Wednesday, December 5, 2018

माझीशेती : माती परीक्षण

पीकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. 
उदा.-
१) सामू PH २) विधुत वाहकता EC, ३)चुनखड़ी CaCO3 ४) सेंद्रिय कर्ब OC, ५) नत्रN, ६) स्फुरदP, ७) पालाशK, ८) कॉपरCu, ९) फेरस(आयर्न)Fe, १०) झिंकZn, ११) मॅगनीज्Mn, १२) कॅल्शियमCa, १३) मॅग्निशियमMg, १४) सल्फर S, १५) सोडियम Na

पाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात. अश्या अठरा अन्नद्रव्याशिवाय पीकांची वाढ पूर्ण होत नाही.
माती परीक्षणचा उद्देश

१) मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.

२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट ,हिरवळीचे खत ,गाडूळ खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते.
३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामूPH , विधुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 ,सेंद्रिय कर्ब OC,नत्रN, स्फुरदP, पालाशK, कॉपरCu, फेरस(आयर्न)Fe, झिंकZn, मॅगनीज्Mn, कॅल्शियमCa, मॅग्निशियमMg, सल्फर S, सोडियम Na यासाठी परीक्षण केले जाते .
४) जमीन कोणते पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते समजते .
५) विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या वाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो .
मातीचा नमुना घेण्याची पध्दती

१) जमिनीचा रंग ,चढ -उतार ,खोली ,खडकाळ किंवा पाणथळ ठिकाणे निच-याची परिस्थिती तसेच क्षारयुक्त किंवा चोपण जागा इत्यादी बाबीचा विचार करून शेताचे निरनिराळॆ विभाग पाडावेत आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्रपणॆ प्रतिनिधीक नमूना घ्यावा .

२) मातीचा नमूना हा त्या शेतातील प्रतिनिधीक नमूना असावा .कारण आपण शेतातून फक्त अर्धा ते एक किलो माती परिक्षणासाठी वापरतो .प्रतिनिधीक नमूना शेतातील ८-१० वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा करावा .
३) नमूना घेताना फक्त लाकडी साहित्य आणि प्लास्टिक घमेले किंवा पोते वापरावे. शेतीचे समान ९ भाग करायचे. प्रत्येक भागातील मध्यावर १x१x१ फुटाचा खड्डा घ्यायचा. नंतर हाताने बाजूची माती खाली पाडून ५०० ग्रॅम पर्यंत नमुना घ्या. (हि पद्धत कटाक्षाने पाळा)
४) शेतक-याचे नाव, सर्वे नंबर बागायती /कोरडवाहू
अ) जमिनीचा प्रकार :(हलकी / मध्यम / भारी )
ब) चूनखडीचे प्रमाण (कमी /मध्यम /जास्त )
क) चिकन मातीचे प्रमाण : (कमी /मध्यम /जास्त )
जमीनीची निचरा शक्ती
जमीनीची खोली
ओलिताचे साधन
नमूना घेतल्याची तारीख

मागील हंगामात घेतलेली पिके, त्यांचे उत्पादन ,वापर्लेली खते ,त्यांचे प्रमाण पुढील हंगामात घ्यावयाची पिके ,त्यांचे वाण व अपेक्षीत उत्पादन.


इतकी माहिती नमुण्यासोबत लिहून जवळच्या कृषि विभागातील कर्मचाऱ्यांकडे किंवा माझीशेती शेतकरी सुविधा केंद्र मध्ये जमा करून तपासणी अहवाल घ्यावा.

Friday, August 31, 2018

बांबू लागवड

बांबूची शेती


शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. शेतक-यांनी बांबूची लागवड थांबते, पर्यायाने जमिनीचा पोत सुधारतो.

फायदे

 1. बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्यांच्या लवचीक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्व आहे. एकदा बांबू लावल्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते व ४ ते ५ वर्षांपासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते.
 2. मानवेल ही बांबूची जात लांब धागा असलेली, जास्त सेल्युलोज असलेली तसेच कोड व रोग प्रतिकारक जात आहे. ही जात गर्द हिरव्या रंगाची असून साधारणपणे ६ ते १८ मीटर उंच वाढते. दोन पेन्यांमधील अंतर २५ ते ४० सेंटिमीटर असून पेच्याजवळचा भाग थोडा फुगीर असतो. या जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यासाठी बांबू लागवडीची माहिती ही प्रामुख्याने मानवेल जातीविषयी देण्यात येत आहे.
 3. बाबूपासून कागद, चटया, दांडया, टोपल्या, खोकी, पत्रे, फर्निचरआदि उत्पादने  तयार होतात . यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते .

