Translate (Trial Version)

Monday, October 28, 2024

आले / अद्रक लागणी ते काढणी आणि नंतर प्रक्रिया, लावण्यापूर्वी संपुर्ण माहितीसाठी एकदा पहा.

हवामान : 
आल्यास उष्ण व दमट हवामान मानवते, पण जेथे ओलीताची सोय आहे अशा उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड यशस्वी करता येते. समुद्रसपाटीपासून ते १५०० मीटर उंचीपर्यनच्या प्रदेशात आले चांगले येऊ शकते. 

तापमानाचा विचार करता आले लागवडीच्या कालावधीतील एप्रिल - मे ३० डी. ते ३५ डी. से. तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होण्यासाठी उत्तम असते. आल्याच्या वाढीसाठी सरासरी २० डी. ते ३० डी. से. तापमानाची आवश्यकाटा असते. थंडीच्या दिवसातील कोरडे व थंड हवामान जमिनीतील कंद उत्तम प्रकारे पोसण्यासाठी अनुकूल असते. या पिकास लागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी १५० ते ३८० सें. मी. पाऊस पुरेसा ठरतो. जास्त पावसाच्या प्रदेशात विशेषत: कोकणात हे पीक पावसाच्या पाण्यावरही घेतले जाते. परंतु जमिनीमध्ये पाणी साठून राहिल्यास याचे कंद कुजण्यास सुरुवात होते, म्हणून जास्त पावसाच्या प्रदेशात पाण्याचा उत्तम निचरा होणे आवश्यक आहे. साधारणत: २५% सावलीच्या ठिकाणी आल्याचे पीक उत्तम येते. परंतु आल्याच्या पिकास दिवसाचा सुर्यप्रकाश जास्त मिळाल्यास आल्याचा सुवास कमी होतो, असे प्रयोगांती आढळून आले आहे. 

जमीन : 
आल्यास चांगली निचरा होणारी मध्यम प्रतीची भुसभुशीत, कसदार जमीन मानवते. नदीकाठची गाळाची जमीनदेखील कंद वाढण्याच्या दृष्टीने योग्य आहे. हलक्या जमिनीत भरपूर शेणखत व कंपोस्ट खत घातल्यास तसेच हिरवळीच्या खताचे पीक घेतल्यास हे पीक चांगले येते. आले लागवडीसाठी जमिनीची खोली कमीत - कमी ३० सें.मी. असावी. या पिकाच्या लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्यतो टाळाव्यात. कोकणातील जांभ्या खडकापासून तयार झालेल्या जमिनीत तसेच तांबड्या पोयाट्याच्या जमिनीत या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. या पिकासाठी किंचीत आम्लयुक्त सामू असलेली जमिन (सामू ६.५ ते ७) मानवते. कंदवर्गीय पीक असल्यामुळे कंदाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीत हवा खेळती राहणे गरजेचे असते. चुनखडक असलेला जमिनीत पीक चांगले येते, परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. जमीन निवडताना त्यामध्ये लव्हाळा, हराळी, कुंदा इत्यादींसारखा बहुवार्षिक तणांचा प्रादुर्भाव नसावा.

जाती : 
आले हे जमिनीत वाढणारे खोड असून त्यावर प्रक्रिया करून ते वापरले जाते.

  • सुंठनिर्मितीसाठी आले : करक्कल, नादिया, नरन, वैनाड, मननतोडी, वाल्लुवानाद, एरनाड,कुरूप्पमपाड, रिओ - डी -जानिरिओ, चायना, वैनाड स्थानिक, ताफेन्जिया.
  • बाष्पशील असलेल्या तेलाचे जास्त प्रमाण असणार्‍या जाती : स्लिवा स्थानिक, नरसापटलाम, एरनाड, चेरनाड, हिमाचल प्रदेश.
  • जास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूप्पमपाडी, रिओ - डी - जानिरिओ. 
  • तंतूचे प्रमाण कमी असणार्‍या जाती : जमैका, बँकॉक, चायना. 

आल्यामध्ये प्रचलित अशा प्रमुख जाती मुख्यत: ज्या भागात ते पिकवले जाते, त्या भागाच्या नावावरून ते ओळखले जाते. उदा. 
  • आसाम : थिंगपुई, जोरहाट, नादिया, थायलंडीयम मरान. 
  • वेस्ट बेंगॉल : बुर्डवान. 
  • केरळ : वैनाड स्थानिक, वायनाड, मननतोडी, एरनाड, थोडूपुझा, कुरूप्पमपाडी. 
  • कर्नाटक : करक्क्ल. 
  • आंध्रप्रदेश : नरसपटलम 
  • महाराष्ट्र : माहीम, स्थानिक, या नावाने ओळखले जाणारे आले घेण्यात येते. 
काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओडी जानरो, चायना, जमेका या जातींचा समावेश होतो. यापैकी प्रमुख जातींची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. 

१ ) वरदा : ही जात भारतीय मसाला पिकाचे संशोधन केंद्र, कालिकत येथून १९९६ साली प्रसारित केली आहे. ही जात तयार होण्यास २०० दिवस लागतात.या जाती प्रति हेक्टरी २२.३ टन उत्पादन मिळते. या जातीमध्ये तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० % आढळते. या जातीस सरासरी ९ ते १० फुटवे येतात. ही जात रोग व किडीस सहनशील आहे. सुंठेचे प्रमाण या जातीमध्ये २०.०७% आढळते. 

२) महिमा : ही जात सुध्दा कालिकत येथील संशोधन केंद्रातून २००१ साली विकसित करून, प्रसारीत केली आहे. याही जातीला तयार होण्यास २०० दिवस लागतात. या जातीपासून सरासरी प्रती हेक्टरी २३.२ टन उत्पादन मिळते. या जातीमध्ये तंतुचे प्रमाण ३.२६ % असते.

या जातीस सरासरी १२ ते १३ फुटवे येतात. हि जात सुत्रकृमीस प्रतिकारक आहे. सुंठेचे प्रमाण १९ % आढळते.

३) रीजाथा : ही जात मसाला पिकाचे संशोधन केंद्र, कालिकत येथून २००१ साली प्रसारीत केली आहे. या जातीमध्ये तंतुचे प्रमाण ४% असून सुगंधी द्रव्याचे प्रमाण सर्वात जास्त २.३६% आहे.
ही जात तयार होण्यास २०० दिवस लागतात, तर सरासरी उत्पन्न प्रति हेक्टरी २२.४ टन मिळते. या जातीस ८ ते ९ फुटवे येतात. या जातीमध्ये सुंठेचे प्रमाण २३% आहे.

४) माहीम : ही जात महाराष्ट्रामध्ये प्रचलित असून बहुतेक सर्व जिल्ह्यामध्ये ही जात लागवडीस योग्य आहे. ही जात मध्यम उंचीची, सरळ वाढणारी आहे. या जातीस ६ ते १२ फुटवे येतात . ही जात तयार होण्यास २१० दिवस लागतात. तर हेक्टरी सरासरी उत्पादन २० टन मिळते. या जातीमध्ये सुंठेचे प्रमाण १८.७% आहे. 

आल्याच्या सुधारीत जाती :

१) सुप्रभा : ही जात कुंडली स्थानिक या जातीमधून निवडली आहे. या जातीच्या झाडाला भरपूर फुटवे असतात. गड्डे जाड असतात आणि त्यांची टोके गोलाकार असतात. साल चमकदार करड्या रंगाची असते. तंतू ४.४%, सुगंधी तेल १.९% व ओली ओरेझीन ८.९% असते. हिरव्या आल्यासाठी व सुंठीसाठी ही योग्य जात आहे. प्रति हेक्टरी ३.४० टन उत्पादन मिळते.

२) सुरुची : ही जात कुंडली स्थानिक या जातीमधून निवडली आहे. गड्डे हिरवट पिवळ्या रंगाचे असतात. ओरेझीन १० % असते. प्रती हेक्टरी २.२७ टन उत्पादन मिळते.

3) सुरभी : स्थानिक जातीचे कंदावर 'एक्सरे' ची प्रक्रिया करून ही जात निवडलेली आहे. गड्ड्यांचा आकार सिलेंडर सारखा असतो. साला गर्द चमकदार असते. भरपूर फुटवे असतात. तंतू ४%, तेल २.१% असते. प्रति हेक्टरी उत्पादन ४ टन मिळते.

वरील सुधारीत जाती मिळण्याचा पत्ता : Director central Plantaiton Crops Research Institute, Post Kudly, Kasaragod (Kerala).

पुर्वमशागत : आल्यासाठी १ फुटापर्यंत खोल उभी व आडवी नांगरट करून १ ते २ कुळवाच्या पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.

आल्याचे पीक जमिनीत १८ महिन्यापर्यंत राहू शकत असल्यामुळे आणि या पिकास लागणार्‍या भुसभुशीत जमिनीमुळे जमीनीच चांगली पूर्व मशागत करणे गरजेचे आहे. शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे, तसेच जमीनतील बहुवार्षिक तणांचे कंद, काश्या वेचून गोळा कराव्यात. मोठे दगड - गोटे वेचून काढावेत. 

