Wednesday, December 5, 2018

माझीशेती : माती परीक्षण

पीकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. 
उदा.-
१) सामू PH २) विधुत वाहकता EC, ३)चुनखड़ी CaCO3 ४) सेंद्रिय कर्ब OC, ५) नत्रN, ६) स्फुरदP, ७) पालाशK, ८) कॉपरCu, ९) फेरस(आयर्न)Fe, १०) झिंकZn, ११) मॅगनीज्Mn, १२) कॅल्शियमCa, १३) मॅग्निशियमMg, १४) सल्फर S, १५) सोडियम Na

पाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात. अश्या अठरा अन्नद्रव्याशिवाय पीकांची वाढ पूर्ण होत नाही.
माती परीक्षणचा उद्देश

१) मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.

२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट ,हिरवळीचे खत ,गाडूळ खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते.
३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामूPH , विधुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 ,सेंद्रिय कर्ब OC,नत्रN, स्फुरदP, पालाशK, कॉपरCu, फेरस(आयर्न)Fe, झिंकZn, मॅगनीज्Mn, कॅल्शियमCa, मॅग्निशियमMg, सल्फर S, सोडियम Na यासाठी परीक्षण केले जाते .
४) जमीन कोणते पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते समजते .
५) विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या वाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो .
मातीचा नमुना घेण्याची पध्दती

१) जमिनीचा रंग ,चढ -उतार ,खोली ,खडकाळ किंवा पाणथळ ठिकाणे निच-याची परिस्थिती तसेच क्षारयुक्त किंवा चोपण जागा इत्यादी बाबीचा विचार करून शेताचे निरनिराळॆ विभाग पाडावेत आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्रपणॆ प्रतिनिधीक नमूना घ्यावा .

२) मातीचा नमूना हा त्या शेतातील प्रतिनिधीक नमूना असावा .कारण आपण शेतातून फक्त अर्धा ते एक किलो माती परिक्षणासाठी वापरतो .प्रतिनिधीक नमूना शेतातील ८-१० वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा करावा .
३) नमूना घेताना फक्त लाकडी साहित्य आणि प्लास्टिक घमेले किंवा पोते वापरावे. शेतीचे समान ९ भाग करायचे. प्रत्येक भागातील मध्यावर १x१x१ फुटाचा खड्डा घ्यायचा. नंतर हाताने बाजूची माती खाली पाडून ५०० ग्रॅम पर्यंत नमुना घ्या. (हि पद्धत कटाक्षाने पाळा)
४) शेतक-याचे नाव, सर्वे नंबर बागायती /कोरडवाहू
अ) जमिनीचा प्रकार :(हलकी / मध्यम / भारी )
ब) चूनखडीचे प्रमाण (कमी /मध्यम /जास्त )
क) चिकन मातीचे प्रमाण : (कमी /मध्यम /जास्त )
जमीनीची निचरा शक्ती
जमीनीची खोली
ओलिताचे साधन
नमूना घेतल्याची तारीख

मागील हंगामात घेतलेली पिके, त्यांचे उत्पादन ,वापर्लेली खते ,त्यांचे प्रमाण पुढील हंगामात घ्यावयाची पिके ,त्यांचे वाण व अपेक्षीत उत्पादन.


इतकी माहिती नमुण्यासोबत लिहून जवळच्या कृषि विभागातील कर्मचाऱ्यांकडे किंवा माझीशेती शेतकरी सुविधा केंद्र मध्ये जमा करून तपासणी अहवाल घ्यावा.

No comments:

Post a Comment