Sunday, February 9, 2020

पिकावरील सुत्रकृमीचे एकात्मिक व्यवस्थापन - भागवत इंगोले


सुत्रकृमी (Nematode) हा धाग्यासारखा लांबट आकाराचा परजीवी सुक्ष्मजीव आहे. सरासरी १ मिमि. लांब असतो. तो जमिनित झाडावर किंवा झाडाच्या अंतर्गत भागात राहुन बुडाचे नुकसान करतो. तो डोळयांनी दिसत नाही. सुत्रकृमीच्या काही प्रजाती मुळांवर गाठी तयार करतात. तर काहींमुळे मुळांमध्ये तसेच मुळांवर छिद्र पडतात किंवा तयार होतात. त्यामुळे पिकांना मुळाकडून पाणी व अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा यावर विपरीत परणिाम होतो. पिकांवर दिसुन येणा-या लक्षणावरुन ब-याच वेळा त्याच्या प्रादुर्भावाची निंश्चिती करता येत नाही. त्यामुळे पिकांच्या होणा-या नुकसानीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अलीकडे सुत्रकृमीचा भाजीपाला, द्राक्षे, संत्रावर्गीय पिके इत्यादीवर मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसुन येत आहे. पृथ्वी तलावावर सुत्रकृमीच्या ५ लाखांवर जाती अस्तित्वात असाव्या असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सुत्रकृमीच्या सर्व जातीमध्ये काही जाती पिकांना तर काही जाती प्राण्यांना उपद्रव पोहोचवतात. एकुण सुत्रकृमीच्या जातीपैकी सुमारे ७०० जाती भारतात आढळतात व त्यातील ७५ सुत्रकृमीच्या जाती महाराष्ट्रात आढळतात. व त्या वेगवेगळया पिकावर उपजिविका करतात. सन १७४३ मध्ये निधम या अमेरिकन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गव्हावर उपद्रव करणा-या सुत्रकृमीचा Wheat Seed gall nematode शोध लावलाया सुत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे गव्हाची वाढ खुटंते. फुटव्याचे प्रमाण घटते. पीक लवकर फुलो-यात येते व दाणे काळे पडतात किंवा पोकळे राहतात.


सुत्रकृमीचे व्यवस्थापण:- सुत्रकृमी हा उघडया डोळयांना न दिसणारा अतिसुक्ष्म प्राणी असल्यामुळे त्याचे नियंत्रण करणे खुप अवघड जाते परंतु सुनियोजित व्यवस्थापण करुन सुत्रकृमीची संख्या अर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे शक्य होते. सुत्रकृमीच्या व्यवस्थापणात खालील नियंत्रण पद्धतीचा समावेश होतो.
पारंपारीक पद्धतीः- हया पद्धती अत्यंत कमी खर्चीक असुन शेतामध्ये राबविण्यास अत्यंत सोप्या असतात. या पारंपारीक पद्धतीचा वापर सतत वर्षानुवर्षे केला तर सुत्रकृमीचे चांगले नियंत्रण मिळु शकते.
पिकांची फेरपालटः- सुत्रकृमी हया काही विशिष्ट पिकांवरच आपली उपजिविका करतात. अशा वेळी त्यांच्या यजमान पिकांची लागवड न करता त्या ठिकाणी दुसरी पिके घेतली जातात. तर सुत्रकृमीच्या वाढीवर आळा बसतो. उदा. पाश्चिमात्य देशात बटाटा पिकावरील कवचधारी सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी बटाटा पीक घेतल्यानंतर त्या शेतामध्ये ५ते ६ वर्षे दुसरी पिके उदा. वाटाणा, फुलकोबी, पानकोबी, गाजर इत्यादी पिके घेतली जातात. यामुळे कवचधारी सुत्रकृमीचे नियंत्रण होण्यास मदत होते.
पेरणीच्या वेळेत बदलः- पेरणीच्या वेळेत बदल करुन सुत्रकृमीचा प्रादुर्भाव टाळता येतो, बहुतांशी सुत्रकृमीच्या  जाती हया उन्हाळी हंगामापेक्षा कमी तापमान असलेल्या हिवाळी हंगामामध्ये प्रजननाच्या दृष्टीने कमी कार्यक्षम असतात। म्हणुन रब्बी हंगामामध्ये पेरणीच्या वेळेत बदल केल्यास सुत्रकृमीच्या प्रादुर्भाव कमी होतो. उदा. हरभरा व जवस पिकांची पेरणी जास्त तापमान असणा-या आùक्टोबर महिन्यात न करता नोव्हेंबरच्या दुस-याआठवडयात केलयास पिकांची  वाढ चांगली होते व सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होतो.