आले लागवडीच्या पद्धती : जमिनीच्या प्रकारानुसार तसेच स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार आले लागवडीची पद्धत वापरावी. या पिकाची लागवड प्रामुख्याने सपाट वाफे, सारी वरंबा पद्धत आणि रुंद वरंबा किंवा गादी वाफ्यावर केली जाते.

१) सपाट वाफे पद्धत : पठारावरील सपाट जमिनीवरती जेथे पोयटा किंवा वाळू मिश्रीत जमीन आहे. अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करतात. त्यासाठी जमिनीच्या उतारानुसार २ x १ मी. किंवा २ x ३ मी. चे सपाट वाफे तयार करून घ्यावेत. सपाट वाफ्यामध्ये आल्याची लागवड २० x २० सें. मी. किंवा २२.५ x २२.५ सें. मी. अंतरावरती करावी की, जेणेकरून प्रति हेक्टरी रोपांची संख्या दोन लाखाच्या दरम्यान राहील.

२) सरी वरंबा पद्धत : मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी. या पध्दतीमध्ये लाकडी नांगराच्या सहाय्याने ४५ सें.मी. वरती सर्‍या पाडून घ्याव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून २ इंच खोल आल्याची लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.

३) रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत : महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीत किंवा आधुनिक सिंचन पद्धत जसे तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर केला जातो, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करणे फायदेशीर ठरते. वरील पद्धतीपेक्षा या पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २०% उत्पादन जास्तीचे मिळते. जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गाडी वाफ्याची) लांबी ठेवावी. १३५ सें.मी. वरती सारी पाडून घ्यावी, म्हणजे मधील वरंबा ९० सें.मी. रुंदीचा होईल. दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ४५ सें.मी. सोडावी. या रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवून त्याच्यावरती २२.५ x २२.५ सें.मी. वरती लागवड करावी.

लागवडीचा हंगाम आणि लागवडीची वेळ : ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार आल्याची लागवड १४ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. त्यानंतर मात्र आल्याची लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येतो.

सातारा जिल्ह्यात शेतकरी आल्याची लागवड साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यात करतात. अहमदनगर जिल्ह्यात मे चा दुसरा आठवडा लागवडीसाठी योग्य असल्याचे प्रयोगाअंती दिसून आले आहे. आले उगवणीसाठी उष्ण हवा, वाढीसाठी उष्ण व दमत हवा लागत असल्याने पावसानंतर कीड जास्त पडत असल्याने आल्याचे पीक पावसाअगोदर उगवून स्थिर होईल अशा दृष्टीने लागण केली जाते.

लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत. बियाणे निवडतान कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. तसेच लांबी २.५ ते ५ सें.मी. असावी. बियाणे सुप्तावस्थ संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे. लागवडीसाठी २५ क्विंटल / हेक्टरी आले बियाणे लागते. लागवडीच्या वेळेपर्यंत या बियाण्याच्या वजनात घट होवून साठवणुकीच्या पध्दतीनुसार त्याचे वजन १५ ते १८ क्विंटल भरते. आल्याची लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजुला असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो आणि त्याची वाढही चांगली होते. याउलट जर डोळा खाली आणि आतल्या बाजुला राहिल्यास डोळा लहान आणि कमकुवत राहतो. कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावे. लागवडीच्यावेळी कंद पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.

बीजप्रक्रिया : जमिनीत लावलेले बेणे सोडू नये, म्हणून बीजप्रक्रिया करावी लागते. मऊसड (सॉफ्ट रॉट). यामुळे बेणे सडण्याचा संभव असतो. त्यासाठी १०० लि. पाण्यामध्ये १ लि. जर्मिनेटर आणि ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट घेऊन त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बेणे बुडवून ठेवावे. नंतर पाणी निथळून ते बेणे लावणीसाठी वापरावे. साधारणपणे बेणे ३० ते ३५ दिवसात उगवते, पण जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे १८ -१९ दिवसात उगवते.

सेंद्रिय खते : मध्यम ते हलक्या जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत वरीलप्रमाणे टाकून कल्पतरू सेंद्रिय खत लागणीपुर्वी एकरी ५० किलोच्या २ ते ३ बॅगा आणी लागणीनंतर २ ते २।। महिन्याने उटाळणीच्यावेळी एकरी ५० किलो आणि त्यानंतर २।। ते ३ महिन्यांनी पुन्हा ५० किलो कल्पतरू खत द्यावे. जमीन भारी असेल तर लागणीपुर्वी २ बॅगा आणि २।। ते ३ महिन्यांनी १ ते २ बॅगा द्याव्यात. त्यानंतर २ ते २।। महिन्याने १ म्हणजे आल्याची वाढ, फणीचे पोषण चांगल्या प्रकारे होऊन आले लागण्याचा प्रादुर्भाव कमी होतो.

तणनाशकाचा वापर : आले पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. शेणखतात तणांचे बी असल्यामुळे आले लागवडीनंतर दुसर्‍या ते तिसर्‍या दिवशी जमीन ओलसर असताना अेट्राझीन हे तणनाशक एक लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ ग्रॅम घेवून फवारणी करावी. त्याचाप्रमाणे लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ग्लायफोसेट १ लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ मिली घेवून फवारणी केल्यास पहिली फवारणी करूनसुध्दा त्यातून उगवलेल्या तणांचा नायनाट होतो.एकदा आले उगवण्यास सुरुवात झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा.

पाणी व्यवस्थापन : आले पिकाची लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती केली जाते, तर कमी पावसाच्या प्रदेशाच्या मात्र पाणी देण्याशिवाय पर्याय राहत नाही. आल्याची लागवड एप्रिल -मे महिन्यात करत असल्यामुळे पावसाची सुरवात होईपर्यंत सुरूवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो, म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसर्‍या - चौथ्या दिवशी लगेच द्यावे. पावसाळ सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसामध्ये १०ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे. हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

आधुनिक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे झाल्यास तुषार सिंचन, ठिबक सिंचन यासारख्या पद्धतींचा अवलंब करावा. गादीवाफा पद्धतीने या पिकाची लागवड करावी, एका गादीवाफ्यावर दोन ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकाव्यात आणि २ लि. / तास एवढेच पाणी देणार्‍या तोट्या बसवाव्यात. जमिनीच्या मगदुरानुसार हा संच सुरुवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ - संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.

आंतरमशागत : तणनाशकांचा वापर केला नसल्यास वेळच्या वेळी चेणारी तणे खुरपणी करून काढून टाकावीत. आले पिकत उटाळणी करणे ही गरजेचे असते. त्यामध्ये लांब दांड्याच्या खुरप्याने माती हलवली जाते. त्यामुळे मुळ्या तुटून त्याठिकाणी नवीन तंतुमयमुळे फुटतात. आले पिकांमध्ये उटाळणी पीक २.५ ते ३ महिन्याचे असताना करावे. या पिकास ६ व्या ते ७ व्या महिन्यात फुले येतात त्यास 'हुरडे बांड' असे म्हणतात. उशीरात उशीरा उटाळणी हुरडे बांड येण्यापूर्वी करावी. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून फण्यांची वाढ होण्यात सुरुवात होते. उटाळणी केली नाही तर उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के घट येते. उटाळणीनंतर पाण्याचा हलका ताण द्यावा, म्हणजे फुटवे चांगले फुटतात.

आंतरपिके : आल्याचे पीक २५ % सावलीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात वाढते. त्यामुळे हे पीक नारळ, सुपारी, कॉफी इत्यादीच्या बागेमध्ये घेतल्यास उत्पादनात वाढ होते.आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू मिरची,,तूर गवार यासारखी पिके घेतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. 

संजीवकांचा वापर : आल्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच आल्यामधील तंतुचे प्रमाण कमी करण्यासाठी २% युरिया आणि ४०० पी. पी. एम. प्लॅनोफिक्सचे मिश्रण लागवडीनंतर ६० आणि ७५ व्या दिवशी फवारावे. तसेच फुटव्यांची संख्य वाढण्यासाठी २०० पी. पी. एम. इथ्रेलची ७५ व्या दिवसापासून १५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.

कीड व रोग नियंत्रण :

१) कंदमाशी : या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. या किडीची माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाया शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अंडी पांढरट रंगाची असतात. अळी पिवळसर असून त्यांना पाय नसतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजिवीका करतात. 

याचे नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागल्यावर माशा मारण्यासाठी क्किनॉलफॉस २५ % प्रवाही २० मि. ली. १०० लिटर पाण्यामध्ये किंवा डायमेथोएट १५ मि. ली. प्रती १० लि. पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान आलटून - पालटून १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. त्यानंतर क्किनॉलफॉस ५ % किंवा फोरेट १० % दाणेदार हेक्टरी २५ किलो याप्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरून टाकावे व पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे. याच किटकनाशकाचे पुढील दोन हप्ते १ महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत. अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीत झाकून घ्यावेत. 

२) पाने गुंडाळणारी अळी : आले पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते.

किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी. 

