Saturday, January 16, 2016

कोबी

कोबी
हवामान आणि जमीन - 
कोबीच्या लवकर येणार्या जातींसाठी हलकी ते मध्यम उशीरा येणार्या जातींसाठी सुपीक, भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ -६.५ अस मात्र आम्लयुक्त जमिनीत कोबीच्या पिकास बोरॉन मॉलिब्डेनम  या सूक्ष्म अन्नद्रव्यांची  कमतरता पडून रोपे रोगट दिसू लागतात आणि उत्पादन  घटते.

बीजप्रक्रिया - 
५० ते १०० ग्रॅम बियासाठी २० ते ३० मिली जर्मिनेटर आणि १५ ते २० ग्रॅम प्रोटेक्टंटची पेस्ट बनवून बीजप्रक्रिया करावी.
गादीवाफ्याच्या रुंदीशी समांतर ५ ते ६ सेंमी अंतरावर  पेरावे. साधारणपणे एका चौरस मीटरला १ ग्रॅम बियाणे पडेल अशा तर्हेने बियाणे विरळ पेरावे. साधारणपणे ३ ते ५ आठवड्यांत कोबीची रोपे लागवडीसाठी तयार होतात.

हंगाम, बियाण्याचे प्रमाण आणि लागवडीचे अंतर
खरीप हंगामासाठी रोपवाटीकेत बियाण्याची पेरणी मे - जूनमध्ये करावी. रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी महिन्यात रोपे तयार करावीत.
- ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत रोपांची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळते आणि मालाचा दर्जा उत्तम मिळतो.

एक हेक्टर लागवडीसाठी बियाणे - 
हळवे वाण 500 gm
गरवे वाण 300-400 gm
संकरित वाण 200-250 gm

बियाण्यांच्या पेरणीनंतर हंगामानुसार ३ -४ आठवड्यांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. गादीवाफ्यावरून रोपे उपटून शेतात लावताना आदल्या दिवशी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे. त्यामुळे रपे उपटतान मुळांना इजा होणार नाही.
रोपांची आटोपशीर  वाढ मध्यम आकाराचा गड्डा आणि लवकर काढणीला येणार्या जातींसाठी ४५ x ४५ cm किंवा ३० x ३० cm अंतर ठेवावे. 
मोठा गड्डा, रोपांची पसरट वाढ आणि अशिरा तयार होणार्या जातींची लागवड ६० x ६० cm किंवा ७० x ७० cm अंतरावर करवी. रोपांची पुनर्लागवड करताना १० लि. पाण्यामध्ये १००मिली जर्मिनेटर घेऊन त्ये द्रावणात रोपे पुर्ण बुडवून लावावीत. रोप लावताना मुळ्या जमिनीत सरळ राहतील अशा तर्हेन रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. लागवडीनंतर दुसर्या किंवा तिसरया दिवशी आंबवणी द्यावी.

लागवड पद्धती - 
पावसाळयाच्या सुरुवातीला ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीच्या खताचे पीक घेऊन ते जमिनीत गाडावे. हिरवळीचे पीक घेणे शक्य नसल्यास हेक्टरी १५ ते २० टन शेणखत, लेंडीखत किंवा कोणतेही सेंद्रिय खत जमिनीत मिसळून द्यावे. नंतर २ मीटर रुंद आणि ३ मीटर किंवा सोयीस्कर लांबीचे वाफे तयार करावेत. खरीप हंगामात ४५ ते ६० सेंटिमीटर अंतरावर सरी- वरंबे पाडून वरील आकराचे वाफे बांधून घ्यावेत. पाणी देण्यासाठी ड्रीप इरिगेशन पद्धत वापरावी.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण - 
१) मावा : (अॅफिड्स ) - किडीची पिल्ले हिरव्या रंगाची असतात, तर कीड काळसर रंगाची असते. कीड कोवळ्या पानांतून अन्नरस शोषून घेतात. पानाच्या बेचक्यात, पानाखाली, फुलकोबीच्या गड्ड्याच्या आतील बाजूस ही कीड asate. पाने पिवळी होऊन गळून पडतात. रोपाची वाढ खुंटते, पाने आकसल्यासारखी रोगट, पिवळी दिसतात. 
उपाय : ढगाळ हवामानात या किडीची झपाट्याने वाढ होते. यासाठी १० लिटर पाण्यात २५ मिली लिटर मॅलाथिऑन आणि २० ग्रॅम प्रोटेक्टंट मिसळून १० ते २५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

२) चौकोनी ठिपक्याचा पतंग -(डायमंड बॅक मॉथ) - या किडीचा पतंग पानकोबी तसेच सर्व कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पिवळसर राखी रंगाची अंडी घालतो. त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.या अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खातात. त्यामुळे पानावर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. सप्टेंबर ते मार्च या काळात  ही कीड सर्वत्र आढळते.
उपाय - १० लिटर पाण्यात २० मिली क्विनॉलफॉस किंवा ४ % निंबोळी अर्काच्या प्रोटेक्टंट २० ग्रॅमसह (रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर) १० -१२ दिवसांच्या अंतराने २ -३ फवारण्या कराव्यात.

३) मोहरीवरील काळी माशी -(मस्टर्ड सॉ फ्लाय )- ही बारीक, जाडसर काळपट पिवळसर रंगाची माशी असून ती पानांच्या पेशीत अंडी घालते. Tyapasun nighalelyaकाळसर रंगाच्या अळ्या पिकाची कोवळी पाने खातात. या अळ्या कोवळ्या पानाच्या कडेपासून पाने खाण्यास सुरुवात करून संपूर्ण रोपांवरील पाने खातात. पानकोबी, फुलकोबी या पिकांशिवाय नवलकोल, मुळा, मोहरी इत्यादी पिकांवर ही कीड आढळते.