जमीन व हवामान

बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. तरीही, पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे ९ ते ३६ अंश से. तापमान, सरासरी प्रतिवर्षी ७५0 मि.मी. पाऊसमान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते. बांबूची मुळे ही तंतुमय असल्याने ती जमिनीच्या वरच्या भरात वाढतात. त्यामुळे जमीन उथळ असली तरी चांगली निचरा होणारी भुसभुशीत असावी लागते. अशा जमिनीत बांबूच्या कंदाची वाढ चांगली होते. क्षारपड, चिबड अथवा पाणथळ जमिनीत  बांबूची लागवड करू नये. अशा जमिनीत बांबू जरी  होत नाही.

अभिवृद्धी

बांबूची अभिवृद्धी जरी वेगवेगळ्या बियांपासून व कंदापासून करण्यात येते. (Y अ) बियांपासून अभिवृद्धी बियांपासून अभिवृद्धी करताना बांबूची रोपे ही पुढील दोन प्रकारांनी तयार करतात.
 1. गादी वाफ्यात बी पेरूनबांबूची रोपे बियाणे पेरून करताना ती गादी वाफ्यावर दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी साधारणपणे १ मीटर व लांबी सोयीनुसार १० मीटर ठेवावी. गादी वाफ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवून आडव्या ओळीमध्ये बियाणे पेरावे. बियाण्याची पेरणी साधारणपणे सप्टेंबरऑक्टोबर महिन्यांत करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. या त-हेने तयार केलेली रोपे जून-जुलै महिन्यांत लागवडीसाठी वापरता येतात.
 2. पॉलिथिन पिशवीत लावून बांबूच्या रोपांची निर्मिती बियाणे पॉलिथिन पिशवितसुद्धा लावून करता येते. यासाठी २५ सें.मी. × १२ सें.मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीत माती, वाळू व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे १:१:१ मिश्रण करून पॉलिथिन पिशवित भरून प्रत्येक पिशवित ३ ते ४ बिया टोकून त्यात पाणी द्यावे. पॉलिथिन पिशव्यांत रोपांची चांगली वाढ होते व कमी बियाणे लागते. यामध्ये बियाणे लावलेल्या वाफ्यामध्ये चाळणी एका महिन्याच्या कालावधीने करणे आवश्यक असते.
ब) कंदाद्वारे अभिवृद्धीयासाठी जुन्या बांबूच्या बेटातील कंदमुळयासह पावसाळ्याच्या  सुरुवातीस काढून त्याची लागवड करतात . कंदाद्वारे केलेल्या बांबूच्या लागवडीमध्ये झाडे जगण्याचे प्रमाण चांगले असते व वाहतुकीचा खर्च कमी येतो. लागवडीसाठी कंदाची निवड करताना कंदावर २ ते ३ डोळे असणे आवश्यक असते.

लागवड

बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबूतोडणीस अडचण होत नाही. सर्वसाधारणपणे ५ × ५ मीटर अंतरावर लागवड करणे योग्य ठरते. याप्रमाणे लागवड केल्यास एक हेक्टर अंतरावर ४00 बांबूची रोपे बसतात. बांबूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत '५ मीटर अंतरावर ६ox६ox६० सें.मी. आकाराचे खडे खोदावेत. यामुळे उन्हाळ्यात माती तापून त्यामधील किडी , कृमी मरण्यास मदत होते.  अशा या खोदलेल्या खडुयात पावसाळ्यापूर्वी  माती भरावी. माती भरताना त्यामध्ये एक | घमेले चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम | अमोनियम सल्फेट आणि २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. नंतर पुरेसा पाऊस होताच त्या ठिकाणी बांबूची लागवड करावी. पेिशव्यांमधील रोपांची लागवड करताना पिशवी फाडून, अलगद मातीच्या गोळ्यासह रोप खडुयात बसवून आजूबाजूची माती चौफेर घट्ट दाबून द्यावी.


घ्यावयाची काळजी


नांगी भरणे

बांबू लावल्यानंतर पुढील कारणांमुळे त्याची मर होऊ शकते.
 1. लागवड करताना रोपाच्या भोवताली माती व्यवस्थित न दाबल्यामुळे
 2. कंद काढताना त्यास झालेली इजा
 3. वाहतूक करताना रोपांना होणारी इजा
 4. रोपाच्या भोवतालची माती निघाल्यामुळे किंवा रोपे उघडी पडल्यामुळे
 5. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास.
बांबू लावताना व वाहतुकीमध्ये योग्य ती काळजी घेतल्यास रोपे मरण्याचे प्रमाण फारच अल्प असते. रोपे मेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन रोपे लावावीत.

