Wednesday, January 13, 2016

मोसंबी

जमीन :
चोपण, क्षारपड जमिनीवर मोसंबीची लागवड टाळावी. मोसंबीसाठी मध्यम जमीन एक मीटर खोल काळी माती व त्याखाली नरम मुरूम असलेली जमीन लागवडीसाठी चांगली असते. जास्त चोपण, पाण्याचा निचरा न होणारी, जमिनीतील मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असलेली जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी न्यूसेलर, काटोल गोल्ड, फुले मोसंबी या जातींची निवड करावी. 

लागवड:
मोसंबीची लागवड 6 × 6 मीटरवर करावी. लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे खोदताना खड्ड्यातील वरील चांगली माती वेगळी टाकावी. खड्डे उन्हाळ्यात 15 ते 20 दिवस चांगले तापवून द्यावेत. खड्डे खोदताना, भरताना तळाशी शिफारशीत कीडनाशक, पालापाचोळा किंवा वाळलेला काडीकचरा यांच्या मिश्रणाचा 15 सें.मी. थर भरावा.
त्यानंतर खड्डा भरण्यासाठी दोन टोपली शेणखत, खड्ड्यातून काढलेल्या वरच्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरावा. पाऊस पडल्यानंतर कलमांची लागवड करावी. कलमाचा जोड जमिनीपासून 20 ते 25 सें.मी. उंचीवर राहील याची काळजी घ्यावी. कलमे खात्रीच्या रोपवाटिकेतूनच घ्यावी. रंगपूर लाइम खुंटावरील कलमांना प्राधान्य द्यावे. कलमांचा डोळा 22 ते 25 सें.मी.वर बांधलेला असावा.

No comments:

Post a Comment