित्य पुरविले जाते

+ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
  • या योजनेचे मूळ उद्दिष्ट गर्भवती आणि स्तनपान कालावधीत महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना पोषक आहार उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारणे.
  • गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला शासनातर्फे मिळणारे आर्थिक लाभ घेता येतात. शासनाकडून दोन हप्त्यांमध्ये एकूण रुपये ६००० मदत दिली जाते. 
  • प्रथम प्रसुतीच्यावेळी (रुपये ३०००) आणि बालक सहा महिन्यांचे झाल्यावर (रुपये ३०००) देण्यात येतात.
  • सद्यस्थितीत ही योजना अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे.

+ राजीव गांधी सबला योजना
  • किशोर वयातील मुलींना स्वयं-विकास आणि सबलीकरणाकरिता सक्षम करणे
  • त्यांच्या पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारणे.
  • त्यांच्यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पोषण, पौगंडावस्थेतील प्रजनन आणि लैंगिक आरोग्य (ए आर एस एच), कुंटुंब आणि मुलांची काळजी याबाबत जाणीव जागृती करणे.
  • त्यांच्या गृह कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि व्यावसायिक कौशल्यांमध्ये सुधारणा करा.
  • शालाबाह्य किशोरावस्थेतील मुलींना औपचारीक/ अनौपचारीक शिक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणणे.
  • त्यांना सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, बॅंक, पोलीस ठाणे इत्यादी सार्वजनिक सेवांबाबत माहिती देणे आणि मार्गदर्शन करणे.
  • सद्यस्थितीत ही योजना अमरावती, बीड, नांदेड, सातारा, गोंदीया आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.

+ किशोरी शक्ति योजना
  • किशोर वयातील मुलींना बालविवाहाचे आणि वारंवारं मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच संतुलित आहाराची आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याची आवश्यकता इत्यादी बाबतचे आरोग्य आणि स्वच्छते संबंधीत शिक्षण तसेच प्रशिक्षण देणे.
  • या योजनेतंर्गत किशोरींकरिता ’किशोरी मेळावा’, ’किशोरी आरोग्य शिबीर’ असे विविध प्रकारचे कार्यक्रम अंगणवाडी केंद्र पातळीवर  आयोजित केले जातात. ज्या किशोरींना रक्तक्षय झाला असेल अशा मुलींची आर्यन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देऊन विशेष काळजी घेतली जाते तसेच त्यांना स्वस्वच्छते विषयी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
  • सद्यस्थितीत ही योजना  अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदूर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये (केवळ २३) सुरू आहे.

+ एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस)
या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.
  • पुरक पोषण आहार
  • लसीकरण
  • आरोग्य तपासणी
  • संदर्भ आरोग्य सेवा
  • अनौपचारीक शाला-पूर्व शिक्षण
  • पोषण आणि आरोग्य शिक्षण

जागतिक महिला दिन आणि रौप्यमहोत्सवी वर्ष - स्वप्ने हि दिवास्वप्नेच राहू नयेत यासाठी महिलांच्या पाठीशी माझीशेती खंबीरपणे उभे आहे. गरजा शोधून त्या गरजा पुर्ण करण्यावर भर दिल्यास आपोआप उद्योग प्रेरणा मिळते.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आरवडे ता. तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मा. श्रीमती चव्हाण, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती तासगाव यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात झाली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माहिती दिली तसेच १९९३ ते २०१८ मधील महिला आयोगाच्या खंबीर वाटचालीची मुद्देसूद माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये श्री. अर्जुन माळी यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची पार्श्वभुमी आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या ग्रामीण भागातील बचत गटांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. 

आगकाडीच्या पेटीतील काडी आणि माणसाच्या मनातील स्वप्ने यांच्यामध्ये एक अतूट साम्य आहे ते म्हणजे काडी जोपर्यंत बाहेर काढून घासली जात नाही तोपर्यंत तिच्यामध्ये छुपा असलेला वणवा दिसत नाही अगदी तसेच आपल्या मनातील इच्छा जोपर्यंत वास्तवात आणण्यासाठी घासल्या जात नाहीत तोपर्यंत स्वप्ने हि दिवास्वप्नेच राहतात. या उदाहरणाने श्री. महेश बोरगे यांनी बचत गटांच्या सामुहिक शक्तीचे परिवर्तन उद्यमशीलते बदलून सक्षम होण्यासाठी आवश्यक उद्योजकता विकास या विषयाला सुरुवात केली.


व्यवसाय स्थापन करताना वैयक्तिक, सामाजिक किंवा मानसिक गरजा शोधून त्या गरजा पुर्ण करण्यावर भर दिल्यास आपोआप उद्योग प्रेरणा मिळते. जात्याच व्यावसायिकाला जास्त अडचणी निर्माण होणे आणि त्या सोडवण्यासाठी सक्षम होण्यासाठी नियोजन कौशल्य, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संदेशवहन याचा उदाहरणासहीत उहापोह महेश बोरगे यांनी त्यांच्या भाषणात केला. प्रत्येक व्यावसायिकाला उत्पादन, व्यापार आणि सेवा या तिन्ही क्षेत्रात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष काम करावे लागते. विमा आणि मार्केटिंग हे व्यवसायातील अनन्य साधारण घटक आहेत, त्याशिवाय व्यवसाय शाश्वत आणि सक्षम होऊ शकत नाही. मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी माझीशेतीच्या व्यवसाय शृंखलेचा भाग बनण्याचे आवाहन महेश बोरगे यांनी केले. 

मा. वकील श्री. अनिल माने यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यकमाची सांगता बचत गटातील उद्योजक महिला यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी शासकीय, कंत्राटी, निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या व बचत गटांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.

Friday, March 9, 2018

बचत गटांनी सक्षम होणेसाठी एकत्रित येणे महत्वाचे, महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महेश बोरगे यांचे वक्तव्य....

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मांजर्डे ता. तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मा. सरपंच रणखांबे यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात झाली. 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माहिती दिली तसेच १९९३ ते २०१८ मधील महिला आयोगाच्या खंबीर वाटचालीची मुद्देसूद माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये श्री. अर्जुन माळी यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची पार्श्वभुमी आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या ग्रामीण भागातील बचत गटांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. 
आगकाडीच्या पेटीतील काडी आणि माणसाच्या मनातील स्वप्ने यांच्यामध्ये एक अतूट साम्य आहे ते म्हणजे काडी जोपर्यंत बाहेर काढून घासली जात नाही तोपर्यंत तिच्यामध्ये छुपा असलेला वणवा दिसत नाही अगदी तसेच आपल्या मनातील इच्छा जोपर्यंत वास्तवात आणण्यासाठी घासल्या जात नाहीत तोपर्यंत स्वप्ने हि दिवास्वप्नेच राहतात. या उदाहरणाने श्री. महेश बोरगे यांनी बचत गटांच्या सामुहिक शक्तीचे परिवर्तन उद्यमशीलते बदलून सक्षम होण्यासाठी आवश्यक उद्योजकता विकास या विषयाला सुरुवात केली.