खुरपणी

बांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असल्याने त्याची मुळे साधारणतः जमिनीच्या वरच्या थरातच असतात. तसेच इतर गवतझुडपे यांची मुळे वरच्या थरात असल्यामुळे पाणी व अन्न मिळविण्यासाठी दोन्हींची स्पर्धा होते. यासाठी वेळोवेळी रोपाभोवतालचे तण काढणे आवश्यक असते. तसेच रोपाच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोडमुळाची वाढ जोमदार होते. बांबू या वृक्षाची वर्षभर सर्व काळात वाढ होत असल्याने जमिनीत योग्य ओलावा राहील, यासाठी काळजी घ्यावी. त्यासाठी रोपांच्या जवळ असलेल्या गवताच्या धसकटांचा  आच्चादन म्हणून सुद्धा उपयोग होतो.

पाणी

साधारणपणे ७५० ते ८00 मि.मी. पाऊस पडत असलेल्या १ ते २ वर्षे विशेषत: उन्हाळ्यामध्ये रोपांना पाणी देण्याची आवश्यकता पडते. हलक्या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने तर मध्यम व भारी जमिनीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. १ ते २ वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही. तरीही पाणी देण्याची सोय असल्यास पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

आंतरपीक

बांबू लागवडीनंतर ३ ते ४ वर्षांनी पक्र होण्यास सुरवात होते. तेव्हा सुरवातीच्या २ ते ३ वर्षांच्या कालावधीमध्ये दोन ओळींच्या पड्यात आंतरपिके घेण्यास हरकत नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळतेच; शिवाय जमीन तणविरहित राहण्यास मदत होते.

शाखा छाटणी

प्रत्येक कळकाच्या पेन्यातून फांद्या फुटत असतात व कधीकधी त्या फार लांबसुद्धा वाढतात. नवीन येणा-या कळकाच्या सरळ वाढीला अडथळा होऊन कळक वेडावाकडा वाढू नये, म्हणून या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक ठरते. त्यासाठी फांद्यांची छाटणी कळकाच्या अंगालगत धारदार कात्रीने खालपासून जिथपर्यंत करता येईल तिथपर्यत करावी.

काढणी

लागवडीनंतर ४ ते ५ वर्षांनी बांबू काढण्यास सुरवात होते. रोगराईपासून संरक्षण व नवीन फुटीला प्राधान्य यासाठी बांबू दरवर्षी काढणे फायदेशीर ठरते. बांबू तोडताना तो जमिनीलगत न तोडता, दुस-या व तिस-या पेन्याच्या मध्यभागी (३० सें.मी. अंतरावर) धारदार कु-हाडीने घाव घालून तोडावा. असे न केल्यास खोडमुळांच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूची खोडमुळेच मरतात. बांबू योग्य ठिकाणी तोडल्यास कुजण्यापासून त्याचे संरक्षण होते. बांबूची काढणी ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत करावी. एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांत बांबूची काढणी करू नये, कारण त्या काळात बांबूची वाढ अत्यंत जलद गतीने होत असते.

रोग व व्यवस्थापन

बांबूच्या रोपांवर विविध प्रकारच्या बुरशीपासून निरनिराळे रोग पडतात. उदा. मुळे सडणे, पानावरील ठिपके, खोड सडणे, विचेस बूम या रोगात रोपांची वेडीवाकडी वाढ होते. यामुळे फुले व कोंबावर त्याचा परिणाम होतो. बुरशीमुळे होणा-या ब्लाईट या रोगामुळे फार नुकसान होते. यासाठी प्रादुर्भाव झालेली रोपे काढून टाकावीत व त्यानंतर बाविस्टिन (०.१५ टक्के), फ्युरॉडॉन (२५ ग्रॅम) ही बुरशीनाशके फवारावीत. रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर ही द्रावणे फवारल्यास रोग आटोक्यात येतो. बियांचे बुरशी व जिवाणूपासून संरक्षण करण्यासाठी सेरेशन या बुरशीनाशकाची (५ ग्रॅम/कि.ग्रॅ.) प्रक्रिया केल्यास बुरशीचा नायनाट करता येतो. तसेच या बियांची उगवणक्षमता वाढविण्यासाठी प्रतिजैविकांचाही आजकाल उपयोग केला जातो.

