कृषि विभागामार्फतचे पुरस्कार

१. कृषिरत्न - 
कृषि क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रीया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मध्ये अति उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्ती/संस्था/गटास हा पुरस्कार देण्यात येतो.
स्वरुप:- प्रत्येकी रक्कम रुपये 75,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार

२. कृषिभूषण - कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास, फलोत्पादन व ग्रामिण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतक-यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात अव्दितीय कार्य करणा-या शेतकरी / संस्था/ गटांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
स्वरुप: प्रत्येकी रक्कम रुपये 50,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार

३. जिजामाता कृषिभुषण पुरस्कार - शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता जिजामाता कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
स्वरुप: प्रत्येकी रक्कम रुपये 50,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पतीसह सत्कार

४. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक्य-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वत: शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वत:ची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-यांना/ व्यक्तींना / संस्थांना, त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील वैशिष्टपुर्ण कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा्य-या महिला, कृषि विज्ञान मंडळ अशा मंडळाचे क्रियाशील सभासद/प्रमुख, इत्यादी व्यक्ती/संस्था/गट यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
स्वरुप: प्रत्येकी रक्कम रुपये 30,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार

५. शेतीनिष्ठ - शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती औजरांचा वापर, जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर / नाला इत्यादीमधील पाणी अडवुन शेतीतील नालाबडींग इत्यादीव्दारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा सुयोग्य वापर, पिक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेती पुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, निलगिरी, सुबाभ्‌ुळ इत्यादींची लागवड करणे, स्वतःच्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड व जवळपास शेतक-­यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, शासन / सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर व त्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे, इत्यादी निकषांतर्गत शेतीमध्ये शेतक­-यांचे एकंदरीत कार्य विचारात घेऊन राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण २५ (पंचवीस) शेतक­-यांना अथवा संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 
स्वरूप - प्रत्येकी रुपये ११,०००/- (रुपये अकरा हजार) रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व त्या व्यक्तिचा सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

६. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषि सेवारत्न पुरस्कार - राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणा­या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचा­यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचा­यास राज्यशासनाव्दारे प्रतीवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविणेत येणार आहे
स्वरुप:- स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

No comments:

Post a Comment