Sunday, May 6, 2018

बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत संस्थाना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था यांना महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागामार्फत कळविनेत येते कि, केंद्र शासनाने दिनांक ०१ जानेवारी २०१६ पासून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि या कायद्याच्या अंमलबजावणी साठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू केले आहेत. या कायद्याच्या ४१ (१) अंतर्गत विधी संघर्षग्रस्त आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यरत व इच्छुक असणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था यांनी या महिला व बाल विकास विभागांतर्गत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रमाणपत्राशिवाय ज्या संस्था बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहतील अश्या अवैध्य संस्थांवर या कायद्याच्या कलम ४२ अंतर्गत गुन्हा दाखल करणेत येणार आहे सादर गुन्ह्यासाठी कमाल ०१ वर्ष्यापर्यंत तुरुंगवास व रुपये ०१ लाख पर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद अधिनियमात नमूद करणेत आली आहे.


बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत (निरीक्षण गृह, विशेष गृह, सुरक्षित जागा (place of safety) बालगृहे, खुले निवारागृह (विशेष दत्तक संस्था) तसेच इच्छुक सर्व संस्थांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ४१ नुसार नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ नमुना २७ (नियम २२(२) आणि २३ (२) नुसार विहित नमुन्यामध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक २०/०५/२०१८ पर्यत सादर करावे. नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संस्थांनी नीती आयोगाच्या darpan portal वर संस्थेची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक राहील. नीती आयोगाच्या darpan portal नोंदणी नसल्यास केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.


सदर कालावधीनंतर नोंदणी प्रमाणपत्राशिवाय किंवा नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर न करणाऱ्या काळजी व संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांवर कायद्याच्या कलम ४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करणेत येईल. ज्या स्वयंसेवी संस्थांना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० सुधारित अधिनियम २००६ नुसार नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे परंतु मुदत संपलेली नाही किंवा नोंदणी प्रमाणपत्रावर मुदत नमूद नाही अश्या संस्थांनी देखील बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ नुसार नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दिनांक २२/५/२०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे अन्यथा त्याची मान्यता रद्द करणेत येईल.


पूर्वी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व केंद्र शासनाची आदर्श नियमावली २०१६ नुसार नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत सादर करणेत आलेले प्रस्ताव व्यपगत करणेत येत आहेत.

अश्या वर उल्लेख केलेल्या संस्थांनी सर्व ऑनलाईन अर्ज व अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची साक्षांकित छायांकित प्रत बंद लखोट्यात "महिला व बाल विकास आयुक्तालय २८, राणीचा बाग जुना सर्किट हौस पुणे - ०१" या पत्त्यावर दि.२३/५/२०१८ पर्यंत सादर करावेत.

Thursday, April 26, 2018

कोल्हापूर : कसबा बावडा येथे बचत गटांच्या महिलांना उद्योगामध्ये रेकोर्ड किपिंगचे प्रशिक्षण, येणाऱ्या काळात बचत गट संकल्पनेला फाटा देऊन व्यवसाय गट निर्मितीवर भर देण्याचा महिलांचा निर्धार

कोल्हापूर : कसबा बावडा येथे बचत गटांच्या महिलांना उद्योगामध्ये रेकोर्ड किपिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमासाठी कोल्हापुर जिल्हा व महानगरपालिका यांचे शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश बोरगे, अन्नपूर्णा सेवाभावी महिला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आश्लेशा चव्हाण मॅडम, श्री. प्रमोद गुरव सर, नरेंद्र जाधव आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. 

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. प्रमोद गुरव सर यांनी महिलांसोबत संवाद साधला व महिला आपले घर सांभाळून कश्या पद्धतीने आणि कोण - कोण व्यवसाय करू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले. उद्योग व्यवसायात उभ्या राहणाऱ्या महिलांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन महिलांच्या शंकेचे निरसन केले. बचत गटातील कागदपत्रे आणि व्यवसायातील कागदपत्रे यातील फरक समजावून सांगताना माझीशेतीच्या मार्केट लिंकेज"प्रकल्पाबाबत माहिती देऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.महेश बोरगे सर यांनी महिलांना महिला बचत गटासाठी रेकॉर्ड किपिंग चे महत्व पटवून दिले आणि रेकॉर्ड किपिंग कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री.महेश बोरगे सरांनी महिलांना व्यवसाय गट ही संकल्पना समजावून त्याचे फायदे सांगितले व इच्छुक महिलांकडून त्यांच्या आवडीच्या व्यवसायाची माहिती घेऊन त्यासाठी काय केले पाहिजे आणि कोणत्या सरकारी कार्यालयामध्ये जावे याची सविस्तर माहिती दिली. उपस्थित महिलांनी येणाऱ्या काळात बचत गट संकल्पनेला फाटा देऊन व्यवसाय गट निर्मितीवर भर देण्याचा निर्धार केला. 

कार्यक्रमाचे वृत्तांकन श्री. नरेंद्र जाधव यांनी केले.
कार्यक्रमाची क्षणचित्रे 

Thursday, April 19, 2018

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची अक्षय तृतीयेला कोल्हापुरात मुहर्तमेढ

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पातील "बेदाणा क्लस्टर विकास प्रकल्प"मधील व्यवसाय शृंखला प्रकल्प कोल्हापूरमध्ये सुरु करण्यात आला. याप्रसंगी माझीशेतीच्यावतीने कोल्हापूर जिल्हा कृषी व्यवस्थापक नरेंद्र जाधव यांनी ठरावावर स्वाक्षरी केली तर प्रकल्पाच्या सुरुवातीसाठी अन्नपुर्णा सेवाभावी महिला संस्थेच्या वतीने समाजसेविका डॉ. आश्लेषा चव्हाण यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी शिल्पा पाटील, जयश्री पाटोळे, सुजाता साळोखे, फरीदा शेख व इतर व्यवसाय गटांच्या प्रतिनिधी महिला उपस्थित होत्या. 


सांगली, नाशिक, सोलापुर, सातारा, अहमदनगर या द्राक्ष उत्पादक ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकासासाठी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प कार्यरत आहे. अवकाळी पाऊस, बाजारपेठ चढ-उतार, व्यापारी मनमानी या सर्व अडचणींवर मार्ग काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्री करण्याची जबाबदारी अन्नपूर्णा संस्थेने उचलली आहे. 

बचत गट आणि स्वयंसहायता गट या कल्पनेला फाटा देऊन माझीशेती अध्यक्ष महेश बोरगे यांच्या व्यवसाय गट या संकल्पनेच्या विस्तृत मागणीला पाठींबा मिळत आहे. उत्पादन, मुल्यवर्धन, विक्री आणि सेवा या चतुःसूत्रीने शेतकरी, ग्रामीण आणि शहरी व्यावसायिक गट (बचत गट, स्वयंसहायता गट, सुशिक्षित बेरोजगार गट, विद्यार्थी गट) एकत्रित बांधले गेल्यामुळे शासनाच्या "शेतकरी ते ग्राहक थेट विक्री" योजनेला पाठबळ मिळत आहे. गुणवत्ता व्यवस्थापन करण्यासाठी अतिउच्च धोरण ठेवून "विषमुक्त अन्न सोसायटीमध्ये पोहोचवण्यासाठी माझीशेतीची यंत्रणा कार्यरत आहे. 