किटकांचा प्रादुर्भाव

पाने खाणा-या किटकांमुळे पानावर छिद्रे पडतात. तसेच पाने गळतात. यांच्या बंदोबस्तासाठी पानांवर सायपरमेष्धिन (o.o२ टक्के) किंवा मॅलिथिऑन ५o ई.सी. (o.o२ टक्के) पाण्यामध्ये मिसळून फवारावे. बीजकृमीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३o ई.सी. या औषधाचा पाण्यात मिसळून फवारा गरजेप्रमाणे मारावा.ज्या वेळेस साठविलेल्या बांबूवर बारीक छिद्रे व पिवळी भुकटी आढळून येते, अशावेळी या मुंग्याच्या बंदोबस्तासाठी सायपरमेश्रीन (०.४ टके) डिझेल/ऑईलमध्ये मिसळून फवारावे.वाळवी/उधईच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या ठिकाणी थायमेट आणि तोडलेल्या बांबूवर सी.सी.ए. (कॉपर क्रोमियम अरसेनिक) फवारावे. नवीन कोवळे बांबू,पोखरणा-या कीटकांसाठी डायमेथोएट (०.०१ टक्के) किंवा मोनोक्रोटोफॉस (०.२ टक्के) पाण्यात मिसळून फवारावे. बांबू हा पानझडी वृक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात त्याचे आगीपासून संरक्षण करावे.

उत्पादन

लागवड पद्धती व रोपांची देखभाल यांवर मुख्यत्वे बांबूचे उत्पादन अवलंबून असते. बांबूचे उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून सुरू होते. ५ × ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४,००० रोपे बसतात व त्यामधून पाचव्या वर्षी २,००० रुपये मिळतात. बाजारात किरकोळ विक्रेत्याकडून प्रतिनग १५ रुपये प्रमाणे एकूण ३० हजार रुपये उत्पन्न हेक्टरी मिळण्यास सुरवात होते.बांबूची लागवड केल्यानंतर सलग ४o वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. म्हणजेच एकदा लागवड केल्यानंतर पाणी व खते देण्याशिवाय प्रत्येक वर्षी इतर कसलीही मशागत करावी लागत नाही. शिवाय, दरवर्षी बांबूचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते. हलक्या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणातदेखील सहाव्या वर्षापासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू मिळतात.

बांबू प्रक्रिया

बांबूवर रासायनिक प्रक्रिया केल्यास त्याचे आयुष्य अर्धे चिरलेले बांबू६ ते ८ टक्के सी.सी.ए. किंवा सी.सी.बी.चे द्रावण असलेल्या हौदात बांबूचा ३० ते ४० सें.मी. भाग बुडेल अशा त-हेने २४ तास ठेवावेत. नंतर पुन्हा उलट्या बाजूने त्याच द्रावणात २४ तास बुडवून ठेवावते. त्यानंतर असे प्रक्रिया केलेले बांबू वापरण्यापूर्वी २ ते ३ आठवडे एकत्र साठवून ठेवावेत. अशा त-हेने प्रक्रिया केलेल्या बांबूचे आयुष्य १० ते १५ वर्षांनी वाढल्याचे आढळून आले आहे व त्यासाठी खर्चसुद्धा फारसा येत नाही.

Wednesday, June 20, 2018

"खरिप शेती व्यवस्थापन २०१८" आणि "आला पावसाळा, आरोग्य सांभाळा" कार्यशाळेबाबत...

खरिप शेती व्यवस्थापन २०१८  
ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प मार्गदर्शक सूचना आणि खरीप हंगाम २०१८ च्या नियोजनामध्ये सोमवार दि. २५/०६/२०१८ ते शनिवार दि.१४/०७/२०१८ या कालावधीमध्ये माझीशेती कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रावर खरीप पिक व्यवस्थापन कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत. या कार्यशाळा शेतकऱ्यांना मोफत आहेत. कार्यशाळा अंमलबजावणी करिता शेतकरी सुविधा केंद्र, स्वयंसेवक यांना प्राधान्य देण्यात आले आहे. 
 • मातीचे प्रकार आणि घ्यावयाची पिके 
 • बियाणे निवड आणि प्रक्रिया, फायदे 
 • सापळा पिके निवड आणि रचना 
 • खत व्यवस्थापन (जैविक, सेंद्रिय व रासायनिक) 
 • आंतरमशागत (विरळणी, निंदणी, कोळपणी, खुरपणी) 
 • काढणीपश्चात व्यवस्थापन (शासकीय सहकार्य, माझीशेती नियोजन)      