३) खोड पोखरणारी अळी : ही कीड मुख्यत: जुलै ते ऑक्टोबर या काळामध्ये आढळते. या किडीची अळी छोट्या खोडाला छिद्र करते आणि त्यावर उपजिवीका करते. त्यामुळे खोड पिवळे पडून वाळण्यास सुरुवात होते. अळीने पडलेल्या छिद्रावर जाळीदार भाग दिसतो.

या किडींच्या नियंत्रणासाठी एक महिन्याच्या अंतराने १.५ मिली मॅलेथिऑन प्रति लिटर पाण्यात किंवा १.५ मिली मोनोक्रोटोफॉस याची फवारणी आलटून पालटून करावी.

सुत्रकृमी : काही भागामध्ये आले पिकावर सुत्रकृमीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सुत्रकृमी हे पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच त्यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशीचा सहज शिरकाव होतो. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्यावेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो /हे. शेणखतात मिसळून घ्यावा किंवा फोरेट १० जी हेक्टरी २४ किलो याप्रमाणात द्यावे किंवा १८ ते २० क्विं./ हे. निंबोळी पेंडीचा वापर करावा. 

रोग नियंत्रण : 

१) कंदकूज : आले तसेच कंद वर्गातील पिकांवरील हा एक प्रमुख रोग आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे ५० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त परमाणात दिसून येतो. प्रथम पानांच्या शेंड्यावरून व कडांनी पिवळे पडून झाड खालीपर्यंत वाळले जाते. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाणा वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना, आंतरमशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पिथीयम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंद कुजण्यास सुरुवात होते.

या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवड करताना निरोगी बियाण्याचा वापर करावा. जमिन हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचर्‍याची निवडावी. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेवून पाण्याचा निचरा करून घ्यावा. तसेच मेटॅलॅक्सिल ८ टक्के + मॅकोझेब ६४ टक्के हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेन्डेझिम ( ५० डब्ल्यु. पी.) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा मॅकोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करवी. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून घ्यावा. 

२) पानावरील ठिपके : या रोगाची सुरुवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानावर पसरतो. या रोगामध्ये असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात. रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येवून संपूर्ण पान करपते.

याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५, १० लिटर पाण्यात २५ ते ३० ग्रॅम किंवा बाविस्टीन १० लिटर पाण्यात १० ते १५ ग्रॅम किंवा १ टक्के बोडोंमिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितिनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्या करव्यात. वरील औषधांच्या आलटून- पालटून फवारण्या कराव्यात एकच औषध सतत फवारणीसाठी वापरू नये.

फवारणी : वरील सर्व किडी व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि उत्पादन अधिक व दर्जेदार मिळावे म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (बेणे उगवल्यानंतर २१ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (४५ ते ६० दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ६०० मिली. + क्रॉंपशाईनर ६०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (७५ ते ९० दिवसांनी ) : थ्राईवर ६०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ६०० ते ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौठी फवारणी : (१२० दिवसांनी ): थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १.५ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० ते ६०० मिली + ३०० लि. पाणी.

आल्याची काढणी करेपर्यंत दर महिन्याला फवारणी क्र. ४ प्रमाणे फवारणी करावी. म्हणजे आल्याच्या फण्यांची फुगवण,वाढ चांगली होऊन दर्जात वाढ होते. तसेच आले लागू नये याकरीता दर महिन्याला जर्मिनेटर १ लि. आणि कॉपरऑक्झीक्लोराईड १ किलो + हार्मोनी ५०० मिली प्रति एकरी २००लि. पाण्यातून सोडावे.

हवामानातील फेरबदल, पाणी, खतांचे नियोजन आल्याच्या लागवडीचा हेतू (मार्केट, बेणे, प्रक्रिया उद्योग इत्यादी) लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्र अथवा मुख्य कार्यालयाशी संपर्क करून तज्ज्ञांकडून माहिती घेऊनच सर्व व आवश्यक असल्यास पुढील अधिक अथवा कमी जास्त फवारण्यात घ्याव्यात कारण आले हे पीक साधरण १२ ते १८ महिने जमिनीत राहते.

काढणी आणि उत्पादन : आले पीक ७५ टक्के परिपक्क झाल्यानंतर काढणी केली तरी मार्केटला विक्रीसाठी चालते. हिरवे आले म्हणून वापरावयाचे असल्यास पिकाची काढणी ६ महिन्यांनी करता येते. आल्याची विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागणीनंतर आठ महिन्यानंतर पुढे आल्याची काढणी करावी.

बाजारातील मागणीप्रमाणे आल्याची काढणी करावी. गड्डे बाहेर काढताना त्यांना इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आल्याचा पाला कापून गड्डे. बोटे (नवीन आले) काढणीनंतर वेगळे करावे. काढणीनंतर आल्याचे कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करावेत आणि बाजारात पाठवावे.

प्रति हेक्टरी ओल्या आल्याचे सरासरी उत्पादन १८ ते ३० टनापर्यंत हेते.

द्विहंगामी पीक : उत्तम निचर्‍याची जमीन असेल तर हेच आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून आल्याचे द्विहंगामी पीक घेता येते आणि याचे उत्पन्न पहिल्या वर्षापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दीडपट ते दुप्पट मिळते आल्याची पाने सुकल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी या पिकास पाणी द्यावे.

साधारणत: अडीच ते तीन महिन्यानंतर पुन्हा नवीन फुटवे फुटु लागतात.

आल्याचे बेणे कसे साठवावे. 

आल्याची लागवड बेण्यापासून कंदापासून करतात, कारण बियापासून लागवड करता येत नाही. आल्याचे भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी बेणे निरोगी असावे लागते. सामान्यपणे आल्याची काढणी डिसेंबर महिन्यात होते आणि पुढील हंगामातील लागवड एप्रिल - मे महिन्यात होते. तोपर्यंत म्हणजे ४ ते ५ महिने साठवून ठेवावे लागते. या काळात बेण्यातील बाष्पीभवन होऊन बेणे आकसते आणि बुरशीमुळे सडते. परंतु बेण्याची योग्य पद्धतीने साठवण केल्यास ही समस्या राहत नाही. साठवणुकीत बेण्याचे नुकसान होऊ नये म्हणून निरोगी प्लॉटमधून आल्याचे पुर्ण पक्क झालेले कंद निवडावेत.

बेणे साठवण्याची पद्धत : सामान्यपणे शेतकरी खोलीच्या कोपर्‍यात किंवा छ्प्परात तळाशी वाळूचा पातळ थर देऊन त्यावर बेण्याचा ढीग करतात आणि तो ढीग वाळलेल्या पानांनी झाकतात. काही शेतकरी मोठ्या झाडाच्या सावलीत खड्डा करून त्यात बेणे साठवतात. काही शेतकरी आल्याची काढणी करण्याचे वेळी शेताचा काही भाग काडणी न करताच सोडतात महणजे त्या भागातील आल्याचे कंद काढत नाहीत. पुढील हंगामात लागवडीच्या आधी हे कंद काढून बेण्यासाठी वापरतात. काही शेतकरी बेणे साठविण्यापूर्वी शेणकाल्यात बुडवून काढतात.

बेण्याच्या साठविण्याची पध्दत बेण्याच्या आकारमानाप्रमाणे जमिनीत आवश्यक लांबीचा व रुंदीचा खड्डा खणावा. त्याची खोली मात्र ६० सेंमी ठवावी. ४५ x ४५ x ६० सेंमी आकाराच्या खड्ड्यात २० ते २५ किलो बेणे साठविता येते. खड्ड्याच्या भिंती व तळ शेण व मातीच्या मिश्रणाने सारावाव्यात. त्याप्रमाणे तयार झालेला खड्डा १० ते १५ दिवस वाळू द्यावा.

खड्ड्याच्या तळावर कोरड्या वाळूचा २ सेंमी जाड थर पसरावा. या थरावर बेण्याचा १० सेंमी जाडीचा थर पसरावा. याप्रमाणे बेण्याचा थर व त्यावर वाळूचा थर असे आलटून पालटून खड्ड्यात तळापासून ४५ से ५० सेंमी उंचीपर्यंत थर भरावेत. खड्ड्यावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे. ही फळी व बेण्याचा थर यामध्ये १० सेंमी खोल मोकळी जागा ठेवावी. खड्ड्यातील बेण्याला हवा मिळविण्यासाठी फळीला मधे भोक ठेवावे. खड्ड्यावर वाळलेल्या गवताचे छप्पर तयार करावे. त्यामुळे अकाली पावसापासून बेण्याचे संरक्षण होते.

बेण्याची साठवण : बेण्यासाठी ठेवावयाचे आले काढणीनंतर असणार्‍या जाड मुळ्या तोडून सावलीत हवेशीर ठिकाणी रचून साठवण करावी. परंतु या पद्धतीने वजनामध्ये २५ ते ३० % घट येते. त्यामुळे आले काढल्यानंतर चांगले निवडलेल्या गड्डे बेण्यावर क्किनॉलफॉस २५ ई.सी. २० मि.ली. आणि कार्बेन्डेझिम ५० डब्ल्यू पी. १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेवून त्यात १० ते १५ मीटर बुडवावेत, त्यांनतर ते सावलीत सुकवावे.

