Tuesday, August 29, 2017

गांडुळ संवर्धन आणि गांडूळखत निर्मीती

गांडुळ जीवनक्रम

गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात.

१) जागेची निवड व बांधणी - 

गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मिटर, मधील उंची ३ मिटर, बाजूची उंची १ मिटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार ५ ते २५ मिटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मिटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत. चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचरट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पध्दतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.२) गांडुळ खाद्य - शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुध्दा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी पाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांची अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगँस प्लँन्टमधून निघालेली स्लरीसुध्दा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. वरील संवर्धक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय पुणे-५ यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. या व्यतीरीक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रीया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल.


३) गांडूळखत वेगळं करणे - गांडुळखत आणि गांडुळे वेगले करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतीरीक्त दुसऱ्या पध्दतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.


गांडुळखताचे फायदे - 
१) जमिनीचा पोत सुधारतो. 
२) मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. 
३) गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. 
४) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 
५) जमिनीची धूप कमी होते. 
६) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. 
७) जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो. 
८) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. 
९) गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 
१०) जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.


गांडूळ खतातून मिळणारी सूक्ष्म खनिज द्रव्ये.
कमी खर्चात जमिनीचा पोट सुधारून पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी गांडूळ खत हा उत्तम पर्याय आहे. गांडूळ खतामुळे सूक्ष्म खनिज द्रव्ये मिळतातच शिवाय फॉस्फेट,सेल्युलोज सारखे एन्झायीम आणि ओक्झीन, जीब्रालिक अॅसिड सारखी संजीवके ही मिळतात ज्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते.
ओल्या जमिनीत या खतात आलेल्या अंड्यामुळे गांडुळे निर्माण होतात, ती जमीन सच्छिद्र ठेऊन मुळांची वाढ होण्यास मदत करतात.
गांडूळ खतामध्ये खालीलप्रमाणे सूक्ष्म खनिज द्रव्ये असतात.
सेंद्रिय कर्ब - ९.८ ते १३.४ टक्के,
नायट्रोजन - ०.५१ ते १.६१टक्के,
फॉस्फोरस - ०.१९ ते १.०२ टक्के, 
पोटॅशियम - ०.१५ ते ०. ७३ टक्के, 
कॅल्शियम - १.१८ ते ७. ६१ टक्के, 
झिंक - ०.००४२ ते ०.११० टक्के, 
कॉपर - ०.००२६ ते ०.००४८ टक्के, 
मँगनीज - ०.०१०५ ते ०.२०३८ टक्के

Sunday, August 27, 2017

What is apeda?

कृषि आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उपक्रम आहे. 


 1. निर्यातीसाठी सुचित केलेल्या उत्पादनांशी संबंधित उद्योगांचा विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे किंवा सर्व्हेक्षण करणे, व्यवहार्यता तपासणे, संयुक्तपणे व्यवसाय उभारणी करिता भागभांडवल देणे तसेच इतर सवलतीच्या योजना राबविणे.
 2. अनुसूचित उत्पादनांच्या निर्यातीसाठी फी आकारून निर्यातदारांची नोंदणी करणे. (नोंदणी पद्धत)
 3. निर्यातीच्या उद्देशासाठी शेड्यूल्ड उत्पादनांसाठी मानके आणि विशिष्ट बाबी निश्चित करणे.
 4. कत्तलखाण्यामध्ये मांस आणि मांस उत्पादन, प्रक्रिया केंद्रे, स्टोरेज व आवार, वाहतुक किंवा इतर ठिकाणी उत्पादने ठेवली किंवा हाताळली जातात अशा उत्पादांची गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने निरिक्षण करणे.
 5. उत्पादनांचे वेष्टन (Packing) विकसित आणि सुधारित करणे.
 6. भारताबाहेर अनुसूचित उत्पादनांचे मार्केटिंग सुधारणे.
 7. अनुसूचित उत्पादनांच्या निर्यातीसहित उत्पादन आणि विकासाला चालना देणे.
 8. कारखान्यांचे मालक किंवा आस्थापना ज्या अनुसूचित उत्पादन किंवा संबंधित कोणत्याही विषयावर उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, मार्केटिंग किंवा निर्यात करणाऱ्या किंवा अनुसुचित उत्पादनांशी संबंधित असणाऱ्या इतर व्यक्ती आणि प्रकाशनांवरून किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून आकडेवारी काढणे. 
 9. अनुसूचित उत्पादनांशी संबंधित उद्योगांना वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रशिक्षण देणे.
 10. अश्या इतर बाबी ज्या स्वीकृत असतील. 

