शेळी - गरीबाची गाय

शेळी - गरीबाची गाय

शेळीच्या जाती :
दूध व मांस देणाऱ्या - उस्मानाबादी, संगमनेरी, बारबेदी, जमनापारी, मलबारी, मेहसाना, झालावाडी, बीटल, सिरोही, अजमेरी, कच्छी
मांस उत्पादनासाठी आसाम डोंगरी, काळी बंगाली तपकिरी बंगाली, मारवाडी, काश्मिरी, गंजभ या जाती चांगल्या आहेत.
बंदिस्त शेळीपालन : 
शेडची दिशा ठरवताना दक्षिण - उत्तर अथवा पूर्व - पश्चिम ठेवावी. प्रत्येक शेळीला १५ चौ. फुट जागा ठेवावी. गोठ्यांच्या आजूबाजूला चाऱ्यासाठी सुबाभूळ, शेवगा अशी झाडे लावावीत. १५ ते २० माद्यांकरिता प्रजननासाठी एक नर ठेवावा. पिण्यासाठी पाणी शुद्ध असावे. करडे, नुकत्याच व्यायलेल्या शेळ्या, आजारी शेळ्या, गाभन व इतर शेळ्या असे भाग करावेत. शक्य असेल तर शेळीचा चारा टांगून द्यावा. शेळ्यांना १०० ते १५० ग्रॅम खुराक द्यावा लागतो.
शेळ्यांचे प्रजनन : योग्य आहार व वजन असलेस शेळी १० महिने वयानंतर शेळी भरवली तरी चालते. इतिहास पाहून शेळीचा पैदाशीसाठी वापर करावा. काही शेळ्या मुका माज दाखवतात. त्यामुळे शेळ्यांच्या कळपात नर नेहमी ठेवावा.
शेळीला दोन ते तीन करडे होतात. गाभन काळात शेळीला अधिक सकस चारा व खाद्य द्यावे. शेळी विण्यास एक महिना असताना दूध काढणे बंद करावे व या काळात त्यांना २०० ते २५० ग्रॅम खाद्य द्यावे. त्यामुळे गर्भावी वाढ चांगली होते. विणात काही अडचणी आल्यास डॉक्टर कडून सहाय्यता घ्यावी. विल्यानंतर करडे स्वच्छ करून घ्यावे. नाक आणि तोंड स्वच्छ करावे. विल्यानंतर लगेच चीक पाजायला सोडावे.
चारा व खाद्य प्रमाण : शेळीला दिवसाकाठी ३ ते ४ किलो ओला चारा व दीड ते दोन किलो सुका चारा द्यावा. शेळ्यांना प्रथिनयुक्त ल्यूसर्न,बरसीम, चवळी असा चारा द्यावा. मका, ज्वारी, बाजरी, ओट, नाचणी व त्यांचे कोंडा द्यावा त्यासोबत शेंगदाण, तीळ, सरकी सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई यांच्या पेंढि द्याव्यात. गाभण काळात शेवटी ३० दिवसात ४०० ते ५०० ग्रॅम खाद्य द्यावे.
लहान करडांचा चारा व खाद्य प्रमाण : सुरवातीचा आठवडा चीक आणि दूध द्यावे. नंतर ओल्या व सुक्या गवतांचा तसेच झाडा झुडूपांच्या पाल्याचा चारा द्यावा. शेळ्यांना शेवरी, सुबाभूळ, पकार, पिंपळ, बेल, ओक, लिंबोळी, करवंद अश्या काटेरी झाडांचा पाला टांगून द्यावा. करडे १.५ ते २ महिन्यांची झाल्यावर दूध पाजने बंद करावे. याच काळात आंबवण व ओला चारा वाढवत जावे. चार महिन्यानंतर मटणासाठी विकण्यापर्यंत वैरणीशिवाय २५० ते ३०० ग्रॅम आंबवण द्यावे.
पैदाशीसाठी बोकडाचा चारा व खाद्य प्रमाण : चाऱ्यासह ५०० ते ८०० ग्रॅम प्रति दिन (त्याच्या वजनानुसार) खाद्य देणे आवश्यक आहे.
शेळ्यांची जोपासना
गाभण शेळीची जोपासना -
गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी. तिला ओला व सुका चारा आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी. शेवटच्या दोन - तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण आहार द्यावा. शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्यक असते.
दुभत्या शेळीची जोपासना -
दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त ऊर्जेची आवश्ययकता भासते. म्हणून त्यांना ओल्या व सुक्याे चाऱ्यासोबतच 100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा. चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.
करडांची जोपासना -
करडाच्या जन्मानंतर शेळी त्या पिल्लाला चाटू लागते; मात्र असे न घडल्यास कपड्याने करडास स्वच्छ पुसून घ्यावे. नाका-तोंडातील चिकट द्रव स्वच्छ करून घ्यावा. नाळ स्वच्छ ब्लेडने कापून टिंक्च र आयोडीन लावावे. करडास एक - दोन तासांतच शेळीचा चीक पाजावा. करडाने नैसर्गिकरीत्या चीक न प्यायल्यास त्याला तो काढून पाजावा. दोन - तीन आठवड्यांनंतर त्याला कोवळा पाला द्यावा. पहिले तीन - चार महिने दूध पाजावे. त्यानंतर मात्र त्याला शेळीपासून तोडून चरण्यास सोडावे.
