Skip to main content

Posts

Featured

नारळ लागवड माहिती

नारळ लागवड 
सर्वच प्रकारच्या जमिनीत नारळ लागवड करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी. शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड करता येते. 1 × 1 × 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे. रेताड, वरकस किंवा मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळात कमीत कमी एक ते दोन टोपल्या चांगल्या प्रतीची माती टाकावी. अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्याच्या तळाला एक ते दोन टोपल्या रेती (वाळू) घालावी; तसेच खड्डा भरताना एक ते दोन टोपल्या रेती मातीत मिसळावी, त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. वालुकामय जमिनीत खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या सोडणांचा थर दिल्यास उत्तम. त्याद्वारे जमिनीत ओल टिकून राहते. खड्डा भरताना खड्ड्यात चार ते पाच घमेली शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम फॉलिडॉल पावडर खड्ड्याच्या मातीत मिसळावी. जमीन सपाट असल्यास खड्डे पूर्ण भरून घ्यावेत.  पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये लागवड करावी. 

लागवडीचे अंतर - उंच जाती - 7.5X7.5 मीटर बुटक्या जाती - 6X6 मीटर कुंपन करिता - 7 मीटर

एक वर्षे…

Latest Posts

व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण = रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा

Fertilizers - Need to change mindsets of farmers - Mahesh Borge

माझीशेती : शेतकऱ्याने शेतीचे नियोजन कसे करावे

शेती अपडेट्स... दि.09 फेब्रु.2018

शेती अपडेट्स... दि.07 फेब्रु.2018

शेती अपडेट्स... दि.06 फेब्रु.2018