Friday, January 22, 2016

बीट

बीट लागवड

बीट हे कंद वर्गीय भाजीपाला पीक आहे. ८० ते ९० दिवसांत कमी खर्चात येणाऱ्या या पिकांची लागवड पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. बीट पीकाचे उत्पादन वर्षभर आलटून पालटून घेता येते . शरीरात रक्ताची कमतरता असेल तर बीट खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आहारात दररोज बीट खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे शहरी ग्राहकांमध्ये बीटाची मागणी जास्त असते.

बीटाचे पीक कमीत कमी ६.५ ते ७ आणि जास्तीत जास्त १० ते ११.५ सामू असलेल्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते.त्यामुळे आपल्याकडील क्षारपड जमिनीत याची शेतीकरण्यास मोठा वाव आहे.

बीट लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी.भुसभुशीत जमिनीत बीटाची वाढ चांगली होते. बीटाची चांगली वाढ होण्यासाठी कमीत कमी १० ते ३६ अंश सेल्सियस तापमानाची गरज असते. त्यामुळे पावसाळा किंवा हिवाळ्यात उष्णता कमी असल्याने याचे अपेक्षितउत्पादन मिळत नाही. बीट लागवडीसाठी डेट्राईट डार्क रेड, क्रीमसन ग्लोब यासारख्या वाणांची शिफारस करण्यात येते.

लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करुन त्यात ६ गाड्या शेणखत वापरावे. याची लागवड  सरीवरंबा आणि वाफापद्धतीने करतात. बीटाचे शेत तणमुक्त ठेवले तर हवा खेळती राहते आणि त्याचा कंदांच्या वाढीस फायदा होतो. बीटाच्या शेतीत कीड आणि रोगांचे नियंत्रण महत्त्वाचे आहे. पाने पोखरणाऱ्या अळीच्यानियंत्रणासाठी होस्टाथिऑन १० मिली १० लिटर पाण्यातूनफवारा. उंटअळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २५ मिली  १० लिटर पाण्यातून फवारा. पानावरील ठिपके आणि केवडा येऊ नये म्हणून कॅप्टन हे बुरशीनाशक प्रतिकिलो बियाण्यास २ ते ३ ग्रॅम चोळावे. लागवडीवेळी बीजप्रक्रिया करुनदेखील त्यावर ठिपके आणि केवड्याचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावर डायथेन एम ४५ बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

बीटाचे पीक काढल्यानंतर त्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या पुढील पिकाला चांगला फायदा होतो. बीटाचा वापर सलाड, लोणचे आणि साखर तयार करण्यासाठी होतो. लाल रंगाचे बीट शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. तर शेतकऱ्यांना कमी कालावधीत चांगला नफा मिळवून देण्यासीठी ते फायद्याचे ठरत आहे. त्यामुळेखाणाऱ्यांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवूनदेणाऱ्या बीटाची लागवड वाढवणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

येत्या काळात द्राक्ष बागेतील डाऊणी व्यवस्थापण

*शेतकरी  माझा :  द्राक्ष   बंधूनो  आजून मोडला  नाही कणा ......* *प्रिय सन्मानीय सदगृहस्थ,.... सदबंधू*  नमस्कार  द्राक्ष बागाईतदार ...