व्यवसाय स्थापन करताना वैयक्तिक, सामाजिक किंवा मानसिक गरजा शोधून त्या गरजा पुर्ण करण्यावर भर दिल्यास आपोआप उद्योग प्रेरणा मिळते. जात्याच व्यावसायिकाला जास्त अडचणी निर्माण होणे आणि त्या सोडवण्यासाठी सक्षम होण्यासाठी नियोजन कौशल्य, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संदेशवहन याचा उदाहरणासहीत उहापोह महेश बोरगे यांनी त्यांच्या भाषणात केला. प्रत्येक व्यावसायिकाला उत्पादन, व्यापार आणि सेवा या तिन्ही क्षेत्रात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष काम करावे लागते. विमा आणि मार्केटिंग हे व्यवसायातील अनन्य साधारण घटक आहेत, त्याशिवाय व्यवसाय शाश्वत आणि सक्षम होऊ शकत नाही. मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी माझीशेतीच्या व्यवसाय शृंखलेचा भाग बनण्याचे आवाहन महेश बोरगे यांनी केले. 

कार्यकमाची सांगता बचत गटातील उद्योजक महिला यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी शासकीय, कंत्राटी, निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या व बचत गटांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.

कवठे एकंद (तासगाव) येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्थापनेचे (२५ वर्षे) रौप्य महोत्सवी वर्ष आणि “८ मार्च” जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानतर्फे उद्योजकता विकास विषयावर कार्यशाळा....

कार्यशाळेमध्ये प्रास्ताविक करताना मा. श्री. अर्जुन माळी
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कवठे एकंद जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पंचायत समिती महिला व बाल कल्याण कार्यालयाच्या वतीने पर्यवेक्षक श्रीमती केंगार यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये श्री. अर्जुन माळी यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची पार्श्वभुमी आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या ग्रामीण भागातील बचत गटांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
आगकाडीच्या पेटीतील काडी आणि माणसाच्या मनातील स्वप्ने यांच्यामध्ये एक अतूट साम्य आहे ते म्हणजे काडी जोपर्यंत बाहेर काढून घासली जात नाही तोपर्यंत तिच्यामध्ये छुपा असलेला वणवा दिसत नाही अगदी तसेच आपल्या मनातील इच्छा जोपर्यंत वास्तवात आणण्यासाठी घासल्या जात नाहीत तोपर्यंत स्वप्ने हि दिवास्वप्नेच राहतात. या उदाहरणाने श्री. महेश बोरगे यांनी त्यांच्या उद्योजकता विकास या विषयाला सुरुवात केली. 
कार्यशाळेमध्ये उद्योजकता विकास याविषयावर
मार्गदर्शन करताना मा. महेश बोरगे...

व्यवसाय स्थापन करताना वैयक्तिक, सामाजिक किंवा मानसिक गरजा शोधून त्या गरजा पुर्ण करण्यावर भर दिल्यास जास्त अडचणी निर्माण होत नसतात हे सांगताना नियोजन कौशल्य, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संदेशवहन याचा उदाहरणासहीत उहापोह महेश बोरगे यांनी त्यांच्या भाषणात केला. प्रत्येक व्यावसायिकाला उत्पादन, व्यापार आणि सेवा या तिन्ही क्षेत्रात प्रत्यक्ष अ प्रत्यक्ष काम करावे लागते पण मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी माझीशेतीच्या व्यवसाय शृंखलेचा भाग बनण्याचे आवाहन महेश बोरगे यांनी केले. विमा आणि मार्केटिंग यांचा व्यवसायातील अनन्य साधारण महत्वाचा रोल यावर संपूर्ण मार्गदर्शन या कार्यशाळेत केले गेले. 

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश बोरगे, यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माहिती दिली तसेच १९९३ ते २०१८ मधील महिला आयोगाच्या खंबीर वाटचालीची मुद्देसूद माहिती सांगितली. 

कार्यशाळेमध्ये महिलांसाठीचे कायदे विषयी
मार्गदर्शन करताना मा. वकील श्री. अनिल माने
मा. वकील श्री. अनिल माने यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यकमाची सांगता बचत गटातील उद्योजक महिला यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी शासकीय, कंत्राटी, निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या व बचत गटांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.

Wednesday, March 7, 2018

रेशीम उद्योग आणि तुती लागवड

रेशीम उत्पादन अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो. शेतकयांस कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर १५ वर्षेपर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. पट्टा पध्दतीने मजूरी खर्चात व वेळेत मोठया प्रमाणात बचत होते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेवून उत्पन्नात भर घालता येते. 


रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने ४५ टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते. त्यातील २४ दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या २४ दिवसांपैक सुरवातीचे १० दिवस शासना मार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांस अवघ्या १४ दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकयांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात २५ टक्के पर्यंत वाढ होईल. शेतीमध्ये रेशीम कोशा शिवाय अवघ्या १४ दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते. शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सदर कोश खरेदी ही शास्त्रीय पध्दतीने होत असून त्याचा दर रु. ६५/- ते रु.१३०/- प्रती किलो आहे.

इतर फायदे

  1. रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून १ ते दीड लिटर दूध वाढते.
  2. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
  3. तुतीच्या वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुद्धा वापरता येते.
  4. संगोपनाकरिता वापरलेल्या काड्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
  5. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
  6. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु ३५००/- ते ४५००/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
  7. तुतीच्या पानांमध्ये अ जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दृष्ट्या महत्वाचा आहे.
  8. विदेशात तुतीच्या पानांचा चहा (मलबेरी टी) करतात. शिवाय वाईन करतात.
  9. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.

 तुती लागवड 

हवामान

महाराष्ट्र राज्याची कृषि विषयक हवामानाची परिस्थिती बघता तुती पाल्याचे बारमाही उत्पादन घेता येऊ शकते तुती लागवडीसाठी 750 मिलि. मी. ते 1000 मिलि.मी. पाऊस वर्षभर समप्रमाणात पडत असलेल्या भागात लागवड केल्यास तुतीला पोषक वातावरण मिळून पाल्याचे उत्पादन वाढते. तुती लागवडीस थंड व उष्ण दोन्हीही प्रकारचे हवामान मानवते. परंतू 250 उ ते 300 उ हे तापमान तुती झाडांच्या वाढीसाठी योग्य असून अशा हवामानास तुती पाल्याची जोमदार वाढ होते व चांगले पाल्याचे उत्पन्न घेता येते.
जमीन