पैदाशीच्या बोकडाची जोपासना
पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची निवड करावी. निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे, तो मारका नसावा. अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा, खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते.
शेळीचे आरोग्य -
लसीकरण (पशु वैद्यकाचा सल्ला घ्यावा)
INSERT TABLE
रोग_ महिना_ मात्रा (शेळी) _मात्रा (करडे)_ (६ महिन्यानंतर)
फुफ्फुसाचा दाह _जानेवारी_ २ मि.लि. कातडीखाली_ २ मि.लि. कातडीखाली
घटसर्प_ मार्च - सप्टेंबर_ ५ मि.लि. कातडीखाली_ ५ मि.लि. कातडीखाली
देवी_ एप्रिल _कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली
आंत्रविकार_ मे - नोव्हेंबर _५ मि.लि. कातडीखाली _५ मि.लि. कातडीखाली
बुळकांडी_ मे - नोव्हेंबर_ १ मि.लि. कातडीखाली_ १ मि.लि. कातडीखाली
फऱ्या_ जुलै _५ मि.लि. कातडीखाली _५ मि.लि. कातडीखाली
पायलाग / लाळ्याखुरकत _ऑगस्ट _५ मि.लि. कातडीखाली _५ मि.लि. कातडीखाली
धनुर्वात_ पहिल्या व दुसऱ्या महिन्यात _ पुढे प्रतिवर्ष बूस्टर इंजेक्शन द्यावे.
रोग व उपचार (पशु वैद्यकाचा सल्ला घ्यावा)
इ - कोलाय जंतू प्रादुर्भाव
बाधित करडांना ताबडतोब वेगळे ठेवावे. त्यांना मीठ व पाणी यांचे द्रावण पाजावे व गरम कापडात किंवा घोंगडीत गुंडाळून ठेवावे. इ. कोलाय हा जीवाणू असल्यामुळे प्रतीजैवीके, सलाईन, अ, ब, क, जीवनसत्व इंजेक्शन द्यावी.
आंत्रविकार / हगवण
जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रो लाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे.
तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रो लाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे.
अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.
जंत
प्रकार - १) पट्टी कृमी २) पर्णकृमी ३) गोलकृमी
जानेवारी ते एप्रिल दरम्यान गाभण शेळ्यांना स्ट्रायगॉलस प्रकारचे जंत होण्याची शक्यता असते. एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान शेळ्यांना यकृतकृमी व पट्टीकृमी प्रकारच्या जंतांचा प्रादुर्भाव होतो.  त्यासाठी त्यांना अलबेंडाझॉंल ५ mg/ ltr प्रति किलो वजनास याप्रमाणे औषध द्यावे. उन्हाळ्यात गोठ्यातील मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळावी.
धनुर्वात
जखम  हायड्रोजन पेरॉक्साईडने स्वच्छ धुऊन घ्या. बाधित शेळ्यांना अंधाऱ्या व शांत जागेत ठेवावे. शेळीला तोंडाच्या स्नायूंमध्ये ताठरपणा जानवला, सर्वांगाला कंप सुटला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कवटीच्या मधील फोरेमिन मग्नम् छिद्रातून धनुर्वात प्रतिविष द्यावे. जखमांना वेळीच औषधोपचार हा सर्वात चांगला उपचार आहे. गाभन काळात शेळीला पहिल्या व दुसऱ्या महिन्यात अशी दोन धनुर्वातची इंजेक्शन द्यावीत व पुढे प्रतिवर्ष बूस्टर इंजेक्शन द्यावे.
घटसर्प
सांसर्गिक प्राण्याची विष्ठा, लाळ, चारा, पाणी यांच्याशी संपर्कात आल्याने या रोगाची लागण होते. या रोगात जनावराचे तापमान अचानक खूप वाढते. शेळी चारा खाणे बंद करते. रवंथ न करता नाक व तोंडातून स्राव बाहेर पडतो.
संसर्गजन्य फुफ्फुसदाह -
हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचे लक्षण म्हणजे कोरडा खोकला, नाकातून पाण्यासारखा द्रव येतो.
फऱ्या -
हा रोग तीव्रपणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामध्ये खूप ताप येतो, पाय व सांधे यांना सूज येते, या सुजेवर दाबले असता दुखते व गरम लागते. या रोगामुळे जनावरास नीट चालता येत नाही.
लाळ्या खुरकूत -
हा एक झपाट्याने वाढणारा संसर्गजन्य रोग आहे. याचा प्रसार हवा, पाणी व रोगी प्राण्याच्या संपर्कात आलेला चारा यामुळे होतो. यामध्ये शेळ्यांची भूक मंदावून त्या अशक्त बनतात. दुभत्या शेळ्यांचे दूध कमी होते, खूप ताप येतो व तोंडातून स्राव वाहतो. तोंडात पांढऱ्या रंगाचे फोड येतात, खुरांतही फोड येऊन जखमा होतात, त्यामुळे खाणे आणि चालणे अशक्यय होते. शेळ्या दगावण्याचीही शक्यता असते.