संपुर्ण प्रकल्पामध्ये कौशल्य विकास करण्यावर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. तासगाव जि.सांगली येथून प्रायोगिक स्तरावर नोंदणी केलेल्या १००० शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती उत्पादने करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यांच्या उत्पादित शेतमालाचे वर्गीकरण, निवड, वेष्टन करण्यासाठी व्यवसाय गटांना व्यवसाय व्यवस्थापन आणि विक्री कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. माझीशेतीच्या धोरणांना कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जात नाही त्यामुळे शहरी सोसायटीमधील कुटुंबांची ओढ दिवसेंदिवस वाढत आहे. 

कृषी, ग्रामीण विकास, नाबार्ड, महापालिका, नगरपालिका अश्या शासकीय संस्थाच्या सहाय्याने विक्री व्यवस्था सक्षम झाली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी रोजगार निर्मिती, आरोग्य, उपजीविका, कौशल्य विकास अश्या उपक्रम राबविण्यासाठी या प्रकल्पामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन महेश बोरगे यांनी केले. 

Wednesday, April 4, 2018

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमातून ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम - श्री. संजय माळी, प्रकल्प व्यवस्थापक


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रम पार्श्वभूमी : माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान मार्फत ग्रामीण भागाच्या विकासाकरिता शेतकरीमहिला आणि तरुण यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प राबविला जातो. शेतकरी बांधवांना शेती पिक उत्पादन पद्धती मार्गदर्शनासोबत तयार झालेला शेतमाल विक्री करिता सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाते. परिणामी गुणवत्तापूर्ण आणि पोषक आहार उत्पादनाचे अंतिम ध्येय गाठता येते. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला फळे - भाजीपाला पूरक विक्री व्यवस्था नसल्याने कवडीमोल किमतीने विकला जातो. बाजारपेठेचे नियोजन नसल्यामुळे बाजारातील आवक वाढल्यास व्यापारी शेतमालास योग्य भाव देऊ शकत नाहीत. यासंपुर्ण एकमेकांना पूरक बाबींचा अभ्यास केल्यानंतर प्रायोगिक तत्वावर दोन वर्षे प्रकल्प चालविल्यानंतर माझीशेती संस्था प्रत्यक्षात कृषी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, बँक (आर्थिक / वित्तीय संस्था), शेतकरी, ग्रामीण व शहरी बचत गट, सेवा पुरवठादार यांच्या सहकार्याने परिपुर्ण विक्री व्यवस्था ज्यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव तर देता येईलच पण ग्राहकांना पोषक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने पोहोच करणे सोपे जात आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि उपजीविका विकास हा एक प्रमुख विषय पुर्ण होताना दिसत आहे. 


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमाची सुरुवात व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षणाने : ग्रामीण भागात उपलब्ध मनुष्यबळाची आवश्यकता पाहुन व्यवसाय कसा सुरु करायचा आणि सुरु केलेला सुस्थितीत चालण्यासाठी कोणती काळजी घ्यावयाची याचे प्राधान्याने प्रशिक्षण दिले जाते. एकूण २ दिवस अभ्यासक्रम + १ प्रात्यक्षिक असे ०३ दिवसांमध्ये शेतकरी, तरुण आणि महिलांना माहिती तंत्रज्ञानाचा व्यवसायामध्ये वापर, नेतृत्वकला, संवादकला, उत्पादन - व्यापार - सेवा यामधील फरक आणि पद्धत, जमा - खर्च, मनुष्यबळ व्यवस्थापन, विमा संरक्षण, मूल्यवर्धन आणि विक्री व्यवस्थापन, सोबत शासकीय मदत आणि प्रोत्साहन योजना असे विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. परिणामी सहभागी घटकांचे मनोबल वाढते आणि इच्छित साध्य करणे सोपे जाते.




बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना मिळणार उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव : 

माझीशेतीच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या सहाय्याने प्रतिवर्षी किमान ५०० व कमाल १००० शेतकरी बांधवांना व्यावसायिक शेती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाते. एकुण २ (अभ्यासक्रम) + १ (प्रात्यक्षिक) असे ०३ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर, सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शासकीय मदत आणि प्रोत्साहन योजना असे अतिशय मुलभुत शेती व्यवसायकरिता आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत होते. शिवाय उत्पादन होण्यापुर्वीच शेतकऱ्यांच्या मालाचा दर ठरत असल्यामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे. एकंदरीत प्रती शेतकरी एक एकर द्राक्षबाग गृहीत धरल्यास १००० एकर द्राक्षबाग आणि त्यापासुन सरासरी ०५ ते ०६ टन प्रती एकर बेदाणा उत्पादन गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट उत्पादन खर्चावर आधारित हंगामी हमीभाव रु. १२० प्रति किलो दिला जातोय.


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये बचत गटांना रोजगाराचा पर्याय : बचत गट चळवळ महाराष्ट्राला नवीन नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बचत गट सर्व बाजुने सक्षम आहेत, अगदी आर्थिक साक्षरता आणि सक्षमता बाबतीतही इथले बचत गट कमी नाहीत. बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये बचत गट प्राधान्याने सहभागी करून घेतले जातात. बचत गटांना एकत्रित करून त्यांना बेदाणा प्रतवारी, वेष्टन, विक्री व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित झालेल्या बचत गटांना व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञान सहकार्य घेणे, बेदाणा ग्राहक आणि उत्पादक शेतकरी नोंदणी करणे, प्रतवारी आणि वेष्टन करणे, बाजारपेठ शोधणे आणि विक्री करून वेळोवेळी अहवाल जतन करून ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून बचत गटांना सरासरी रु. १,००,००,०००/- वार्षिक नफा किंवा रोजगार निर्मिती होते. 

बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये माझीशेतीची भुमिका : 
संस्थेचे वेगवेगळ्या भागातील तज्ञ कार्यरत मनुष्यबळ साधन सुविधा पुरवण्याचे काम करते. प्रशिक्षण देऊन लाभार्थी घटकांना सक्षम करणे हे माझीशेतीचे प्रथम प्राधान्याचे काम आहे. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या 'ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प निधीतून प्रति लाभार्थी अंदाजित रु. ३६५ खर्च करून १००० शेतकरी, २५०० बचत गटाचे सदस्य असे एकूण ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रति वर्ष रुपये १२,७७,५००/- लाख प्रमाणे निधी तरतुद केलेली आहे.

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पच्या 'बेदाणा उत्पादक शेतकरी विकास उपक्रमामध्ये पदभरती जाहिरात (१८०४०३)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाच्या 'बेदाणा उत्पादक शेतकरी विकास उपक्रमामध्ये ०७ (सात) पदे भरणे आहेत. 