 APEDA नियंत्रीत उत्पादने  
 • Fruits, Vegetables and their Products.
 • Meat and Meat Products.
 • Poultry and Poultry Products.
 • Dairy Products.
 • Confectionery, Biscuits and Bakery Products.
 • Honey, Jaggery and Sugar Products.
 • Cocoa and its products, chocolates of all kinds.
 • Alcoholic and Non-Alcoholic Beverages.
 • Cereal and Cereal Products.
 • Groundnuts, Peanuts and Walnuts.
 • Pickles, Papads and Chutneys.
 • Guar Gum.
 • Floriculture and Floriculture Products.
 • Herbal and Medicinal Plants.

यासोबत अपेडाकडून भारतामध्ये आयात केलेल्या साखरेवर देखील नियंत्रण ठेवले जाते. 

 APEDA रचना 

चेअरमन केंद्रशासनाकडून नियुक्त केला जातो. नीती (नियोजन) आयोग मार्फत एक प्रतिनिधी, लोकसभेचे दोन आणि राज्यसभेचा एक प्रतिनिधी, आठ (8) मेंबर्स केंद्र शासनाच्या कृषि व ग्रामीण विकासाशी संबंधित विभागातून निवडले जातात.
(i) Agriculture and Rural Development
(ii) Commerce
(iii) Finance
(iv) Industry
(v) Food
(vi) Civil Supplies
(vii) Civil Aviation
(viii) Shipping and transport

यासोबत  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आद्याक्षर क्रमानुसार ५ सदस्य निवडले जातात. 

याशिवाय ७ मेंबर केंद्राच्या कृषि संबंधित खालील उपक्रमातून निवडले जातात.
(i) Indian Council of Agricultural Research
(ii) National Horticultural Board 
(iii) National Agricultural Cooperative Marketing Federation 
(iv) Central Food Technological Research Institute
(v) Indian Institute of Packaging 
(vi) Spices Export Promotion Council and 
(vii) Cashew Export Promotion Council. 

व्यावसायिक प्रतीनिधीमधून १२ प्रतिनिधी निवडले जातात.
 • Fruit and Vegetable Products Industries
 • Meat, Poultry and Dairy Products Industries
 • Other Scheduled Products Industries
 • Packaging Industry
दोन मेंबर हे शास्त्रज्ञ किंवा तज्ञ व्यक्ती म्हणुन निवडले जातात. असे एकूण ३८ सदस्यांची apeda प्राधिकरण रचना आहे. 


सेंद्रिय शेतीला चालना

कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये गांडूळ खत निर्मिती, सीपीपी कल्चर युनिट, सेंद्रिय शेतीशाळा, अभ्यास दौरे, समूह संघटनांसाठी अर्थसाहाय्य यासारख्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. - जनार्दन जाधव 