मध्यम, भारी, हलकी प्रकारची जमीन असली तरी तुतीची लागवड करण्यास योग्य असते. मात्र डोंगर उताराची व खारट जमीन म्हणजेच ज्या जमीनीत पानी साचून राहते किंवा पाण्याच निचरा होत नाही अशी जमीन तुती लागवडीसाठी आयोग्य असते. कारण अशा जमिनीत तुती कलमांची लागवड केली तर कलमे जास्त ओलाव्या मुळे कुजून बाद होतात. तेव्हा पाण्याचा चांगल्या प्राकरे निचरा होणाऱ्या जमीनीतच तुती लागवड करावी. तुती झाडाची मुळे खोलवर जात असल्याने ज्या जमीनीत तुती लागवड करावयाची आहे त्या जमिनीचा थर किमान 2 फुट खोल असावा. कोणत्याही प्रकारच्या जमीनीत तुती लागवड करता येत असली तरी देखील काळया कसदार मातीत तुती झाडाची वाढ अतिशय झपाटयाने होत असल्याचे आढळून आले आहे. तुती झाडाच्या वाढीसाठी जमीनीतील सामु (पी.एच.) हा 6.5 ते 7 पर्यंत असणे योग्य असतो. त्यासाठी शेतकरी बांधवांनी तुती लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतातील मातीचे परिक्षण करुन घेणे महत्वाचे आहे. ज्या जमिनीत आम्लाचे प्रमाण जास्त असते म्हणजेच जमीनीचा सामु 5 पेक्षा कमी असेल तर चुनखडीचा उपयोग करुन आम्लाता कमी करुन घ्यावी तसेच जमीनीचा सामू (पी.एच.) 7.5 पेक्षा जास्त असेल तर मात्र जीप्समचा वापर करुन अल्कता कमी करुन घ्यावी.

जमीन तयार करणे व शेणखताचा वापर

तुती लागवडीसाठी जमीन तयार करतांना लोखंडी नांगराने 12 '' ते 15 '' इंच (30 ते 45 सेमी.) खेल नांगरट करावी. जमीनीची नांगरट करतांना उभी व आडवी दोन्ही बाजुनी नांगरटी करावी. जेणे करुन जमीनीचा कठीणपणा जावुन ती मोकळी व भुसभुसीत होईल. एप्रिल व मे महिन्यात अशी नांगरनी केल्यास ती फायदेशीर ठरते त्यामुळे जमिनीतील किड मरते व तणाचे देखील प्रमाण कमी होते. पुन्हा 15 ते 20 दिवसानंतर लाकडी नांगराने एकादा उभी व आडवी नांगरनी करुन घ्यावी, नांगरनी झाल्यानंतर एकरी 8-10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत सर्व जमिनीत सार'या प्रमाणात पसरवावे नंतर वखरणी करुन जीमन सारखी करुन घ्यावी यासाठी मे महिण्यापुर्वीच मशागतीची तयारी केली तर जुन-जुलै महिण्यापर्यंत जमीन तयार ठेवता येते. 

रेशीम उद्योगाच्या स्थापनेपासून मार्केटिंगपर्यंत
मार्गदर्शन करिता 9975740444 यावर संपर्क करा.

तुतीच्या प्रचलीत व सुधारीत जाती

तुतीची प्रचलीत जात कनव्हा-2 अथवा एम-5 ही जात निवड पध्दतीने सन 1950 मध्ये कर्नाटक राज्यातील शासकीय कनव्हा रेशीम फार्म केन्द्रामध्ये विकसित करुन लागवड करण्यासाठी शिफारस केली आहे. या जातीची निर्मिती ओपन पराग सिंचन संकर या पध्दतीने स्थानिक म्हैसूर या जातीपासून झालेली आहे. या जातीची वाढ जलद असून आंतर मशागत हवामान व जमीन या बाबींना चांगला प्रतिसाद देते. म्हैसूर लोकल या जातीपेक्षा या जातीच्या पाला रेशीम अळयांना अधिक आवडत असून तो अळयाच्या पचन शक्तीला पोषक आहे. या जातीची लागवड भारतात मोठया प्रमाणात असून हि जात श्रीलंका, बांगलादेश, पिलिपाईन्स, थॉयलँड इत्यादी देशात प्रचलित झालेली आहे. या जातीच्या फांद्या सरळ व हिरवट करडया रंगाची पाने साधी कातरलेली असून एकमेकांसमोर रचना असलेली आहे. पाने बोटीच्या आकारासारखी असून जाडसर नरम वाटतात. या जातीच्या पाल्याचे उत्पादन बागायती क्षेत्रावर 35,000 कि. ग्रॅम प्रति हेक्टर प्रति वर्ष येत असून या झाडाना 300 कि.ग्रॅम 120 कि.ग्रॅम 120 कि. ग्रॅम नत्र, स्फुरद, पालांश खताचा मात्रा वेगवेगळया 5 हप्त्यात द्यावा लागतो. तसेच 20 टन शेणखत प्रति हेक्टर द्यावे. या जातीला 1.5 एकर इंच सिंचनासाठी पानी आवश्यक आहे. पावसावर अवलंबून लागवड असेल तर पाल्याचे उत्पादन 12,000 कि. ग्रॅम प्रति हेक्टर प्रति वर्ष येत असून या करिता 100 कि.ग्रॅम नत्र 50 कि.ग्रॅम स्फुरद व 50 कि.ग्रॅम पालांश या खतांचा मात्रा वेगवेगळया दोन हप्त्यात द्याव्यात व 10 टन शंणखत प्रति हेक्टर प्रति हेक्टर प्रति वर्षे देणे फायद्याचे ठरते बागायती क्षेत्रासाठी तुतीचा भरपूर पाला उत्पादन देणाऱ्या जाती: देशातील वेगवेगळया संशोधन केंद्रावर काही ठराविक भरपूर पाला उत्पादन देणाऱ्या जाती विकसीत आहेत. काही जाती शेतकऱ्यांपर्यंत लागवडीकरीता गेलेल्या आहेत तर काही जात अद्यावत संस्थाच्या प्रात्यक्षिक व चाचणी केंद्रावरच आहेत. या जाती पैकी एस-30, एस-36, एस-54, एस-135, डी. डी. आणि एम.आर-2, या जाती सी एस.आर. ऍण्ड टि. आय. म्हैसूर या संस्थेने बागायती क्षेत्रासाठी विकसित केलेल्या असून त्या लागवडीखाली तसेच क्षेत्र गुणवी कार्यक'म खाली चाचण्या चालू आहेत. 

1. एस- 30: या जातीचे झाड साधे वळणदार, खरवडीत, हिरवट करडया फांद्या असलेले आहे. पाने सरळ कातरलेली नाहीत. एकमेकांसमोर पानाची रचना नरम व बोटीच्या आकाराप्रमाणे वरच्या दिशेने वाकलेली पाने आहेत. पाल्याचे उत्पादन कमीत कमी बागायती क्षेत्रामध्ये योग्य ती जमीन व रासायनिक खताच्या मात्रा दिल्यानंतर 38,000 किलो प्रति हेक्टर प्रति वर्षे येते. 

2. एस-36: या जातीचे झाड साधे वळणदार, हिरवट, करडया रंगाचे आहे. पाने साधी हिरवट, कातरलेली नाहीत. एकमेकासमोर पानाची रचना आहे. मोठया बोटीच्या आकारासारखी पाने दिसतात. पाल्याचे उत्पादन खात्रीशीर सिंचन व्यवस्था व खतांच्या मात्रा आवश्यकतेनुसार दिल्यानंतर 40,000 ते 42,000 किलो पाल्याचे उत्पादन प्रति हेक्टर प्रति वर्ष मिळते. 