सापळा पिकेः (Trap Crop):- सापळा पिके म्हणजे सुत्रकृमीस जास्त आकृष्ट करणारी परंतु कमी उपयोगी  असणा-या पिकांना सापळा पिके असे म्हणतात. सुत्रकृमी मुख्य पिकापेक्षा सापळा पिकाकडे जास्त आकर्षित होतात त्यामुळे प्रथम तो सापळा पिकांवर हल्ला करतात. असे प्रादुर्भाव सापळा पीक नष्ट केले जाते. त्यामुळे मुख्य पिकाचे आपोआप रक्षण होते. उदा. पिकांच्या मुळावर गाठी तयार करणा-या सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी चवळी हे पीक सापळा पीक म्हणुन घेतले जाते.
प्रतिशत्रु पिके:-
काही पिकांच्या मुळाद्वारे एक प्रकारचा विषारी द्रव पदार्थ बाहेर पडतो. आणि तो सुत्रकृमी नियंत्रणासाठी उपयोगी पडतो. अशा प्रतिशत्रु पिकांची लागवड मुख्य पिकासोबत केल्यास सुत्रकृमीवर नियंत्रण मिळविता येते.
. मोहरीः मोहरी पिकामधील अलील आयसोसायनेट या रसायनामुळे बटाटा या पिकासोबत मोहरीचे पीक घेतल्यास बटाटयावरील कवचधारी सुत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
. झेंडुः झेंडु या पिकामधील अल्फा टरथीनाईल या रसायनामुळे पिकांच्या मुळावर गाठी तयार करणा-या सुत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
. शतावरीः शतावरी या पिकामधील ग्लायकोसाइड व अùस्परùगस अùसिड या रसायनामुळे सुत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
. तीळः तीळ या पिकामधील सुत्रकृमींना विरोधक रसायनांमुळे भेंडी या पिकासोबत तीळ हे पिक घेतल्यास  भेंडी या पिकांच्या मुळावर गाठी करणा-या सुत्रकृमीचे नियंत्रण होते.
. कडुलिंबः कडुलिंब झाडामधील निम्बीडीन व थिओनिमोन या रसायनामुळे अनेक प्रकारच्या सुत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
. क्रोटोलारियाः क्रोटोलारिया या वनस्पतीचे इतर पिकांमध्ये आंतरपीक घेतल्यास राùडेफिलस या सुत्रकृमीचे नियंत्रण मिळु शकते.