अ) गांडूळ खत उत्पादन व वापर 
1) गांडूळ खत उत्पादन युनिट स्थापन करणे. 2) बायोडायनामिक कंपोस्ट युनिट स्थापन करणे. 3) सीपीपी कल्चर युनिट स्थापन करणे. 4) निंबोळी पावडर व अर्क तयार करण्यासाठी निम पल्वरायझर/ ग्राइंडरचा पुरवठा करणे. 
अ- 1) गांडूळ खत उत्पादन युनिट
1) गांडूळ खत उत्पादन युनिटसाठी 10,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. उत्पादन प्रक्रिया सुरू करताच लाभार्थ्यास खर्चाच्या 25 टक्के दराने जास्तीत जास्त 2,500 रुपये याप्रमाणे अनुदान देय आहे. 
अ- 2) बायोडायनामिक कंपोस्ट तयार करणे - 
बायोडायनामिक कंपोस्टसाठी शेतातील काडीकचरा, बनगी, पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या, वाळलेली बोंडे, वाढलेले गवत, शेतातील तण, कडुनिंब, रुचकिण, निरगुडी, मोगली एरंड इत्यादीची पाने, गाजर गवत, बेशरम, गिरिपुष्प इत्यादी साहित्य, सीपीपी कल्चर, ताणे शेण (आठ ते दहा दिवसांचे), जनावरांचे मूत्र व 1500 ते 2000 लिटर पाणी लागते. 
अ- 3) सीपीपी कल्चर युनिट - 
बायोडायनामिक कंपोस्ट तयार करण्यासाठी सीपीपी कल्चर लागते, तसेच सीपीपी हे उत्तम जमीन सुधारक आहे, त्यामुळे बियाण्याची उगवण लवकर होते. जमिनीचा पोत सुधारतो. पिकात कीड व रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते. सीपीपी कल्चर युनिट उभारणीसाठी 250 रुपये प्रति युनिट अनुदान देय राहील. 
अ- 4) निंबोळी पावडर/ अर्क तयार करणे - 
शास्त्रीय पद्धतीने व मोठ्या प्रमाणावर निंबोळी पावडर तयार करण्याकरिता पल्वरायझर/ ग्राइंडरची आवश्‍यकता असते. निम पल्वरायझर / ग्राइंडर, इलेक्‍ट्रिक/ डिझेल मोटार चाळण्या, शेड, कच्चा माल, पॅकिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी इत्यादी यंत्रसामग्रीच्या किमतीवर किमतीच्या 50 टक्के दराने जास्तीत जास्त 15,000 रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. 

ब) सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसाहाय्य 
1) सेंद्रिय शेती गट स्थापन करणे - 
या घटकांतर्गत प्रत्येकी 20 शेतकऱ्यांचा साधारणतः 10 हेक्‍टरचा एक गट तयार करण्यात येतो. या गटात 10 किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा समावेश राहील. गटाचे नेतृत्व करण्यासाठी गटातील सेंद्रिय शेतीबाबत अग्रगण्य आणि उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या शेतकऱ्यांची गटप्रवर्तक म्हणून निवड करण्यात यावी.

ब- 1) समूह संघटनांसाठी अर्थसाहाय्य - 
स्थापन झालेल्या गटास तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि समूह संघटनांसाठी रु. 5,000 रुपये प्रति गट याप्रमाणे एका प्रकल्पास 50 हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येईल. समूह संघटनांचे काम शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था, स्वयंसेवी आणि मित्र मार्गदर्शक संस्था, कृषी विज्ञान केंद्र इत्यादींमार्फत करावे. गटाकडून उत्पादित झालेल्या मालास योग्य ते ब्रॅंडिंग करून वेगवेगळ्या प्रदर्शनांत, कृषी खात्याचे प्रदर्शन तसेच महोत्सवांत हा सेंद्रिय शेतीमाल ठेवण्यासाठी अशा गटांस प्रोत्साहन देणे, तसेच अशा मालास बाजारपेठ उपलब्धतेची माहिती करून देणे गरजेचे आहे. 

ब- 2) शेतकऱ्यांच्या शेतीशाळा - 
सेंद्रिय शेतीशाळा आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे पिकांची निवड करण्यात आली आहे. 
सेंद्रिय शेतीशाळा ही उपरोक्त यादीमधील ज्या पिकांचा प्रकल्प राबवायचा आहे, त्या पिकांसाठी घेण्यात यावी. यामध्ये 30 शेतकऱ्यांच्या गटाचा समावेश राहील. गटातील प्रत्येक शेतकऱ्याने तेच पीक घेणे अनिवार्य राहील (एका गटासाठी एक पीक). यादीव्यतिरिक्त इतर पिकांची निवड करावयाची असल्यास विभागीय कृषी सहसंचालक स्थानिक परिस्थितीनुसार त्यास मान्यता देतात. शेतीशाळेचे एकूण 15 प्रशिक्षणवर्ग घेणे अपेक्षित आहे. एका सेंद्रिय शाळेकरिता वीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 

ब- 3) प्रवर्तकाचे प्रशिक्षण - 
सेंद्रिय शेतीशाळा आयोजनासाठी तज्ज्ञ प्रवर्तक तयार करणे, सेंद्रिय शेती व प्रमाणीकरणाचे तंत्रज्ञान सर्वदूर एकसारखेच राहील याची काळजी घेणे. 