3. एस- 54: झाडाच्या फांद्या सरळ, साधारण उभ्या खरबडित हिरवट करटया रंगाच्या खालच्या फांद्या पसरलेल्या असतात. पाने साधी कोरलेली नसून, एकमेकांसमोर रचना असलेली जाडसर मोठी बोटीच्रुा आकारासारखी दिसतात. ही जात पाल्याचे उत्पादन योग्यतो खताच्या मात्राचा पूरवठा व सिंचन व्यवस्था दिली असता 46,000 किलो / हेक्टर / वर्षे उत्पादन देते. कनव्हा -2 या जाती पेक्षा 20 टक्के या याती पासून पाला उत्पादन जास्तीचे आहे. हि जात नविन संशोधन आंतर मशागत तंत्राला पोषक असून वाढीव खतांतून मात्राचा वापर केल्यास अधिक प्रतिसाद देते. 

4) विरवा (डी.डी.): पूर्वी या जातीला डेहराहून या नावाने ओळखले जात असून ती वेगवेगळया नैसर्गिक जातीच्या संचातून निवड केलेली आहे व ही जात के. एस.एस. आर.डी.आय. थलगटपूरा कर्नाटक या संस्थेने विकसति केलेली आहे. या झाडाच्या फांद्या सरळ उभ्या साधारणत: पसरट आणि हिरवट - करडया रंगाच्या आहेत. पाने कातरलेली नसून समोरासमोर रचना असलेली मोठया बोटीच्या आकारासारखी गरम व लुसलुसीत आहेत. पाल्याचे उत्पादन 35,000 ते 40,000 किलो/हेक्टर/वर्षे आवश्यक ती खतांची उपलब्धता करुन दिली तर मिळते. 

5) एस- 135 - (ओपीएस-135 अथवा रेनफेड सिलेक्शन 135): ही जात नैसर्गिक रित्या पराग सिंचनापासून झालेली संकरित जात आहे. या जातीची निवड कनव्हा -2 या जातीपासून सी.एस.आर. ऍन्ड टि. आय. म्हैसूर या संस्थेने विकसीत केलेली आहे. फांद्या व पानाचे गुणधर्म इतर जातीप्रमाणे आहे. पाल्याचे उत्पादन आवश्यक खताची मात्रा व पाण्याची व्यवस्था केल्यास 40,000 किलो / हेक्टर/ वर्षे आहे. 

6) व्ही -1 (व्हीक्टरी -1) या जातीच्या झाडांच्या फांद्या सरळ, मोठे सरळ, जाडे व रसरशीत पाने, त्यामध्ये 75 टक्के आद्रता असते. हि जात सी.एस.आर. ऍण्ड टी.आय म्हैसूर यांना विकसीत केली असून याजातीचे पाल्याचे उत्पादन प्रति हेक्टरी 60,000 कि. ग्रॅम पर्यंत येते. बागायती क्षेत्राकरीता महाराष्ट्रात सद्या एस- 36 व व्ही-1 या जातीचे बेने उपलब्ध असुन या जाती खाली तुती लागवड क्षेत्र वाढविणे ही काळची गरज आहे. पावसाळी हंगामात / जिरायत क्षेत्रावर येणाऱ्या तुतीच्या जाती दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असून पावसाचे दिवसा बाबंतही अनिश्चिता वाढत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रात ज्या विभागात पावसाची अनिश्चिता आहेत. व सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही अशा विदर्भ व मराठवाडा विभागात तुतीचे जिरायत क्षेत्र वाढविण्यास पोषख वातावरण आहे. या मध्ये पुढील पैकी जातीची निवड खड्डा पध्दतीमध्ये 8 द 5 फुट अंतरावर तुतीची लागवड करावी. दोन वर्षा नंतर वाढलेल्या तुती झाडांची 4 ते 5 फुट उंचीवर छाटणी करुन त्याला आकार द्यावा. या पध्दतीमध्ये फळबाग लागवडी प्रमाणे शेतकरी पावसाळी हंगामात सोयाबीन, गहू, मुग, इत्यादी. अंतर पिके घेऊ शकतो. व येणाऱ्या तुती पाल्या पासुन रेशीम पाल्याचे उत्पादन मिळवू शकतो. 

1) एस- 13 - या जातीची लागवड पावसावर अवलंबून असलेल्या भागात मोठया प्रमाणात होते व य जातीची निवड के - 2 या जातीच्या रोपापासून ओपन पराग सिंचन संकरीत निवड केलेली आहे. या झाडांच्या फांद्या वळणदार आणि हिरवट ते करडया, पाने साधी गडद हिरव्या रंगाची एकमेकांसमोर रचना असते. या जातीचे उत्पादन 15,000 कि. ग्रॅम प्रति हेक्टर प्रति वर्षे उत्पादन मिळते. 

2) एस-34 - हि देखील पावसाळी हंगामात लागवड चांगली येते या जातीची निर्मिती एस- 30 आणि बेर साी - 776 या जातीचे नियंत्रित पध्दतीने परागसिंचन करु न संकर केलेले आहे. झाडाच्या फांद्या वळणदार आणि हिरवट करडया, पाने बोटीच्या आकाराची असून गडद हिरव्या रंगाची असतात. 

3) विरवा (डी.डी.) : हि जात पावसाळी हंगामात के-2 जाती पेक्षा लावगवडीकरीता पोषक ठरते. या जातीचे उत्पादन 15,000 किलो प्रति हेक्टर प्रति वर्षे मिळते. 

चॉकी अळयांना उपयुक्त असलेल्या तुतीच्या जाती:
चॉकी अळयांना प्रामु'याने लुसलुसीत, पाण्याचे प्रमाण 90 टक्के असलेली व प्रथिने 10 ते 20 टक्के असलेली पाने आवडतात त्यामुळे अशा प्रकारचा पाला एस-30 व एस-36 या जातीपासून उत्पादन केले जाते. रेशीम कोषाच्या उत्पादनाचे प्रमुख दोन बाबी म्हणजे पाला उत्पादन व तुती पाल्याची प्रत ह्या आहेत. 

तुतीची लागवड व देखभाल

तुती बेणे तयार करणे: तुती लागवड तुतीबेण्या पासून करायची असते. त्यासाठी एम-5, एस-54, एस-36, व्ही -1 अशा सुधारीत जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करतांना 6 ते 8 महिने वयाच्या तुती झाडांची 10 ते 12 मि.मि. जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी. त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत व तुकडे करातांना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळया फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत.

तुती बेण्यावरील रासायनीक प्रक्रिया

तुती कलमे तयार केल्यानंतर जमीनतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी खालील प्रमाणे बेण्यावर रासायनिक प्रकिया करावी. 
1) थॉयमेटच्या 1 टक्के द्रावणात कलमे 4 ते 5 तास बुडवून ठेवावेत. 
2) बुरशी नाशक बाव्हिस्टिन, कॅप्टॉन यांचे 1 टक्के द्रावणात तुती बेणे 4 ते 5 तास बुडवून ठेवाव्यात. 
3) तुती झाडाचा लवकर मुळे फुटावीत या करिता रुटेक्स पावडर किंवा कॅरडॉक्स पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी त्यामुळे लवकर मुळे फुटून झाडांची जोमदार वाढ होईल.