जमिनीची मशागतः उन्हाळयामध्ये जमिनीची उभी आडवी नांगरणी केली तर जमिनीमध्ये राहणा-या सृत्रकृमीवर नियंत्रण मिळु शकते.
स्वच्छ व निरोगी बियाणांची निवडः स्वच्छ व सुत्रकृमीविरहीत बियाणांची निवड हा घटकदेखील सुत्रकृमीवर चांगले नियंत्रण मिळवु शकतो.
सुत्रकृमी प्रतिबंधक पिकांच्या जातीचा वापरः- पिकांच्या चांगल्या व दर्जेदार सुत्रकृमी प्रतिबंधक जातीचा वापर केल्यास सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी  व्हायला मदत होते। उद। पंजाब पी।बी। एन। आर -७ ही जात मुळावर गाठी करणा-या सुत्रकृमींना प्रतिबंधक आहे.
कायदयाचा वापर करुन सुत्रकृमीचे नियंत्रणः- सुत्रकृमी प्रसार थांबविण्यासाठी कायदयाचा वापर केला जातो. सुत्रकृमीग्रस्त वनस्पतीची एका प्रदेशातुन दुस-या प्रदेशात वाहतुक करण्यास प्रतिबंधित केले जाते. या प्रकारच्या कायदयाला क़ुरनटाईन कायदा असे म्हणतात. हा कायदा भारतात डिस्ट्रीक्टिव इन्सेक्टन्ड पेस्ट क्ट १९१४ म्हणुन ओळखला जातो. या कायदयान्वये सुत्रकृमीच्या देशांतर्गत प्रसारास प्रतिबंध लागु आहे. उदा. बटाटा पिकावरील कचचधारी सुत्रकृमी हा मुळचा भारतातील नसुन १९६१ साली तो परदेशातुन भारतात आला. तो प्रथम तमिळनाडुया राज्यातील निलगिरी टेकडयावर आढळला. सध्या तो तमिळनाडु या राज्यात निलगिरी टेकडयांवरुन कोठेही बाहेर प्रसारासाठी प्रतिबंधीत आहे.
भौतिक पद्धतीने सुत्रकृमीचे नियंत्रणः- भौतिक पद्धतीमध्ये गरम पाणी, गरम हवा, क्ष-किरण, सुत्रकृमी विरहीत बियाणे यांचा वापर करुन सुत्रकृमीचे नियंत्रण केले जाते.
गरम पाण्याचा वापरः- ही पद्धत मोठया प्रमाणात वापरली जाते. जे सुत्रकृमी बियाणे, कंद, मनुवे पिकांच्या मुळयांवर प्रादुर्भाव करतात. त्या सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर आहे. उदा. केळीवरील रोडोफिलस सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी केळीचे मनुवे ५५ अंश सेल्सिअस उष्ण पाण्यामध्ये २० मिनीटे बुडविली जातात. तसेच लिंबुवर्गीय पिकावरील सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लिंबुवर्गीय मुळांच्या काडया ४५ अंश सेल्सिअस उष्ण पाण्यामध्ये २५ मिनीटे ठेवाव्यात.
यजमान पिकेः- टोमाटो, वांगी, मिरची, इत्यादी.
फेरपालटीची पिकेः ज्वारी मका गहु बाजरी ऊस यांसारखी एकदल वर्गातील पिके फेरपालटीचे पिके म्हणुन घ्यावीत. सुत्रकृमी विरोधक जशी मोहरी तीळ कांदा लसुण झेंडु यांसारखी आंतरपिके म्हणुन घ्यावीत.

सेंद्रीय खतांचा वापरः-. शेणखत कंपोष्ट खत, गांडुळखत, निंबोळी पेंड, करंज पेंड, इत्यादीपैकी कोणत्याही सेंद्रीय खताचा वापर १ ते २ टन दर हेक्टरी याप्रमाणे जमिनित करावा व जमिनीत खत चांगले मिसळुन घ्यावे.
प्लाष्टीक कागदाचा वापरः- रोपवाटीकेत मे महिन्यामध्ये फळझाडे व भाजीपाला कलमे किंवा रोपे तयारकरण्यापुर्वी जमिनीवर ३ते ४ आठवडे पारदर्शक प्लाष्टीक कागदाचा आच्छादन म्हणुन वापर करावा. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढेल व सुत्रकृमी मरुन जातील.
जैविक नियंत्रणः- पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा ही परोपजीवी बुरशीजन्य पावडर २.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे १०० किलो ओल्या शेणखतात मिसळुन जमिनीत मिसळावी  किंवा एक किलो बियाण्यास ५ ग्राम पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा परोपजीवी बुरशी जन्य पावडरची बीजप्रक्रीय करावी. पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा ही परोपजीवी बुरशीजन्य पावडर ५ ग्राम प्रति लीटर पाण्यात मिसळुन प्रत्येक झाडाला आळवणी पद्धतीने द्यावी.