आंत्रविषार :
प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव असणाऱ्या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात प्यायलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात व काही मिनिटांतच गतप्राण होतात.
उपाययोजना - शेळ्या, मेंढ्यांना पावसाळ्याच्या सुरवातीला लस टोचून घ्यावी. कोकरांना लस दिल्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. लस टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागतो. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.
फाशी :
हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस व दुष्काळ परिस्थितीमुळे फाशीचा रोग पसरतो. यात खूप ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो. श्वाोस घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते.
उपाययोजना - पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या वर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्यात. त्यांची कातडी विकू नये. शवचिकित्सा करू नये.
जरबा :
याचा प्रसार चावणाऱ्या चिलटांपासून म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये चिलटांची उत्पत्ती डबक्याजत पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते. याची लक्षणे म्हणजे तोंडाला गरे पडतात, तोंडातील आतील भाग लालसर पडतो, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात.
उपाययोजना - पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करावी. डबकी व साचलेल्या पाण्यावर रॉकेल फवारणी करावी. असे केल्याने चिलटांचे प्रजनन कमी होऊन संख्या वाढत नाही. बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत. कोमट पाण्यात मीठ टाकून तोंड धुवावे.
बुळकांडी :
या आजारात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
उपाययोजना - पशुतज्ज्ञांकडून नियमित पी.पी.आर. लस टोचून घेणे. वाडग्यात स्वच्छता पाळावी. आजारी शेळ्या, मेंढ्यांना वेगळे ठेवावे.
** दुष्काळी परिस्थितीत शेळ्या- मेंढ्यांची घ्यावयाची काळजी
उष्माघात -
शेळ्या जर जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या, तर ही समस्या उद्‌भवण्याची शक्य्ता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा- पाणी घेण्याचे थांबते अथवा शरीराचे तापमान सामान्य तापमानाच्याही वर साधारणतः 105-106 फॅ.पर्यंत पोचते. कधीकधी शेळ्या मूर्च्छित होऊन पडतात. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.
उपचार व प्रतिबंध -
उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून शेळ्यांना दिवसातील थंड काळ जसे सकाळी लवकर (सहा ते दहा वाजेपर्यंत) आणि संध्याकाळी उशिरा (तीन ते सात वाजेपर्यंत) या काळातच चरावयास सोडावे. स्वच्छ, ताजे व थंड पाणी शेळ्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.
उन्हाळी हगवण -
एकंदरीत अशा हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश करता येईल. हगवणीची बाधा झाल्यास जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रो लाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे शेळ्या अगदी अशक्त होतात व जमिनीवर पडून राहतात. जंतबाधेची हगवण असल्यास शेणाला विशिष्ट वास येतो.
वरील सर्वच बाबतीत पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.
गोठा पद्धती
मुक्त गोठा पद्धत
या शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही. परंतु शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे त्यामुळे हि पद्धतीची आम्ही शिफारस करत नाही.
बंदीस्त शेळीपालन -
शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया प-हाटया यांच्या सहायाने करावे.
प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा.
गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत.
शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
बंदीस्त शेळीपालना विषयी माहीती
  
पूर्णत: बंदिस्‍त शेळीपालन करण्‍यामध्‍ये शेळी मरतूकीची शक्‍यत: असते.कारण शेळी हा पूर्वापार पासून फिरणारा प्राणी आहे व शेळीला एकदम बंदिस्‍त अवस्‍थेत ठेवणे चूकीचे आहे.यासाठी शेळीला अर्धबंदिस्‍त अवस्‍थेत ठेवणे उपयूक्‍त आहे.काही जाती उदा. बोअर,बारबेरी शेळया पूर्ण बंदिस्‍त शेळीपालनासाठी योग्‍य आहेत.शेळी पालनाअगोदर प्रशिक्षण घेणे हितावहच असते.शेळीला निवा-यासंदर्भात महत्‍वाच्‍या गोष्‍टी:-
1.शेळीला निवा-यामध्‍ये ऊन,थंडी,पाऊसापासून संरक्षण होणे आवश्‍यक आहे.
2. शेळीचा निवारा शेळीस पूरेशी जागा ऊपलब्‍ध करणारा असावा,शेळीला मोकळी हवा व जागा मिळावी..
3.निवा-याची जागा राहत्‍या घरापासून दूर व उंचवटयावर असावी.तसेच निवारा फार खर्चिक नसावा.निवा-यातील जमीनीवर ३ अंशाचा प्रत्‍येक फूटास उतार ठेवावा व त्‍यावर मूरूम पसरून नीट धूमसून[चोपून] त्‍यात ३% कळीचा चूना मिसळावा व मूरूम पून्‍हा चोपून घ्‍यावा.
4.वयोगटानूसार व शारीरीक अवस्‍थेनूसार शेळयाचे गट करावेत उदा- दूध देणा-या शेळया,०-३ महिन्‍याची पिले,३-६ महिन्‍यांची मादी पिले,३-६ महिन्‍यांची नर पिले,६ महिन्‍यांच्‍या पूढील ते १ वर्षाची मादी पिले ,१ वर्षापूढील व मोठया खाटया[भाकड शेळया],गाभण शेळया,बोकड व आजारी जनावरे इ.चे गट करावेत म्‍हणजे अशी जनावरे गोठयात वेगवेगळी/ स्‍वतंत्र ठेवावीत.