ब- 4) प्रवर्तकाच्या माध्यमातून प्रमाणीकरणाचे क्षेत्र निश्‍चित करणे -
प्रत्येक विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर इच्छुक सेंद्रिय शेतीमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच सेंद्रिय शेतीमध्ये उत्स्फूर्तपणे कार्य करणाऱ्या मातृमार्गदर्शक संस्थेमार्फत प्रवर्तकाचे प्रशिक्षण या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची आहे. प्रत्येक तालुक्‍यामध्ये सेंद्रिय शेती प्रकल्पामध्ये समाविष्ट गटातील प्रवर्तक/ कृषी सेवक/ कृषी सहायक तसेच सेंद्रिय शाळा घेण्यास उत्सुक असलेल्या संस्थेकडील प्रवर्तक म्हणून नामनिर्देशित केलेला कार्यकर्ता यांची टीओएफ प्रशिक्षणासाठी निवड करावी. एका टीओएफकरिता 40 प्रवर्तक/ कृषी सहायक/ कृषी पर्यवेक्षक यांची निवड करावयाची आहे. मात्र, टीओएफमध्ये प्रशिक्षण झालेल्या प्रवर्तकाने सेंद्रिय शेतीशाळेची अंमलबजावणी करावयाची आहे. जिल्हानिहाय दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रकल्पामध्ये समाविष्ट कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्याची/ प्रवर्तकाची टीओएफकरिता निवड करून ती यादी विभागीय कृषी सहसंचालक यांना सादर करावी. प्रति टीओएफकरिता चार लाख रुपये खर्चमर्यादा आहे. 

ब- 5) हिरवळीचे खत बियाणेपुरवठा - 
1) हिरवळीच्या खताचे पीक प्रत्यक्षात शेतात मुख्य पीक लागवडीपूर्वी पेरून ते 50 ते 60 दिवसांचे झाल्यानंतर अथवा फुलोऱ्यात येण्यापूर्वी नांगराने गाडण्याची पद्धत - यासाठी प्रामुख्याने ताग, धैंचा, चवळी, उडीद, कुळीथ इत्यादी पिकांची शेतात विशेषतः खरीप हंगामात लागवड करतात. 
2) दुसऱ्या पद्धतीत हिरवळीच्या पिकासाठी प्रामुख्याने शेताच्या बांधावर अथवा पडीक डोंगराळ जमिनीतील क्षेत्रावर सुबाभूळ, करंजा, टाकळा, रानमोडी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गिरिपुष्प वनस्पतीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्याचा वापर करणे. 
सन 2012-13 मध्ये कृती आराखड्यांतर्गत सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजनेमध्ये हिरवळीच्या खताचा वापर हा घटक समाविष्ट आहे. सदर कार्यक्रमात प्रस्तावित केल्यानुसार हिरवळीच्या खताचा वापर वाढविण्यासाठी सहभागी शेतकऱ्यास कमाल दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंत ताग, धैंचा, चवळी, उडीद, कुळीथ इत्यादीचे बियाणे 25 टक्के अनुदानावर कमाल 2000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय राहील. कृषी विद्यापीठे/ शासकीय प्रक्षेत्रे/ राज्य बियाणे महामंडळ/ राष्ट्रीय बीज नियम या यंत्रणेच्या माध्यमातून बियाणे पुरविण्यात येणार आहे. हे अनुदान लागवड क्षेत्राच्या 75 टक्के लोकवाटा भरून घेऊन प्रत्यक्ष बियाणे स्वरूपात देय आहे. संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे राज्य बियाणे महामंडळाने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना बियाणेपुरवठा करावयाचा आहे. या बाबीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतात.

