Wednesday, January 13, 2016

ऊस - खोडवा

जमिनीची पूर्व मशागत, उसाचे बेणे, उसाची लागण, उसातील आंतरमशागत इत्यादी बाबींवरील खर्च वाचत असल्याने किफायतशीर ऊस शेतीसाठी उसाचे जास्तीत जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते. या पद्धतीत खोडवा पिकात आंतरमशागतीची आवश्‍यकता नाही. लागणीचा ऊस तुटल्यानंतर खोडव्यात बगला फोडणे, जारवे, कुळव मारणे, मोठी बांधणी करणे इत्यादी कामे करण्याची आवश्‍यकता नाही. खोडव्यातील पाचट अजिबात जाळायचे नाही किंवा ते शेताच्या बाहेरही काढायचे नाही.

खोड़वा नियोजन -
           खोडव्यास नांगरट, कलटिव्हेटर, रोटर, सरी वगैरे मशागतिचि आवश्यकता  नसते म्हणजेच तो खर्च नसतो. बियाणे , लागनीचा खर्च वगैरे बाबींचा खर्च नसतो. हे अत्यंत महत्वाचे आहे. याच्या शिवाय अजुन अत्यंत महत्वाचे आणि उत्पादन जास्त मिळण्याची बाब म्हणजे; उस ज्या क्षणी तुटतो त्या क्षणपासून खोडव्याची वाढ सुरु झालेली असते. लागण केले नंतर 15 ते 25 दिवस उसाची उगवण होण्यास लागतात आणि नंतर हळू हळू जश्या मुळ्या तयार होतील तशी त्याची सुरुवातीला हळू हळू वाढ होते आणि नंतर जोमाने वाढ होते. खोडव्या मध्ये मात्र वाढ लगेच होते कारण त्याच्या मुळ्या आगोदरच तयार असतात. त्याला योग्य खत पाणी मिळाले की जोमाने वाढ सुरु होते.

पाचट आच्छादन (व्यवस्थापन)

 • ऊस तोडणीच्या वेळी, पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा.
 • त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत, त्यामुळे त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील.
 • उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते. जमिनीखालील येणारे कोंब जोमदार असतात.
 • मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच कार्बेन्डाझीम 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. 
 • शेतात पसरलेल्या पाचटावर एकरी 32 किलो युरिया, 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 लिटर पाचट कुजविणारे द्रवरूप जिवाणू शेणखतात मिसळून सारख्या प्रमाणात पसरावेत. त्यानंतर उसास पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन 

 • पहिली खतमात्रा - पाणी उपलब्ध असल्यास, खोडव्याला पहिले पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली खतमात्रा द्यावी.
 • जमिनीत वाफसा असताना 15 दिवसांचे आत एकरी 50 किलो युरिया, 175 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश एकत्रित मिसळून द्यावे.
 • पहारीने बुडख्यांपासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर 15 ते 20 सें.मी. खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दोन छिद्रामधील अंतर 30 सें.मी. ठेवावे.
 • दुसरी खतमात्रा - दुसरी तितकीच मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 120 दिवसांनी द्यावी.
 • पहारीने खते देताना छिद्रात बुजविलेली खते विरघळून मुळांच्या सान्निध्यात पसरण्यासाठी पाणी देणे आवश्‍यक आहे.
 • ठिबक सिंचनाची सोय असल्यास पाण्यात विरघळणारी युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश सारखी खते ठिबक संचाद्वारेच द्यावीत. 
 • ऍझोफॉस्को हे द्रवरूप जीवाणू खत प्रति एकर 1 लिटर प्रमाणात ठिबक संचाद्वारे द्यावे. पाटपाणी देत असल्यास ऍझोफॉस्को जिवाणू खताची खोडकीच्या बुडात आळवणी करावी.
 • खोडवा पीक साधारण 1.5 ते 2 महिन्यांचे असताना पानांवर ऍसिटोबॅक्‍टर द्रवरूप जिवाणू खताची हेक्‍टरी 1 लिटर प्रति 200 लिटर पाण्यातून सकाळी फवारणी करावी.
 • साधारण खोडवा 2 ते 2.5 महिन्याचा झाल्यानंतर मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची एकरी प्रत्येकी 2 लिटर मात्रा प्रति 200 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून पहिली फवारणी करावी. 
 • दुसरी फवारणी 90 दिवसांनी प्रत्येकी 3 लिटर मात्रा प्रति 300 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी. 
 • फवारणी करताना घ्यावयाची काळजी - उसाची पाने दोन्ही बाजूंनी चांगली भिजतील, याची काळजी घ्यावी. शक्‍यतो वारा कमी असताना सकाळ, संध्याकाळ फवारणी करावी. कोणतीही इतर रसायने द्रवरूप खतात मिसळू नयेत. सदर द्रवरूप खते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे उपलब्ध होतात.