आला पावसाळा, आरोग्य सांभाळा
जसे कि आपण जाणता, मानवाचे ६५% आजार दुषित पाण्यामुळे होतात. पावसाळा सुरु झाला कि पिण्याच्या पाण्याचे साठे एनकेनप्रकारे दुषित होतात व परिणामी मानवाला आजारास सामोरे जावे लागते. पावसाळी हंगाम २०१८ च्या आरोग्य, आहार आणि पाणी नियोजनाद्वारे आपण आजारांना दूर ठेवु शकतो. या विषयावर सोमवार दि.२५/०६/२०१८ ते शनिवार दि.१४/०७/२०१८ या कालावधीमध्ये वार्डनिहाय, सोसायटीनिहाय (मागणी असेल तर) “आला पावसाळा, आरोग्य सांभाळा” कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत. या कार्यशाळा नागरिकांना मोफत आहेत. कार्यशाळा अंमलबजावणी करिता माझीशेती सहयोगी संस्था, स्वयंसेवक, विद्यार्थी यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
 • पर्जन्यामानाची माहिती (पडणारा पाऊस, पाण्याची दिशा, साठे) 
 • पाणीपुरवठा यंत्रणा माहिती (साठा, सध्याची घेतली जाणारी काळजी) 
 • पाण्यापासुन पसरणारे रोग माहिती (लक्षणे, प्रतिबंध, प्राथमिक उपचार) 

Sunday, May 6, 2018

बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत संस्थाना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था यांना महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागामार्फत कळविनेत येते कि, केंद्र शासनाने दिनांक ०१ जानेवारी २०१६ पासून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि या कायद्याच्या अंमलबजावणी साठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू केले आहेत. या कायद्याच्या ४१ (१) अंतर्गत विधी संघर्षग्रस्त आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यरत व इच्छुक असणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था यांनी या महिला व बाल विकास विभागांतर्गत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रमाणपत्राशिवाय ज्या संस्था बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहतील अश्या अवैध्य संस्थांवर या कायद्याच्या कलम ४२ अंतर्गत गुन्हा दाखल करणेत येणार आहे सादर गुन्ह्यासाठी कमाल ०१ वर्ष्यापर्यंत तुरुंगवास व रुपये ०१ लाख पर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद अधिनियमात नमूद करणेत आली आहे.


बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत (निरीक्षण गृह, विशेष गृह, सुरक्षित जागा (place of safety) बालगृहे, खुले निवारागृह (विशेष दत्तक संस्था) तसेच इच्छुक सर्व संस्थांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ४१ नुसार नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ नमुना २७ (नियम २२(२) आणि २३ (२) नुसार विहित नमुन्यामध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक २०/०५/२०१८ पर्यत सादर करावे. नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संस्थांनी नीती आयोगाच्या darpan portal वर संस्थेची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक राहील. नीती आयोगाच्या darpan portal नोंदणी नसल्यास केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.


सदर कालावधीनंतर नोंदणी प्रमाणपत्राशिवाय किंवा नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर न करणाऱ्या काळजी व संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांवर कायद्याच्या कलम ४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करणेत येईल. ज्या स्वयंसेवी संस्थांना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० सुधारित अधिनियम २००६ नुसार नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे परंतु मुदत संपलेली नाही किंवा नोंदणी प्रमाणपत्रावर मुदत नमूद नाही अश्या संस्थांनी देखील बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ नुसार नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दिनांक २२/५/२०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे अन्यथा त्याची मान्यता रद्द करणेत येईल.


पूर्वी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व केंद्र शासनाची आदर्श नियमावली २०१६ नुसार नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत सादर करणेत आलेले प्रस्ताव व्यपगत करणेत येत आहेत.

अश्या वर उल्लेख केलेल्या संस्थांनी सर्व ऑनलाईन अर्ज व अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची साक्षांकित छायांकित प्रत बंद लखोट्यात "महिला व बाल विकास आयुक्तालय २८, राणीचा बाग जुना सर्किट हौस पुणे - ०१" या पत्त्यावर दि.२३/५/२०१८ पर्यंत सादर करावेत.

Thursday, April 26, 2018

कोल्हापूर : कसबा बावडा येथे बचत गटांच्या महिलांना उद्योगामध्ये रेकोर्ड किपिंगचे प्रशिक्षण, येणाऱ्या काळात बचत गट संकल्पनेला फाटा देऊन व्यवसाय गट निर्मितीवर भर देण्याचा महिलांचा निर्धार

कोल्हापूर : कसबा बावडा येथे बचत गटांच्या महिलांना उद्योगामध्ये रेकोर्ड किपिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमासाठी कोल्हापुर जिल्हा व महानगरपालिका यांचे शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश बोरगे, अन्नपूर्णा सेवाभावी महिला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आश्लेशा चव्हाण मॅडम, श्री. प्रमोद गुरव सर, नरेंद्र जाधव आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. 

