Friday, January 15, 2016

शेवंती

शेवंती

शेवंती लागवडीस हलकी ते मध्यम प्रतीची  जमीन निवडावी .जमिनीचा सामू 6.5  ते  7 दरम्यान असावा.

लागणीची पद्धत 
शेवंतीची  लागवडीस  10 ते  15 सेंमी लांबीच्या  सकर्सच्या तुकड्यांचा वापर करावा .जाती नुसार 60 सेंमी  अंतर सऱ्या पाडाव्या किंवा 3×2 आकाराचे सपाट वाफे तयार करून 30×20 सेंटीमीटर ठेवुण लागवड करावी .

बीज प्रक्रिया -
लागनीपूर्वी  बोर्डो मिश्रण किंवा  बविस्टिनच्या  द्रावनात बुडुन  बीज प्रक्रिया करा.जर लागवडीस शेंडा कलम किंवा खोड कलम अवलंबल्या स बेने 2-3 पाने असलेले कलम कांडी बुरशीनाशकात बुडविले नंतर IBA 1000  ppm या संजीवकात बुडुन लागवड करावी .

ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.

पाणी व ख़त व्यवस्थापन 
पडवळ पिकास करीता पेरणी पूर्वी प्रति हे. 40टन शेनखत द्यावे .लागवड करताना प्रति हे 200 किलो प्रमाणे  , स्फूरद ,पालाश द्यावे .आणी नत्र पहिला हप्ता 15दिवसानी 100किलो व दुसरा नत्राचा  हप्ता 45 दिवसांनी 100 -किलो  मात्रा द्यावी .
जमिनीच्या मगदुराने 4-5 दिवसाच्या अंतराने पाणी  द्यावे.

वळन आणी छाटनी - लागवडी नंतर 3-4 आठवड्यानी 10 सेंमी शेंडा  खुडावा यालाच पिचिंग असे म्हणतात

लागवडीस उपयुक्त जाती - झिप्री ,राजा ,पांढरी रेवडी ,पिवळी रेवडी ,सोनाली तारा ,आय .आय . एच .आर . सीलेक्शन -4, बग्गी ,शरद माला जाती वापरावि.
किड नियंत्रण 
1) मावा - पिकाच्या कोवळ्या पानातून रस शोषून घेते  खाते नियंत्रना करीता 10 लिटर पाण्यात   किंवा  मॅलॅथिऑन 15 मिली ची फवारनी करावी .

2) फुलकिडे  - कळी आणी पानातीला रस शोषून घेते मॅलेथियॉन (50%प्रवाहि)10- मिली 10 लिटर पाण्यात फुले  येण्यापूर्वी  1ते 2 वेळा  फवारावेत .             
3)पाने खाणारी आळी -पिकावरील सर्व पाने खाऊन  टाकते नियंत्रण करीता 12 मिली इकॅलकस (35%प्रवाहि)किंवा थायोडॉन (35%प्रवाहि) ची फवारनी करावी .
4) लाल कोळी - पानांच्या खालून रस शोषण करतात. नियंत्रण -30ग्रॅम पाण्यात विरघळणारे  गंधक अथवा 10 मिली केलथेन 10 लिटर पाण्यात मिसळून फवरावे .

रोग नियंत्रण 
1)खोड कुज - खोड काळे पडून पाने  सुकतात 
नियंत्रण - बाव्हिस्टीन20ग्रॅम  किंवा कॅप्टन 20 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

2) पानावरील ठिबके  -पानावर गोल ठिबके पडतात नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 26ग्रॅम डायथेन - एम -45 डायथेन झेड -78 हे बुरशी नाशक फवारावे .

3)रोपांची मर  -रोप तपकिरी रंगाचे पडून पाने  सुकतात व कालांतराने रोप मरते  नियंत्रण करीता डायथेन एम- 45   0.2% द्रावणात रोप बुडून लागवड करावी. 
4) मूळकुज -अतिरिक्त पानी साचल्याणे रोप मरते नियंत्रणा करीता रोपाच्य मुळाजवळ 25 ग्रॅम थायरम (80%)10 लिटर पाण्यात मिसळून फवारवे .

5) भूरि - रोपावर पांढऱ्या रंगाचे डाग पडतात नियंत्रण -10 लिटर पाण्यात 6ग्रॅम कॅरथेन किंवा 10 ग्रॅम बविस्टिन फवारवे .
6)तांबेरा -पानावर  वीटकरी रंगाचे ठिबके पडतात व फुले कमी येतात नियंत्रणकरीता 30 ग्रॅम डायथेन एम -45    10 लिटर पाण्यातून फवारवे .

महत्वाची घ्यावयाची काळजी 
फुलांची काढनी  कोवळी असतांनच  सकाळच्या वेळी करावी. काढनि नंतर फुले थंड ठिकाणी ठेऊन लवकरात लवकर प्रतवारी करून पॅकिंग करून बाजारपेठेत विक्रीस पाठवावे.

No comments:

Post a Comment