अ.नं.
पदाचे नाव
शैक्षणिक अर्हता
०१
तज्ञ प्रशिक्षक (पदसंख्या - ०१)
Agri + MSW
०२
समुपदेशक (पदसंख्या - ०६)
Com + MSW

१. शैक्षणिक पात्रता - नियमित शिक्षण घेतलेले उमेदवारांना प्राधान्य राहील. पदव्युत्तर शिक्षण बहिस्थ झालेले असेल तर चालेल मात्र शैक्षणिक कालावधीत संबंधित उमेदवार हा सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत असावा. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य राहील. 
२. वेतन - मुळ वेतन रु. ७००० प्रतिमाह सोबत मुळ वेतनाच्या १५% प्रवास भत्ता, ०३% फोनबिल, १०% निवास भत्ता, ०५% वैद्यकीय भत्ता (विमा काढण्यास प्राधान्य द्यावे.) अतिरिक्त देय राहील. टीप : शहरी (District Headquarter) आणि महानगरीय (Metro City) भागासाठी निवास भत्ता अनुक्रमे ५% आणि १०% वाढीव देय राहील. पहिल्या महिन्याचे वेतन सहाव्या महिन्याच्या वेतनासोबत अदा केले जाईल. दुसऱ्या महिन्याच्या अहवाल सादरीकरणनंतर उमेदवारांचे बँक खातेवर नियमित वेतन होईल.
३. वयमर्यादा - उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे किंवा कमाल 35 वर्षे असावे. माझीशेतीच्या लाभार्थी गटातील उमेदवारांना वयाची अट लागू नाही. 
४. आरक्षण - महिला उमेदवारांना ३०% राखीव जागा आहेत. इतर सर्व प्रवर्गांना विशेष आरक्षण नाही. 
५. पदसंख्या - 
i) प्रशिक्षक पदासाठी तासगाव जि.सांगली मुख्यालयी ०१ जागा आहे. 
ii) समुपदेशक पदासाठी सांगली, कोल्हापुर, सातारा, पुणे, मुंबई आणि बेळगाव येथे प्रत्येकी ०१ असे ०६ जागा आहेत. 
iii) प्रकल्प कालावधीपर्यंत नेमणुका वैध राहतील, त्यानंतर गुणवत्तेनुसार कालावधी वाढ लागू होईल. 
६. अर्ज प्रक्रिया - माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या रोजगार निर्मिती उपक्रमातून आलेले अर्ज छाननी करून कर्मचारी नियुक्त केले जातील. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Saturday, March 24, 2018

माझीशेतीचे ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाचे ग्रामीण भागाच्या विकासामधील योगदान बहुमोल ... ऋषभ पाटील, नाशिक


 माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा मी २००९ पासून सल्ला आणि मार्गदर्शन घेत आहे. माझ्याकडे ०४ एकर कोरडवाहू जमीन आहे. घरी मी एकुलता एक असल्यामुळे माझ्या पाठीमागे शेती करण्यासाठी कोणीच नसल्यामुळे मी कधी शेतीकडे लक्ष दिले नव्हते. शिक्षण व्यवस्थित असल्याने नोकरी करण्यावर मी भर दिला. कोरडवाहू शेतीमधून विक्रीसाठी काही मिळत नव्हते पण 'तेल-मीठसोडले तर काही विकत पण आणावे लागत नव्हते. लग्न होईपर्यंत नोकरीचा पर्याय सुंदर होता पण जसजसे खर्च वाढत गेला तसतसे नोकरीचा पर्याय भयानक होऊ लागला. जास्त कमाई तर सोडाच पण आहे ते पण पोट भरण्यासाठी पुरेसे ठरत नव्हते. एक एक दिवस पुढे ढकलणे म्हणजे कठीण होऊन बसले होते. 


इंटरनेटवर सगळ्या गोष्टीचे समाधान होते असे ऐकले होते म्हणून मी एक्स्ट्रा इन्कमसाठी वेळ भेटेल तेंव्हा सर्च करीत होतो खुप ठिकाणी पाहिलेखुप पाहिले... पण म्हणावेसे काही सापडत नव्हते. शेवटी शेतीमध्ये काहीतरी करावे असे ठरवुन नेटवर चेक केले तर प्रत्येक सर्च मध्ये माझीशेती नावाने काही न काही यायचे. एकदा वेळ भेटल्यावर वेळ काढल्यावर वेबसाईट पाहिली... ग्रामीण भागातील जनजीवन सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांमार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. एकूण जनसंख्या पाहता त्यांच्यासाठी काम करणारा वर्ग पुरेसा आहे. उदा. गावस्तरावर काम करणारे शिक्षकतलाठीग्रामविकास अधिकारीपाणलोट कर्मचारीआत्मा कर्मचारीकृषी अधिकारीअंगणवाडी सेविकाआशा कर्मचारी असे अनेकाविध कर्मचारी ग्रामीण जनतेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. मंत्रालयस्तरावरून घेतले जाणारे निर्णय हे वेगवेगळ्या विभागांशी सल्लामसलत करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्राधान्याने घेतले जातात. सर्व विभागाच्या योजना राबविण्यासाठी गावस्तरापर्यंत स्वतंत्र मनुष्यबळ कार्यरत आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्राधान्याने स्थानिक संसाधने विकास करणे हे शासनाचे प्रमुख ध्येय आहे. 

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा आढावा घेतल्यास शासनाच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना अंतिम आणि सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे कठीण आहे. सध्याची परिस्थिती हि एकमार्गी आहे. शासकीय योजना आणि त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि तज्ञ हे एका चाकोरीबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. एखाद्या विभागाच्या अंतिम टप्प्यातील कर्मचाऱ्यांना एखाद्या योजनेचे संबंधित लाभार्थी घटकांना लाभ देताना अंतिम निर्णय घेण्याची किंवा चाकोरी बाहेरील माहिती सांगण्याची परवानगी नसते किंवा तशी यथायोग्य माहिती देण्यासाठी माहितीचे संकलन अपुरे पडते.

गावस्तरावर प्राधान्याने कृषी व्यवस्था आणि त्यावर आधारित रोजगार निर्मितीची शृंखला तयार करणे आवश्यक आहे. एक कुटिरोद्योग तयार करणे. त्याच्या पक्क्या मालावर आधारित असणारा दुसरा व्यवसाय सुरु करणे. असे एकापेक्षा जास्त एकमेकांवर आधारित रोजगार निर्मिती उपक्रम राबविले पाहिजेत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणेद्वारे वेगवेगळ्या विभागाच्या जनसुविधांची माहिती संकलित करणेजनतेच्या गरजेनुसार ती पुरवठा करणे आवश्यक आहे. यासाठी गावस्तरावर काम करण्यासाठी यंत्रणा उभी असणे अभिप्रेत आहे. कृषिग्रामीण विकासराज्यशास्त्रसमाज कार्य असे मुलभूत शिक्षण असणाऱ्या सुशिक्षित मनुष्यबळास पाणलोट व्यवस्थापन करण्यासाठीचे प्रशिक्षण देऊन कृषी विभागाच्या सध्या कार्यरत आत्मा आणि पाणलोट व्यवस्थापनाच्या धर्तीवर गावस्तरावर क्षमता विकास करण्यासाठी मनुष्यबळ असणे अभिप्रेत आहे. हे मनुष्यबळ सर्व विभागांशी समन्वय साधून शासकीय योजनांचे वर्गीकरण करतील. राजकीय हेतुवैयक्तिक नातेसंबंध आणि वरिष्ठांची मनधरणी अश्या बाबींपासून या मनुष्यबळास दूर ठेवल्यास सामाजिक आणि आर्थिक बदल घडून येईल.