5.निवा-यात छप्‍पर असलेला व मोकळा भाग असावा.छप्‍पर असलेल्‍या भागात गव्‍हाण व पिण्‍याच्‍या पाण्‍याची टाकी असावी.गव्‍हाणीची रूंदी १-१.२५ फूट,उंची १.५ फूट [गव्‍हाणीचा तळ],व लांबी दर शेळीस १ फूट एवढी असावी.
6.गोठयाची उंची मध्‍यभागी १२ फूट व व कडेला ८ फूट असावी व दिशा उत्‍तर -दक्षिण असावी.शेडची रूंदी ३० फूट व दोन्‍हीकडे मोकळा परंतू चेनलिंक जाळीचा भाग १५ फुट असावा.कडेची जाळी ६ फूट उंच,व मधील विभागातील जाळी ५ फूट उंच असावी
बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी. त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.
उत्तम जातीच्या शेळ्या
मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जातीच्या् शेळ्या खालीलप्रमाणे
ऑस्ट्रेलियन बोअर -
उस्मानाबादी- अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी]
संगमनेरी - अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी]
सिरोही - अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी]
बोएर - बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी]
सानेन- बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्तप[दूधासाठी]
कोकण कन्यावळ: अर्धबंदीस्तस शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी कोकणामध्ये]
उस्मानाबादी शेळया मूखेड[नांदेड],रेणापूर[लातूर],कोण[कल्यााण],लोणंद[सातारा],म्हतसवड[सातारा],च्या[आठवडी बाजारात या शेळया विकत मिळू शकतात.
चारा व्यवस्थापन
साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. यामध्ये मुख्यतः शेवरी, बोर, बाभूळ, आंबा, चिंच, तुती, केळीच्या पानांचा समावेश होतो. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता असते.
बोअर शेळ्याबाबत माहिती.
* ऑस्ट्रेलियन बोअर असे या जातीचे नाव आहे. ही जात मांस उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. ही मुळची दक्षिण अफ्रीकेतील असून सदर जातीबाबत ऑस्ट्रेलीया मध्ये संशोधन झालेले आहे. भारतामध्ये फलटण येथील शेळी-मेंढी संशोधन व विकास संस्था येथे या शेळ्या बाबत संशोधन झाले आहे. तसेच कृषि विकास प्रतिष्ठान, बारामतीच्या डेअरी विभागाकडे सुध्दा या शेळ्या आहेत.
* या शेळ्यांची वैशिष्ट्ये
१.कोणत्याही हवामानाशी जुळवुन घेण्याची क्षमता अधिक
२.जास्तीत जास्त शेळ्या जुळी देतात
३.लवकर प्रजननक्षम होण्याचा गुण
४.वजन वाढीचा दर चांगला आहे
५.खाद्याची मटणात रुपांतर करण्याची क्षमता उत्कृष्ट
६.हाडे व चरबीचे प्रमाण कमी असलेले उच्च प्रतीचे मटण व दर्जेदार कातडे मिळते.
७.उत्तम व्यवस्थापन असल्यास दररोज २ किलो दुध प्रती शेळी मिळते.
८.उत्तम रोगप्रतीकार शक्ती
९.स्थानिक शेळ्यांशी संकर केल्यास संकरीकरणाच्या जोम असलेली उत्तम संकरीत पैदास मिळते.
*प्रजनन क्षमता
-एक करडे देण्याचे प्रमाण – २४ टक्के
-दोन करडे देण्याचे प्रमाण – ५८ टक्के
-तीन करडे देण्याचे प्रमाण – १७ टक्के
* बोअर नरमाद्या ९ – १० महिन्यात पुर्ण वयात येतात. ६-९ महीन्यामध्ये ३५ – ४० किलो वजन होते.
* कृषि विकास प्रतीष्ठानच्या फार्मवर घेण्यात आलेल्या प्रयोगामध्ये ६ महीन्याच्या संकरीत करडांची सरासरी २१ किलो वजन मिळाली.
१)बोअर जातीचे पैदासीसाठी नर कृषि विकास प्रतीष्ठान बारामती ( फोन- २५४३१३) येथे उपलब्ध आहे.
२)शेळ्या व पैदासीसाठी बोअर नर मिळण्यासाठी निरा व्हॅली जेनेटीक्स लि. फलटण, लोणंदरोड फलटण जिल्हा- सातारा येथे संपर्क साधावा.
(फोन ०२१६६ – २२२३२८ किंवा २२२४८४)
* बंदिस्त पध्दतीने शेळी/मेंढी पालन प्रकल्पाबाबत संपर्क:
शेळी व मेंढी संशोधन केंद्र
महात्मा फुले कृषि विद्यापिठ राहुरी जि. नगर
*अहिल्यादेवी होळकर
शेळी, मेंढी विकास महामंडळ
गोखलेनगर पुणे- ४११०५३
(फोन - ०२०- २५६५७११२) किंवा महात्मा फुले विकास महामंडळ किंवा जिल्हा उद्योग केंद्र किंवा नजिकच्या पशुधन विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
* शेळी विकास संशोधन केंद्र
नारायणगांव.
शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते. तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी. शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल. शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत. शक्यशतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.
बोकडाची निवड कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते. शुद्ध जातीचाच बोकड शक्यपतो विकत घ्यावा. ते न जमल्यास निदान सुधारित जातीचा बोकड घ्यावा. विकायला आलेल्या बोकडांपैकी सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्याची छाती भरदार असावी व पायांत भरपूर अंतर असावे. शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असावा. पाय मजबूत व खूर उंच असावेत. बोकड मारका नसावा. तो चपळ व माजावर आलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असावा. डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा. या लक्षणांवरून पुढील पिढीत चांगले गुणधर्म संक्रमित होण्याची शक्यता कळते.
शेळ्या, मेंढ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या..
नवजात करडांचे संगोपन
नवजात करडास शेळी स्वतः चाटून स्वच्छ करते, त्याचे दोन फायदे असतात. त्यामुळे करडांचे रक्ताभिसरण वाढत असते; शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास पिल्लांचे अंग स्वच्छ, खरखरीत कापडाने स्वच्छ करावे. नाकातील व तोंडातील चिकट स्राव काढावा, त्यामुळे करडांना श्वांस घेण्यास सोपे जाते. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा, जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल.
करडांना उभे राहण्यास मदत करावी. करडे उभे राहिल्यानंतर शेळीच्या सडाला तोंड लावून दूध पिण्याचे प्रयत्न करते की नाही ते पाहावे. नाही तर दूध पिण्यास शिकवावे. पिल्लू जन्मल्यानंतर अर्धा तासाच्या आत शेळीचे दूध म्हणजे चीक पाजणे आवश्याक असते, यामुळे करडांची रोगप्रतिकारक्षमता वाढत असते आणि करडांची पचनसंस्था व पचनमार्ग साफ होतो.
पहिल्या आठवड्यात करडाच्या वजनाच्या दहा टक्के एवढे दूध चार- पाच वेळेस विभागून पाजावे. आवश्य्कतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाही तर अपचन होऊन हगवण वाढते. करडे जन्मल्यानंतर त्याचे वजन करून नोंद करून घ्यावी.
जन्मल्यानंतर पाच- सात दिवस शेळी व करडे एकत्र ठेवावीत व रोज त्यांना वजनाच्या दहा टक्के दूध तीन- चार वेळा विभागून पाजावे. शेळीच्या पाण्याची व्यवस्था/ भांडे उंचीवर असावे, जेणेकरून करडे पाण्यात पडणार नाहीत, याची काळजी घेता येते.

साधारणपणे 65- 70 दिवसांपासून करडांचे दूध कमी करत 90 दिवसांपर्यंत पूर्णपणे बंद करावे आणि शेळीपासून पूर्णपणे वेगळे करावे. करडांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ, लुसलुशीत चारा देण्यास सुरवात करावी, जेणेकरून चारा खाण्याची सवय होऊ लागते.
करडांची निरोगी व झपाट्याने वाढ करण्यासाठी त्यांना आवश्यहक औषधी, सकस आहार इ.कडे बारकाईने लक्ष देण्यात यावे. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात.
करडे पाच महिन्यांच्या नंतरच विक्रीसाठी काढावीत, कारण या वयानंतर करडांची वाढ झपाट्याने होते व जास्त नफा मिळतो.
तीन महिन्यांनंतर करडांना आंत्रविषार, लाळ्या खुरकूत व घटसर्प आणि फर रोगांविरुद्धचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

शेळी पालन एक उत्कृष्ट व्यवसाय
अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहेत शासनही या व्यवसायाला आर्थिक सहाय देत आहे त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे काही ठराविक जातीच्या शेळया दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.
शेळी पालनाचे फायदे-
अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो
शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठया प्रमाणावर आढळतात.
शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.
शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.
काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.
शेळयांचे खत उत्तम असते.
आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
शेळयांच्या शिंगापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मासांत अधिक असते.
शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. भारतात शेळयांचे 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर आहे व शेळीच्या दुधाला मागणी नाही खरं तर शेळीचा विकास दुध उत्पादनाकरीता झालाच नाही आपल्या कडील निवडक जातीच्या शेळया एका वेतात 200 ते 250 लिटर दुध देतात तर विदेशी जातीच्या शेळया 1200 ते 1700लिटर दुध देतात. आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2.2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.
शेळयांच्या जाती भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल,उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी,सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.
बंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता -
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
बंदीस्त शेळीचे व्यवस्थापन -
शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया प-हाटया यांच्या सहायाने करावे
प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत.
शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
उत्ताम जातीच्यान शेळ्यांव
मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जातीच्या् शेळ्या खालीलप्रमाणे
उस्मासनाबादी- अर्धबंदीस्त् शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी]
संगमनेरी - अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी]
सिरोही - अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी]
बोएर - बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी]
सानेन- बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[दूधासाठी]
कोकण कन्यावळ: अर्धबंदीस्तस शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी कोकणामध्येव]
उस्मानाबादी
शेळया मूखेड[नांदेड],रेणापूर[लातूर],कोण[कल्यााण],लोणंद[सातारा],म्हतसवड[सातारा],च्या[आठवडी बाजारात या शेळया विकत मिळू शकतात.
दुर्लक्ष नको शेळ्यांच्या आरोग्याकडे...
शेळ्यांचे कमी खर्चात चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. शेळी व्यवस्थापन करताना सकस चारा, गाभण शेळ्यांची - करडांची काळजी घ्यावी. आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.
साधारणपणे शेळ्यांना ...........दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यिक आहे. यामध्ये मुख्यतः शेवरी, बोर, बाभूळ, आंबा, चिंच, तुती, केळीच्या पानांचा समावेश होतो. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यचकता असते. शेळ्यांचे ऊन - पावसापासून संरक्षण करता येईल, अशा पद्धतीने गोठा बांधावा. शेळ्यांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत. मल-मूत्राची रोजच्या रोज विल्हेवाट लावावी. गोठ्यात स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. गोठ्यात हवा खेळती असावी. ............मुक्त गोठा पद्धतीने शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्य कता भासत नाही; मात्र बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यआक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी. त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.
शेळ्यांची जोपासना
गाभण शेळीची जोपासना -
गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी. तिला ओला व सुका चारा आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी. शेवटच्या दोन - तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण आहार द्यावा. शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्य क असते.
दुभत्या शेळीची जोपासना -
दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त ऊर्जेची आवश्ययकता भासते. म्हणून त्यांना ओल्या व सुक्याे चाऱ्यासोबतच 100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा. चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.
करडांची जोपासना -
करडाच्या जन्मानंतर शेळी त्या पिल्लाला चाटू लागते; मात्र असे न घडल्यास कपड्याने करडास स्वच्छ पुसून घ्यावे. नाका-तोंडातील चिकट द्रव स्वच्छ करून घ्यावा. नाळ स्वच्छ ब्लेडने कापून टिंक्च र आयोडीन लावावे. करडास एक - दोन तासांतच शेळीचा चीक पाजावा. करडाने नैसर्गिकरीत्या चीक न प्यायल्यास त्याला तो काढून पाजावा. दोन - तीन आठवड्यांनंतर त्याला कोवळा पाला द्यावा. पहिले तीन - चार महिने दूध पाजावे. त्यानंतर मात्र त्याला शेळीपासून तोडून चरण्यास सोडावे.
पैदाशीच्या बोकडाची जोपासना
पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची निवड करावी. निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे, तो मारका नसावा. अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा, खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते.
घटसर्प
- हा अतिशय वेगाने पसरणारा साथीचा रोग आहे. सांसर्गिक प्राण्याची विष्ठा, लाळ, चारा, पाणी यांच्याशी संपर्कात आल्याने या रोगाची लागण होते. या रोगात जनावराचे तापमान अचानक खूप वाढते. शेळी चारा खाणे बंद करते. रवंथ न करता नाक व तोंडातून स्राव बाहेर पडतो.
संसर्गजन्य फुफ्फुसदाह -
हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचे लक्षण म्हणजे कोरडा खोकला, नाकातून पाण्यासारखा द्रव येतो.
फऱ्या -
हा रोग तीव्रपणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामध्ये खूप ताप येतो, पाय व सांधे यांना सूज येते, या सुजेवर दाबले असता दुखते व गरम लागते. या रोगामुळे जनावरास नीट चालवतही नाही, त्यामुळे ते लंगडते, म्हणूनच या रोगास "एकटांग्या' असेही म्हणतात.
लाळ्या खुरकूत -
हा एक झपाट्याने वाढणारा संसर्गजन्य रोग आहे. याचा प्रसार हवा, पाणी व रोगी प्राण्याच्या संपर्कात आलेला चारा यामुळे होतो. यामध्ये शेळ्यांची भूक मंदावून त्या अशक्त बनतात. दुभत्या शेळ्यांचे दूध कमी होते, खूप ताप येतो व तोंडातून स्राव वाहतो. तोंडात पांढऱ्या रंगाचे फोड येतात, खुरांतही फोड येऊन जखमा होतात, त्यामुळे खाणे आणि चालणे अशक्यय होते. शेळ्या दगावण्याचीही शक्यशता असते.
धनुर्वात -
या रोगामुळे शेळ्यांचे स्नायू ताठरतात, सर्वांगाला कंप सुटतो, शेळ्यांना चालताना त्रास होतो. त्यासाठी वेळेवर लसीकरण, वैद्यकीय सल्ला व निदान करून घ्यावे.
शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते. तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी. शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल. शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत. शक्यशतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.
