Thursday, July 12, 2012

स्त्री.... काल, आज आणि उद्या

स्त्री
काल, आज आणि उद्या            मी स्त्री आहे हे वास्तव जगाने स्वीकारायला हवे. साहजिकच एक स्त्री म्हणुन मी सुंदर असणे स्वाभाविक आहे परंतु सुंदर असण्यापेक्षा मला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी मला अधिक गरम किंवा मादक असायलाच हवे आणि हा मला लोकशाहीने दिलेल्या मुलभूत हक्कापैकी एक हक्क आहे.’ हो, काय चुकीच आहे, एकेकाळी सांगलीच्या (नागठाणेच्या) बाळगंधर्वांनी स्वतः स्त्रीचा अभिनय करून स्त्रीला माणसात आणले. आणखी थोडस पाठीमागे गेलो आणि काळाचा पडदा किलकिला करून पाहिलं तर सदासर्वदा इतकंच जाणलं की स्त्रीला परमपुज्य रामांनी देखील एक मर्यादेतच ठेवले होते. कारण काहीही असो पण स्त्री आणि मर्यादा हे एक समीकरणच होते. परंतु एकदमच पाठीमागे भुतकाळात ज्यावेळी समाज किंवा कोणतीही रुढी – परंपरा नव्हती तेंव्हा कोणालाही कसल्याही मर्यादा नव्हत्या हेही ध्यानांत घ्यायला हवं.
                ज्यावेळी समाज वेगवेगळ्याप्रकारे वेगवेगळ्या थरात स्वतःला आकार देत गेला त्यावेळी प्रत्येक घरातील आजी, आई, बायको, बहिण, मुलगी या वेगवेगळ्या रुपात स्त्री ही त्या संस्कारित घराची लक्ष्मी म्हणुन उदयाला येत गेली. पण समाज रचनेच्या अगोदर मानव प्राणी कसा होता. मी मुद्दाम प्राणी असा उल्लेख केला कारण त्यावेळची परिस्थिती अगदी तशीच होती जशी आजच्या घडीला जंगलामध्ये जनावरांचे कळप राहतात. प्रत्येक नराला त्याच्या कुवतीनुसार कळपाचे नेतृत्व मिळायचे, मग त्या नराने कळपातील प्रत्येक सदस्याचे संरक्षण करायचे, कळपाला योग्य दिशा दयायची, चारा-पाण्याचा प्रश्न सोडवायचा, प्रजननक्षम माद्यांमार्फत कळपाची संख्या वाढवायची यांसारखी प्रामुख्याने कळपाच्या नराची कामे असत. काही काळ गेल्यानंतर पुन्हा स्वयंवर. नवीन तयार झालेल्या नरांबरोबर स्पर्धा आणि जिंकलेल्या नराला कळपाचे प्रतिनिधीत्व. हे असे चक्र होते.
म्हणजेच तत्कालीन स्त्रीचा विचार केल्यास शून्य असेच चित्र पहावयाला मिळेल. काळ बदलत गेला तसा मानव प्राणी समाजप्रिय होत गेला. मानव प्राण्यामध्ये लज्जेची जान आली आणि रूप पालटले मानव प्राण्यामधुन मनुष्य जन्माला आला. समाज आकार घेऊ लागला. मनुष्य वस्ती करु लागला. मनुष्याने कमरेभोवती झाडाचा पाला लपेटुन घेतला. छातीवरही झाडपाला आला. पुढे मनुष्याला वाणी मिळाली. मनुष्य संवाद करू लागला. आणि आणि मनुष्याच्या आयुष्यात प्रगती आली. तिने सर्व चित्रच बदलुन टाकले. बाळगंधर्वांच्या चित्रपट सृष्टीला आताच्या पिढीतल्या बिबत्स नायिका गालबोट लावुन थांबल्या नाहीत तर अधिक उन्मत्त आणि मादक दिसण्यासाठीच या ललनांचा जन्म झालाय हे सांगायलाही ह्या तरुण पिढीच्या नायिका विसरल्या नाहीत. जेंव्हा अजुन कापडाचा शोध लागलेला नव्हता तेंव्हापासुन स्त्रीचा युगानुयुगे चाललेला प्रवास कोणी विसरले नाही आणि विसरनारही नाही असाच आहे.
पूर्वीचा सती सावित्रीचा काळ मधला झाशीची राणी लक्ष्मीबाईचा काळ आणि आजचा पुनम पांडेचा काळ !!!! कुठे चाललाय हा समाज... आज प्रत्येकजण स्त्री मुक्तीचा पाढा वाचतोय,,, पण स्त्रीला कोणापासून मुक्ती दयायची.... स्त्री मुक्तीच्या भोवऱ्यात सापडून आजची स्त्री स्वतःच्या मीला विसरू लागलीय. स्त्रीला पाहून मान झुकविणारा समाजातील वर्ग हा याच स्त्रीच्या वर्तनामुळे स्त्रीला अंगाखाली पाहू लागला आहे. कोण जबाबदार आहे या परिस्थितीला??? स्त्रींयांवर झालेला हा वैचारिक अत्याचार हा शारीरिक अत्याचारापेक्षा कितीतरी पटीने अधिक भयानक आहे. चंगळवादी आणि अश्लीलपणामुळे तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुली नागड्या देहाचे प्रदर्शन करताना पाहून आदराने झुकणाऱ्या माना शरमेने झुकू लागल्या आहेत. स्त्रीचे शील, तिचे सौंदर्य याचा आज मितीला बाजार भरला आहे.

काय होती स्त्री?? या स्त्री वादाकडे निरखुन पाहिल्यास समजुन येईल की प्राणी म्हणुन झाडाझुडपांच्या जंगलात विवस्त्र वावरणाऱ्या स्त्रीने घोशा पहिला, बुरखा पहिला आता या जीवनाचा कंटाळा आलेमुळे स्त्री पुन्हा जंगलाकडे वळण्याच्या प्रयत्नात आहे. स्त्रीचा प्रवासही अगदी तसाच आहे विवस्त्र असणारी स्त्रीने लज्जा रक्षणासाठी झाडापाल्याचा आधार घेतला नंतर जसजशी प्रगती माणसाबरोबर आली तसतशी स्त्रीने भारतीय पोशाख नऊवारी साडी पाहिली आणि आता वर एक आणि खाली एक अशी दोन फडक्यांच्या सहाय्याने लज्जा रक्षणाचा आव आणला जात आहे. आजच्या स्त्रीच्या या वागण्यामुळे स्त्री भोगाची वस्तु म्हणुन वापरली जात आहे.

No comments:

Post a Comment