तुतीचे लागवड अंतर

सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील शेतकरी तुतीची लागवड करतांना 3 द 3 अंतरावर लागवड करीत होते. परंतू आता सन 98 - 99 पासून नविन सुधारीत पध्दतीनुसार फांदी पध्दत किटक संगोपनामध्ये वापरली जात असल्यामुळे फांदी पध्दतीसाठी महाराष्ट्रात नव्यानेच रेशीम संचालनालया मार्फत तुती लागवडीसाठी 5 द 2 द 1 फुट अंतर मध्यम जमिनीसाठी व 6 द 2 द 1 भारी जमिनीसाठी तुती कलमांची लागवड करवून घेण्यात येत आहे. या पध्दतीमध्ये तुती झाडाची सं'या एकरी 10890 इतकी बसते. त्यामुळे प्रति एकरी पाल्याच्या उत्पादनात 3द3 फुट लागवड पध्दतीपेक्षा दुपटीने वाढ होते.

पट्टा पध्दतीच्या तुती लागवडीपासून फायदे
  1.  या पध्दतीमुळे झाडाची सं'या मोठया प्रमाणात वाढते. 
  2.  तुती लागवडीमध्ये हवा खेळती राहते व भरपूर प्रमाणात सुर्यप्रकाश सर्व झाडांना मिळाल्यामुळे तुती पाल्याची प्रत चांगली मिळते व पाल्याचे उत्पादन ही भरपूर प्रमाणात वाढते. 
  3. आंतर मशागत करण्यासाठी सोईचे होते. 
  4. कोळपणी करुन तुती झाडांच्या रांगामधील तण काढू शकतो. त्यामुळे निंदणी करील खर्च कमी करता येतो. 
  5.  बुराशीपासुन होणारे रोग पानावरील ठिपके, भूरी व तांबेरा यांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो. 
  6. शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असेल तर दोन सरीमध्ये पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत होते व कमी पाण्यात लागवडीची जोपासना करता येते. 
  7. मधल्या पटयात भाजीपाला व इतर अंतर पिके घेऊन बोनस उत्पादन मिळवीता येते. 

तुती लागवड करतांना घ्यावयाची काळजी

  1. लागवडीकरिता किमान सहा महिने जूने व बागेस पाणी दिलेले तुती बेणे वापरावे. त्यानंतर 
  2. तुती बेणे छाटणी केल्यापासून 24 तासांच्या आत लागवड केल्यास त्याचा फुटवा चांगला होतो व बागेत तुट अळी पडत नाही. 
  3. तुती बेणे छाटणी धारदार हत्याराने किंवा सिकॅटरने 3 ते 4 डोक्यावरच करावी. जास्त लांब काडी तोडू नये. 
  4. तुतीची लागवड 5 द 3 द2 किंवा 6 द 2 द 1 अथवा इतर अंतरावर जोड ओळ पध्दतीनेच करावी. 
  5. तुतीची काडी लावताना 3 डोळे जमिनीत व एकच उभा डोळा जमीनीवर ठेवावा. उलटी काडी लावू नये. 
  6. जमिनीत वाळवी व बुरशीचा प्रादूर्भाव असल्यास तुती बेण्यास क्लोअरपायरीफॉस, बावीस्टीन / डायथेन एम-4 अथवा कॉपर ऑक्सी क्लोराईड यांची बेणे प्रक्रिया करुनच लागवड करावी. 
  7. लागवड करातांना कॅरेडिक्स,रुटेक्स किंवा आय.बी.ए. इत्यादीचा वापर करवा. 
  8. तुती लागवडीमध्ये नैसर्गिकरित्या 10 ते 15 % तुती अळी पडत असल्याने प्रती एकर किमान तुट अळी भरण्यासाठी 1000 रोपांची वेगळी रोपवाटीका करावी. 

तुती बागेची आंतर मशागत

तुती कलमांची लागवड केल्यानंतर 1 महिन्याने खुरपणी /निंदणी करुन गवत/तन काढावे बागेतील गवतामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही व उष्णता निर्माण होवून तुती कलमाची पाने पिवळी पडतात तसेच तुती कलमांना गवतामुळे अन्नद्रव्ये कमी पडून पाने गळून पडतात.त्यामुळे तण काढणे अतिशय आवश्यक बाब आहे. तदनंतर प्रत्येक पीकानंतर उपलब्ध साधन व अंतरानुसार बैलजोडी अथवा टॅक्टरने अंतर मशागत करावी. 

तुती झाडांची छाटणी

तुती बागेच्या आंतरमशागतीमध्ये तुती झाडांची शास्त्रोक्त पध्दतीने छाटनी करण्या फार महत्व आहे. सर्व साधारणपणे शेतकरी फांदी किटक संगोपन पध्दतीचा वापर करत असतांना तुती झाडांची / फांद्याची छाटणी विळयाने फांद्या खेचुन करतो. यामध्ये झाडांचा डींक बाहेर निघून वाया जातो. व मोठया प्रमाणावर नुकसान होते तसेच उन्हाळया झाड सुकून जाऊन गॅप पडतात या करिता शेतकऱ्यांनी तुती झाडांच्या छाटणी करीता प्रमु'याने सिकॅटरचा वापर केला पाहिजे. प्रथम वर्षी पहीले पीकझाल्यानंतर सिकॅटरच्या सहाय्याने झाडावर निवडक तीन फांद्या ठेऊन (त्रिशुल) बागायती क्षेत्रा करीता जमिनीपासुन 25 ते 30 सेमी. वर छाटणी करावी. आडव्या फांद्या खोडापासूनच काढून टाकाव्यात. तदनंतर 1 वर्ष प्रत्येक पीकानंतर झाडावर सरळ वाढणाऱ्या 7 ते 8 फांद्याची दोन डोळयावर छाटणी करुन उर्वरीत फांद्या काढून टाकाव्यात. दिड ते दोन वर्षानंतर तुती झाडाची जमिनीलगत छोटया करवतीच्या सहाय्याने कापणी करावी. अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर तुती झाडापासुन सकस व भरपुर पाला मिळतो. कमीपाण्याच्या (आठमाही) क्षेत्रामध्ये तुतीझाडाची प्रथम छाटणी जमिनीपासून एक फुटाच्यावर करावी एक फुटापर्यंत तुती झाडास आडवी फांद्यी न वाढू देता सरळ खोड वाढू द्यावे व पुढील छाटणी एक फुटाचे वर करावी. जिरायत तुती लागवड क्षेत्रात वाढविलेल्या तुती झाडाची दीड ते दोन वर्षानी 4 ते 5 फुट उंचीवर छाटणी करावी व तदनंतर प्रत्येक पीकानंतर दोन डोळे ठेऊन फाद्याची छाटणी करवी. 