बोकडाची निवड कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते. शुद्ध जातीचाच बोकड शक्यपतो विकत घ्यावा. ते न जमल्यास निदान सुधारित जातीचा बोकड घ्यावा. विकायला आलेल्या बोकडांपैकी सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्याची छाती भरदार असावी व पायांत भरपूर अंतर असावे. शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असावा. पाय मजबूत व खूर उंच असावेत. बोकड मारका नसावा. तो चपळ व माजावर आलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असावा. डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा. या लक्षणांवरून पुढील पिढीत चांगले गुणधर्म संक्रमित होण्याची शक्य ता कळते.
शेळ्या, मेंढ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या..
आंत्रविषार : प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव असणाऱ्या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात प्यायलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात व काही मिनिटांतच गतप्राण होतात.
उपाययोजना - शेळ्या, मेंढ्यांना पावसाळ्याच्या सुरवातीला लस टोचून घ्यावी. कोकरांना लस दिल्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. लस टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागतो. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.
फाशी :
हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस व दुष्काळ परिस्थितीमुळे फाशीचा रोग पसरतो. यात खूप ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो. श्वाोस घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते. उपाययोजना - पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या वर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्यात. त्यांची कातडी विकू नये. शवचिकित्सा करून नये.
जरबा :
याचा प्रसार चावणाऱ्या चिलटांपासून म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये चिलटांची उत्पत्ती डबक्याजत पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते. याची लक्षणे म्हणजे तोंडाला गरे पडतात, तोंडातील आतील भाग लालसर पडतो, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात.
उपाययोजना - पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करावी. डबकी व साचलेल्या पाण्यावर रॉकेल फवारणी करावी. असे केल्याने चिलटांचे प्रजनन कमी होऊन संख्या वाढत नाही. बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत. कोमट पाण्यात मीठ टाकून तोंड धुवावे.
बुळकांडी :
या आजारात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
उपाययोजना - पशुतज्ज्ञांकडून नियमित पी.पी.आर. लस टोचून घेणे. वाडग्यात स्वच्छता पाळावी. आजारी शेळ्या, मेंढ्यांना वेगळे ठेवावे.
दुष्काळी परिस्थितीत शेळ्या- मेंढ्यांची घ्यावयाची काळजी
वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष अशा दुहेरी संकटात सध्या शेळी- मेंढी पालक आहेत. या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
या वर्षी दुष्काळजन्य स्थिती फारच गंभीर असून, सतत दोन वर्षे कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची झळ शेळ्या- मेंढ्यांनाही बसत आहे. कधी नव्हे ते शेळ्या- मेंढ्यांसाठीही छावण्यांची मागणी होत आहे. दुष्काळ आणि त्याचबरोबर वाढते तापमान यामुळे उद्‌भवणाऱ्या आरोग्य समस्यांचा व त्यावर करावयाच्या उपचाराचा आढावा सदर लेखात घेत आहोत. या परिस्थितीत उद्‌भवणाऱ्या आरोग्याच्या प्रमुख समस्या खालीलप्रमाणे आहेत.
उष्माघात -
शेळ्या जर जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या, तर ही समस्या उद्‌भवण्याची शक्य्ता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा- पाणी घेण्याचे थांबते अथवा शरीराचे तापमान सामान्य तापमानाच्याही वर साधारणतः 105-106 फॅ.पर्यंत पोचते. कधीकधी शेळ्या मूर्च्छित होऊन पडतात. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.
उन्हाळी हगवण -
एकंदरीत अशा हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश करता येईल. हगवणीची बाधा झाल्यास जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रो लाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे शेळ्या अगदी अशक्त होतात व जमिनीवर पडून राहतात. जंतबाधेची हगवण असल्यास शेणाला विशिष्ट वास येतो.
आम्लीय अपचन -
उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावलेली असते. बाह्य तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी शेळ्या पाणी जास्त पितात. शेळ्यांच्या खाद्यामध्ये जर कोरडा चारा जास्त प्रमाणात असला, तर पचनशक्तीवर परिणाम होतो. उन्हाच्या तीव्रतेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रक्तामध्ये आम्ल वाढते व आम्लीय अपचन होते. कधीकधी समारंभातील उरलेले तेलकट, पिष्टमय, दूषित अन्न खाल्ल्यामुळेसुद्धा असे अपचन होते.
जंतबाधेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम -
खरे तर उन्हाळ्यामध्ये जंतांची वाढीची अवस्था म्हणजे अंडी, अंड्यांपासून विषारी अवस्था व वयस्क अवस्था ही थांबलेली असते; परंतु शरीराच्या आत असलेले जंत जसे यकृत, आतडी व पोटाचे कप्पे यांतील जंत क्रियाशील असतात. सामान्यतः यकृतातील जंत जास्त क्रियाशील असतात. अशा जंतांची शरीरातील संख्या वाढली, की शेळ्यांमध्ये रक्ताल्पता वाढते व शेळ्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. शेळ्यांची हाडे व बरगड्या दिसायला लागतात. केस राठ झालेले व चकाकी नसलेले, तसेच कातडी निस्तेज झालेली दिसते. डोळ्यांची श्ले ष्मा निस्तेज, फिकट दिसते आणि यकृतावर व पचनक्रियेवर परिणाम झालेले दिसतात. काही प्रसंगी शेवटी शेळ्यांना हगवणीचा तीव्र त्रास होऊन शेळ्या अगदी अशक्त होतात व उपचाराला प्रतिसाद न देता दगावतात.