ब- 6) बांधावर/ सलग गिरिपुष्प/ शेवरी लागवड - 
जमिनीची पाणी धारण क्षमता, सुपीकता सुधारणे व क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी हिरवळीच्या खतांचे बियाणे वापरास प्रोत्साहन देण्यात येते. गिरिपुष्पाच्या पानांमध्ये कर्ब 36 टक्के, नत्राचे प्रमाण 1.15 टक्के असते, त्यामुळे शेताच्या बांधावर, कुंपणावर आणि सलग गिरिपुष्प लागवडीस प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. 
छाटकलमांद्वारे लागवड करण्यासाठी 30 सें.मी. लांब व तीन सें.मी. व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरवातीस 30 x 30 x 30 सें.मी. आकाराचा खड्डा करून बांधावर दोन मीटर अंतरावर आणि सलग 3 x 3 मीटर अंतरावर लागवड करावी. अशाप्रकारे एक हेक्‍टर क्षेत्राच्या बांधावर साधारणतः 250 रोपे लागवड करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी 500 रुपये इतके अनुदान देय आहे. गिरिपुष्पाची कलमे/ रोपे/ बिया शासकीय नर्सरी/ शासन मान्यताप्राप्त नर्सरीमधूनच खरेदी करावीत. एक हेक्‍टर क्षेत्राच्या बांधावर साधारणतः 250 रोपे लागवड करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी 500 रुपये इतके अनुदान देय आहे, म्हणजेच प्रति रोप लागवडीसाठी रु. 2.00 प्रमाणे अनुदान देय आहे. 

ब- 7) प्रदर्शन/ महोत्सव/ चर्चासत्र/ कार्यशाळा/ प्रशिक्षण/ आकस्मिक निधी - 
ग्राहकांमध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित मालासंबंधी जागृती आणण्यासाठी, प्रमाणीकरण उत्पादनास प्रसिद्धी देण्यासाठी, तसेच सेंद्रिय शेतीमालास खुली बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी, त्याचप्रमाणे सेंद्रिय उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांना, ग्राहकांना, सेंद्रिय वाटचालीमध्ये सहभागी घटकांना प्रशिक्षण देणे, उत्पादकांना प्रशिक्षण देऊन सेंद्रिय उत्पादने घेण्यास प्रवृत्त करणे. राज्य/ विभाग/ जिल्हास्तरीय प्रदर्शन/ महोत्सव इत्यादी आयोजित करावयाचे असून, यामध्ये शेतकरी, सेंद्रिय संस्था, कृषी विद्यापीठे, आरसीओएफ नागपूर, प्रमाणीकरण यंत्रणा, सेंद्रिय निविष्ठा उत्पादक, व्यापारी आयात/ निर्यातदार, सेंद्रिय प्रक्रिया उत्पादक, प्रयोगशाळा, इ. व्यक्ती/ संस्थांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. या घटकांतर्गत असलेली रक्कम प्रदर्शन, महोत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण, प्रचार, प्रसार मोहीम व संकीर्ण बाबींसाठी खर्च करावयाची आहे. 

ब- 8) प्रचार व प्रसिद्धी - शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व ग्राहक व खरेदीदार यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 
ब- 9) अभ्यास दौरे - राज्यातील तसेच राज्याबाहेरील आदर्श सेंद्रिय प्रक्षेत्र, सेंद्रिय तंत्रज्ञान संशोधन केंद्र, तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर शेतकऱ्याने जाऊन पाहणी केल्यास सेंद्रिय शेती पद्धतीबद्दल त्यांना माहिती करून घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे नव्याने सेंद्रिय शेतीमध्ये सहभागी होणाऱ्या उत्पादकांना सेंद्रिय शेतीबाबतचे तंत्रज्ञान अवगत होऊन ते सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. हंगामात समक्ष जाऊन पिकांची व तेथील प्रयोगांची आणि निविष्ठा उत्पादनाची पाहणी करून शेतकऱ्यांना अल्प खर्चात माहिती मिळू शकते. याची खात्री झाल्यावर ते स्वतः या तंत्राप्रमाणे सेंद्रिय शेती सुरू करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांचे राज्यांतर्गत व राज्याबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करण्यात यावेत. राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी प्रति शेतकरी 1000 रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य प्रस्तावित आहे. प्रत्येक प्रकल्पातून अशा प्रकारे सर्वसाधारणपणे 25 शेतकरी/ उत्पादकांचा दौरा आयोजित करण्यासाठी अनुदान प्रस्तावित आहे. राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी प्रति शेतकरी 2,000 रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य प्रस्तावित असून, प्रत्येक कृषी विभागातून 60 ते 65 शेतकरी/ उत्पादकांचा एक अभ्यास दौरा आयोजित करण्यासाठी अनुदान मंजूर आहे. 

