Wednesday, January 18, 2017

डाळींब उत्पादने

डाळींब उत्पादने

डाळिंब 

 डाळिंबामध्ये आम्लपदार्थ, साखर, जीवनसत्चे, खनिजे ही भरपूर प्रमाणात आढळतात. डाळिंबाचा रस हा आनुवंशिकतेने येणा-या मधुमेह आजाराला बरा करू शकतो.

 डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आढळतात. डाळिंबाचा रस ह्या रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या आजाराला दूर ठेवतो. त्वचेवर तेज येण्यासाठी आणि स्मृती वाढविण्यासाठी देखील डाळिंबाचा रस उपयोगी पडतो.


डाळिंब प्रक्रिया उद्योग

मशिनरी पाहण्यासाठी www.bertuzzi.in/pomegranate येथे भेट द्या.

धुलाई वर्गीकरण – बिया काढणे -

डाळिंबाचे साल कठीण असते. अयोग्य तंत्रज्ञान वापरल्यास गुणवत्ता खालावते. शिवाय खाण्यासाठी वापरले जात असल्याने आरोग्यास हानिकारक ठरू शकते. बाजारात बर्याच कंपन्या आपापले मशिनींची जाहिरात करत असतात. ग्राहकांनी आपल्या परिसरातील डाळिंबाचे उत्पादन पाहून योग्य ती मशीन निवड करावी. जागतिक स्तरावर उपलब्धता, विक्री पश्चात सेवा, प्रती तास उत्पादन आणि त्यानुसार किंमत या सर्व बाबींचा विचार करायला हवे.डाळींब ज्युस -

डाळींबाच्या फळापासून रस काढून त्याची विक्री करणे हा आता तेजीत चालणारा व्यवसाय आहे.डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आढळतात. डाळिंबाचा रस ह्या रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या आजाराला दूर ठेवतो. त्वचेवर तेज येण्यासाठी आणि स्मृती वाढविण्यासाठी देखील डाळिंबाचा रस उपयोगी पडतो.बरेच आयुर्वेदिक औषधे तयार करणाऱ्या कंपन्या पुरवठा व्यवस्थित असेल तर खरेदी हुकमी बाजारपेठ उपलब्ध करून देतात. मशीन निवड करताना संपुर्ण स्टेनलेस स्टीलची मशीन निवड करावी.ज्युस संद्रिभवन -
रसायने आणि इंझायमनी युक्त रसमध्ये प्रक्रिया करून खाण्यास योग्य असा डाळिंबाचा ज्युस खाण्यास उपयुक्त ठरतो. यासाठी दुधावर प्रक्रिया करतात अश्या मशिनरी वापरली जातात. त्यामध्ये प्रोसेसिंग युनिट, साठवण टाक्या, वेगवेगळ्या क्षमतेचे पंप असे घटकांचा समावेश होतो. या प्रक्रियेस ते  तासांचा कालावधी लागतो. संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यावर रस स्पष्टीकरण अल्ट्रा-गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती करिता पाठविला जातो. मशीन निवड करताना संपुर्ण स्टेनलेस स्टीलची मशीन निवड करावी.


निर्जंतुकीकरणासाठी आणि जीवाणूंपासून मुक्त करणे आणि रस केंद्रीकरण हे पर्यायाने गरजेची प्रक्रिया आहे. रस स्वच्छ आणि कमी घनतेसाठी आणि एक ठराविक सुगंध पुनर्प्राप्ती संपुर्ण युनिट सुसज्ज असणे जरुरी आहे.