उपचार व प्रतिबंध -
उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून शेळ्यांना दिवसातील थंड काळ जसे सकाळी लवकर (सहा ते दहा वाजेपर्यंत) आणि संध्याकाळी उशिरा (तीन ते सात वाजेपर्यंत) या काळातच चरावयास सोडावे. स्वच्छ, ताजे व थंड पाणी शेळ्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.
हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रो लाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे.
तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रो लाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे.
जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.
जंतबाधा ही शेळ्यांमधील प्रमुख समस्या आहे. उन्हाळ्यात जंतांची अंडी सुप्तावस्थेत असतात, अशा काळात गोठ्यातील जंतयुक्ती माती काढून घ्यावी व त्याठिकाणी जंतरहित माती टाकावी. या मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळल्यास जमीन निर्जंतुक होण्यास मदत होईल, याशिवाय शरीरातील क्रियाशील जंत मारणे अति आवश्यनक असते, त्यासाठी सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी असलेले जंतुनाशक जसे फेनबेन्डॅझाल, डिस्टोडीन, बॅनमिन्थसारखी जंतुनाशक औषधे वापरून जंतनिर्मूलन करून घ्यावे, जेणेकरून उत्पादनक्षम काळात शेळ्यांचे आरोग्य चांगले राहील व गर्भाची योग्य वाढ होईल.
शरीरावर वाढणारे परोपजीवीसुद्धा या काळात सुप्तावस्थेत असतात. मात्र, त्याआधी योग्य ते औषध फवारणी करून शरीरावरील परोपजीवींचा बंदोबस्त करावा. अशाप्रकारे उन्हाळ्यात घेतलेली आरोग्याची काळजी पुढील काळात विशेषतः पावसाळ्यातील संक्रमण काळात प्रतिबंधक म्हणून आणि उद्‌भवणाऱ्या समस्येवर उपाय ठरते.
नवजात करडांचे संगोपन
नवजात करडास शेळी स्वतः चाटून स्वच्छ करते, त्याचे दोन फायदे असतात. त्यामुळे करडांचे रक्ताभिसरण वाढत असते; शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास पिल्लांचे अंग स्वच्छ, खरखरीत कापडाने स्वच्छ करावे. नाकातील व तोंडातील चिकट स्राव काढावा, त्यामुळे करडांना श्वांस घेण्यास सोपे जाते. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा, जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल.
करडांना उभे राहण्यास मदत करावी. करडे उभे राहिल्यानंतर शेळीच्या सडाला तोंड लावून दूध पिण्याचे प्रयत्न करते की नाही ते पाहावे. नाही तर दूध पिण्यास शिकवावे. पिल्लू जन्मल्यानंतर अर्धा तासाच्या आत शेळीचे दूध म्हणजे चीक पाजणे आवश्याक असते, यामुळे करडांची रोगप्रतिकारक्षमता वाढत असते आणि करडांची पचनसंस्था व पचनमार्ग साफ होतो.
पहिल्या आठवड्यात करडाच्या वजनाच्या दहा टक्के एवढे दूध चार- पाच वेळेस विभागून पाजावे. आवश्य्कतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाही तर अपचन होऊन हगवण वाढते. करडे जन्मल्यानंतर त्याचे वजन करून नोंद करून घ्यावी.
जन्मल्यानंतर पाच- सात दिवस शेळी व करडे एकत्र ठेवावीत व रोज त्यांना वजनाच्या दहा टक्के दूध तीन- चार वेळा विभागून पाजावे. शेळीच्या पाण्याची व्यवस्था/ भांडे उंचीवर असावे, जेणेकरून करडे पाण्यात पडणार नाहीत, याची काळजी घेता येते.
जन्मल्यानंतर पाच- सात दिवस शेळी व करडे एकत्र ठेवावीत व रोज त्यांना वजनाच्या दहा टक्के दूध तीन- चार वेळा विभागून पाजावे. शेळीच्या पाण्याची व्यवस्था/ भांडे उंचीवर असावे, जेणेकरून करडे पाण्यात पडणार नाहीत, याची काळजी घेता येते.
साधारणपणे 65- 70 दिवसांपासून करडांचे दूध कमी करत 90 दिवसांपर्यंत पूर्णपणे बंद करावे आणि शेळीपासून पूर्णपणे वेगळे करावे. करडांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ, लुसलुशीत चारा देण्यास सुरवात करावी, जेणेकरून चारा खाण्याची सवय होऊ लागते.
करडांची निरोगी व झपाट्याने वाढ करण्यासाठी त्यांना आवश्यहक औषधी, सकस आहार इ.कडे बारकाईने लक्ष देण्यात यावे. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात.
करडे पाच महिन्यांच्या नंतरच विक्रीसाठी काढावीत, कारण या वयानंतर करडांची वाढ झपाट्याने होते व जास्त नफा मिळतो.
तीन महिन्यांनंतर करडांना आंत्रविषार, लाळ्या खुरकूत व घटसर्प आणि फर रोगांविरुद्धचे लसीकरण करून घेणे आवश्यतक आहे.

Popular Posts