अशा प्रकारे प्रक्रिया केलेल्या बियाण्याची साठवण चार खणून किंवा खड्ड्यात केली असता त्याची उगवण क्षमता चांगली राहते. त्यासाठी सावलीत आपल्या बियाण्याच्या गरजेनुसार आवश्यक तेवढ्या लांबी रुंदीचा व एक मीटर खोलीचा खड्डा काढावा.

खड्डा खोदताना त्या जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा खोल आहे. याची खात्री करून घ्यावी. खड्ड्याच्या तळाला व कडेला लाकडाचा भुसा, पालापाचोळा अगर वाळलेले गवत टाकावे. अशा खड्ड्यामध्ये बियाण्याची साठवण करावी. खड्ड्याच्या तोंडावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे व त्यास हवेसाठी छिद्र ठेवावे. खड्ड्यातील आले व फळी यामध्ये अंतर सोडावे की जेणेकरून खड्ड्यात हवा खेळती रहावी. अशाप्रकारे साठविलेल्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहते. पत्र्याची सिमेंट, अगर कौलारू बंद खोली बेणे साठवणीसाठी वापरू नये. अडीच ते तीन महिन्यात आल्याच्या कंदाचे डोळे फुगून बारीक कोंब येतात. असे कोंब आलेले आले बेण्यासाठी वापरावे.

आले कंदाचे सरासरी उत्पन्न १५ ते ३० टन प्रती हेक्टर इतके येते. महराष्ट्रात माहिम या जातीचे चांगले उत्पन्न मिळते.

काढणी केल्यानंतर आले पुढीलप्रमाणे करून साठवणूक करता येते.

१) वाळलेले आले 
२) सुंठ 
३) आल्याची पावडर 

वाळलेले आले किंवा सुंठ तयार करावयास वापरावयाचे आले, पीक परिपक्व झाल्यानंतरच काढणी करावी. ते पुर्ण वाढलेले निरोगी असावे. कुजके, सडलेले अपरिपक्व आले सुंठीसाठी वापरू नये. त्याचाप्रमाणे सुंठीसाठी वापरावयाचे आले अधिक तंतुमय असू नये, सुंठ तयार करण्यासाठी जमेका, चायना, रिओडी जानेरो, माहिम यासारख्या कमी तंतुमय असणार्‍या जातीचा वापर करावा. याच्यापासून उत्तम प्रतिची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो.

वाळलेले आले : वाळलेले आले तयार करण्यासाठी प्रथम आले चांगले स्वच्छ धुवून घ्यावे, ते मुळ विरहित असावे. स्वच्छ पाण्यामध्ये एक रात्रभर भिजवून ठेवावे. दुसर्‍या दिवशी त्याच्यावरील साल बाबुंच्या टोकदार कडाने चिवट्याने खरडून काढावी. परत एकदा स्वच्छ पाण्यात आले धुऊन काढावे. हे साल काढलेले आले ७ ते ८ दिवस उन्हात चांगले वाळवावे. वाळवताना एक ते दीड इंचापेक्षा जाड थर देऊ नये. तसेच आले सुकविणेसाठी स्वच्छ प्लॅस्टिकचा किंवा ताडपत्रीचा वापर करावा. वाळविताना वरचेवर हात घ्यावा. सायंकाळी पसरलेले आले गोळा न करता ताडपत्रीने झाकुन घ्यावे, म्हणजे धुराने काळपट पडणार नाही. आल्यातील पाण्याचा अंश आठ ते दहा टक्क्यापर्यंत कमी आल्यानंतर आले पुर्ण वाळले असे समजावे. पुर्ण वाळल्यानंतर परत एकदा हाताने चोळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेल्या आल्यास वाळवलेले आले किंवा चुन्याची प्रक्रिया न केलेले आले म्हणतात. असे आले थंड आणि कोरड्या जागेत साठवावे. वाळलेल्या आल्याचे उत्पन्न ओल्या आल्याच्या २० ते २५% इतके असते. हे उत्पन्न आल्याच्या वाणानुसार बदलते.

सुंठ तयार करण्याची मलबार पद्धत : या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी प्रथम आले स्वच्छ निवडून ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर त्याची साल काढून घ्यावी. साल काढलेले आले २% चुन्याच्या द्रावणात ६ ते ७ तास भिजत ठेवावे. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्या बंद खोलीत पसरून ठेवताना बंद खोलीत आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी देतात थोडक्यात बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. साधारणत: १ किलो कंदाला ६ ते १० ग्रॅम याप्रमाणात गंधक जाळावे. त्यानंतर कंद बाहेर काढून २% चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत १२ तास गंधकाची धुरी देतात. अशा प्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढरा शुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सुर्यप्रकाशामध्ये पाण्याचा अंश ८ ते १० % राहीपर्यंत वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते.

सुंठ तयार करण्याची सोडा खार मिश्रण पद्धती : या पध्दतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर १.५ x २ फूट आकाराचा हाताने उचलेल इतक्या क्षमतेचा गॅल्वनाईज जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यामध्ये सोडीयम हयाड्राऑक्साईड (कॉस्टीकसोडा) ची २०%, २५% आणि ५०% तिव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणामध्ये कंदाने भरलेला पिंजरा २०% द्रावणामध्ये पाच मिनीटे, २५% द्रावणमध्ये एक मिनीट आणि ५०% द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले ४% सायट्रीक अॅसिडच्या द्रावणात २ तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सुर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. या पध्दतीने तयार केलेल्या सुंठेला बाहेरच्या देशात चांगली मागणी असते. कारण मलबार पध्दतीने तयार केलेल्या सुंठेत कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते.

आल्याची पावडर : चांगले वाळलेले आले घेवून त्याची बारीक पावडर तयार केली जाते. ती पावडर ५० ते ६० मेशच्या चाळीणीमधून चाळून हवा बंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरली जाते. आल्याच्या पावडरीचा मुख्य उपयोग ओलीओरेझीन तसेच तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.

आद्रकाची साल काढण्यासाठी लागणारी उपकरणे: प्रक्रिया करून विविध पदार्थात वापर करण्यासाठी आद्रकाची साल काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आद्रक रात्रभर पाण्यात भिजवून काढल्यानंतर त्याची साल थोडीशी ढिली होते व काढून टाकण्यास फारसे कष्ट पडत नाहीत व त्यासोबत गराचा अंशही खरवडला जात नाही. साल काढण्यासाठी बांबूची धारदार सुरी किंवा स्टेनलेस स्टीलचा चाकू वापरतात. तसेच शिंपले किंवा कोरड्या स्वच्छ खरबडीत कापडासही घासून साल काढतात. यानंतर स्वच्छ धुवून आद्रक ३ ते ४ दिवस कडक उन्हात वाळवितात. वाळलेल्या आद्रकाची पावडर तयार करून विविध पदार्थ तयार करण्यासाठी ती वापरतात.

सौजन्य - डॉ. बावसकर टेक्नॉलॉजी

विहीर घ्यायची आहे? ही थोडक्यात माहिती वाचा.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी काही विशेष सरकारी योजना आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. 

१. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना (Chief Minister's Sustainable Irrigation Scheme):

  • ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान देते. योजना अनुषंगाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी भांडवल मिळते, ज्यामुळे त्यांच्या शेतीत पाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते.

२. पंतप्रधान कृषि सिंचन योजना (PM Krishi Sinchayee Yojana - PMKSY):

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा सुधारण्यासाठी मदत दिली जाते. विहीर बांधणे, शेततळे, पाइपलाइन, ड्रिप इत्यादीसाठी वित्तीय सहाय्य दिले जाते.

३. महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal):

  • महाराष्ट्रातील विविध शासकीय योजना Mahadbt (महा डीबीटी) पोर्टलवर उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना विहीर किंवा सिंचनाच्या अन्य साधनांसाठी अर्ज करता येतो आणि थेट अनुदान मिळवता येते.

अर्ज प्रक्रिया:

  • Mahadbt पोर्टलवर जाऊन आपण या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • आधार कार्ड, ७/१२ उतारा, रहिवासी पुरावा, आणि जमिनीच्या मालकीचे कागदपत्रे यांची आवश्यकता असू शकते.

योजनेबद्दल अधिक माहिती व अर्ज प्रक्रियेसाठी आपल्याला नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा MahaDBT पोर्टलवर भेट देता येईल.

Trending livestock management technologies

Trending livestock management technologies today focus on efficiency, sustainability, and improving animal welfare. Here are some leading innovations:

1. Precision Livestock Farming (PLF)

  • Wearable Sensors: Wearables like smart ear tags, collars, or implants track health metrics, including temperature, heart rate, activity, and rumination. They help detect diseases early and optimize feeding and breeding cycles.
  • GPS and Geofencing: GPS sensors track animal locations, helping manage free-range animals and monitor grazing patterns. Geofencing adds a layer of control, sending alerts when animals move out of designated areas.
  • Real-time Monitoring Software: Platforms that consolidate data from multiple sensors into user-friendly dashboards allow real-time monitoring of animal health, movement, and productivity.