हिरवळीचे खतः- हिरवळीचे खत म्हणुन ताग, धैंचा इत्यादींचा लागवड करावी.
बीजप्रक्रीयाः- कारली व भोपळा यांच्या बियाण्यास प्रति किलो १२ ग्राम कार्बोसाल्फुरोन या प्रमाणात बीजप्रक्रीया करुन सावलीत वाळवुन लागवडीसाठी वापर करावा.
सुत्रकृमी प्रतिबंधक जातीचा वापरः- पिकांच्या मुळावर गाठी तयार करणा-या सुत्रकृमीला प्रतिबंध करणा-या पिकांच्या खालील प्रतिबंधक जातींचा वापर करावा। टोमाटो, पंजाब पी.बी. एन.आर. -७ हिसार ललित, मंगला हायब्रीड कर्नाटक हायब्रीड  वांगी-ब्लाक ब्युटी बनारस जाएंट, म्हैसुर ग्रीन पुसा पर्पल लाँग, मिरची- पुसा ज्वाला, ज्वाला,  मुग-एम. एल. ८० तंबाखु-एन. सी. ४५
रसायनांचा वापरः-. भाजीपाला व फळझाडे यांची लागवड झाल्यावर कार्बोल्फुरोन दाणेदार ३ किंवा फोरेट दाणेदार १० हेक्टरी अनुक्रमे ६५ आणि २० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनित मिसळावे. द्राक्षे व डाळींब या फळ झाडांचा बहार धरताना ऑक्टोबरमध्ये छाटणीनंतर जमिनीत हेक्टरी १.५ ते २ टन निंबोळी पेंड मिसळावी किंवा कार्बोफयुराùन दाणेदार ३ किटकनाशक १३५ किलो किंवा दाणेदार फोरेट १० कीटकनाशक ४० किलो प्रति हेक्टरी जमिनीत मिसळुन पाणी द्यावे.
लिंबुवर्गीय पिकावरील सुत्रकृमीचे व्यवस्थापनः-
सुत्रकृमी प्रतिबंधक उपायः- लिंबुवर्गीय पिकांची रोपवाटीका तयार करताना ती लिंबुवर्गीय फळझाडाच्या बागेच्या किंवा पुर्वी घेतलेल्या लिंबुवर्गीय बागेशेजारी असु नये.
बीजप्रक्रीयाः रोपवाटीकेमध्ये कार्बोल्फुरोन ३ दोणेदार किटकनाशक प्रति चौरस मीटर जागेसाठी १० ग्राम या प्रमाणात वापरावे. रोपांची मुळे ४५ अंश सेल्सीअस तापमान असलेल्या गरम पाण्यात २५ मिनीटे बुडवुन लागवड करावी.
सेंद्रीय खतांचा वापरः निंबोडी पेंड, करंज पेंड इत्यादीपैकी कोणत्याही सेंद्रीय खताचा वापर १ते २ टन दर हेक्टरी याप्रमाणे जमिनित करावा, व जमिनीत चांगले मिसळुन घ्यावे.
फेरपालटीची पिके:- फेरपालटीची पिके म्हणुन यजमान नसलेली पिके घ्यावीत उदा। गहु, मका, वटाणा, गाजर, फुलकोबी, पत्ताकोबी, इत्यादी.
रसायनांचा वापरः- पिकांची लागवड झाल्यावर किंवा लागवडीपुर्वी सुत्रकृमींचा प्रादुर्भावानुसार कार्बोल्फुरोन ३ दोणेदार ६५ ते १२० किलो प्रति हेक्टरी किंवा फोरेट १० दाणेदार २० ते ४० किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे जमिनीत मिसळावे.
सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापरः बटाटा या पिकामध्ये कुफरी सुवर्णा व कुफरी थेनमलाई या जाती कवचधारी सुत्रकृमीसाठी प्रतिकारक्षम आहेत.
सुत्रकृमीचे कायदेशीर नियंत्रणः कवचधारी सुत्रकृमी हा तमिळनाडु या राज्यात निलगिरी टेकडयावर आढळतो सध्या तो तमिळनाडु या राज्यात निलगिरी टेकडयावरुन बाहेरील प्रदेशासाठी प्रतिबंधित आहे.