घटकनिहाय उपाययोजना करताना शेतकरीमहिलातरुण यांना नजरेसमोर ठेवुन रोजगार निर्मितीच्या दृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत. शेतकरी वर्गाला सीड टू सीड कार्यक्रम देणे आवश्यक आहे. सध्या यासाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे ते तालुका स्तरावर किंवा क्लस्टर स्तरावर कार्य करतात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. खरीपरब्बी हंगाम सुरु होताना १००% शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते मात्र उपलब्ध मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांच्या गरजा याचे ताळमेळ बसने अवघड आहे. सध्या कृषी उत्पन्नासाठी एकूण जमीन किती त्यापैकी पेरा होऊ शकणारी जमीन आणि पेरा झालेली जमीन यांची आकडेवारी घेवून हंगामनिहाय शेतकरी गट तयार करणेयोग्यवेळी योग्य ठिकाणी गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवणेत्यानंतर कृषिउत्पन्न काढण्यापुर्वी विक्रीसाठी बाजारपेठेचे नियोजन करणे यामधुन अधिकचे उत्पन्न राहत असेल तर प्रक्रिया केंद्रांना जोडुन देणे आवश्यक आहे. काही ठिकाणी प्रक्रिया केंद्रे उपलब्ध नाहीत अश्या ठिकाणी अत्याधुनिक साठवणूक केंद्रे तयार करणे आवश्यक आहे. इतक्या सुविधा कमी-जास्त प्रमाणात वेगवेगळ्या स्तरावर कार्यरत आहेत मात्र यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे काही प्रमाणात विसंबुन राहता येते. या समन्वयासाठी स्वतंत्र समन्वयक नेमल्यास सर्व विभागांना भेटी देणेत्यांच्या कडून आवश्यक माहिती घेणे आणि गावस्तरावर महिन्यातून किमान एकदा शेतकरी बांधवांची आढावा बैठक घेणे आवश्यक आहे.

 
शेतकरी हे शेतीच्या माध्यमातून स्वतःची उपजीविका पूर्ण करतात सोबतच ज्यांना शेती नाही अश्या मजूर घटकांच्या आर्थिक प्रगतीसाठी देखील कृषिव्यवस्था सक्षम आहे. महिला व पुरुष बचत गट आणि त्यांच्यामार्फत स्वतंत्र सेवा पुरवठादार गट तयार केलेस शेतीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळाचे कौशल्य विकास केल्यास शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये देखील २० ते ३०% उत्पन्न वाढीची शाश्वती देता येते. याविषयी आम्ही तासगाव पुर्व भागात चाचण्या घेतलेल्या आहेत.

यासोबत शेतीला व्यावसाय समजून वीजपाणी आणि रस्ता या मुलभूत सुविधा भेटल्यास तरुणांना रोजगार निर्मितीसाठी स्वतंत्र योजना कराव्या लागणार नाहीत. शासकीय विभागामार्फत केल्या जाणारे / वर्तवले जाणारे अंदाज यांची जबाबदारी घेणारा शासकीय वर्ग तयार झाल्यास नुकसानीची मर्यादा कमी होते. प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करणारी टीम हि सक्षम आणि कुशल असल्यास शासकीय यंत्रणेची जबाबदारी बऱ्याच अंशी कमी होईल. ग्रामीण भागातील कृषी आणि कृषी पूरक अर्थव्यवस्था सक्षम होण्यासाठी प्रत्येक विभागाचे आकडेवारी कक्ष आणि नियोजन कक्ष सक्षम आणि जबाबदार असावेत. याप्रमाणे शेतकरीमहिलातरुण यांना नजरेसमोर ठेवुन माहितीसमन्वयकौशल विकास आणि रोजगार या चातुसुत्रीवर काम केल्यास ग्रामीण भागाचा विकास करणे सोपे जाईल. 


















Friday, March 16, 2018

पर्यटन व्यवसाय

घडय़ाळाच्या काटय़ावर चालणाऱ्या धकाधकीच्या आयुष्यातून काही काळ तरी स्वत:साठी व कुटुंबीयांसाठी मजेत घालवावा असे प्रत्येकालाच वाटत असते. मग खिशाला परवडेल त्यानुसार सहलींचे घाट घातले जातात. मात्र त्या पर्यटनस्थळांची अचूक माहिती, प्रवासाची व्यवस्था, राहण्याची व जेवणाची व्यवस्था इत्यादींसाठी पुरेसा वेळ बहुधा नसतो. मग एखाद्या ट्रॅव्हल कंपनीवर या सर्व गोष्टी सोपवून आपण निर्धास्त होतो. अर्थात अशा ट्रॅव्हल एजन्सीजची मदत न घेता स्वत:च पूर्ण नियोजन व व्यवस्था करणारे हौशी पर्यटकही बरेच असतात. या पर्यटकांना आवश्यक ते साहाय्य व सुविधा पुरविणारा व्यवसाय म्हणजे ‘पर्यटन व्यवसाय’ होय.