4) कोबीवरील फुलपाखरू (कॅबेज बटरफ्लाय) - कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पांढर्या रंगाचे मोठे फुलपाखरू अंडी घालते. त्यातून निघणाऱ्या हिरव्या अळ्या पाने खातात. पानांवर असंख्य छिद्रे दिसतात.

५) पानावर जाळी विणणार्या अळ्या (लीफ वेबर ) - या किडीच्या फिकट हिरव्या रंगाच्या आह्या पानाचा पृष्ठभाग खातात पाने गुंडाळून स्वत: भोवती जाळी तयार करतात. त्यामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते.

६) गड्डा पोखरणारी अळी (ग्रॅम कॅटरपिलर ) - फिकर पिवळसर विटकरी रंगाचे हे पतंग कोबीच्या पानांवर अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या तांबूस करड्या रंगाच्या असतात. या अळ्या पाने खातात आणि पानांमागे लपून बसतात. तसेच गड्डे पोखरून आत शिरतात. त्यामुळे गड्ड्यांची प्रत खराब होते.

उपाय : वरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात १० मिली मॅलथिऑन आणि २० मिली क्विनॉलफॉस (इकॅलक्स) किंवा ४ % निंबोळी अर्क + २५ ग्रॅम प्रोटेक्टंट एकत्र मिसळून लागवडीनंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या दिल्यास कोबीवरील पाने कुरतडणार्या तसेच गड्डा पोखरणार्या सर्व प्रकारच्या अळ्यांचे नियंत्रण होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत फवारण्या प्रोटेक्टंटचा नियमित वापर केल्यास किडीस प्रतिबंध होतो.

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण - 
१) रोपे कोलमडणे (डॅपिन ऑफ) - हा रोग जमिनीत वाढणार्या बुरशीपासून होतो. या रोगाची लागण प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामानात, पाण्याचा योग्य निचर न होणार्या जमिनीत होतो. रोपे निस्तेज पिवळसर दिसतात. रोपांचे जमिनीलगतचे खोड कुजून रोपे पडतात.
उपाय : रोपे नेहमी पाण्याचा उत्तम निचरा असलेल्या ठिकाणी गादीवाफ्यावर तयार करावीत. पेरणीपूर्वी १३ ग्रॅम कॅपटॉंन किंवा फायटेलॉन १० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण गादीवाफ्यावर झारीने शिंपडावे. तसेच पेरणीपूर्वी बियाण्यास व पुनर्लागवडीत रोपांना जर्मिनेटरची प्रक्रिया करा.

२) काळी कूज (ब्लॅक लेग) - बियाण्यात वाढणार्या बुरशीपासून या रोगाचा प्रसार होतो. रोगाचे प्रादुर्भाव झालेल्या रोपांची सर्व मुळे खालून वरच्या भागाकडे कुजतात.
उपाय : बियाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. त्यासाठी १ ग्रॅम कॅपटॉंन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात पानकोबी, फुलकोबी किंवा नवलकोल बियाणे prakriya karun पेरणीसाठी वापरावे.

३) केवडा (डाऊनी मिल्ड्यू ) - रोगग्रस्त पानांवर पिवळसर किंवा जांभळट रंगाचे डाग दिसतात. पानाच्या खालच्या भागावर भुरकट केवड्याच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. गड्ड्यांची काढणी लांबल्यास गड्ड्यांवर काळपट चट्टे दिसतात आणि असे गड्डे सडू लागतात.

४) करपा (ब्लॅक स्पॉट) - या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकर किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसू लागतात. नंतर हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला सर्व भाग करपल्यासारख्या काळपट रंगाचा दिसतो.
उपाय : केवडा व करपा दोन्ही रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच पिकावर १% बोर्डो मिश्रण फवारावे किंवा १० लिटर पाण्यात २५ मिली थ्राईवर + २५ मिली क्रॉंपशाईनर+ २५ ग्रॅम डायथेन एम - ४५ हे औषध मिसळून १० दिवसांच्या अंतराने २ फवारण्या करा.

५) भुरी (पावडरी मिल्ड्यू ) - कोबीवर्गीय पिकांवर भुरी हा बुरशीजन्य रोग क्वचित प्रसंगी आढळतो. सुरुवातीला पानांच्या वरच्या बाजूला पांढर्या रागाचे ठिपके दिसतात. काही काळाने संपूर्ण पानावर करड्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लागण दिसून येताच १० लिटर पाण्यात थ्राईवर २५ मिली + २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक मिसळून फवारणी करवी.

६) मुळकुजव्या (फ्लबरूट ) - या बुरशीजन्य रोगामुळे झाडाच्या मुळांवर अनियमित गाठी तयार होतात. झाडाची पाने पिवळी पडतात आणि सुकतात. ज्या जमिनीचा  सामू ७ पेक्षा कमी आहे अशा जमिनीत  या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो.
उपाय : जमिनीत चुना टाकून जमिनीचा आम्ल - विम्ल निर्देशांक वाढवावा. रोपांच्या लागवडीपूर्वी रोपे जर्मिनेटर १० मिली आणि २ ग्रॅम बाविस्टीन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.

पिकांची काळजी :
वरील कीड, रोग, विकृतींवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच भरघोस, दर्जेदार उत्पादनासाठी खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात. 
फवारणी :
१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : ( लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २५० लि. पाणी.

No comments:

Post a Comment