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. प्रमोद गुरव सर यांनी महिलांसोबत संवाद साधला व महिला आपले घर सांभाळून कश्या पद्धतीने आणि कोण - कोण व्यवसाय करू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले. उद्योग व्यवसायात उभ्या राहणाऱ्या महिलांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन महिलांच्या शंकेचे निरसन केले. बचत गटातील कागदपत्रे आणि व्यवसायातील कागदपत्रे यातील फरक समजावून सांगताना माझीशेतीच्या मार्केट लिंकेज"प्रकल्पाबाबत माहिती देऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.महेश बोरगे सर यांनी महिलांना महिला बचत गटासाठी रेकॉर्ड किपिंग चे महत्व पटवून दिले आणि रेकॉर्ड किपिंग कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री.महेश बोरगे सरांनी महिलांना व्यवसाय गट ही संकल्पना समजावून त्याचे फायदे सांगितले व इच्छुक महिलांकडून त्यांच्या आवडीच्या व्यवसायाची माहिती घेऊन त्यासाठी काय केले पाहिजे आणि कोणत्या सरकारी कार्यालयामध्ये जावे याची सविस्तर माहिती दिली. उपस्थित महिलांनी येणाऱ्या काळात बचत गट संकल्पनेला फाटा देऊन व्यवसाय गट निर्मितीवर भर देण्याचा निर्धार केला. 

कार्यक्रमाचे वृत्तांकन श्री. नरेंद्र जाधव यांनी केले.
कार्यक्रमाची क्षणचित्रे 

Thursday, April 19, 2018

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची अक्षय तृतीयेला कोल्हापुरात मुहर्तमेढ

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पातील "बेदाणा क्लस्टर विकास प्रकल्प"मधील व्यवसाय शृंखला प्रकल्प कोल्हापूरमध्ये सुरु करण्यात आला. याप्रसंगी माझीशेतीच्यावतीने कोल्हापूर जिल्हा कृषी व्यवस्थापक नरेंद्र जाधव यांनी ठरावावर स्वाक्षरी केली तर प्रकल्पाच्या सुरुवातीसाठी अन्नपुर्णा सेवाभावी महिला संस्थेच्या वतीने समाजसेविका डॉ. आश्लेषा चव्हाण यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी शिल्पा पाटील, जयश्री पाटोळे, सुजाता साळोखे, फरीदा शेख व इतर व्यवसाय गटांच्या प्रतिनिधी महिला उपस्थित होत्या. 


सांगली, नाशिक, सोलापुर, सातारा, अहमदनगर या द्राक्ष उत्पादक ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकासासाठी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प कार्यरत आहे. अवकाळी पाऊस, बाजारपेठ चढ-उतार, व्यापारी मनमानी या सर्व अडचणींवर मार्ग काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्री करण्याची जबाबदारी अन्नपूर्णा संस्थेने उचलली आहे. 

बचत गट आणि स्वयंसहायता गट या कल्पनेला फाटा देऊन माझीशेती अध्यक्ष महेश बोरगे यांच्या व्यवसाय गट या संकल्पनेच्या विस्तृत मागणीला पाठींबा मिळत आहे. उत्पादन, मुल्यवर्धन, विक्री आणि सेवा या चतुःसूत्रीने शेतकरी, ग्रामीण आणि शहरी व्यावसायिक गट (बचत गट, स्वयंसहायता गट, सुशिक्षित बेरोजगार गट, विद्यार्थी गट) एकत्रित बांधले गेल्यामुळे शासनाच्या "शेतकरी ते ग्राहक थेट विक्री" योजनेला पाठबळ मिळत आहे. गुणवत्ता व्यवस्थापन करण्यासाठी अतिउच्च धोरण ठेवून "विषमुक्त अन्न सोसायटीमध्ये पोहोचवण्यासाठी माझीशेतीची यंत्रणा कार्यरत आहे. 

संपुर्ण प्रकल्पामध्ये कौशल्य विकास करण्यावर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. तासगाव जि.सांगली येथून प्रायोगिक स्तरावर नोंदणी केलेल्या १००० शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती उत्पादने करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यांच्या उत्पादित शेतमालाचे वर्गीकरण, निवड, वेष्टन करण्यासाठी व्यवसाय गटांना व्यवसाय व्यवस्थापन आणि विक्री कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. माझीशेतीच्या धोरणांना कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जात नाही त्यामुळे शहरी सोसायटीमधील कुटुंबांची ओढ दिवसेंदिवस वाढत आहे. 