तुतीबागेस सिंचन

माहे जुलै ते नोव्हेंबर - महिन्याच्या दरम्यान केलेल्या लागवडीस पावसाच्या पाण्याचा फायदा मिळतो परंतू आपल्याकडे दरवर्षी पाऊस अनियमित पडत असल्यामुळे तुती कलमांचे नुकसान होत व त्यामुळे तुती कलमांची लागवड केल्यानंतर पाऊस कमी पडल्यास किंवा 10 ते 12 दिवसाचा खंड पडल्यास विहिरीचे पाणी देवून कलमे जगतील याची काळजी घ्यावी. लागवड केल्यानंतर सात ते आठ दिवसाच्या अंतराने कलमें जगेपर्यंत पाणी द्यावे नंतर डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत जमिनीची प्रत पाहुन साधारणत: 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात एक वेळातुती लागवडीला 1 ते 1.5 एकर इंच पाण्याची आवश्यकता असते. 

तुती लागवडीसाठी गांडुळ व इतर खताचा उपयोग

तुती लागवड केलेल्या जमिनीत गांडुळ खत वापरणे फयदेशिर आहे. गांडुळखतामुळे जमिनीतील पाला-पाचोळा गांडुळ कुजवितात, जमिनीत हवा खेळती राहण्यास पोकळी तयार करतात तसेच जमिनीतील सुक्ष्म जंतुचे कार्यप्रणाली वाढवितात त्यामुळे तुती झाडांना सुक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होवून तुती पानामध्ये कार्बोहायड्ेट व प्रथीनांचे प्रमाण देखील वाढते,

गांडुळ खत वापरतांना घ्यावयाची काळजी
  1. गांडूळ खत रासायनिक खतामध्ये मिश्रण करुन टाकु नये. 
  2. रासायनिक खत वापरण्याआधी 1 महिन्या अगोदर गांडुळ खत तुती झाडांना द्यावे. 
  3. गांडुळ खतामध्ये शेणखत, कम्पोस्ट खत मिसळून टाकल्यास त्यांचा चांगला फायदा होतो. 
  4. गांडुळखत वापरल्यास रासायनिक खताची मात्रा कमी करता येईल. 
  5. पहिल्या वर्षी नविन तुती लागवडीङ्ढकरीता डिसेंबर महिण्यात गांडुळ खत वापरावे.

ऍझोटोबॅक्टर

ऍझोटोबॅक्टर या जीवाणूचा प्रती एकर प्रती वर्ष 8 किलो या प्रमाणात वापर केल्यास नत्राची मात्रा 50 टक्के ने कमी करता येते. ऍझोटोबॅक्टर, रासायनिक खताचे 10 ते 15 दिवस आधी किंवा नंतर शेणखतामध्ये मिसळून (1.6 किंलो ऍझोटोबॅक्टर + 80 किलो शेणखत या प्रमाणात) आंतरमशगतीच्या वेळेत टाकावे व तदनंतर लगेचच बागेस पाणी द्यावे.

तुतीबागेत रासायनिक खते

तुतीची वाढ योग्य होणेसाठी रासायनिक खताची मात्रा देणे महत्त्वाचे आहे. तुती लागवड केल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यात कलामांना मुळे फुटतात. तेव्हा पहिली मात्रा अडीच महिन्यांनतर एकरी 24 किलो नत्र, स्पुरद, पालाश रिंग पध्दतीने तुती झाडांचय बाजुला गोल खड्डे करुन द्यावे व खत दिल्यानंतर त्यावर मातीचा भर द्यावा. जेणेकरुन दिलेले खत वाया जाणार नाही. दुसरा डोस 3 ते 4 महिन्यांनी एकरी 24 किलो नत्र रिंग पध्दतीने द्यावा अशी दोन वेळा रासायनिक खताची मात्रा पहिल्या वर्षी द्यावी. तुतीच्या बागेस माती परिक्षण करुनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी. शेणखत व रासायनिक खते जमिनीत 8 ते 10 सेमी खोलवर टाकावीत. रासायनिक खतांचा वापर कराताना एकच मुलद्रव्यांची खते जसे नत्राकरिता अमोनियन सल्फेट, स्पुरादाकरिता सिंगल सुपर फॉस्फेट व पालाशकरिता म्युरेट ऑफ पोटॅश यांचा प्राधान्याने वापर करावा. 

रासायनिक खते

नेहमीच प्रत्येक पिकाच्या छाटणीनंतर अंरमशागत झालेनंतर कोंब फुटतेवेळी 14 ते 21 व्या दिवशी देण्यात यावे.

तुतीच्या झाडांवरील रोग व नियंत्रण

इतर झाडांप्रमाणेच तुतीच्या झाडांवर ही बरेच रोग आहेत. वेळेवर सर्व पाला वापरला गेल्यास मात्र या रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळून येत नाही. तसेच ठरावविक रोगांमुळे पुर्ण झाडाचे नुकसान झाले आहे व त्यामुळे पुर्ण पीक पाया गेले असे कधीही आढळून आलेले नाही. तरी देखील काही महत्वाच्या रोगांची व जे महाराष्ट्रात मु'यत्वे आढळून येतात अशा रोगांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

कलमावरील बुरशी
तुतीच्या लागवडीच्या वेळेस कलमास शेतकरी, बुरशीनाशक द्रावणात बुडवत नाहीत. अतिपाण्यामुळे किंवा जास्त आर्द्रतेमुळे सालीच्या आतील बाजूस काळी बुरशी येते, यामुळे झाडास फुटवा येत नाही किंवा आलेला फुटवा जळून जातो. 
उपाय
बुरशी नाशक द्रावणात तुती कलमे लावण्यापूर्वी 5-10 मिनिटे बुडवावीत व मग लागवडीस वापरावीत. प्रादर्भाव जास्त असेल तर फुटवा झालेवर देखील झाडांवर औषधे फवारावे.

वाळवी/उदई
हलक्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव निश्तिच होतो. शेतकरी भारी जमीन सहसा तुती लागवडीसाठी वापरत नाहीत. त्यामुळे हलक्या जमिनीत लागवड केली की त्या जमिनीत मोठया प्रमाणात वाळवीचा प्रादुर्भाव होतो. तसेच शेणखतातून जमिनीत उदई अथवा उदडीचा प्रादुर्भाव होतो. उदई कोवळी कांडी कुरतडून खातात व झाडांची मर वाढते. एकरी झाडांची सं'या कमी होते. 
उपाय
1. लागवड करतांना क्लोरपायरिफॉसच्या द्रावणात, कांडया (कलमे) बुडवून लावावेत. 
2. फुटवा झाल्यावर फयुरॉडॉन औषध मुळांजवळ दिल्यास वाळवी अथवा उदईचा त्रास होत नाही. किंवा कुठलेही वाळवी नाशक औषध वापरावे त्याचा परिणाम संपल्यानंतरच अळयांचे किटक संगोपन घ्यावे. झाडांची मुळे खोलवर गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या वर्षानंतर हा त्रास होत नाही.

