Saturday, November 29, 2014

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 1012 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
संकलन - मिलींद पोळ, वार्ताहर

डॉ. रामचंद्र साबळे
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 1012 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मध्य प्रदेशावर 1014, राजस्थान सीमेवर 1016 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. त्यामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतात थंड वारे वाहतील. वाऱ्याचा वेगही साधारणपणे 10 किलोमीटर राहील. कमाल तापमानात फरक दिसेल. कोकणात 25 ते 32 अंश सेल्सिअस,
उत्तर महाराष्ट्रात 29 ते 32 अंश सेल्सिअस,
मराठवाड्यात 24 ते 27 अंश सेल्सिअस,
विदर्भात 25 ते 30 अंश सेल्सिअस;
पश्चिम महाराष्ट्रात 23 ते 26 अंश सेल्सिअस राहील.

संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहील. त्यानुसार रात्रीचे तापमान घटेल.
अरबी समुद्राचे आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 300 ते 301 केलव्हिन्स इतके राहील. हिंदी महासागरावर ढगांचा समूह जमलेला असून, त्या ढगांचे तापमान उणे 40 अंश सेल्सिअस राहील. हवेच्या दाबात फरक
होत असल्याने मोठ्या प्रमणात ढग दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्रावरही दिसून येतील. प्रामुख्याने डिसेंबरच्या 1 ते 3 तारखेच्या दरम्यान अशी स्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रावरही ढग जमतील आणि मेघ गर्जनेसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत पावसाची शक्य

उत्तर महाराष्ट्र -
उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत राहील. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात 17 अंश, तर धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत 19 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 47 ते 58 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 19 ते 22 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 7 ते 10 किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
मोबाईल - ०९९७५७४०४४४
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444