ब- 10) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) - 
राज्यात सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढविण्यासाठी सेंद्रिय शेतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना/ संस्थांना शासनामार्फत कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 

(लेखक कृषी आयुक्तालयात कृषी सहसंचालक (फलोद्यान) म्हणून कार्यरत आहेत.) 
ऍग्रोवन चौकट, ता. 4-2-2013 (केपी) फा.नं. - ए74106 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

Sunday, August 13, 2017

विद्यालक्ष्मी योजना - कौशल्याधारित शिक्षण संकल्पना प्रत्येकाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी...

विद्यालक्ष्मी योजना - कौशल्याधारित शिक्षण संकल्पना प्रत्येकाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी... 

शिक्षण हा मुलभूत अधिकार आहे. शिक्षणापासून कोणी वंचित राहु नये यासाठी शासन, प्रशासन आणि वित्तीय संस्था त्यांच्या परीने कार्यरत आहेत. कौशल्याधारित शिक्षण ही संकल्पना प्रत्येकाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी, उंच आकाशात भरारी घेण्यासाठी पायाभरणी आहे... मग तो कोणीही असो... अगदी दारिद्र्य रेषेखालील गरीबातील गरीब देखील. गरज आहे फक्त अंगात कौशल्य असण्याची... गुणवत्तेची आणि धाडसाची, काहीतरी नवीन आणि उद्दिष्ट्य साध्य करण्याची. व्यावसायिक, तांत्रिक आणि इतर कौशल्याधारित शिक्षण जितके महाग झाले तितक्याच संधी उपलब्ध झालेल्या आहेत. ज्यांना कोणाला वाटते कि पैश्याअभावी शिक्षण थांबवावे लागणार किंवा घराची परिस्थिती बेताची आहे त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी खचून जाऊ नये. सामान्यतः भारतातील कोणत्याही मध्यम-स्तरीय कुटुंबासाठी उच्च शिक्षण हे एक प्रचंड आव्हान आहे. नियमित ट्यूशन शुल्कासह, विद्यार्थ्यांना बोर्डिंग आणि लॉजिन्सचा खर्च, पुस्तके, प्रवास आणि विद्यार्थ्यांसाठी अन्य संबंधित खर्च भागवावा लागतो. उज्वल भविष्यासाठी आणि उत्तम शिक्षण घेण्यासाठी ते मग भरतात असो वा भारताबाहेर... जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि गुणवत्तेच्या आधारावर उच्च शिक्षणासाठी नामांकित संस्थामध्ये प्रवेश निर्धारित केला असेल तर फक्त तुमच्या मार्कशिट आणि प्रवेश दाखल्यासोबत तुमच्या जवळच्या बँकेला भेट द्या. तुम्हाला शैक्षणिक कर्ज मिळू शकते. जवळपास उच्च शिक्षणासाठी उपलब्ध सर्व कोर्सेसना कर्जाची सुविधा उपलब्ध आहे त्यामध्ये पदवी कोर्सेस, पदवीत्तर कोर्सेस, मास्टर आणि पीएचडी तसेच व्यावसायिक कोर्सेस करिता कर्जाची सोय उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही जर परदेशात शिक्षणासाठी जायचे नियोजन केले असेल तर तेथील नोकरीभिमुख व्यावसायिक / तांत्रिक अभ्यासक्रम देणाऱ्या नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये पदवी अभ्याक्रम पात्र आहेत. पदवीत्तर मध्ये MCA, MBA, MS हे कोर्स शिवाय बँकांच्या अधिकारक्षेत्रात असणाऱ्या नियमानुसार परदेशातील शिक्षणासाठी कर्ज मिळते. 

