Friday, February 23, 2018

मिलनरिंग - सामुहिक विवाह सोहळा


शेतकरी / शेतमजुर यांनी मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू नये म्हणून मुलीच्या विवाहासाठी रु. १०००० इतकी अनुदानित राशी दिली जाते. मंगळसुत्र व किमान आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी सहाय्यक अनुदान दिले जाते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी माझीशेतीच्या सहयोगी संस्थांमार्फत सहभागी बांधवांच्या मुला- मुलींच्या लग्नात 'फुलाची पाकळी' समजुन अर्थसहाय्य केले जाते. 

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केले जाते. लग्न समारंभात कोणतीही उणीव भासणार नाही याची काळजी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानकडून घेतली जाते. 

सहभागी होणाऱ्या वधु-वरांसाठी नियम व अटी

  • वधु, वर व त्यांचे पालक माझीशेतीचे शेतकरी लाभार्थी घटक असावेत.
  • वधु-वर हे संस्थेच्या कार्यक्षेत्रात (महाराष्ट्रात) राहणारे असावेत. 
  • प्रथम वधु-वरास तसेच विधवा आणि घटस्फोटीत वधुच्या विवाहासाठी माझीशेतीकडून सहकार्य केले जाईल.
  • लाभार्थी कोणत्याही क्षणी नोंदणी करू शकतात परंतु एका सहयोगी संस्थेकडे किमान १० लाभार्थी जोडप्यांची नोंदणी झाल्यानंतर यथोचित निमंत्रणे आणि मुहूर्त पाहून सामुहिक लग्नसोहळा केला जातो.
  • सहभागी जोडप्यांनी निबंधक विवाह नोंदणी यांच्याकडे नोंदणी करणे आणि प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. 
  • सहभागी जोडप्यांनी शेतकरी असलेबाबत (७/१२) व रहिवासी दाखला (तलाठी किंवा ग्रामसेवक) सादर करणे. 

No comments:

Post a Comment