Wednesday, December 30, 2015

एक शेतकरी आणि ग्रामीण भागात तुमच्या पासून दूर राहणारा नागरिक म्हणून विनंती मागणी ...

(एक सुज्ञ आणि जागृत नागरिक म्हणून या मेसेजला शक्य तितकी प्रसिद्धी द्या. याबाबत काही शंका किंवा अडचण असेल तर 09975740444 या नंबरवर संपर्क करा.)

प्रति,
महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक परिक्षेत्रात राहणारे,
तुम्ही सर्वजण, नागरिक, शासन, प्रशासन, मीडिया,
हे आणि यांच्याशी संबंधित सर्व जिवंत घटक

यांना नम्र निवेदन,

कृपया, तुमच्या स्तरावरून आम्हास शक्य तितके सहकार्य करावे, कारण हा असा प्रश्न आहे कि तो तुमच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणार नाही.

* शासनाचे हजारो कोटी खर्च करून गुणवत्ता का मिळत नाही?
* समाजात बदल का होत नाही?
* नेहमी विकासासाठी अमुक इतका निधी खर्च केला असे बोलले जाते.... खर्च केला म्हणजे विकास झाला असे कसे म्हणता येईल.
* पैसा शासनाचा, गुणवत्ता तपासणारे शासन, अहवाल करणारे शासन, नियम बनवणार शासन..... कोणाचा कोणाला मेळ नाही.

शासनाचा प्रत्येक अधिकारी एका महत्वाच्या कामात व्यस्त आहे, ते म्हणजे "हे काम माझे नाही, हे काम माझ्या विभागाचे नाही, हे काम माझ्या टेबलवर येत नाही." मग या लोकांना शासन पगार कश्यासाठी देतेय. प्रत्येक कामात चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही. खूप वैतागून जनतेने सत्ताबदल केला आणि बहुमत दिले, तर भारताचे कैवारी परदेशी दौऱ्यात व्यस्त आहेत तर महाराष्ट्राचे कैवारी महत्वाच्या कामात व्यस्त आहेत.

असो, एक शेतकरी आणि ग्रामीण भागात तुमच्या पासून दूर राहणारा नागरिक म्हणून विनंती मागणी एवढीच आहे कि,

१. शेती पिको अगर न पिको, माझीशेती तुम्ही चालवायला घ्या.
२. शेतीसाठी तुम्हाला जमतील तश्या मुलभूत सुविधा द्या अगर न द्या, मला माझ्या जमिनीच्या क्षेत्राप्रमाणे कसण्याचा मासिक मोबदला द्या.
३. माझ्या पोरांना ५० किमी अंतरावर हरतर्हेचे शिक्षण मिळायला पाहिजे.
४. माझ्या पोरांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी शासकीय द्या अगर कंत्राटी द्या पण कायम (किमान वयाच्या ६० वर्षेपर्यंत) भाकरी मिळेल याची शाश्वती द्या.
५. माझ्या घरच्या बायका-पोरींना रात्री-बेरात्री बाहेरून घरी परत सुरक्षित पोहचण्याची हमी द्या.
६. माझ्या पोराबाळांना स्वच्छ पाणी आणि चांगल्या आरोग्याची हमी द्या.
७. माझ्या जाती-धर्मामध्ये आरक्षणाच्या नावाखाली लुडबुड करू नका. हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचेच असेल तर आर्थिक निकषांवर द्या.

मला हे पण माहित आहे कि माझ्या वरच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे आणि तुम्ही हे वर्षानुवर्षे करताय असे लेखी सांगाल पण पुन्हा तुमचा सरकारी बाबु आडवा येतोय. तो अगदी गोड, मधुर आणि स्वच्छ वाणीने पटवून देतो कि तो कामात व्यस्त आहे. आता यांचे काम परत सांगावे असे वाटत नाही कारण त्याचा वर उल्लेख केलेलाच आहे.

हे सहज शक्य झाले तर तुमच्यावरील आमचा विश्वास द्विगुणित होईल पण जर याबाबत कुचराई झाली तर अखंड महाराष्ट्रातून जन आंदोलन उभे राहील. याची कृपया नोंद घ्यावी.

____MAHESHBORGE (अध्यक्ष)
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सावळज (सांगली) महाराष्ट्र राज्य
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटना, सावळज (सांगली) महाराष्ट्र राज्य
संपर्क - ९९७५७४०४४४, maheshborge@gmail.com

Wednesday, December 9, 2015

झेंडु

माझीशेती: झेंडु (151209) (Post 1/3)
(पुढील शृंखला : पपई)

** जमीन : 
हलकी ते मध्यम. सामू ७ ते ७.५ पर्यंत. भरपूर सेंद्रिय कर्बनी युक्त, पाण्याचा चांगला निचरा होणारी.
भारी आणि सकस - रोपे खूप वाढतात परंतु फुले कमी मिळतात.

** जाती : 
आफ्रिकन आणि फ्रेंच असे दोन प्रकार पडतात.
* अ) आफ्रिकन झेंडू : 
१) क्रेकर जॅक २) आफ्रिकन टॉंल डबल मिक्सड ३) यलो सुप्रीम ४)गियाना गोल्ड ५) स्पॅन गोल्ड ६) हवाई ७) अलास्का ८) आफ्रिकन डबल ऑरेंज ९) सन जाएंट
* आ) फ्रेंच झेंडू : 
१) स्पे २) बटरबॉल ३) फ्लेश ४) लेमन ड्रोप्स ५) फ्रेंच डबल मिक्स्ड
** इ) फ्रेंच हायब्रिड :
१) पेटीट २) जिप्सी ३) हार्मनी हायब्रिड ४) रेड हेड ५) कलर मॅजीक ६) क्वीन सोफी ७) हार बेस्टमून
** ई) झेंडूच्या प्रचलित जाती :
१) मखमली २) गेंदा ३) गेंदा डबल
  
** लागवड पद्धती :
* बियांपासून रोपे तयार करण्यासाठी २ x १ चौरस मीटर आकाराचे कुजलेले शेणखत टाकून गादीवाफे तयार करावेत. खात्रीच्या ठिकाणाहून बी अथवा रोपे आणावीत.
* एक हेक्टर लागवडीसाठी ७५० ते १२५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी निवडलेले बियाणे शक्यतो मागील हंगामातील असावे. 
* रोपांना ५ - ६ पाने आल्यावर म्हणजे हंगामाप्रमाणे पेरणीनंतर ३ - ४ आठवड्यांनी रोपांची शेतात लागन करावी.

** झेंडू लागवडीसाठी पद्धत :
१) नवीन फळबागेत आंतरपीक 
२) भाजीपाल्याच्या पिकात - मिश्र पीक 
३) कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर
४) झेंडूची स्वतंत्र लागवड

** लागवड : लागवडीपुर्वी सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून घ्यावेत. जातीनुसार तसेच हंगामानुसार झेंडू लागवडीसाठी दोन ओळीत, दोन झाडात पुढीलप्रमाणे अंतर राखावे.

** हंगाम नुसार झेंडू लागवडीचे अंतर  
TABLE FORMAT
हंगाम_  प्रकार_  लागवडीचे अंतर  
* पावसाळी
उंच ६० x ६० सेमी 
मध्यम ६० x ६० सेमी 

* हिवाळी
उंच  ६० x ४५ सेमी 
मध्यम उंच ४५ x ३० सेंमी
बुटका ३० x ३० सेंमी

* उन्हाळी  
उंच ४५ x ४५ सेंटिमीटर  
मध्यम उंच  ४५ x ३० सेंटिमीटर

क्रमशः  .....

(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे निय...