पानांवरील बुरशी
रोगाचे कारण फायलेक्टिनिया कोरिलीया, कालावधी पावसाळा व हिवाळा. तुती बागेतील पाने वेळेवर वापरली नाहीत व ज्या बागेत प्रकाश व्यवस्थित येत नाही. अशा बागेतील पानांवर बुरशीचा प्रादुर्भाव लगेच होतो. म्हणजेच पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात हे टाळण्यासाठ म्हणजेच पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात हे टाळण्यासाठी वेळेवर प्रमाणात अंडीपुंज घेऊन पाल्याचा वापर करावा. 
उपाय
वेळेत पाल्याचा वापर केल्यास रोग आढळत नाही, तथापी रोग मोठया प्रमाणात आढळयास पानांवर 0.2 टक्के बाविस्टीन अथवा 0.2 टक्के डायनोकॅप द्रावण फवारावे. फवारणीनंतर वीस दिवसांनी पाने वापरता येतात.

झाडांवर आढळून येणारी कीड
टूक्रा (बोकडया): 
लक्षणे: 
  1. शेंडयाच्या पानाचा आकार बदलतो. 
  2. पाने कोमजल्यासारखी दिसतात किंवा घडया पडून आकसतात. 
  3. ज्या फांदीवर टूक्रा आढळतो, तो भाग जाड किंवा चपटा बनतो. 
  4. पाने गडद हिरव्या रंगाची बनतात.

उपाय: 
  1. टूक्रा रोग असलेले झाडाचे शेंडे तोडून जाळून टाकावेत. 
  2. 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात (10 लिअर पाण्यात 50 ग्रॅम साबण टाकवा) 0.2 टक्के डी.डी.व्ही.पी. (न्युआन 2 मि.ली. 1 लिटर पाणी) चे द्रावण तयार करुन झाडांवर फवारावे. 
  3. क्रिप्सोलिनस मौंटेजरीचे 100 प्रौढ किटक 10 ते 12 हजार तुतीच्या झाडामध्ये सोडावेत.

लष्कर अळी: 
लक्षणे : बऱ्याच ठिकाणी पानांवर लष्कर अळी आढळते. लष्कर अळीचे पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळया एकाच पानांच्या खालच्या भागावर असतात. अळया पानाचा हिरवा भाग खाऊन पान जाळीदार बनवतात. अळया मोठया झाल्या की समुहात राहत नाहीत. त्या स्वतंत्र्यपणे संचार करतात. अळयांच्या अंगावर मोठे लांब केस असतात. प्रथम तांबूस दिसणाऱ्या अळया नंतर काळया रंगाच्या होतात. ह्या अळया मोठया प्रमाणावर पाला खातात यामुळे पानांचे एकरी उत्पन्न कमी होते.
उपाय: 
अळया लहान असतांना जाळीदार दिसणारे पाने अळया सहित तोडून नष्ट करावेत. अळयांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर रोगार, 0.2 टक्के फवारावे. पानांवर फावारणी केल्यानंतर 20-25 दिवसानंतरच पाला अळयांना घालण्यात यावा.

स्त्रोत : रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन व विकासपीडिया

Tuesday, March 6, 2018

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान


राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्चीनार्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना या तीन योजना राबविल्या जात आहेत. 


 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना


लाभार्थी
पात्रता
कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
लघु व मध्यम उद्योगांसाठी 
उत्पादन, सेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
 आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
 वय - १८ ते ४५ वर्षे 
 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
 दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  2. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  3. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना
लाभार्थी
पात्रता
कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
लघु व मध्यम उद्योगांसाठी 
उत्पादन, सेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा
 आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
 वय - १८ ते ४५ वर्षे 
 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
 दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा

इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
वैयक्तिक योजनेच्या उमेदवारांनी व गट योजनेच्या सदस्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावे. प्रस्ताव सादर केल्यावर उमेदवारास संगणकीकृत सशर्त पात्रता प्रमाणपत्र प्राप्त होईल. हे LOI बँकेकडे देऊन कर्ज मंजुर करून घ्यावे. बँकेच्या परतावा नियमानुसार वेळेत हप्ते भरल्यास व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून त्यांच्या कर्ज खात्यास जमा होईल. 

गट प्रकल्प कर्ज योजना 
महामंडळातर्फे सदर योजनेंतर्गत पात्र शेतकरी उत्पादक गटांना १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज रक्कम शेती उद्योगाकरिता देण्यात येईल. 
 लाभार्थी - 

  1. कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी 
  2. लघु व मध्यम उद्योगांसाठी 
  3. उत्पादन, सेवा व व्यापार क्षेत्रांसाठी 
  4. गटातील किमान एक सदस्य शैक्षणिक अर्हता १० वी पास असावी.
पात्रता - 
  1. महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  2. आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक 
  3. वय - १८ ते ४५ वर्षे 
  4. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न - ८ लाख पर्यंत 
  5. दिव्यांग उमेदवारासाठी सक्षम यंत्रणेचा पुरावा 
इतर अटी व शर्ती - 
  1. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, निबंधक भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले सहकारी संस्था, कंपनी, LLP, सोसायटी व इतर नोंदणीकृत संस्था 
  2. यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 
  3. चालू उद्योग विस्तारासाठी व नवीन उद्योगासाठी 
  4. कर्ज प्रकरण CIBIL धारक बँकेतून करणे आवश्यक आहे. 
  5. एका कुटुंबासाठी एकदाच एका व्यक्तीला लाभ दिला जातो.
नोंदणी व अंमलबजावणी 
  1. सदरचे कर्ज मुदत कर्ज असेल 
  2. गट पात्र ठरलेनंतर ऑनलाईन मंजुरी पत्र दिले जाईल. 
  3. वैधानिक कागदपत्रे तारण पत्रे पुर्ण केल्यावर कर्ज रक्कम गट कर्ज खात्यावर जमा होईल. 
  4. बिनव्याजी कर्ज रक्कम परतावा वितरणाच्या खात्यात ७ व्या महिन्यापासुन ८४ व्या महिन्यापर्यंत (७ वर्षे) समान हप्ता देणे अनिवार्य आहे. 

Monday, March 5, 2018

Parents Development Program

About Plan India

Plan India is a nationally registered independent child development organisation striving to advance children’s rights and equality for girls, thus creating lasting impact in the lives of the vulnerable and excluded children and their communities. Since 1979, Plan India and its partners have improved the lives of millions of children by providing them access to protection, basic education, proper healthcare, a healthy environment, livelihood opportunities and participation in decisions which affect their lives.Plan India is a member of Plan International Federation, working for child development in 71 countries through a child centred community development approach.

Plan India’s Country Strategic Plan IV (2016-2020) goal is to be “the leading child development organization in India, known for the lasting impact created in the lives of the vulnerable and excluded children and their communities.” Aiming to impact the lives of two million children directly and five million children through advocacy and policy influence. Plan India programs cover 10 states with six strategic objectives: child survival, growth and optimal development; water, sanitation and hygiene; education; economic development; disaster risk reduction and protection.

Plan recognizes importance of parent and family support including provisions for child care as critical for achieving positive child level outcomes.Plan India’s existing parenting initiatives aims at changing/improving childcare practices for young girls & boys. Plan India in CSP IV aim at going beyond delivering knowledge and making parents/caregivers effective agents of change at family and community level.