कृषी, ग्रामीण विकास, नाबार्ड, महापालिका, नगरपालिका अश्या शासकीय संस्थाच्या सहाय्याने विक्री व्यवस्था सक्षम झाली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी रोजगार निर्मिती, आरोग्य, उपजीविका, कौशल्य विकास अश्या उपक्रम राबविण्यासाठी या प्रकल्पामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन महेश बोरगे यांनी केले. 

Wednesday, April 4, 2018

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमातून ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम - श्री. संजय माळी, प्रकल्प व्यवस्थापक


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रम पार्श्वभूमी : माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान मार्फत ग्रामीण भागाच्या विकासाकरिता शेतकरीमहिला आणि तरुण यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प राबविला जातो. शेतकरी बांधवांना शेती पिक उत्पादन पद्धती मार्गदर्शनासोबत तयार झालेला शेतमाल विक्री करिता सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाते. परिणामी गुणवत्तापूर्ण आणि पोषक आहार उत्पादनाचे अंतिम ध्येय गाठता येते. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला फळे - भाजीपाला पूरक विक्री व्यवस्था नसल्याने कवडीमोल किमतीने विकला जातो. बाजारपेठेचे नियोजन नसल्यामुळे बाजारातील आवक वाढल्यास व्यापारी शेतमालास योग्य भाव देऊ शकत नाहीत. यासंपुर्ण एकमेकांना पूरक बाबींचा अभ्यास केल्यानंतर प्रायोगिक तत्वावर दोन वर्षे प्रकल्प चालविल्यानंतर माझीशेती संस्था प्रत्यक्षात कृषी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, बँक (आर्थिक / वित्तीय संस्था), शेतकरी, ग्रामीण व शहरी बचत गट, सेवा पुरवठादार यांच्या सहकार्याने परिपुर्ण विक्री व्यवस्था ज्यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव तर देता येईलच पण ग्राहकांना पोषक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने पोहोच करणे सोपे जात आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि उपजीविका विकास हा एक प्रमुख विषय पुर्ण होताना दिसत आहे. 


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमाची सुरुवात व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षणाने : ग्रामीण भागात उपलब्ध मनुष्यबळाची आवश्यकता पाहुन व्यवसाय कसा सुरु करायचा आणि सुरु केलेला सुस्थितीत चालण्यासाठी कोणती काळजी घ्यावयाची याचे प्राधान्याने प्रशिक्षण दिले जाते. एकूण २ दिवस अभ्यासक्रम + १ प्रात्यक्षिक असे ०३ दिवसांमध्ये शेतकरी, तरुण आणि महिलांना माहिती तंत्रज्ञानाचा व्यवसायामध्ये वापर, नेतृत्वकला, संवादकला, उत्पादन - व्यापार - सेवा यामधील फरक आणि पद्धत, जमा - खर्च, मनुष्यबळ व्यवस्थापन, विमा संरक्षण, मूल्यवर्धन आणि विक्री व्यवस्थापन, सोबत शासकीय मदत आणि प्रोत्साहन योजना असे विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. परिणामी सहभागी घटकांचे मनोबल वाढते आणि इच्छित साध्य करणे सोपे जाते.
बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना मिळणार उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव : 

माझीशेतीच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या सहाय्याने प्रतिवर्षी किमान ५०० व कमाल १००० शेतकरी बांधवांना व्यावसायिक शेती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाते. एकुण २ (अभ्यासक्रम) + १ (प्रात्यक्षिक) असे ०३ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर, सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शासकीय मदत आणि प्रोत्साहन योजना असे अतिशय मुलभुत शेती व्यवसायकरिता आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत होते. शिवाय उत्पादन होण्यापुर्वीच शेतकऱ्यांच्या मालाचा दर ठरत असल्यामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे. एकंदरीत प्रती शेतकरी एक एकर द्राक्षबाग गृहीत धरल्यास १००० एकर द्राक्षबाग आणि त्यापासुन सरासरी ०५ ते ०६ टन प्रती एकर बेदाणा उत्पादन गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट उत्पादन खर्चावर आधारित हंगामी हमीभाव रु. १२० प्रति किलो दिला जातोय.