पर्यटन व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे. या व्यवसायाचा प्रामुख्याने चार विभागांत विचार करता येईल.
  1. केंद्र व राज्य सरकारांशी संबंधित सेवा - यात पर्यटन संचालनालये, पर्यटन विकास महामंडळे, आय. टी. डी. सी. हॉटेल्स, इमिग्रेशन व कस्टम सेवा इत्यादींचा समावेश करता येईल.
  2. व्यावसायिक विभाग - यामध्ये प्रामुख्याने पर्यटन संस्था, पर्यटन सेवांचा समावेश होतो. (उदा. हवाई सेवा, रेल्वे सेवा इ.)
  3. संस्थात्मक विभाग - यात हॉटेल्स किंवा हॉस्पिटॅलिटीशी संबंधित सेवा समाविष्ट करता येतात. उदा. कुकिंग, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग इ.
  4. सेवा विभाग - गाईडस्, दुभाषी, मार्केटिंगमधील व्यक्ती, प्रसिद्धी यंत्रणा हाताळणारे, इत्यादींचा समावेश यात होतो. 
ट्रॅव्हल एजन्सी / एजंटस्
ट्रॅव्हल एजंट ग्राहकांना प्रवासाचे नियोजन करण्यास मदत करतात. प्रवासाचे विविध मार्ग समोर ठेवणे, पर्यटनस्थळांची परिपूर्ण माहिती पुरविणे, विमान/ रेल्वे इत्यादींचे आरक्षण करणे, पासपोर्ट/ व्हिसा मिळवून देण्यात मदत करणे, हॉटेल्सचे आरक्षण करणे, सामानाच्या वाहतुकीची व्यवस्था करणे इत्यादी गोष्टी ट्रॅव्हल एजंटस् करून देतात. मोठय़ा ट्रॅव्हल एजन्सीजमध्ये या प्रत्येक कामासाठी स्वतंत्र विभाग केलेले असतात-
  • आरक्षण (बुकिंग) विभाग - या विभागात काम करणाऱ्या व्यक्तीकडे विविध गाडय़ा, विमाने, रेल्वे इत्यादींच्या वेळापत्रकांची माहिती असणे आवश्यक असते. प्रवासाचे विविध पर्याय, आरक्षण, प्रवासभाडे अशी माहितीही त्यांना हवी. जलद कामे करण्याची क्षमता, संवादकौशल्य, तत्परता हे गुण या विभागात काम करण्यासाठी आवश्यक असतात.
  • व्यवस्थापन विभाग - विविध विभागांच्या कामात सुसूत्रता आणणे, कामांचे नियोजन करणे, कामे वाटून देणे, पर्यटनाची नवनवीन पॅकेजेस आखणे अशी कामे या विभागाद्वारे केली जातात.
  • विपणन (मार्केटिंग) विभाग - नवनवीन ग्राहक शोधणे, जुन्या ग्राहकांशी संपर्क ठेवणे, नवी प्रसिद्ध योजना आखणे अशी कामे या विभागाकडे असतात.
  • टूर ऑपरेटर्स - देशविदेशात पर्यटकांना घेऊन जाणे व त्यांच्या सर्व व्यवस्था पाहणे टूर ऑपरेटर्सचे काम असते. स्वत:च टूर आखण्याऐवजी आजकाल ग्राहक टूर ऑपरेटर्सनी नवनवीन योजना काढून ग्राहकांना आकर्षित केले आहे. या टूर ऑपरेटिंग कंपन्यांच्या कामाचेही विभाग केलेले असतात.
  • नियोजन विभाग - कंपन्यांचे डायरेक्टर्स व अनुभवी काऊंटर क्लाकर्स विविध टूर्सचे नियोजन करतात. सहलीच्या ठिकाणच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून जेवण, मनोरंजन, प्रवासाचे वेळापत्रक, यातायात व्यवस्था, टूरचा खर्च इत्यादींचा विचार या विभागाची जबाबदारी असते.
  • विक्री विभाग - हॉटेल्स तसेच ट्रॅव्हल एजन्सीजशी संपर्क करणे, शाळा, महाविद्यालये, क्लब्ज, विविध वयोगट, व्यावसायिक इत्यादींपर्यंत कंपनीच्या टूर्सची माहिती आकर्षक पद्धतीने पोहोचवणे असे या विभागाचे कार्य असते.
  • आरक्षण विभाग - प्रवासाची व निवासाची तसेच गाईडस् व तत्सम आरक्षणे करणे या विभागाचे कार्य असते.
  • टूर मॅनेजर्स/ टूर रिप्रेझेंटेटिव्हज्/ टीम लीडर्स - टूर ऑपरेटिंग कंपनीचा प्रतिनिधी म्हणून टूर मॅनेजर प्रत्यक्ष ग्राहकांबरोबर सहलीमध्ये सहभागी होतो. सहलीदरम्यान उद्भवणाऱ्या प्रत्येक समस्येला शांतचित्ताने व प्रसंगावधान राखून सामोरे जाण्याचे महत्त्वाचे काम याला करावे लागते. लहान, वृद्ध, अपंग, आजारी पर्यटकांची विशेष काळजी घेणे. सर्व पर्यटकांना एकत्र आणून मनोरंजनाचे कार्यक्रम घडवून आणणे, त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवणे इत्यादी कामांचा समावेश त्यांच्या जबाबदारीत होतो. संघटकांचे गुण तसेच पर्यटनस्थळाची परिपूर्ण माहिती, तेथील भाषेचे ज्ञान, समयसूचकता, मनमोकळा स्वभाव इत्यादी स्वभावगुण चांगल्या टूर मॅनेजर्सना आवश्यक असतात.
  • गाईडस् - पर्यटनस्थळाविषयी, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक माहिती पर्यटकांना आकर्षक शैलीत देण्याची जबाबदारी गाईडस्ची असते. पर्यटन मंत्रालयातर्फे रिजनल, स्टेट व लोकल अशा तीन प्रकारच्या गाईडस्ना मान्यता दिली जाते. रिजनल गाईडस् म्हणून दर दोन वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक असलेला परवाना मंत्रालयाकडून मिळवणे आवश्यक असते. असे गाईडस् टूर ऑपरेटर्स, हॉटेल्स, स्थानिक पर्यटन विभाग इत्यादींसाठी काम करू शकतात. आवश्यकतेनुसार कधी समूहांसाठी तरी कधी व्यक्तिगत गाईड (उदा. संशोधकासाठी) म्हणूनही काम करावे लागते.
  • सरकारी पर्यटन विभाग - केंद्र व राज्य सरकारांच्या पर्यटन विभागात दोन प्रकारच्या संधी मिळू शकतात. संचालनालयातील किंवा पर्यटन मंत्रालयातील विविध अधिकारी म्हणून व आरक्षण लिपिक, टूर गाईडस्, विक्री-विपणन कर्मचारी इत्यादी. ‘ऑपरेशनल’ कामांसाठी अधिकारी हे केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांम धून निवडलेले सनदी अधिकारी असतात. यांचे काम प्रामुख्याने पर्यटनविषयक नियोजन करणे, व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी योजना आखणे, धोरणात्मक निर्णय घेणे असे असते, तर ‘ऑपरेशनल जॉब्स’ म्हणजे प्रत्यक्ष आरक्षण करणे, धोरणानुसार कार्यक्रम राबवणे, प्रसिद्धी करणे या स्वरूपाचे असतात. या जागांसाठी ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम’ मधील पदवी/ पदवीधारक उमेदवारांची निवड केली जाते. याची जाहिरात ‘रोजगार समाचार’मधून वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते.

याशिवाय पर्यटन मंत्रालयात व संबंधित विभागात इन्फर्मेशन असिस्टंटस्’ची नियुक्ती केली जाते. पर्यटन स्थळाविषयी माहिती/ सेवा पुरवणे, पर्यटकांना सहलीचे नियोजन करण्यात मदत करणे इ. स्वरूपाचे काम त्यांना करावे लगते. या पदासाठी ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’तर्फे स्पर्धा परीक्षा घेतली जातात. २१ ते २५ वयोगटातील पदवीधर उमेदवार या लेखी परीक्षेसाठी पात्र समजले जाते. या व्यतिरिक्त भारतीय इतिहास, संस्कृती, पर्यटनस्थळांचे ज्ञान, इंग्रजीवर प्रभुत्व याही बाबी आवश्यक असतात. एखादी परदेशी भाषा येत असल्यास अधिक उपयुक्त समजले जाते. लेखी परीक्षा व मुलाखत या दोन टप्प्यांतून निवड केली जाते. जाहिरात ‘रोजगार समाचार’मधून प्रसिद्ध केली जाते.

कृषी पर्यटन 

भारतात कृषी पर्यटन सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे , आज मितीस ४०० पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र अस्तित्वात असून मागच्या आर्थिक वर्षात २०१५-१६ या कृषी पर्यटन केंद्रांना ८ लाख पर्यटकांनी भेटी दिल्या असून रुपये १८ कोटी चे अतिरिक्त उत्पन्न कृषी पर्यटन केंद्र चालकांना मिळाले आहे, ५००० लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे , गावातील महिला बचत गट , युवक , कारागीर , कलाकार , या सर्वांना कृषी पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांमुळे फायदा झाला आहे , त्यामुळे कृषी पर्यटन हे गावाला पूरक व्यवसायांचे जाळे निर्माण करणारा शेतीवर आधारित उपक्रम आहे ,जग भरातील देशांनी पर्यटन क्षेत्र खूप गांभीर्याने घेतले आहे , आशिया खंडातील कित्येक दक्षिण अग्न्य देशांची आर्थिक उलाढाल फक्त पर्यटनाच्या जोरावर सुरु आहे , त्या सर्व देशांचे पर्यटन धोरण खूप प्रोग्रेसिव्ह आहे ,आपल्या देशात महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन चळवळ सुरु करणारे पहिले राज्य आहे.