IIT, IIM, ISB मध्ये पूर्णवेळ प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही मर्यादेशिवाय कर्ज पुरवठा केला जातो. देशांतर्गत शिक्षणासाठी १० ते १५ लाख आणि परदेशात २० ते २५ लाख मर्यादेत कर्जपुरवठा केला जातो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे, शैक्षणिक कर्जे अ) रु. 4 लाख, बी) रु. 4 लाख आणि रू. 7.5 लाख आणि क) वरील रू. 7.5 लाख या स्लॅबमध्ये दिले जातात. या कर्ज रक्कमेत शैक्षणिक फी, परीक्षा फी, लायब्ररी फी, प्रयोगशाळा फी, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, युनिफॉर्म, प्रवास, संगणक (आवश्यकतेनुसार) याशिवाय अभ्यासदौरा, प्रोजेक्ट वर्क आणि थेसिस याकरिता कर्ज रक्कमेचा विनियोग होतो. वित्तपुरवठा आढावा
कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा लाभ घेतांना, कर्जदाराने विचार केला जाणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे निवडलेल्या बँकेने दिलेल्या कर्जासाठी व्याज दर. कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक कर्जासाठीचा व्याज दर घेतलेल्या कर्जाची रक्कम, कर्ज कालावधी आणि  निवडलेली शैक्षणिक संस्था यानुसार एक निश्चित किंवा फ्लोटिंग रेट असू शकतो. कर्जदाराच्या मागणीनुसार शिक्षण कर्जावरील व्याज बदलते. व्याज दर देयके साधारणपणे कर्जाच्या वितरणाच्या नंतर लगेचच केल्या जातात बहुतेक बँका कर्जाच्या मंजुरीनंतर अधिस्थगन कालावधी देतात, ज्या दरम्यान कर्जदारास शिक्षणाचे मुख्य मुद्दल परत करण्याची गरज नसते. नियोजित परतफेड या कालावधीनंतर सुरु होऊ शकते, सामान्यतः अर्थातच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. परंतु कर्जदारदेखील जास्त प्रमाणात परतफेड करण्याच्या ओझे टाळण्यासाठी वितरणाच्या वेळी पूर्वी व्याजदेखील अदा करु शकतात. बँकाकडून दिलेल्या व्याज दर पाहताना विचार करण्याचे आणखी एक मुख्य मुद्दे म्हणजे बँक तिमाही कमी शिल्लक रकमेवर व्याज किंवा दैनिक रिड्यूंग शिल्लक रकमेवर गणना करत आहे की नाही. शैक्षणिक कर्जाच्या अधिस्थगन कालावधी दरम्यान, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकास केंद्र सरकार संपूर्ण व्याजदर अनुदान योजना पुरवते. काही बँक महिला अर्जदारांसाठी सवलती देतात आणि कमी व्याज दर देतात.


शासकीय योगदान - प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना
शासनाची प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना तुमच्यासाठी आहे. शासनाकडून खासकरून मेक इन इंडियाच्या यशासाठी हा कार्यक्रम सादर केला आहे. या योजनेतून शिष्यवृत्ती आणि कर्ज असे संयुक्त सुविधा www.vidyalakshmi.co.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शैक्षणिक कर्जमागणी, शिष्यवृत्ती आणि तक्रार या बाबींची सुविधा या वेबसाईटवर  आहेत. 

जवळपास सर्व व्यापारी व राष्ट्रीयीकृत बँका या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. सध्या कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण प्राधान्यक्रमावर ठेवतील त्यासाठी कर्ज, शिष्यवृत्ती यासह शिक्षणासह आवश्यक सुविधा देण्यासाठी हा शासनाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे कि ही कोणत्याही प्रकारची अनुदान योजना नाही तर वेगवेगळ्या बँकांच्या नियमानुसार कर्ज मिळवण्यासाठी एक खिडकी उपक्रम आहे. (काही बँकांकडून आर्थिक कमकुवत गटांसाठी व्याजात सवलत देण्याची योजना आहे. उदा. देणा बँक)  Documentation required:
 • Letter of admission.
 • Duly filled and signed loan application form.
 • 2 recent passport size photographs.
 • Statement of cost of study.
 • PAN Card, AADHAR card of student and parent/guardian.
 • Proof of identity and proof of residence.
 • IT returns or IT assessment order of previous two years of the co-borrower.
 

Education Loan Canara Bank
Courses in IndiaCourses Abroad
Max Loan AmountRs. 1,000,000Rs. 2,000,000
Interest Rates
Loans upto Rs. 4 lakh11.35% , Girls - 10.85%11.35% , Girls - 10.85%
Loans Rs. 4.0 - 7.5 lakh11.35% , Girls - 10.85%11.35% , Girls - 10.85%

दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे निय...