2. Automated Feeding Systems

  • Robotic Feeders: These systems provide precise feed portions to each animal based on nutritional requirements, reducing waste and improving growth rates.
  • Automated Calf Feeders: Customizing feeding schedules for young animals, especially calves, helps ensure they receive optimal nutrition, boosting early growth and survival rates.
  • Precision Feed Formulation: Advanced software calculates exact nutrient mixes tailored for each animal group, maximizing feed efficiency and reducing environmental impact.

3. Genetic Selection & Biotechnology

  • Genomic Selection: By analyzing the genetic makeup of animals, breeders select for traits such as growth rate, disease resistance, and milk production, accelerating genetic improvements.
  • CRISPR and Gene Editing: Although controversial, gene-editing techniques are being researched to promote disease resistance and productivity in animals without introducing foreign DNA.

4. Drones and Aerial Monitoring

  • Surveillance and Tracking: Drones are increasingly used for monitoring livestock in expansive areas, checking on herd movements, and identifying any isolated or stressed animals.
  • Thermal Imaging: Equipped with thermal cameras, drones can identify sick animals or detect heat loss in facilities, aiding in animal welfare and facility management.

5. Automatic Milking and Egg Collection Systems

  • Robotic Milking Machines: These machines reduce manual labor and increase milking efficiency, often using sensors to measure milk quality and yield in real-time.
  • Automated Egg Collectors: Popular in poultry management, these systems ensure efficient collection and reduce breakage, optimizing productivity.

6. Artificial Intelligence and Data Analytics

  • Predictive Analytics: AI models can analyze large datasets to predict health issues, optimize breeding schedules, and maximize feed efficiency.
  • Computer Vision: Using AI-enabled cameras, systems can analyze body conditions, detect lameness, and monitor behavioral changes in real-time.

7. Blockchain for Traceability

  • Supply Chain Transparency: Blockchain enables end-to-end tracking, verifying animal history, health records, and production practices, which enhances food safety and builds consumer trust.
  • Smart Contracts: These can facilitate transactions and compliance across the supply chain, from farm to retailer, helping with transparency and reducing fraud.

8. Climate Control and Environmental Sensors

  • IoT-Enabled Environmental Sensors: Monitors temperature, humidity, and air quality in barns to ensure optimal living conditions, reducing disease spread and improving productivity.
  • Automated Ventilation and Lighting Systems: These systems maintain ideal environments for livestock, adapting based on real-time data to promote health and reduce energy costs.

9. Sustainable Waste Management

  • Anaerobic Digesters: These systems convert manure into biogas, reducing waste and providing renewable energy sources for farms.
  • Nutrient Recovery Systems: Technologies that capture nutrients from manure help create fertilizers, reducing environmental impact and creating additional revenue streams for farmers.

10. Virtual Fencing

  • GPS-based Fencing Systems: Using GPS collars, virtual fencing eliminates the need for physical barriers, providing more flexibility for rotational grazing and pasture management. It allows for adjusting grazing areas remotely and minimizes land degradation.

Each of these technologies can contribute significantly to sustainable, efficient, and profitable livestock management when integrated effectively. As these technologies become more affordable and accessible, adoption is expected to grow rapidly across small and large-scale operations.

डेयरी व्यवसाय : म्हैसपालन

म्हैस पालन व्यवसाय दीर्घकालीन नफा देणारा आहे, ज्यामध्ये मुर्रा, जाफराबादी, मेहसाणा यांसारख्या जाती जास्त दूध उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. योग्य आहार, आरोग्य व्यवस्थापन, आणि शासकीय योजनांचा वापर केल्यास खर्च कमी होऊन नफा वाढतो. दूध विक्रीसोबत तूप, पनीर, श्रीखंड यांसारख्या प्रक्रियायुक्त उत्पादनांमुळे अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यामुळे व्यवसाय यशस्वी होतो.

म्हैशींच्या जाती आणि त्यांचे दूध उत्पादन: 

जातीचे नाववितांचा कालावधी (महिने)दूध उत्पादन (लिटर/दिवस)उत्पादन कालावधी (दिवस)सरासरी दूध उत्पादन (लिटर/लॅक्टेशन)खर्च (₹/महिना)
मुर्रा10-1210-15270-3002,700-3,5003,000-4,000
जाफराबादी12-158-12280-3002,500-3,2002,500-3,500
मेहसाणा12-156-10250-3002,000-3,0002,000-3,000
पंढरपुरी8-104-6240-2601,200-1,5001,500-2,000

म्हैशींचे आरोग्य :

व्यवस्थापनासाठी आजार आणि लसीकरण: 

प्रतिबंधात्मक उपाय : नियमित जंतनाशक परजीवी प्रादुर्भाव रोखते, तर गोठ्यांमध्ये स्वच्छता आणि योग्य हवा खेळती ठेवल्यास श्वसनाचे आजार कमी होतात. यासोबत पशुवैद्यकांद्वारे नियमित तपासणी केल्यास रोग लवकर ओळखण्यास आणि उपचार करण्यास मदत होते. 
आजाराचे नावलक्षणेउपचार/लसीकरण
फूट आणि माऊथ रोगताप, तोंडात चट्टे, पाय दुखणेFMD लस (दर 6 महिने)
गलघोटूताप, श्वास घेण्यास त्रास, सुजलेला घसाHS लस (दर वर्षी)
लंपी स्किन डिसीजचट्टे आणि कातडीवर गाठीLSD लस (शासनाच्या योजनेद्वारे)
ब्रुसेलोसिसगर्भपात, वंध्यत्वब्रुसेलोसिस लस (म्हशीच्या पहिल्या वर्षी)
तुपेरी/डायरियावारंवार पातळ विष्ठाइलेक्ट्रोलाइट्स, ओआरएस
वंध्यत्वपुन्हा गर्भधारणेत अडचणयोग्य आहार, व्यावसायिक सल्ला


व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे:

शासकीय योजना : सायलेज बनवण्याच्या उपकरणांसाठी सबसिडी देतात आणि बियाणे आणि प्रशिक्षणाद्वारे चारा पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देतात. 

अन्न आणि खाद्य व्यवस्थापन

संतुलित आहार: वाढत्या वासरे, स्तनपान देणाऱ्या गायी आणि कोरड्या गुरांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संतुलित आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश होतो.

पूरक खाद्य: धान्य, तेलबिया आणि मोलॅसेससह केंद्रित फीड जास्त उत्पादन करणाऱ्या प्राण्यांसाठी आवश्यक आहे. खनिज मिश्रण दुधाचे उत्पन्न आणि पुनरुत्पादक आरोग्यावर परिणाम करणारी कमतरता टाळतात.

रेकॉर्ड कीपिंग & अनॅलिसिस : डेटाचा वापर करून प्रत्येक जनावराच्या गरजेनुसार अचूक फीडिंग फीड वाटप करता येते, त्यामुळे वाया जाणारे अन्न आणि चारा वाचवून खर्च कमी करता येतो. 

  • गर्भधारणा व्यवस्थापन: 
    • कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा वापर.
    • योग्य वेळेत वितानंतर विश्रांती देणे.

औषध आणि उपचार

  • सामान्य औषधे: प्रतिजैविक, दाहक-विरोधी औषधे आणि व्हिटॅमिन सप्लिमेंट्सचा वापर रोग उपचार आणि पुनर्प्राप्तीसाठी केला जातो. 
  • जंतनाशक: दर 3-4 महिन्यांनी आवश्यक, विशेषत: उच्च परजीवी प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांमध्ये.
  • प्रोबायोटिक्स: पचनास मदत करते, विशेषतः जेव्हा गायी एकाग्र आहार घेतात.
  • प्रथमोपचार किट: किरकोळ दुखापतींसाठी, जंतुनाशक आणि जखमेच्या काळजीचे साहित्य शेतात उपलब्ध असावे. 
  • नोंद ठेवणे: प्रत्येक प्राण्यासाठी औषधोपचार आणि उपचार नोंदीचे रेकॉर्ड ठेवणे प्रभावी आरोग्य व्यवस्थापन आणि नियामक आवश्यकतांचे पालन करण्यास मदत करते.

दूध विक्री ते प्रक्रिया:

(अ) दूध विक्री:

  • थेट विक्री: - 
    • स्थानिक बाजारपेठ किंवा ग्राहकांना दररोज ताजे दूध पुरवणे.
    • विक्री दर: ₹50-₹60 प्रति लिटर (गुणवत्तेनुसार)
    • वितरणासाठी थंडगार व्यवस्था आवश्यक.
  • दुग्धसंघ/डेअरी:
    • मोठ्या प्रमाणात दूध विक्रीसाठी सहकारी दुग्धसंघांशी जोडले जावे.
    • दर: ₹35-₹45 प्रति लिटर (जाती आणि फॅट प्रमाणावर आधारित).
(ब) प्रक्रिया उत्पादने:

उत्पादनाचे नावनिर्मिती खर्च
(₹/किलो/लिटर)
मार्केट दर
(₹/किलो/लिटर)
नफा (₹)
तूप400-450600-800150-350
पनीर200-250300-400100-150
श्रीखंड100-120200-300100-180
दही20-2540-6020-35

दूध प्रक्रिया प्रकल्प (लघु उद्योग):

  • प्राथमिक उपकरणे:
    • मिल्क चिलर
    • पाश्चरायझर
    • बटर चर्नर
    • पॅकिंग मशीन
  • प्रारंभिक गुंतवणूक: ₹5-10 लाख (उपकरणे आणि लहान प्लांटसाठी).
  • शासकीय योजना:
    • राष्ट्रीय दुग्ध विकास प्रकल्प (NDDB)
    • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि दुग्ध व्यवसाय विकास योजना.