सन 2004 साली बारामतीपासून सुरु झालेली कृषी पर्यटनाची चळवळ आज राज्याच्या सीमा ओलांडून देशभर पसरली आहे. राज्यात आजिमितीस ४१८ कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. 2015 साली केलेल्या पाहणी अहवालानुसार काही महत्वपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कृषी पर्यटन करणारे शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून 40 टक्के अधिक आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. तसेच शेतावर आधारित अनेक रोजगाराच्या संधीही उपलब्ध झालेल्या असलचे आढळून आले आहे. कृषी पर्यटनाचे महत्व आणि गरज सर्वच स्तरावर घेतली आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटनामध्ये साधारणतः 69 टक्के कृषी पर्यटन चालक शेतकरी पदवीधर आहेत. 20 टक्के कृषी पर्यटन चालक जन्माने शेतकरी नसले तरीही व्यवहारिक ज्ञान खूप आहे. कृषी पर्यटन चालक शेतकरी उच्च पदवीधर असून 10 टक्के कृषी पर्यटन चालक शेतकरी सातवी पर्यंत शिकलेले आहेत. 58 टक्के कृषी पर्यटन केंद्रांना शाश्‍वत सिंचन सुविधा उपलब्ध आहेत. 30 टक्के कृषी पर्यटन केंद्राच्या जवळ गड किल्लेे आहेत. त्यातून इतिहासाची माहिती मिळते आहे. 75 टक्के कृषी पर्यटन केंद्रावर कौटुंबिक सहली येतात. तसेच 20 टक्के कृषी पर्यटन केंद्रावर शाळेच्या सहली येतात. 5 टक्के कृषी पर्यटन केंद्रावर सर्व सहली येतात. उदा. शाळा, कॉलेज सहली, कंपनी सहली, कौटुंबिक सहली इत्यादी. आज मितीस महाराष्ट्रातील ४१८ कृषी पर्यटन केंद्रांना मागीलवर्षी 7 लाख पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यातून 18 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न शेतकरी बंधूना मिळाले आहे. शिकलेले युवक कृषी पर्यटन चांगल्या प्रकारे चालवू शकतात. विशेषतः जे कृषी पदवीधर होऊन या व्यवसायात येऊ इच्छितात. त्यांना सर्वाधिक संधी आहे. महाराष्ट्रील एकूण ४१८ कृषी पर्यटन केंद्रावर ९२७ खोल्या असून, २८ टक्के कृषी पर्यटन केंद्र फक्त दिवसभराची सहली करतात.

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास, यासाठी व शेतकर्‍यांच्या हितासाठी महाराष्ट्रात कृषी पर्यटन करणार्‍या शेतकर्‍यांनी व कृषी पर्यटन संस्थांनी एकत्र येऊन एक महासंघ स्थापन केला आहे. त्याचे नाव ‘महाराष्ट्र स्टेट ऍग्री ऍण्ड रूरल टुरिझम को-ऑप. फेडरेशन लि.’ (मार्ट). मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात ‘मार्ट’ने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार सुमारे ४२ टक्के लोकांना ग्रामीण भागात एकही नातेवाईक नसल्याचे सिद्ध झाले.

शेतकर्‍यांमध्ये होणारी जागृती, शेतीपूरक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे बघितले जात असल्याने दिवसेंदिवस कृषी पर्यटन व्यवसाय चांगलेच मूळ धरून बहरू लागला आहे. उपलब्ध साधनसामग्रीत अगदी कमी भांडवली खर्चात केला जाणारा हा पूरक व्यवसाय आहे. शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवनाची ओळख करून देणे व त्यायोगे शहरी पैसा ग्रामीण भागाकडे वळविणे, हा उद्देश साध्य होतो.

रोजगारनिर्मिती, शेतीमालाला शेतातच ग्राहक हे मुख्य, अत्यंत महत्त्वाचे हेतू साध्य होतात. ही कृषी पर्यटन केंद्रे प्रत्येक गावात रोजगारनिर्मितीचे नवीन साधन म्हणून उदयास येत आहेत. आजच्या नव्या पिढीला शेती, गोठे, चुलीवरचं जेवण, घर, गावाकडच्या प्रथा हे सारं माहीत नसतं. गंमत म्हणजे जर आजच्या मुलांना विचारलं भात कुठे पिकतो? तर मुलं सहज उत्तर देतात बिग बाजार किंवा सुपरमार्केट इ. यात त्यांचा दोष नाही कारण त्यांनी या सर्व गोष्टी कधी पाहिलेल्याच नाहीत आणि जे पाहिलेच नाही ते कळेल तरी कसे? जे अन्न आपण खातो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय आणि किती प्रकारच्या प्रक्रियेतून जाते याची कल्पनाच नसेल तर अन्न वाया घालवू नये याचे महत्त्व पटेलच कसे? शेतकर्‍यांची दु:खं समजण्याची त्यांच्या आत्महत्येच्या प्रश्‍नाशी आजची पिढी जोडली जाईलच कशी? म्हणूनच कांदा जमिनीवर उगवतो कि जमिनीखाली, शेतकरी आत्महत्या का करतात? अशा प्रश्‍नांची उत्तर मिळवायची असतील तर त्यासाठी कृषी पर्यटन हाच मार्ग आहे. हे आता शहरी जणांना मनोमन पटू लागलेय.

काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी आता जोमाने कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला पाहिजे. अत्यंत उज्ज्वल असे भवितव्य असणारा असा हा कृषी पर्यटनाचा पूरक व्यवसाय करून तो मुख्य व्यवसाय कसा होईल याचा ध्यास घेतला पाहिजे. आज शेतीमालाच्या दराबाबत अनिश्चितता आहे. शेतकरी शेती उत्पादन पिकवतो. त्याला दर निश्चितीचा हक्क नाही. यामुळे शेतकर्‍यांना उत्पादनखर्चसुद्धा मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये कृषी पर्यटन व्यवसायात पर्यटकांचे दर निश्चिती पॅकेज ठरविणे शेतकर्‍यांच्या हातात आहे. म्हणून हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य व सामर्थ्य देणारा आहे.