भाताच्या मुळावरील सुत्रकृमीचे व्यवस्थापणः-
जमिनीची मशागतः उन्हाळयात जमिनीची आडवी उभी खोलवर नांगरणी करावी.
यजमान पीकः भात
फेरपालटीची पिकेः फेरपालटीची पिके म्हणुन भुईमुग, ज्युट, गहु आणि बटाटा इत्यादी.
सेंद्रीय खतांचा वापर:- लाकडाचा भुसा, गांडुळखत, निंबोळी पेंड, करंज पेंड इत्यादीपैकी कोणत्याही एका सेंद्रीया खताचा वापर करावा.
बीजप्रक्रीयाः- भात रोपांची पुनर्लागवड करत असताना भात रोपाची मुळे १२ तासांपर्यंत फ्हास्पोमीडॉन .२ द्रावणामध्ये बुडवावीत नंतरच ती पुनर्लागवडीसाठी वापरावीत.
रसायनांचा वापरः शेतात भात रोपांच्या लागणीपुर्वी एकदा आणि लागणीनंतर १५ आणि ४५ दिवसांनी २ वेळा कार्बोफयुराùन ३ दाणेदार ६५ किलो किंवा फोरेट १० दाणेदार २० किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
मुळावर चटटे पाडणा-या सुत्रकृमीचे व्यवस्थापण जमिनीची मशागत उन्हाळयात जमिनीची आडवी-उभी नांगरणी करावी, शेत स्वच्छ ठेवावे रोपवाटीकेत तण वाढु देऊ नये.
यजमान पिकेः कॉफी, लिंबु, केळी इत्यादी।
फेरपालटीची पिकेः फेरपालटीची पिके व मिश्रीत म्हणुन झेंडु या पिकाची निवड करावी.
रसायनांचा वापरः शेतात कार्बोफुरोन ३ दाणेदार ३५ ते ६५ किलो किंवा फोरेट १० दाणेदार १० ते २० किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापरः कॉफी या पिकामध्ये रोबुस्टा हा सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा अरेबिका जातीच्या खुंटावर कलम करुन वापर केल्यास या सुत्रकृमीचे नियंत्रण मिळु शकते.
गव्हाच्या लोंब्यातील सुत्रकृमीचे व्यवस्थापणः- या सुत्रकृमीच्या प्रसारास गव्हाच्या सुत्रकृमीग्रस्त बियाणे कारणीभुत असते. पेरणीपुर्वी गव्हाचे बी निवडुन घ्यावे  निवडलेले बी १० मिठाच्या द्रावणात प्रक्रीया करुन तरंगणारे बी बाजुला काढावे व जड व चांगले बियाणे लागवडीसाठी वापरावे. मिठाच्या द्रावणात प्रक्रिया केलेले बियाणे ४ ते ६ तास थंड पाण्यात भिजवावे. त्यानंतर त्या बियाणास उष्ण पाण्याची ५४ अंश सेल्सीअस तापमानास १० मिनीटे प्रक्रीया करावी व नंतरच ते बियाणे पेरणीसाठी  वापरावे.
खोड व कंदावरील सुत्रकृमीचे व्यवस्थापणः-
बीजप्रक्रीयाः या सुत्रकृमीच्या प्रसारास गव्हाच्या सुत्रकृमीग्रस्त बियाणे कारणीभुत असते. पेरणीपुर्वी गव्हाचे बी निवडुन घ्यावे. निवडलेले बी १० मिठाच्या द्रावणात प्रक्रीया करुन तरंगणारे बी बाजुला काढावे व जड व चांगले बियाणे लागवडीसाठी वापरावे. मिठाच्या द्रावणात प्रक्रीया केलेले बियाणे  ४ ते ६ तास थंड पाण्यात भिजवावे. त्यानंतर त्या बियाण्यास उष्ण पाण्याची ५४ अंश सेल्सीअस तापमानास १० मिनीटे प्रक्रीया करावी व नंतरच ते बियाणे पेरणीसाठी वापरावे.