दुधाची साठवण आणि वाहतूक

ऑन-फार्म स्टोरेज: दुधाचा ताजेपणा राखण्यासाठी आणि जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी 4°C तापमानात शीतकरण टाक्यामध्ये दूध साठवतात.

संकलन आणि वाहतूक: तापमानातील चढउतार टाळण्यासाठी उष्णतारोधक टँकरमध्ये दूध दूध वाहतूक केली जाते ज्यामुळे दूध खराब होत नाही. 

गुणवत्ता चाचणी: चरबीचे प्रमाण, सूक्ष्मजीव पातळी आणि भेसळ करणाऱ्यांच्या चाचण्या हे सुनिश्चित करतात की वितरणापूर्वी दूध गुणवत्ता मानकांची पूर्तता करते.

सप्लाय चेन इंटिग्रेशन: डिजिटल सिस्टीमचा वापर आता मोठ्या प्रमाणावर दुधाचा मागोवा घेण्यासाठी फार्मपासून प्रोसेसिंग युनिटपर्यंत केला जातो, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित होते.

सरकारी सहाय्य आणि अनुदाने

  • उपकरणांवर सबसिडी: मिल्किंग मशीन, चिलिंग टँक आणि सायलेज बनवणारी यंत्रे यासारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनेकदा आर्थिक मदत उपलब्ध असते.
  • चारा विकास योजना: अनेक सरकार अनुदानित बियाणे, चारा पिकांना प्रोत्साहन आणि चारा साठवणूक आणि व्यवस्थापनासाठी प्रोत्साहन देतात.
  • विमा कार्यक्रम: सरकार-समर्थित विमा पॉलिसी शेतकऱ्यांना गुरांचे आरोग्य आणि उत्पादकतेशी संबंधित आर्थिक जोखीम व्यवस्थापित करण्यात मदत करतात.
  • कर्ज सहाय्य: गुरे खरेदीसाठी अनुदानित कर्जे, शेतीच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आर्थिक भार कमी करण्यास मदत करते.
  • प्रशिक्षण कार्यक्रम: अनेक सरकारे पशुपालन, रोग व्यवस्थापन आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शाश्वत आहार पद्धतींवरील सर्वोत्तम पद्धतींचे प्रशिक्षण देतात.

These technologies help create more sustainable, efficient, and profitable livestock operations. Read detailed information here




रब्बी हंगामात गहु लागण करायचा आहे? मग एकदा हे वाचा..

हवामान गहू पिकास रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान मानवते. थंडीचे कमीत कमी 100 दिवस मिळणे गरजेचे आहे.

जमीन
गहू पिकासाठी भारी खोल काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पूर्व मशागतपेरणीपूर्वी जमिनीची 15 ते 20 सें.मी पर्यंत खोल नांगरणी करावी. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुषीत करावी. ह्याच वेळी शेतात प्रती हेक्टरी 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकुन कुळवाची पाळी द्यावी. 

लागवड
पेरणीची योग्य वेळ
  • कोरडवाहू गहू पेरणी ऑक्टोंबर महिन्याच्या दुस-या पंधरवडा
  • बागायती गहू पेरणी नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ते 15 डिसेंबर पर्यंत

बागायती वेळेवर पेरणीकरीता शिफारशीतवाण
बागायती उशिरा पेरणीकरीता शिफारशीतवाण
1) AKAW 3722 (विमल)
2) AKW 1071 (पूर्णा)
3) MACS 6222
4) MACS 2846
5) NIAW 301 (त्र्यंबक)
6) HD 2189
7) NIAWnWWQ 917 (तपोवन) 
1) AKW 381
2) AKAW 4627 (नविन वाण)
3) HD-2501
4) NIAW 34
5) HI 977


पेरणी
  • कोरडवाहू आणि बागायत - दोन ओळीतील अंतर 23 सें.मी ठेवावे.
  • उशिरा बागायत - दोन ओळीतील अंतर १६ सें.मी ठेवावे.
  • पेरणी करतांना बियाणे हे जमीनीत 5 ते 6 सें.मी पेक्षा जास्त खोलवर पाडू नये.
  • कोरडवाहू पेरणी - प्रती एकरी ३० किलो बियाणे
  • बागायती वेळेवर पेरणी - प्रती एकरी ४० ते ५० किलो बियाणे
  • (HD 2189 किंवा AKW 1071 या वाणाचे बियाणे ठसठसीत किंवा जाडसर असल्यामुळे अषा वाणाकरीता प्रती एकरी 60 किलो बियाणे वापरावे.)
  • प्रती हेक्टरी रोपांची संख्या 22.5 ते 25 लाख ठेवा.

बीज प्रक्रिया 
  • पेरणीपूर्वी थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.
  • त्यानंतर झोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धन 250 ग्रॅम प्रती 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळून लावावे. जिवाणू संवर्धन लावून पेरणी केल्यास उत्पन्नात निष्चितच वाढ होते.
  • अॅझोटोबॅक्टर बीज प्रक्रिया केल्यानंतर लावावे व बियाण्यास घट्ट चिटकले पाहिजे याची काळजी घ्यावी.
  • त्यासाठी अॅझोटोबॅक्टर पेरणीपूर्वी 2 तास अगोदर लावून बियाणे सावलीत वाळवावे.
पाणी व्यवस्थापन
  • एका ओलीताची सोय असल्यास- 42 दिवसांनी
  • दोन ओलीताची सोय असल्यास- 21 व 65 दिवसांनी
  • तीन ओलीताची सोय असल्यास - 21, 42 व 65 दिवसांनी
खत व्यवस्थापन
माती परीक्षणावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा ठरविणे.
म्हणून पेरणीपूर्वी माती परिक्षण करणे गरजेचे आहे. गहू पिकास रासायनिक खताचा
  • पहिली मात्रा पेरणीच्या वेळी दोन चाड्याची तिफण वापरून बियाण्यासोबतच द्यावी.
  • बागायती वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलो नत्र 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
  • बागायती उशिरा पेरणीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे.
  • बागायती वेळेवर आणि उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास नत्र खताची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा पेरणी सोबतच द्यावी.
  • नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा पेरणीनंतर 21 दिवसांनी ओलीत करतांना द्यावी.
  • कोरडवाहू गहू पेरणी करतांना नत्र व स्फुरदाची पुर्ण मात्रा म्हणजेच 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद प्रती हेक्टरी पेरणी सोबतच द्यावी.
कीड व रोग नियंत्रण
  • मावा किडीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे साधारणपणे दहा मावा कीड (पिले/प्रौढ) प्रति झाड किंवा फुटवा दिसल्यानंतर उपाययोजना त्वरित हाती घ्याव्यात.
  • शेतामध्ये पिवळे चिकट कार्ड(स्टिकी ट्रॅप)चा वापर करावा, की ज्यामुळे शेतात पंख असलेली मावा कीड या कार्डला चिकटलेली दिसून येतात.
  • जैविक पद्धतीने नियंत्रण करताना व्हर्टीसिलिअम लेकॅनी किंवा मेटारायझियम ऍनिसोप्ली ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा (गरजेनुसार) फवारणी करावी.
  • रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रणासाठी थायामिथोक्‍झाम (२५%) १ ग्रॅम किंवा ऍसिटामिप्रीड (५ ग्रॅम) प्रति १० लिटर पाण्यातून एक फवारणी करावी.

वसुबारस: गोवत्स द्वादशीची गोमाता आणि ऋषींचं वरदान

वसुबारस, ज्याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण सण आहे. ह्याचा संबंध गाईच्या पूजनाशी असून शेतकऱ्यांच्या जीवनशैली, परंपरा, शेती आणि संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. 

इतिहास  

भारतीय परंपरेत गोमातेला विशेष स्थान दिलं आहे. प्राचीन काळापासून गाय ही भारतीय समाजाच्या केंद्रस्थानी होती. गाईला केवळ एक जनावर न मानता गाईला धेनू म्हणजे पोषण करणारी माता मानली गेली आहे. वैदिक काळापासूनच गाईला संपत्ती, सन्मान, आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. प्राचीन ऋषी-मुनींच्या काळात गाईला धनाच्या स्वरूपात आणि आरोग्यदायी मानलं जाई, कारण गाईच्या दुधातून अनेक पोषक घटक मिळतात. 

शेतकऱ्यांसाठी गाय केवळ दूध देणारी नसून शेतीसाठी खत, बळ, इंधन आणि शेतीतील अन्य विविध गोष्टींसाठी उपयोगी असणारी आहे. त्यामुळेच वसुबारस हा सण शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी गाईचे पूजन करून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.