धकाधकीच्या जीवनात परस्परातील संवाद कमी होतोय त्यामुळे ताणतणाव वाढतोय. तो कमी करण्यासाठी कृषी पर्यटन हे चांगले माध्यम आहे. पर्यटकांना निवांतपणा मिळाला की ते आनंदित होतात. त्यासाठी आपण मात्र त्यांना कमीत कमी आवश्यक अशा पायाभूत सुविधा तरी पुरविल्याच पाहिजेत. कृषी पर्यटन केंद्रासाठी शक्यतो निसर्गाच्या सानिध्यात जागा निवडावी. रिसॉर्ट व कृषी पर्यटन या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे केंद्र चालवणार्‍याने नेहमी लक्षात ठेवावयास हवे. शेतीतून अधिक उत्पन्न वाढविण्याची संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन. यात शेतीला प्रथम प्राधान्यच मिळाले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अनेक एकरांवर बहरलेली ही केंद्रे शेतीसोबत नवनवीन संकल्पना, प्रयोग करून कृषी पर्यटन यशस्वीरित्या राबवत आहेत. शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील या क्षेत्रातील वाढती मागणी याची वेळीच दखल घेऊन आपल्याकडील प्रत्येक शेतकर्‍याने कृषी पर्यटनासाठी सुरुवात करायला हवी. खरंतर कृषी पर्यटन ही परदेशी संकल्पना आहे. ब्राझील, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया या देशात ती खूप लोकप्रिय आहे. आपल्या देशातही आता ही रुजतेय. परंतु योग्य नियोजन आणि दूरदृष्टीने या गोष्टीकडे पाहिले तर भारत हा कृषी पर्यटनात पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास येण्यास जास्त वेळ लागणार नाही.

त्याचबरोबर कृषी पर्यटन व्यवसायात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे, हे राज्यातील अनेक कृषी पर्यटनचालक शेतकर्‍यांनी सिद्ध केले आहे. कृषी पर्यटनाची अगदी सोपी व्याख्या करायची झाली तर शेतकर्‍यांच्या फळत्या-फुलत्या शेतीत पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारीची उत्तम व्यवस्था करून देणे. शेती पुरक अनेक व्यवसायांची जोड देऊन कृषी पर्यटन करता येते.

कृषी पर्यटन करू इच्छिणार्‍यांसाठी काही महत्त्वाच्या टीप्स : 

  • ‘अतिथी देवो भव।’ ही आपल्या देशाची संस्कृती. सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आदरातिथ्य. येणार्‍या पर्यटकाचे घरचाच सदस्य असल्याप्रमाणे आदरातिथ्य केले की आपण अर्धी लढाई तिथेच जिंकतो. 
  • व्यवसाय सुरू करताना सर्वबाजूंचा अभ्यास आवश्यक आहे. त्याचसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:चे मार्केटिंग करणेही महत्त्वाचे ठरते. आपल्या व्यवसायाची जाहिरात वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, पर्यटनविषयक मासिके यातून सतत करावी.
  • आपल्या शेतीची बलस्थाने आपणच विकसित करावीत. नावीन्य आणि वेगळेपण जपणे गरजेचे असते. आपल्या शेतात पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी शक्यतो नैसर्गिक स्रोतांचा जास्तीत जास्त उपयोग करून पर्यटकांना सेवा द्यावी.
  • पर्यटकांसोबत स्वत: जातीने उपस्थित राहावे. विश्‍वासाचं नातं नवीन पर्यटक तुमच्याशी जोडले जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. 
  • दुर्गम भागातही कृषी पर्यटन करता येते. कारण आजच्या धावपळीच्या जगात लोकांना नीरव शांततेची आवश्यकता असते. त्यामुळे लोक कितीही अडचणी आल्या तरी शांत, निसर्गरम्य ठिकाणी जाण्यास तयार असतात.
  • शेतीसोबतच निसर्गाशी संबंधीत इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात त्याही पर्यटकांना दाखवता येतात. उदा. विविध पक्षी, प्राणी, झाडे, फुलपाखरे इ. 
  • पर्यटकांना घरचे चुलीवर शिजवलेले जेवण मिळाले तर पर्यटक जास्त आनंदी व समाधानी होतात. त्यामुळे या गोष्टींचीही खूप काळजी घ्यायला हवी. राहण्याची व खाण्यापिण्याची योग्य व व्यवस्थित सोय झाली की पर्यटक पुन्हा तुमच्याकडे भेट नक्की देणार याची खात्री. 
  • आठवड्याची सुट्टी (विकएंड) ही वाढती संकल्पना पाहता पर्यटकांना आपल्या केंद्राकडे वळविता येऊ शकते. शेतीचे मूल्यवर्धन म्हणून कृषी पर्यटन करावे. Smart Udyojak Subscription 
  • कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्जप्रकरण सादर करताना ज्यासाठी कर्ज घ्यायचे आहे, त्याबाबत संपूर्ण माहिती दिली पाहिजे. प्रकल्प अहवाल नेमका, वास्तव व पारदर्शक असावा. अहवाल बनवून देणार्‍यास त्याची परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. अहवालात मार्जिन, स्वनिधी, बँक साहाय्य, व्याजदर, कर्ज परतफेडीचा कालावधी, येणारा व जाणारा पैसा यांचा समन्वय, प्रतिवर्षी होणारी वाढ, परतफेडीचा तपशील, आर्थिक जमा आदी बाबींचा समावेश हवा. 
  • कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आवश्यक असतात – राहण्याचा दाखला व फोटो दाखला, ग्रामपंचायतीचा व्यवसाय म्हणून दाखला, ग्रामपंचायत बांधकाम परवाना, एस्टिमेट (अंदाजपत्रक), आर्किटेक्चर दाखला, ज्या जागी बांधकाम करायचे त्या क्षेत्राचा एनए दाखला (कलेक्टर) किंवा झोन दाखला. जागेविषयक संपूर्ण कागदपत्रे, वकील तारणयोग्यतेचा दाखला, टायटल व सर्च रिपोर्ट, ज्यांच्या नावावर जमीन आहे, त्यांचे संमतीपत्रक, जागेचा नकाशा, अन्य गटधारकांची संमती, कुटुंबातील अन्य सदस्यांची संमती. जोडतारण असल्यास जोडतारणाची कागदपत्रे, आर्थिक कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्रे, जामीनदारांची कागदपत्रे. जामीनदार हा कर्जदाराइतकाच परतफेडीला समप्रमाणात जबाबदार असतो. 
  • कृषी पर्यटन व्यवसाय असल्याने व्याजदर १३ ते १५ टक्क्यांपर्यंत अपेक्षित असतो. कर्ज कालावधी कर्जानुसार ५ ते १० वर्षांपर्यंत असू शकतो. कर्जाचा हप्ता मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक असतो. कर्ज परतफेडीबाबत ड्राय पिरियड मंजूर होऊ शकतो. या कालावधीत फक्त दरमहा व्याज भरावे लागते. कर्ज विनियोगाचे स्वतंत्र तपशीलवार पत्र देणे गरजेचे आहे. 
  • या गोष्टींसाठी कर्ज मिळू शकते : जमीन सपाटीकरण, ऍप्रोच रोड, तलाव, शेततळी उभारणी, पाणी टाकी, पाइपलाइन, कॉटेज, रूम बांधणी, डायनिंग हॉल, फर्निचर खरेदी, किचनमधील उपकरणे खरेदी, झोपाळा, घसरगुंडी, नौकानयन, बैलगाडी, घोडागाडी, पर्यटकांना फिरविण्यासाठी वाहनखरेदी, सौर ऊर्जा, गोबरगॅस,  दैनंदिन खर्चासाठी कॅश क्रेडिट, मालतारण कर्ज. इ. एकूणच कृषी पर्यटनाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे. तरच चांगल्याप्रकारे आर्थिक प्रगती साधता येते. 
प्रशिक्षण
खाजगी क्षेत्रातील पर्यटन कंपन्यांमध्ये उमेदवार निवडताना अनेक गुणांचा विचार केला जातो. मात्र वाढत्या स्पर्धेच्या युगात या गुणांबरोबरच ‘ट्रॅव्हल व टुरिझम’मध्ये पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना अधिक पसंती मिळताना दिसते. म्हणूनच या प्रशिक्षणाची आता माहिती घेऊया.