खोडव्यासाठी पाणी नियोजन

 • खोडवा व्यवस्थापनासाठी नेहमीच्या पद्धतीने 26 ते 28 पाण्याच्या पाळ्या लागतात. परंतु, नवीन तंत्रामध्ये फक्त 13 ते 14 पाण्याच्या पाळ्या असल्या तरी खोडवा उसाचे चांगले उत्पादन मिळत असल्याचे दिसून आले आहे.
 • उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा भासल्यास पारंपरिक पद्धतीमध्ये उसाच्या उत्पादनात फार मोठी घट येते. मात्र, मशागत न करता, पाचटाचे आच्छादन केल्यामुळे 40 ते 45 दिवस पाणी नसले तरी उसाचे पीक चांगले तग धरू शकते. पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, त्यामुळे शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते.दोन किंवा तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्‍य असल्यास, मध्यम खोल आणि खोल काळ्या भारी जमिनीत पीक वाढीच्या अवस्थेनुसार फुटवा येण्याच्या स्थितीत आणि पुढील वाढीच्या काळात गरजेप्रमाणे पाण्याच्या हलक्‍या पाळ्या द्याव्यात. खोडवा पिकाचे चांगले उत्पादन मिळू शकते.
 • पाणी उपलब्ध नसल्यास खोडवा पिकास पाण्याचा ताण सहन व्हावा म्हणून म्युरेट ऑफ पोटॅश या खताचे 2.5 किलो प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे उसाच्या पानावर दर 15 ते 21 दिवसांनी फवारणी करावी.

सध्याच्या अवर्षण परिस्थितीत अनेक ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही. अशा वेळी भारी खोल काळ्या जमिनीत ऊस पीक तुटल्यानंतर इतर कोणतेही पीक घेणे शक्‍य नाही. त्यामुळे ऊस पीक न काढता तसाच खोडवा ठेवावा. पाचट आच्छादन करावे.कोणतीही मशागत करू नये.रासायनिक खतांचा जमिनीतून वापर न करता, फक्त ऍसिटोबॅक्‍टर द्रवरूप जिवाणू खताची तसेच मल्टिमॅक्रोन्युट्रियंट द्रवरूप खतांची फवारणी करावी.

म्युरेट ऑफ पोटॅश 2.5 टक्के प्रमाणात द्रावण तयार करून उसावर दर 15 ते 21 दिवसांनी पानांवर फवारणी करावी. उस पिकाने पावसाळा येईपर्यंत तग धरल्यास काही प्रमाणात का होईना ऊस उत्पादन हाती येऊ शकते.
* छाटनि नंतर बुडख्यावर बुरशी नाशक व कीटक नाशक फवारावे.
* रासायनिक खताची पहिली मात्रा लवकर द्यावीं.
* रासायनिक खते शक्यतो पहारिणेच वरंब्यात मुळ्याच्या सानिध्यात द्यावेत. हे अत्यंत महत्वाचे आहे.
* ऊस तुटल्यापासून 30 दिवसांनी व नंतर 20 दिवसाचे अंतराने फवारानी घ्याव्यात.
* पाण्याचे नियोजन योग्य असावे.

** खत व्यवस्थापन -
अर्धा टक्के चुन्याची निवळि फवारावी.
सेन्द्रीय खते दयावित.
रासायनिक खते प्रति एकर डोस -
1. पहिली मात्रा पहारिने द्यावी.
     यूरिया        100 किलो  
     डीएपी        100 किलो
     पोटयाश       75किलो   
     सूक्ष्म अन्न द्रव्य             15 किलो  
     गन्धक ग्रान्युअल्स           15 किलो  
     माग सल्फेट                    25 किलो   
     ह्युमिक आसीड               10 किलो
     सेंद्रिय खते किंवा लिम्बोली पेंड 200 ते 500 किलो द्यावे.
2. दूसरी मात्रा 30 दिवसानी द्यावी.
      यूरिया                       100 किलो
      लिम्बोली पेंड                20किलो
3. तीसरी मात्रा 60 दिवसानी पहारिने द्यावी
      मात्रा नंबर एक प्रमाणे सर्व खते पहारिने
4. 90 दिवस         यूरिया     50किलो
5.120 दिवस      यूरिया       50 किलो
6. 150 दिवस    अमो सल्फेट 50 किलो
                         पोट्याश     25 किलो