संस्कृती आणि परंपरा

वसुबारसला शेतकऱ्याच्या कुटुंबात गाईला धार्मिक महत्त्व असतं. या दिवशी गाय आणि तिचं वासरू हे केंद्रस्थानी असतात. वसुबारसच्या दिवशी गाईला अंघोळ घालून सजवली जाते. तिला हळद-कुंकू लावून फुलांनी सजवलं जातं. नंतर गाईचं आणि वासराचं औपचारिक पूजन केलं जातं. उपवास करणाऱ्या कुटुंबातील स्त्रिया त्यानंतर गाईला चारा, गोडधोड अर्पण करतात. गाय आपल्या आयुष्याचा कणा मानून तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केल्या जातात. 

गाय ही समृद्धी आणि सुफलता आणणारी मानली जाते, म्हणून वसुबारसच्या दिवशी गाईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे मानले जाते की, गाईचा आशीर्वाद घेतल्याने शेतातील उत्पादन वाढतं आणि कुटुंबात सुखशांती येते. 

भविष्य आणि समाजासाठी महत्त्व

तंत्रज्ञानाच्या या युगात वसुबारस आणि त्याचं महत्त्व काळाबरोबर बदलतंय, परंतु शेतकरी समाजातील ही संस्कृती अजूनही टिकून आहे. आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी ही संस्कृती टिकवणे महत्त्वाचे आहे कारण शेती आणि पशुपालनाचे महत्त्व वाढतच चालले आहे. जैविक शेती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्यासाठी गाईचे खत आणि शेणाचे महत्त्व वाढलेले आहे, कारण ते रासायनिक खतांपेक्षा पर्यावरणास अनुकूल असते. वसुबारसच्या निमित्ताने गाईचे संवर्धन आणि तिच्या प्रति आस्था टिकवण्यास मदत होते.

गाईचे संरक्षण आणि गोधन टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली संस्कृती जपणे, ही काळाची गरज आहे. जैविक कृषीत या परंपरेचा मोठा आधार आहे, आणि हे सांस्कृतिक मूल्य पिढ्यानपिढ्या चालू ठेवण्यास वासुबारासचा सण मदत करतो.

उपसंहार

वसुबारस म्हणजे गाईविषयीची आदराची भावना जपण्याचा, आणि कुटुंबासाठी व शेतासाठी तिचं महत्त्व ओळखण्याचा सण आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने गाईला नुसतं धार्मिक नव्हे तर पर्यावरणस्नेही आणि आर्थिक समृद्धी देणारं स्थान आहे. त्यामुळे वासुबारास सण शेतकऱ्यांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि सकारात्मकता आणतो.

पौराणिक कथा: गोवत्स द्वादशीची गोमाता आणि ऋषींचं वरदान 

एकदा देवराज इंद्र आणि गुरू बृहस्पती यांच्यात काही कारणाने वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या देवराज इंद्राने आपल्या शस्त्रांचा त्याग केला. इंद्राने यामुळे पृथ्वीवरील पर्जन्य थांबवला आणि पृथ्वी कोरडी पडली. या कोरड्या वातावरणात मानव आणि पशू-पक्षीही अन्न-पाण्याशिवाय त्रासले.

या कठीण परिस्थितीत एक ब्रम्हर्षि वसिष्ठ नावाचे ऋषी होते, ज्यांच्याकडे एक अद्भुत कामधेनू गाय होती, जी इच्छित वस्तू प्रदान करण्यास सक्षम होती. वसिष्ठ ऋषींच्या आशीर्वादाने ही गाय पृथ्वीवरील लोकांना अन्न आणि दूध देत होती. त्या गाईमुळे ऋषींचं आश्रमही सुख-समृद्धीने भरलं होतं, आणि गरजू लोकांना मदत होत होती.

देवता आणि ऋषी-मुनींनी एकत्र येऊन वसिष्ठ ऋषींना विनंती केली की त्यांनी इंद्राला संतुष्ट करावा. वसिष्ठ ऋषींनी गाईचे पूजन करून इंद्राची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेमुळे इंद्राचा क्रोध शांत झाला आणि त्याने पावसाचा मळभ दूर करून पृथ्वीवर पुन्हा पर्जन्यधारा बरसवल्या. पृथ्वी पुन्हा हिरवीगार झाली, आणि जनजीवन पूर्ववत सजीव व आनंदित झालं.

या कथेतून शिकवण

गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारसचा सण हा गाईचे महत्त्व अधोरेखित करतो. गाईमुळे शेतीला पोषकता मिळते, आणि तिच्याशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे पृथ्वीवर समृद्धी येते. म्हणूनच वासुबारासच्या दिवशी गाईला पूजून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या कथेचा संदेश असा आहे की गाईसारख्या पशूंचा आदर करणे आणि त्यांची सेवा करणे ही केवळ धार्मिक नव्हे तर पर्यावरण आणि मानवी कल्याणासाठीही आवश्यक बाब आहे.

Tuesday, August 27, 2024

नवीन FPO शेतकरी कंपनी बनवायची आहे ? तर नक्की वाचा..

उत्पादक कंपनी म्हणजे काय?  


उत्पादक कंपनी ही भारतातील एक विशेष प्रकारची कंपनी आहे जी शेतकरी आणि कृषी उत्पादकांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही कंपनी कंपनी अधिनियम, 2013 अंतर्गत कायदेशीरदृष्ट्या मान्यताप्राप्त आहे आणि सहकारी संस्थेच्या फायद्यांसह खासगी मर्यादित कंपनीच्या लवचिकतेचा फायदा देते. 

उत्पादक कंपनीची मुख्य वैशिष्ट्ये:

1. सदस्यत्व: केवळ प्राथमिक उत्पादक, जसे की शेतकरी, दुग्ध उत्पादक, मच्छीमार आणि इतर कृषीउत्पादक सदस्य होऊ शकतात.

2. उद्दिष्ट: सदस्यांच्या उत्पन्न आणि जीवनमान सुधारण्यासाठी, खरेदी, प्रक्रिया, विपणन आणि उत्पादन किंवा सेवांची विक्री यासारख्या सेवा देण्याचा प्राथमिक उद्देश आहे.

3. किमान आवश्यकता:

  • किमान 10 उत्पादक किंवा दोन संस्था.
  • सदस्यांची जास्तीत जास्त संख्या मर्यादित नाही.
  • किमान 5 आणि जास्तीत जास्त 15 संचालक.

4. मतदान हक्क: मतदान हक्क "एक सदस्य, एक मत" या तत्त्वावर आधारित आहेत, ज्यामुळे सदस्यांचा हिस्सा कितीही असला तरी प्रत्येक सदस्याला समान अधिकार मिळतो.

5. नफा वितरण: कंपनीच्या क्रियाकलापांमध्ये त्यांच्या सहभागानुसार नफा सदस्यांमध्ये वाटला जातो.

6. फायदे:

  • छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी एकत्रित व्यासपीठ पुरवते.
  • उत्पादन, कापणी, खरेदी, ग्रेडिंग, संकलन, हाताळणी, विपणन, विक्री आणि प्राथमिक उत्पादनाची निर्यात यासह अनेक क्रियाकलाप करू शकते.

7. कर लाभ: उत्पादक कंपन्यांना काही करसवलती मिळतात, परंतु त्यांना त्यांच्या दर्जा टिकवण्यासाठी विविध नियमांचे पालन करावे लागते.

उत्पादक कंपन्या छोट्या शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यात आणि त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 


शेतकरी उत्पादक संघटना (FPO) चे फायदे:

1. सामूहिक ताकद:

  • एफपीओ शेतकऱ्यांना एकत्र आणते, ज्यामुळे त्यांची सामूहिक ताकद वाढते. यामुळे उत्पादनाच्या किमती कमी होतात आणि विक्रीतून अधिक नफा मिळतो.

2. उत्पादन खर्च कमी होणे:

  • शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादींची खरेदी करण्यास FPO मदत करते, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.

3. सरकारी योजना आणि सबसिडी:

  • एफपीओ विविध सरकारी योजना आणि सबसिडीमध्ये प्रवेश मिळवू शकतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदे मिळू शकतात.

4. बाजारपेठ प्रवेश:

  • एफपीओ शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगल्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून देते, ज्यामुळे त्यांना उत्पादनासाठी चांगली किंमत मिळते.

5. उत्पादन गुणवत्ता आणि प्रमाण:

  • एफपीओच्या माध्यमातून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढते.

6. प्रशिक्षण आणि मार्गदर्शन:

  • एफपीओ शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, बाजारपेठेतील ट्रेंड आणि शेतीतील विविध संधी याबद्दल प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करते.

7. शेतीचे विविधीकरण:

  • एफपीओ शेतकऱ्यांना शेतीत विविधीकरण करण्यास प्रोत्साहित करते, जसे की प्रक्रिया उद्योग, पशुपालन, मत्स्यव्यवसाय इत्यादींचा समावेश करून त्यांचे उत्पन्न वाढवणे.

8. क्रेडिट सुविधा:

  • एफपीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवणे सोपे होते.