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये बचत गटांना रोजगाराचा पर्याय : बचत गट चळवळ महाराष्ट्राला नवीन नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बचत गट सर्व बाजुने सक्षम आहेत, अगदी आर्थिक साक्षरता आणि सक्षमता बाबतीतही इथले बचत गट कमी नाहीत. बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये बचत गट प्राधान्याने सहभागी करून घेतले जातात. बचत गटांना एकत्रित करून त्यांना बेदाणा प्रतवारी, वेष्टन, विक्री व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित झालेल्या बचत गटांना व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञान सहकार्य घेणे, बेदाणा ग्राहक आणि उत्पादक शेतकरी नोंदणी करणे, प्रतवारी आणि वेष्टन करणे, बाजारपेठ शोधणे आणि विक्री करून वेळोवेळी अहवाल जतन करून ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून बचत गटांना सरासरी रु. १,००,००,०००/- वार्षिक नफा किंवा रोजगार निर्मिती होते. 

बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये माझीशेतीची भुमिका : 
संस्थेचे वेगवेगळ्या भागातील तज्ञ कार्यरत मनुष्यबळ साधन सुविधा पुरवण्याचे काम करते. प्रशिक्षण देऊन लाभार्थी घटकांना सक्षम करणे हे माझीशेतीचे प्रथम प्राधान्याचे काम आहे. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या 'ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प निधीतून प्रति लाभार्थी अंदाजित रु. ३६५ खर्च करून १००० शेतकरी, २५०० बचत गटाचे सदस्य असे एकूण ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रति वर्ष रुपये १२,७७,५००/- लाख प्रमाणे निधी तरतुद केलेली आहे.

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पच्या 'बेदाणा उत्पादक शेतकरी विकास उपक्रमामध्ये पदभरती जाहिरात (१८०४०३)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाच्या 'बेदाणा उत्पादक शेतकरी विकास उपक्रमामध्ये ०७ (सात) पदे भरणे आहेत. 

अ.नं.
पदाचे नाव
शैक्षणिक अर्हता
०१
तज्ञ प्रशिक्षक (पदसंख्या - ०१)
Agri + MSW
०२
समुपदेशक (पदसंख्या - ०६)
Com + MSW

१. शैक्षणिक पात्रता - नियमित शिक्षण घेतलेले उमेदवारांना प्राधान्य राहील. पदव्युत्तर शिक्षण बहिस्थ झालेले असेल तर चालेल मात्र शैक्षणिक कालावधीत संबंधित उमेदवार हा सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत असावा. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य राहील. 
२. वेतन - मुळ वेतन रु. ७००० प्रतिमाह सोबत मुळ वेतनाच्या १५% प्रवास भत्ता, ०३% फोनबिल, १०% निवास भत्ता, ०५% वैद्यकीय भत्ता (विमा काढण्यास प्राधान्य द्यावे.) अतिरिक्त देय राहील. टीप : शहरी (District Headquarter) आणि महानगरीय (Metro City) भागासाठी निवास भत्ता अनुक्रमे ५% आणि १०% वाढीव देय राहील. पहिल्या महिन्याचे वेतन सहाव्या महिन्याच्या वेतनासोबत अदा केले जाईल. दुसऱ्या महिन्याच्या अहवाल सादरीकरणनंतर उमेदवारांचे बँक खातेवर नियमित वेतन होईल.
३. वयमर्यादा - उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे किंवा कमाल 35 वर्षे असावे. माझीशेतीच्या लाभार्थी गटातील उमेदवारांना वयाची अट लागू नाही. 
४. आरक्षण - महिला उमेदवारांना ३०% राखीव जागा आहेत. इतर सर्व प्रवर्गांना विशेष आरक्षण नाही. 
५. पदसंख्या - 
i) प्रशिक्षक पदासाठी तासगाव जि.सांगली मुख्यालयी ०१ जागा आहे. 
ii) समुपदेशक पदासाठी सांगली, कोल्हापुर, सातारा, पुणे, मुंबई आणि बेळगाव येथे प्रत्येकी ०१ असे ०६ जागा आहेत. 
iii) प्रकल्प कालावधीपर्यंत नेमणुका वैध राहतील, त्यानंतर गुणवत्तेनुसार कालावधी वाढ लागू होईल. 
६. अर्ज प्रक्रिया - माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या रोजगार निर्मिती उपक्रमातून आलेले अर्ज छाननी करून कर्मचारी नियुक्त केले जातील. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

माझीशेती : माती परीक्षण

पीकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.  उदा.- १) सामू PH २) विधुत वाहकता EC, ३)चुनखड़ी CaCO3 ४) सेंद्रिय कर्ब OC...