खोड व कांदावरील सुत्रकृमीचे व्यसस्थापनः- उन्हाळयामध्ये जमिनीतील पुर्वीच्या भात पिकांचे अवशेष जाळुन नष्ट करावेत. त्यामुळे त्या अवशेषावर असलेल्या सुत्रकृमी मारले जातील।उन्हाळयात जमिनीची आडवी उभी खोलवर नांगरणी केल्यामुळे खोड सुत्रकृमी उन्हामध्ये उघडे पडतील आणि त्यांच्य संख्येत घट होण्यास मदत होईल.
यजमान पिकेः भात, कांदा, लसुण इत्यादी.
आंतरपीकेः- आंतरपीक म्हणुन भात पिकाबरोबर जुट किंवा मोहरीची लागवड करावी.
रसायनांचा वापरः- भात पीक लागणीपुर्वी शेतात कार्बोफयुरान दाणेदार ३ ६० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनीत मिसळावी.
पानावरील सुत्रकृमी व्यवस्थापणः- जमिनीची मशागतः उन्हाळयामध्ये पुर्वीच्या पिकांचे अवशेष, तण जाळुण नष्ट करावेत त्यामुळे त्यावर असलेले सुत्रकृमी मारले जातात.
यजमान पिकेः भात, स्ट्राबेरी इत्यादी.
बीजप्रक्रीया:- भात बियाण्यास ५२ ते ५५ अंश सेल्सीअस तापमानास गरम पाण्यामध्ये १५ मिनीटापर्यंत बीजप्रक्रीया करावी.
सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापरः- सेन्चुरी ५२ सेन्चुरी पटना, चिनुर निरा व गौमात्री हया भाताच्या सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा।रसायनांचा वापर स्ट्राबेरी या पिकांवर पेरथिओन ५० प्रवाही ०.०३ तीव्रतेचे कीटकनाशक फवारावे.
सारांश:- सुत्रकृमी ही कीड जमिनीत राहुन मुळावर उपजिविका करते तसेच पिकांच्या जमिनीच्या वरील भागावरदेखील प्रादुर्भाव करते. सुत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे दिसणारी लक्षणे आणि विषाणु व जिवाणु या सुक्ष्मजंतुमुळे होणा-या रोगांची लक्षणे तसेच पिकांना दिली जाणारी सुक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे यांच्यामध्ये फारसा फरक आढळत नाही. त्यामुळे सुत्रकृमीवर सहजासहजी नियंत्रण मिळवणे फार आवघड जाते. सुत्रकृमी हे प्रत्यक्ष नुकसान करतातच परंतु पिकांवर त्यांनी केलेल्या जखमेतुन इतर विषाणुजन्य, जिवाणुजन्य आणि बुरशीजन्य रोगजंतुचा शिरकाव होतो. आणि हे पिकांसाठी खुपच घातक ठरते. मशागत पद्धत, भौतिक पद्धत, रासायनिक पद्धत जैविक पद्धत व कायदेविषयक पद्धत तसेच सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांचा वापर करुन सध्या सुत्रकृमीचे नियंत्रण करणे शक्य झाले आहे. सुत्रकृमी हा अत्यंत सुक्ष्म प्राणी आहे. तो उघडया डोळयांनी दिसत नाही. यामुळे सुत्रकृमीविषयी शेतक-यामध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. सुत्रकृमी नियंत्रणासाठी पिकांच्या सुत्रकृमी प्रतिकारक्षम वाणांची निर्मिती सुत्रकृमीनाशकांचा वापर योग्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर नैसर्गिक घटकांचा पुरेपुर वापर योग्य पीक पद्धतीने नियोजन यांच्यावर जास्त भर देणे गरजेचे आहे.

संकलन
श्री। भागवत म. इंगोले
सहाय्यक प्राध्यापक(वनस्पती वकिृती शास्त्र)
सी. एस. एम. एस. एस. कृषि महावद्यिालय,
काचंनवाडी, औरंगाबाद
मो। न। ८३०८५३८७१

No comments:

Post a Comment