विद्यार्थी

विद्यार्थी विकास उपक्रम 
  या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना करिअर विकास करण्याच्या उद्देशाने पुढील गुण विकसित केले जातात. याशिवाय सहभागी विद्यार्थ्यांना रु. १००० प्रति महिना विद्यावेतन दिले जाते.
  • व्यक्तिमत्व विकास - नेतृत्वगुण, व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य
  • व्यवस्थापन विकास - अनुकुलन, सामाजिक बांधिलकी, मनुष्यबळ व्यवस्थापन
  • तंत्रज्ञान जाणीव जागृती - डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता, आंतरराष्ट्रीय स्तिथी
  • व्यवसाय नियोजन - गट व्यवस्थापन, भागीदारी, शोध आणि सर्जनशीलता
  • नोकरी व प्लेसमेंट सुविधा
  किमान पात्रता 
  • महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील वयाची १८ वर्षे पुर्ण असलेली व्यक्ती 
  • शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीची  
  • एकल पालक (विधवा स्त्री किंवा विधुर पुरुष) यांचे पाल्य
  • दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्य 
  • वरीलप्रमाणे सदस्य उपलब्ध न झाल्यास साधारण गटातील व्यक्ती निवड केली जाईल. 


  सहभागी होण्यापुर्वी मार्गदर्शक सुचना व पत्राचा नमुना या दोन्ही पत्राची प्रिंट काढा. नमुन्याप्रमाणे कॉलेजचे पत्र लेटर हेडवर घ्या आणि ते स्कॅन करून अर्जासोबत पाठवा आणि हार्ड कॉपी तुमच्यासोबत ठेवा. क्षेत्र भेटीवेळी मागणीनुसार द्यावे लागते. याकरिता लोकवर्गणी रु. ०१ प्रतिदिन लागू आहे.
  प्रत्यक्ष भेट अथवा ऑनलाइन संपर्काद्वारे नोंदणी प्रक्रिया पुर्ण केली जाईल.