Programme background

Plan India’s ECCD strategy document in CSP IV define goal & objectives as summarised below:

Goal: All girls & boys below 6 years in Plan’s operational areas have access to developmentally appropriate responsive care and learning opportunities at home and childcare centres that serve to actualize their development potential.

Objective 1: All girls & boys below 6 years in Plan operational areas have access to developmentally appropriate responsive care at home and child care centres.

Objective 2: All girls & boys below 3-6 years in Plan operational areas have access to developmentally appropriate learning opportunities at home and child care centre.

ECCD programs will aim at improving access to developmentally appropriate responsive care and learning opportunities at home and childcare centres that serve to actualize their development potential. One of the key strategy of the program will be to strengthen the parents capacities to promote continuum of care & learning opportunities in home settings.

HOW TO APPLY
  1. Develop short (max. 5 page) research proposal including proposed methodologies, timeframe and budget including breakdown of daily rate
  2. Submit Curriculum Vitae of Consultant /agency with contact details and three referees
  3. Submit one sample of previous report relevant to the applied consultancy job
Interested agencies are requested to submit detailed proposal and time break up of activities and a detailed financial proposal (proposed budget) at procurement@planindia.org.  Please note that no application will be accepted without a proposal & budget.

Please mention the consultancy name “Request for proposals- Development of Parents Development Program” in the subject line. 

Kindly Note : Only shortlisted agencies/consultants will be contacted.

Need help... just push upper button
& send your query with contact details...

Submission

Interested vendors/ agencies are expected to share a detailed proposal along with commercials considering above specific requirements latest by 12 March 2018 (close of business) in sealed envelope and write the subject on envelope “Request for proposals- - Development of Parents Development Program” to be delivered at

Procurement
Plan India,
E-12, Kailash Colony,
New Delhi – 110048.

And through e-mail at procurement@planindia.org with same subject line.

Please ensure that your proposal is sent ONLY on ABOVE MENTIONED e-mail ID, before the closing date & time. Proposal sent/copied to any other email ID (other than above) OR received after the closing date & time (mentioned above) will not be entertained.

In case of any clarification, please feel free to contact us by return mail procurement@planindia.orgor call to us Phone: 011 – 46558484

Plan India reserves the right to accept or reject any bid without assigning any reasons whatsoever

Please see the attachment for more details about the RFP

Job Email id: procurement(at)planindia.org

Sunday, February 25, 2018

महिला सक्षमीकरण : निरीक्षकाची भुमिका महत्वाची आहे आणि ते फक्त महिलाच उत्तमरीत्या सांभाळू शकतात... मंडले सर.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शहीद कै. शंकरराव मोहिते चरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पाटील यांचे हस्ते शहीद शंकरराव मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये श्री. प्रदीप फासे यांनी शंकरराव मोहिते यांच्या कारकिर्दीविषयी आणि त्यांनी दिलेला लढा याविषयी सांगून कार्यक्रम पुढे सुरु ठेवला.
शहीद कै. शंकरराव मोहिते यांच्या प्रतिमा पुजन
करताना मा. दत्तात्रय पाटील

मा. श्री. डी. डी. मंडले, मुख्याध्यापक वीरभद्र कृषि महाविद्यालय सिद्धेवाडी ता. तासगाव यांच्या मार्गदर्शनापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विवाह पुर्व आणि पश्चात समुपदेशन आणि संसारात महिलेची भुमिका एखाद्या कंपनीच्या व्यवस्थापकापेक्षा कमी नाही असे सांगितले. ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी सक्षम होण्याकरिता घरापासून सुरुवात करणे आवश्यक असलेचे सांगितले.

शेतीमध्ये निरीक्षकाची भुमिका अतिशय महत्वाची आहे आणि ते फक्त महिलाच उत्तमरीत्या सांभाळू शकतात असे मंडले सरांनी सांगितले. लग्नाबाबत निर्णय घेताना मुलींनी आपले आई-बाबा शेतकरी आहेत आणि पुढे जाऊन नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक शेती करा आणि होणाऱ्या नवऱ्याला सोबत घ्या. अपवाद वगळता लाखो रुपये कमावून देणारी शेती कधीच धोका देत नाही असे सांगितले.
कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना मा. डी. डी. मंडले सर...


माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाणकडून राबवल्या जाणाऱ्या “विद्यार्थी विकास योजनेचे” आणि अध्यक्ष महेश बोरगे यांचे सरांनी खास शैलीत कौतुक केले. मुख्याध्यापक म्हणुन काम करताना असणाऱ्या जबाबदारीचे विश्लेषण करून मुलींना उत्तम गृहिणी, कुशल व्यवस्थापक, योग्य चिकित्सक बनवून गुरूची भुमिका पार पाडायला कधीही मागे हटणार नाही असे सांगितले. 

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश बोरगे, यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माहिती दिली तसेच १९९३ ते २०१८ मधील महिला आयोगाच्या खंबीर वाटचालीची मुद्देसूद माहिती सांगितली. 

लग्नापुर्वी आणि लग्नानंतर मुलींच्या स्वभाव आणि वागणुक
याविषयावर बोलताना श्री. महेश बोरगे

समाजसंस्था टिकवणे आणि वृद्धिंगत करणे आजच्या घडीला महत्वाचे आहे. लग्नापुर्वी आणि लग्नानंतर मुलींच्या स्वभाव आणि वागणुकीमुळे वातावरण बिघडते असा काहीसा समज आणि काहीसा गैरसमज समाजात पसरलेला आहे. वास्तविक कोणतीही मुलगी माहेर आणि सासरचे वाईट व्हावे असे वाटत नाही. स्वतःच्या स्वभावामध्ये दुसऱ्यासाठी बदल घडविणे किती अवघड असते हे असते हे एका संसारिक मुलीलाच माहिती असते, हे सांगताना प्रेरणा समुपदेशन व सहाय्य केंद्रातील गंभीर आणि हास्यास्पद घटनांची उजळणी केली.

कार्यशाळेमध्ये महिलांसाठीचे कायदे विषयी
मार्गदर्शन करताना मा. वकील श्री. विश्वासराव शिंदे 
मा. वकील श्री. विश्वासराव शिंदे यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी दत्तात्रय पाटील
यांना जनसेवेच्या प्रीत्यर्थ सन्मानित केले
शहीद कै. शंकरराव मोहिते चरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पाटील यांनी संस्थेच्या इच्छापुर्ती वधु-वर सूचक केंद्रामार्फत ४० जणांसाठी रोजगार निर्मिती केली व त्यामाध्यमातून शेकडो विवाह जुळविले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे असणारे एकमेव विवाह सूचक शृंखलेमुळे समाजातील फसवणुकीचे प्रमाण घटणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचा विश्वास आहे कि आजपर्यंत लावलेल्या विवाहापैकी एकही विवाह कलंकित झालेला नाही. सर्व जोड्या व्यवस्थितपणे संसारात मग्न आहेत.

कार्यकमाची सांगता करताना उपस्थित महिलांनी दत्तात्रय पाटील यांच्या जनसेवेच्या प्रीत्यर्थ श्री. दत्तात्रय पाटील यांना सन्मानित केले.  एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.