** सुक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन -
सुक्ष्म अन्नद्रव्ये व मॅग्नेशियम सल्फेट ही दोन्ही खते NPK बरोबर न देता थोड्या शेणखतात 5 ते 7 दिवस मुरवत ठेवावेत आणि नंतर द्यावेत. बेसल डोस देण्या आगोदर 5 ते 7 दिवस मिसळुन ठेवावे, आणि लागनीचे वेळी द्यावे.
या मुळे सुक्ष्म अन्न द्रव्यान्ना सेंद्रियचे कोटिंग होते, त्यामुळे NPK बरोबर त्याचे प्रेसीपिटेशन होत नाही. दिलेल्या खाताची उपयुक्तता पूर्ण पणे मिळते. किंवा बाजारात चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये मिळ्तात ती वापरावीत. ती थोडी महाग आहेत.
मोठी बांधनी किंवा भरणीचे वेळी देखिल असेच करावे.
** जीवाणु खते -
    रासा ख़ताची पहिली व तीसरी मात्रा दिल्या नंतर 10 दिवसांनी जीवाणु खते द्यावित.
आझोटोंबाक्टर 2 लीटर किंवा 2 किलो
पि एस बी        2 लीटर किंवा 4 किलो
ट्रायको            2 लीटर किंवा 2 किलो
5 ते 10 दिवस 100 किलो शेणखतात मिसळून सावलीत ठेवावे. थोड़ी ओल राहील याची काळजी घ्यावी. नंतर जमिनित ओल असताना सायंकाळी टाकावेत. किंवा लिक्विड जीवाणु ड्रिप मधून सोडावेत.
** फवारणी -
कमी खर्चाची आणि फार उपयुक्त अशा या फ़वारण्या आहेत.
1)    पहिली फवारणी
लागणी पासून 45 दिवसानी व खोडव्यासाठी 30 दिवसानी आणि नंतर प्रत्येक 20 दिवसाचे अंतराने .
# पोषण द्रव्ये #
   *18:18:18/19:19:19/  - 600 ग्राम
   * चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये - 150 मिली
           8 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
    * IBA                             - 2 ग्राम
    * SIX BA                        - 2 ग्राम
सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि वरील 8 लीटर पाण्यात मिसळावे.
# पीक संरक्षके #
      * क्लोरोपायारिफोस         - 120 मिली
      * बाविस्टिन                     - 120 ग्राम
वरील 8 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी. एकरी 4 पम्प पुरातात.
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान खोड किड येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
2)    दूसरी फवारणी -
लागणी पासून 65 दिवसानी व खोडव्यासाठी 50 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
   *13:40:13/12:61:0/17:44:0- 900 ग्राम
   * चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये          - 200 मिली
           12 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
    * IBA किंवा GA (Progibb) - 3 ग्राम
    * SIX BA                       - 3 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि वरील 12 लीटर पाण्यात मिसळावे.
# पीक संरक्षके #
      * क्लोरोपायारिफोस         - 180 मिली
      * बाविस्टिन                    - 180 ग्राम
वरील 12 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 6 पम्प पुरातात.
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान खोड किड येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे
3)    तीसरी फवारणी
लागणी पासून 85 दिवसानी व खोडव्यासाठी 70 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
   *13:40:13/12:61:0/17:44: 0 - 1500 ग्राम
   * चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये            -   300 मिली
           20 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
    *  GA  (Progibb)               - 6 ग्राम
    * SIX BA                        - 6 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि
  वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे
# पीक संरक्षके #
   * मोनोक्रोटोपास (आवश्यकतेनुसार)  - 300 मिली
   * हेक्झकोनेझाल (आवश्यकतेनुसार)  - 300 ग्राम
      वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 10 पम्प पुरातात.
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे.
4)    चौथी फवारणी
लागणी पासून 105 दिवसानी व खोडव्यासाठी 90 दिवसानी
ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे देता येणेची शक्यता कमी असते.
# पोषण द्रव्ये #
  *13:40:13/12:61:0/17:44: 0 - 1500 ग्राम
  * पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 500 ग्राम
  * काल्शियम नायट्रेट (चिलेटेड)      - 500 ग्राम
           20 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
    *  GA (Progibb)               - 7 ग्राम
    * SIX BA                        - 7 ग्राम              
  अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि
    वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे.
    * ट्रायकाँन्टेनाँल 0.1%        - 500 मिली
    * सी विड एक्स्ट्राक्ट           - 500 मिली
         वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 10 पम्प पुरातात.
5)   पाचवी फवारणी (शक्य झालेस)
लागणी पासून 125 दिवसानी व खोडव्यासाठी 105 दी
# पोषण द्रव्ये #
  *12:61:0 / 17:44            - 1800 /2500 ग्राम
  * पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 600 ग्राम
           26  लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
    *  GA   (Progib)             - 10 ग्राम
    * SIX BA                        - 10 ग्राम
      अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि
      वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
    * ट्रायकाँन्टेनाँल (0.1%)       - 1000 मिली
    * सी विड एक्स्ट्राक्ट           - 500   मिली 
         वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात,  वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 13 पम्प पुरातात.
अधिक माहिती - कृषिभूषण संजीव माने आष्टा
संपर्क : डी. बी. फोंडे, 9850552552
(वरिष्ठ शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.)