  • आयटा/उफ्टा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम- ‘आयटा’ म्हणजे ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशन’. ही संस्था १९४५ साली स्थापन करण्यात आली. आज या संस्थेत २५६ एअरलाइन्स कंपन्यांचा समावेश आहे.
  • ‘उफ्टा’ म्हणजे ‘युनायटेड फेडरेशन ऑफ ट्रॅव्हल एजन्टस् असोसिएशन’. ही ट्रॅव्हल एजंट व टूर ऑपरेटर्सचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे.
या दोन्ही संस्थांमार्फत ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम’ क्षेत्रात येण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम चालवले जातात. फाऊंडेशन, कन्सल्टंट, मॅनेजमेंट व सीनियर मॅनेजमेंट अशा चार स्तरांवर हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.


  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर १९८३ साली भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाअंतर्गत दिल्लीमध्ये या संस्थेची स्थापना झाली. पर्यटन क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात.
-बॅचलर इन टुरिझम मॅनेजमेंट
हा बारावीनंतरचा तीन वर्षे मुदतीचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुरिझम इंडस्ट्री मॅनेजमेंट- हा पदव्युत्तर अभ्यासक्रम नऊ ठिकाणी उपलब्ध आहे. पूर्णवेळ केल्यास नऊ महिने व अर्धवेळ केल्यास १२ महिन्यांच्या मुदतीचा पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम मॅनेजमेंट- १२ महिने मुदतीचा पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

- मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट- हा दोन वर्षांचा निवासी पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. यात सत्र तीन व चारमध्ये ‘टुरिझम मॅनेजमेंट’ हा विषय घेता येतो.
संस्थेचा पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोविंदपुरी, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश- ४७४०११. फोन- ०७५१-२३४५८२१/ वेबसाइट- www.iittm.org


  • मुंबई विद्यापीठ- गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पूर्व) येथे पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट दीड वर्षांचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
- डिप्लोमा इन ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुरिझम इंडस्ट्री- बारावीनंतरचा दोन वर्षांचा पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम.


  • सोफिया कॉलेज- बी. के. सोमाणी पॉलिटेक्निक, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई- २६ येथे पुढील अभ्यासक्रम शिकवला जातो.
डिप्लोमा इन इंटरनॅशनल ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम- पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, कालावधी- एक वर्ष.

  • निर्मला निकेतन- ४९, न्यू मरीन लाइन्स, मुंबई- २० येथे सहा महिन्यांचा डिप्लोमा इन इंटरनॅशनल ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम हा अर्धवेळ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शिकवला जातो.
  • एस. एन. डी. टी. विद्यापीठ- येथे एक वर्षांचा ‘डिप्लोमा इन टुरिझम मॅनेजमेंट’ हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आहे.
शिवाय विविध विद्यापीठांमध्ये व संलग्न महाविद्यालयांतही ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम’ अभ्यासक्रम शिकवले जातात.

आयटा/ उफ्टा अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्र-
१) ट्रेडविंग्ज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, १८/२०, के. दुभाष मार्ग, काळा घोडा, फोर्ट, मुंबई- २३. फोन- ०२२-२२८७५२३१.
२) पोदार इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, ४ था मजला, आनंदीलाल पोदार बिल्डिंग, सरस्वती रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई. फोन- ०२२-२६४८४३१०.
३) इंटरनॅशनल एअर फेअर डेस्क, रूम नं. ३० ए/ ३१/ ३२, ग्रँट गाला, भास्करराव करगुटकर मार्ग, कुलाबा, मुंबई- ५. फोन- ०२२-२२८५०२८४०.
४) इंडिया इंटरनॅशनल ट्रेड सेंटर, १२०, अरोरा टॉवर्स, पहिला मजला, ईस्ट विंग, एम. जी. रोड, पुणे.
५) कोलंबस ट्रेनिंग सेंटर, रजनीकुंज, एम. जी. रोड, कांदिवली (प.), मुंबई- ६७.
६) आय. एच. सी. टी. एम. आर्थर बंदर रोड, कुलाबा, मुं.- ५.
(वरीलपैकी काही सस्थांच्या मुंबईमध्ये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये शाखा आहेत.)
आनंद मापुस्कर
फोन : ०२२-३२५०८४८७.

Wednesday, March 14, 2018

माध्यम व्यवस्थापन प्रशिक्षण

गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर प्रचंड वाढ झाली आहे. 2006 पासून वाढीचा दर अनपेक्षितपणे खूप उच्च आहे. विशेषतः फेसबुक आणि ट्विटरने यामध्ये बाजी मारली आहे. फक्त काही वर्षात लाखो वापरकर्त्यांना या माध्यमांनी व्यापले आहेत. तंत्रज्ञान जसजसे वाढत आहे तसतसे हे स्पष्ट आहे की भविष्यात अधिकाधिक लोक त्याचे फायदे घेणार आहेत.

समाजात अस्वस्थता आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी जनतेस धमक्या, धमकी संदेश आणि अफवा पाठविले जाऊ शकतात.

वैयक्तिक डेटा आणि गोपनीयता सहजपणे हॅक करून इंटरनेटवर सामायिक केला जाऊ शकतो. कोणत्या गोष्टीमुळे आर्थिक नुकसान आणि वैयक्तिक आयुष्याला नुकसान होऊ शकते.

सोशल मिडियाचे व्यसनामुळे किशोरवयीन मुलांना सर्वाधिक फटका बसला आहे. मुले जास्त व्यापक स्वरूपात सामील होतात आणि अखेरीस समाजापासून दूर होतात. 


धोके आणि घोटाळे - अशा अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत जिथे व्यक्तींनी सोशल मीडियाद्वारे फसवणूक केली आहे. ऑनलाईन व्यवहारामध्ये संभाव्य धोके दिवसेंदिवस वाढत आहेत.

मिडियाचे फायदे जाणुन घेण्यासाठी आणि बदलत्या युगात बदलत्या तंत्रज्ञानासोबत मिसळण्यासाठी आम्ही "माध्यम व्यवस्थापन" हा प्रशिक्षण कोर्स चालु केला आहे. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.
  • इंटरनेट विषयी मुलभुत माहिती आणि त्याचा वापर 
  • इंटरनेट वापराकरिता साधने आणि उपलब्धता
  • इंटरनेट खासगी वापर आणि फायदे
  • इंटरनेट व्यावसायिक वापर आणि फायदे
  • माध्यम व्यवस्थापन (प्रिंट, व्हिडिओ, सामाजिक)
अधिक माहितीसाठी अथवा प्रशिक्षणातील तुमची सीट बुक करण्यासाठी ९९७५७४०४४४ किंवा ८८०६९०८४४४ या क्रमांकावर संपर्क करा.