शेतकरी उत्पादक संघटना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यास आणि त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या योग्य किंमती मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे साधन आहे.

शेतकरी उत्पादक संघटना (FPO) नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि किमान सदस्य संख्या:

1. सदस्य संख्या:

  • किमान सदस्य संख्या: 10 शेतकरी किंवा उत्पादक (एफपीओ सुरू करण्यासाठी आवश्यक).
  • शहरी भाग: किमान 100 शेतकरी किंवा उत्पादक.
  • ग्रामीण भाग: किमान 300 शेतकरी किंवा उत्पादक.

2. कागदपत्रांची आवश्यकता:

a. संचालकांची कागदपत्रे:

  • ओळख पुरावा: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड.
  • पत्ता पुरावा: वीज बिल, टेलिफोन बिल, गॅस बिल, किंवा बँक स्टेटमेंट.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.

b. शेतकरी सदस्यांची कागदपत्रे:

  • ओळख पुरावा: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड.
  • पत्ता पुरावा: वीज बिल, टेलिफोन बिल, गॅस बिल, किंवा बँक स्टेटमेंट.
  • शेतजमिनीचे कागदपत्रे: 7/12 उतारा किंवा जमीन नोंदणी कागदपत्रे.

c. नोंदणीशी संबंधित कागदपत्रे:

  • FPO चा प्रस्तावित नाव: नोंदणीसाठी नाम उपलब्धता चाचणी.
  • प्रस्तावित उद्दिष्टे: एफपीओचे उद्दिष्टे व मिशन स्टेटमेंट.
  • मेमोरँडम ऑफ असोसिएशन (MOA): एफपीओच्या उद्दिष्टे व क्रियाकलापांची तपशीलवार माहिती.
  • आर्टिकल्स ऑफ असोसिएशन (AOA): एफपीओच्या कार्यपद्धती, व्यवस्थापन, आणि सदस्यांच्या अधिकारांची माहिती.

d. इतर कागदपत्रे:

  • शेअर कॅपिटलसाठी योगदान: प्रत्येक सदस्याने केलेले आर्थिक योगदानाचे प्रमाणपत्र.
  • नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC): एफपीओचे मुख्य कार्यालय कुठे स्थापन केले जाईल, त्यासाठी मालकाचे NOC.
  • बँक खाते: एफपीओच्या नावावर बँक खाते उघडण्याची कागदपत्रे.

3. प्रारंभिक निधी:

  • नोंदणी प्रक्रियेसाठी आणि प्राथमिक ऑपरेशन्ससाठी आवश्यक असलेला काही प्रारंभिक निधी (शेअर कॅपिटल) गोळा करावा लागतो.

4. व्यवस्थापन मंडळ:

  • किमान 5 आणि जास्तीत जास्त 15 संचालक असलेले व्यवस्थापन मंडळ असणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रिया:

  • नोंदणीसाठी ROC (Registrar of Companies) कडे अर्ज सादर करावा लागतो.
  • सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, एफपीओला नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.


Monday, March 4, 2024

Empowering Women: A Step Towards Progress

In a significant stride towards women empowerment, the team from the Gramin Shashwat Vikas Project in Tasgaon, Sangli, recently celebrated the International Women's Day and International Women's Rights Day with immense enthusiasm. The initiative aimed to uplift and educate women from rural areas, shedding light on their rights, responsibilities, and avenues for growth. 

The team left no stone unturned in spreading awareness, conducting impactful programs that reached nearly 300 women in the vicinity. From Anganwadi Halls to College Auditoriums, from Panchayat Samitis to Hotel Halls, various locations became the stage for enlightening sessions on women's empowerment.

One of the crucial focuses of the program was to educate women about their rights and duties while emphasizing the importance of their protection. Through insightful discussions, the team delved into topics like gender equality, changing patriarchal mindsets, and combating violence against women.

Moreover, the initiative highlighted the need for holistic development, encouraging women to explore diverse opportunities and break free from traditional stereotypes. The program emphasized the importance of reducing the wage gap and ensuring respect for all roles, including homemakers.

In addition to awareness sessions, the team also introduced women to various government schemes aimed at their welfare and empowerment. From financial assistance for marriage to support for victims of abuse, these schemes provide a safety net and a pathway to progress for women from all walks of life.

Furthermore, the initiative didn't stop at spreading awareness but also paved the way for tangible skill development and employment opportunities for women. By promoting digital literacy and leveraging social media platforms, women were encouraged to explore entrepreneurship and contribute to the digital economy.

Overall, the celebration was not just a one-day event but a stepping stone towards long-term empowerment and progress for women in rural areas. It highlighted the power of education, awareness, and collective effort in breaking barriers and creating a more inclusive society.

As we continue on this journey towards gender equality, let us all pledge to support and uplift the women around us, ensuring that they have the tools and opportunities to thrive and succeed in every aspect of life. Because when women rise, communities prosper, and societies flourish.

Transforming Lives Through Sustainable Rural Development

"Mazisheti's Shetkari Pratishthan is committed to holistic development within rural communities. Our Gramin Shashwat Vikas Project focuses on empowering farmers, women, and youth through comprehensive initiatives.

We provide farmers with guidance on crop production techniques and facilitate cooperative efforts for better sales. Our aim is to ensure high-quality and nutritious produce. By addressing challenges such as fluctuating market prices and lack of market regulation, we strive to enhance agricultural sustainability and improve livelihoods.

In the wake of challenges faced by farmers due to non-supplemental sales channels and market mismanagement, we initiated a practical project in collaboration with the Agriculture Department, local self-government institutions, government offices, banks, farmer groups, rural and urban savings groups, and service providers. This collaborative effort ensures equitable sales arrangements for farmers while also providing nutritious and quality produce to consumers.

With a focus on rural employment creation and livelihood development, we provide extensive training to farmers, youth, and women in various aspects of agricultural practices, leadership, communication, production-business-service methods, financial management, human resource management, insurance protection, value addition, and sales management. After undergoing comprehensive training, participants show increased confidence and are better equipped to achieve desired goals.

Our initiative aims to enhance the income of farmers through production-based assistance. With the support of skilled trainers, we conduct annual training sessions, with a minimum of 500 and a maximum of 1000 farmers participating. Through a blend of theoretical and practical elements over a span of three days, participants gain valuable insights into agricultural technology utilization, effective nutrient and fertilizer management, integrated pest and disease management, government assistance, and incentive schemes. As a result, farmers can reduce production costs and achieve higher yields. Moreover, by pre-determining the price of farm produce, we have effectively resolved issues faced by farmers. Each farmer receiving training on cultivating one-acre vineyard is able to harvest grapes from 1000 acres, yielding 5 to 6 tons per acre, resulting in profitable production at Rs. 120 per kilogram.

Our initiative also focuses on providing employment opportunities to savings groups. Though savings groups are not new to Maharashtra, groups in Western Maharashtra are highly successful, boasting economic literacy and capability. Through the Bedana Cluster Development Program, we actively engage Self help groups. By uniting them, we provide training on entrepreneurship, investment, and sales management. Trained savings groups are encouraged to collaborate in business expansion, product registration, marketing and sales, market research, and timely financial reporting. Through this medium, savings groups have earned an average annual profit of Rs. 1,00,00,000/- or have created employment."



Wednesday, May 4, 2022

Spreading Joy and Awareness: Mazisheti's Happiness Drive

In the midst of unprecedented challenges posed by the COVID-19 pandemic, Mazisheti (MSP) took a proactive step towards spreading joy and awareness in communities. Organizing a happiness drive in Davangiri, Karnataka, and Kurkumbh, Maharashtra, the organization aimed to bring positivity and vital information to young beneficiaries aged 15 to 20 years. 

Amidst the uncertainties and anxieties brought about by the pandemic, the happiness drive served as a beacon of hope, touching the lives of 250 young individuals. The primary objective of the drive was twofold: to spread awareness about the prevention and control of COVID-19 and to create a happy and healthy environment to help beneficiaries cope with the stress and anxiety induced by the pandemic.

At the heart of the initiative was the emphasis on promoting crucial preventive measures such as social distancing, wearing masks, and maintaining personal hygiene. Through engaging activities and informative sessions, Mazisheti aimed to equip the beneficiaries with knowledge that could potentially save lives.

The impact of the happiness drive was profound and tangible. Beneficiaries expressed their gratitude and happiness for the thoughtful activities organized by the organization. More importantly, the drive played a significant role in helping individuals cope with the stress and anxiety associated with the ongoing pandemic.

Furthermore, the beneficiaries gained valuable insights into the importance of adhering to preventive measures. Armed with knowledge about social distancing, mask-wearing, and personal hygiene practices, they became empowered to play an active role in preventing the spread of COVID-19 within their communities.

Mazisheti's happiness drive stands as a testament to the power of community-driven initiatives in times of adversity. By spreading joy and awareness, the organization not only uplifted spirits but also equipped individuals with the tools to navigate the challenges posed by the pandemic.

As we continue to navigate these uncertain times, let us draw inspiration from initiatives like Mazisheti's happiness drive, and collectively work towards building resilient and empowered communities.

#Mazisheti #HappinessDrive #COVID19Awareness #CommunityEmpowerment